बे एरिया

Submitted by Sanjeev.B on 9 March, 2013 - 07:31

तर मित्रांनो आणि मैत्रिणिंनो, शिर्षक वाचुन सरसावुन बसलात ना, आणि खास करुन बे एरियाकरांनो, तुमच्या बद्दल नाही हो लिहले आहे, वाचत रहा म्हणजे कळेल तुम्हा सर्वांना.

आमचा एक मित्र आहे, त्याची बोलण्याची एक विशीष्ट पध्दत आहे. कधीही जेवणानंतर भेटणार तर हा विचारणारच, "जेवण झाले का बे", त्याला काही काम दिले असल्यास, काम झाले कि नाही विचारल्यास, "होऊन राहिलंय ना बे, अजुन ऑफिसातुन निघाला नाही असे विचारल्यास, "निघालोच बे".

त्याला एकदा विचारले प्रत्येक वाक्यात तु "बे" का वापरतोस, तर म्हणाला, "अरे आमच्या गावकडे अशीच पध्दत आहे ना बे"

तर अस्मादिकांना असे वाटले कि त्याचे गाव हे अमेरिका स्थित सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये असावं, आणि तिथे असे एकमेकांस आदराने "बे" म्हणत असावे म्हणुन त्या भागास बे एरिया म्हणत असावे, हे तपासण्यासाठी आम्ही मायबोली.कॉम च्या बे एरिया ह्या गप्पांचे पान पाहिले, तर आम्हांस असे काही आढळले नाही.

त्या रात्री आम्हास स्वप्नात असे दिसले, आम्ही बे एरिया मध्ये फिरतोय, तर पाहुया आम्ही स्वप्नात बे चे काय पाढे (उजळणी) म्हंटले ते. बे च्या पाढे वरुन आठवलं, जसे आपले राष्ट्रगीत आहे, तसे बे एरिया चे गीत हे बे चे पाढे असायला हवे. कित्ती छान वाटते ते बघा, पहा प्रत्येक ओळी मध्ये बे आहे -
बे एकं बेssss
बे दुणे चाssssरं
बे त्रिक सहाssss
बे चौक आठंssss
बे पंचे दाहाssss.

हे म्हणजे बे चा जयजयकार केल्यासारखे वाटते, प्रत्येक ओळीत बे चं गुणगाण केले आहे असे वाटते.

असो, तर आम्ही स्वप्नात बे एरिया मध्ये फिरत होतो, तिथे समुद्र किनारी, जे भारतात काहीच समुद्र किनारी लपुन छपुन पाहायला मिळतं, ते आम्हांस असे मुक्तपणे पाहायला मिळाले, ना कुणाचे भीती, ना कुणाची लाज, हे असे बेलगाम आणि बेदरकार वागणे पाहुन आम्ही मनातच म्हंटलो "मस्त आहे "बे"", आणि एकदमच आम्ही झोपेतुन उठलो आणि मना मध्ये बोललो काय ही लोकं एकदम बेफिकिर.

आम्हास माहित आहे असे बेसुमार लेखन येथे कुणी वाचत नाही, तरीही ....

Proud Wink

धन्यवाद

- संजीव बुलबुले / ०९.मार्च.२०१३

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेळगावचा बेवडा बेडूक बेकरीतला बेदाणा बेहिसाब खाऊन बेलगाम झाला आणि बेफाम धावत सुटला ..
Biggrin Rofl Lol Rofl Lol Rofl Biggrin Rofl