एकाच कारणाचा करते तपास दुनिया

Submitted by बेफ़िकीर on 15 March, 2013 - 01:44

एकाच कारणाचा करते तपास दुनिया
समजेचना कुणाला असते कशास दुनिया

कष्टांवरी दिनांच्या ती राहते उभी .. पण
पैशात लोळण्याला म्हणते विकास दुनिया

आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया

राहून अर्धपोटी तृप्तीत पाठ टेके
माझ्या लहानपणची ती दिलखुलास दुनिया

जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया

गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया

येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया

धुंदीमधे स्वतःच्या घे तू जगून मित्रा
करशील त्रास तितका देईल त्रास दुनिया

मदिरा खराब आहे हे सांगते मला अन्
घेते भरून पुढचा हातात ग्लास दुनिया

येथे जिवंत असणे इतकेच फार झाले
ही 'बेफिकीर' आहे मुडदेफरास दुनिया

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकाच कारणाचा करते तपास दुनिया
समजेचना कुणाला असते कशास दुनिया >>> समजेचना कुणाला.. खूपच ठाम मत होते आहे. ऐवजी कळले कधी कुणाला? असा प्रश्न केल्यास अधिक पटावे.. पण पुढे तसे आलेलेच आहे.

कष्टांवरी दिनांच्या ती राहते उभी .. पण
पैशात लोळण्याला म्हणते विकास दुनिया>>> सह्ही

जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया>>> चिंतनीय शेर आवडला

गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया ,

धुंदीमधे स्वतःच्या घे तू जगून मित्रा
करशील त्रास तितका देईल त्रास दुनिया... आणि

येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया>>>खूपच सुंदर

मदिरा, दारू.. सारख्याच मात्रा आहेत.. पण दारू प्रचलित आहे.

अगदी बारकाईने वाचून मत मांडलेले आहे.
पण एकूण गझल अप्रतिम म्हणावी अशीच
.................................................................शाम

क्र. ३ मधला विचार, क्र. ४ मधला अनुभव, क्र. ७ मधल्या शेरातला भणंगपणा आणि सोबतची बेपर्वाई, क्र. ८ मधला सल्ला हे आवडले.

मतला भन्नाट!!!

आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया.... हम्न ! खरयं.

जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया....वा !

धुंदीमधे स्वतःच्या घे तू जगून मित्रा
करशील त्रास तितका देईल त्रास दुनिया...... ये ब्बात !

मक्ता क्या कहेने !

आवडली गझल बेफिजी,

धन्यवाद !

कष्टांवरी दिनांच्या ती राहते उभी .. पण
पैशात लोळण्याला म्हणते विकास दुनिया
व्व्व्वा ! ! !

जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया

गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया

हे आणि इतर काही खूप आवडले.
आवडली गझल.

आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया

फार सुंदर.

येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया

येथे जिवंत असणे इतकेच फार झाले
ही 'बेफिकीर' आहे मुडदेफरास दुनिया

सहज आलेत. आवडले.

गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया

हा शेर आवडता-आवडता राहिला. दुसरी ओळ फारच सुंदर.
गझल आवडली.

धन्यवाद.

>> येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया
सुन्दर! फार आवडला हा. त्या 'की' मधल्या धडपडीवर तिच्या हृदयात कळ उठणार नक्कि
>> मदिरा खराब आहे हे सांगते मला अन्
घेते भरून पुढचा हातात ग्लास दुनिया
टाळीचा शेर.
technically एकूण गझल मस्तच.

सर्वच शेर आवडलेत.

कष्टांवरी दिनांच्या ती राहते उभी .. पण
पैशात लोळण्याला म्हणते विकास दुनिया
.
राहून अर्धपोटी तृप्तीत पाठ टेके
माझ्या लहानपणची ती दिलखुलास दुनिया
.
येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया
.
मदिरा खराब आहे हे सांगते मला अन्
घेते भरून पुढचा हातात ग्लास दुनिया
.
येथे जिवंत असणे इतकेच फार झाले
ही 'बेफिकीर' आहे मुडदेफरास दुनिया

हे जास्तच आवडले. Happy

काडीची किंमत नाही मावळत्यास येथे
उगवत्यालाच वंदते ही मतलबी दुनिया...

*मला वृत्ताचे विशेष ञान नाही...
गोड मानून घ्या..

आवडली..
बहुत बडीया..

मस्त

एकाच कारणाचा करते तपास दुनिया
समजेचना कुणाला असते कशास दुनिया

आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया

राहून अर्धपोटी तृप्तीत पाठ टेके
माझ्या लहानपणची ती दिलखुलास दुनिया

जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया

गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया

येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया

धुंदीमधे स्वतःच्या घे तू जगून मित्रा
करशील त्रास तितका देईल त्रास दुनिया

मदिरा खराब आहे हे सांगते मला अन्
घेते भरून पुढचा हातात ग्लास दुनिया

पूर्ण गझल अतिशय आवडली प्रत्येक शब्द जणू धाग्यात विणावा तसा आहे.

कष्टांवरी दिनांच्या ती राहते उभी .. पण
पैशात लोळण्याला म्हणते विकास दुनिया

या शेरातील सर शंका म्हणून विचारतो "दिन" आणि दीन या दोन शब्दात फरक
आहे इथे "दीन" हा शब्द अभिप्रेत असावा.कारण "दिन" हा शब्द मी "दीन" असा लिहिल्याने मी आमच्या मेहेंदळे गुरुजींचा खूप मार खाल्ला होता. कृपया लोभ असावा.

खणखणीत !!
गणेशजी आपण म्हणता त्याप्रमाणे 'दीन्'हा शब्द एकटाच लिहिल्यास 'द' दीर्घ बरोबर आहे.
पण इथे 'दिनांच्या' हा शब्द असल्याने त्यातला 'द' ह्रस्वच योग्य आहे असे मला वाटते.
कॄ. गैं. न. Happy

बेफिकीर,

खूप सुंदर आणि समर्पक रचना आहे. (मला गझलेतलं काही कळत नाही म्हणून रचना म्हणतोय.) भकास शेराचं प्रयोजन कळलं नाही.

आ.न.,
-गा.पै.

आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया


धुंदीमधे स्वतःच्या घे तू जगून मित्रा
करशील त्रास तितका देईल त्रास दुनिया

शेर आवडले!

आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया

गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया

हे शेर सर्वात आवडले.

सुरेख गझल बेफिजी..

जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया

आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया

Too Good

दिन बद्दल गणेशजींशी सहमत
पहिले पाच-एक शेर मनापासून तितकेसे आवडले नाहीत
बाकीचे अप्रतीमच आहेत

मदिरा खराब आहे ....अशी सुरुवात असलेली एक कविता तुमच्या एका काव्य संग्रहात असल्याचे स्मरते आहे बेफीजी

Pages