बे एरिया

मराठी सिनेमा, बे एरिया तर्फे 'नागरिक' चित्रपटाचं प्रदर्शन : १९ जुलै, २०१५

Submitted by rar on 7 July, 2015 - 19:28

'कॉफी आणि बरंच काही' आणि 'कोर्ट' या चित्रपटांच्या यशस्वी प्रदर्शनानंतर आता मराठी सिनेमा बे एरिया प्रदर्शित करत आहे अजून एक दमदार, लोकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट 'नागरिक'.
महाराष्ट्रातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आधारीत असलेल्या ह्या चित्रपटात, मराठी सिनेजगतातील रथी-महारथींनी भूमिका साकारल्या आहेत. मराठीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानल्या जाणार्‍या 'सिंहासन' चित्रपटाचं आजच्या काळातलं रूप म्हणजे 'नागरिक' अशी समिक्षकांकडून पसंती मिळालेला हा चित्रपट. या चित्रपटाद्वारे सुप्रसिद्ध कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचं रूपेरी पडद्यावर पुनरागमन होत आहे, ही या चित्रपटाची खास जमेची बाजू.

बे एरिया

Submitted by Sanjeev.B on 9 March, 2013 - 07:31

तर मित्रांनो आणि मैत्रिणिंनो, शिर्षक वाचुन सरसावुन बसलात ना, आणि खास करुन बे एरियाकरांनो, तुमच्या बद्दल नाही हो लिहले आहे, वाचत रहा म्हणजे कळेल तुम्हा सर्वांना.

आमचा एक मित्र आहे, त्याची बोलण्याची एक विशीष्ट पध्दत आहे. कधीही जेवणानंतर भेटणार तर हा विचारणारच, "जेवण झाले का बे", त्याला काही काम दिले असल्यास, काम झाले कि नाही विचारल्यास, "होऊन राहिलंय ना बे, अजुन ऑफिसातुन निघाला नाही असे विचारल्यास, "निघालोच बे".

त्याला एकदा विचारले प्रत्येक वाक्यात तु "बे" का वापरतोस, तर म्हणाला, "अरे आमच्या गावकडे अशीच पध्दत आहे ना बे"

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बे एरिया