Submitted by आनंद पेंढारकर on 12 March, 2013 - 03:01
प्रेम केले या जगावर चूक झाली
होत गेलो व्यर्थ कातर चूक झाली
चालणे गगनासवे झालेच नाही
कौल ओढुन बांधले घर चूक झाली
शेवटी कळलेच सार्यांना नको ते
पापणीतुन निसटली सर चूक झाली
बोलणे होते जरूरी ज्या ठिकाणी
टाळले होणे अनावर चूक झाली
द्या गुन्ह्याची कल्पना मग फास लावा
एवढेसे बोललो तर चूक झाली ?
तो कवीचा चंद्र होता स्वप्न माझे
आणली डोळ्यात भाकर चूक झाली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बोलणे होते जरूरी ज्या
बोलणे होते जरूरी ज्या ठिकाणी
टाळले होणे अनावर चूक झाली>>> मस्त!
सहजता आहेच, साधेपणाही.
शुभेच्छा!
तो कवीचा चंद्र होता स्वप्न
तो कवीचा चंद्र होता स्वप्न माझे
आणली डोळ्यात भाकर चूक झाली
अप्रतिम शेर आहे...!! स्वप्न आणि वास्तवातला विरोधाभास ठळक झाल्याने वाह असं आपसूकच म्हणावंसं वाटतं.
( कवी आणि भाकरीचा प्रश्न याबद्दलचं असंच एक स्फुट ऑर्कुटवर वाचलं होतं. एका शेरात तो आशय पहायला मिळाला )
प्रेम केले या जगावर चूक
प्रेम केले या जगावर चूक झाली
होत गेलो व्यर्थ कातर चूक झाली>> वा! जाणवलेला फोलपणा फार सहज आलाय...
चालणे गगनासवे झालेच नाही>> मस्त मिसरा
कौल ओढून बांधले घर चूक झाली>> क्या बात....
शेवटी कळलेच सार्यांना नको ते
पापणीतून निसटली सर चूक झाली>>
बोलणे होते जरूरी ज्या ठिकाणी
टाळले होणे अनावर चूक झाली>> सुंदर... सहज..
द्या गुन्ह्याची कल्पना मग फास लावा
एवढेसे बोललो तर चूक झाली ?>> अह्हा! लयीत एक एक शेर वाचत येताना, हा मस्तच वाटतोय
तो कवीचा चंद्र होता स्वप्न माझे
आणली डोळ्यात भाकर चूक झाली>> गूड वन
मस्त गज़ल आनंदजी....! आणखीही वाचण्यास आवडतील..
सहजता भावलीच
शेवटी कळलेच सार्यांना नको
शेवटी कळलेच सार्यांना नको ते
पापणीतून निसटली सर चूक झाली
बोलणे होते जरूरी ज्या ठिकाणी
टाळले होणे अनावर चूक झाली
द्या गुन्ह्याची कल्पना मग फास लावा
एवढेसे बोललो तर चूक झाली ?
>>>>>>
शेर काळजाला भिडला
व्वा ... क्या बात है
तो कवीचा चंद्र होता स्वप्न
तो कवीचा चंद्र होता स्वप्न माझे
आणली डोळ्यात भाकर चूक झाली>>> सुंदर शेर
वैभवचा शेर आठवला...
"भूक जाळू लागल्यावर चंद्र भाकर होत नाही
रक्त गोठू लागल्यावर आभाळ चादर होत नाही"
मस्तच. आवडली.
मस्तच. आवडली.
वा, सुर्रेखच.......
वा, सुर्रेखच.......
छान गझल... छोटीशी शंका
छान गझल...
छोटीशी शंका <<<निसटली सर>>> इथे एका गुरूऐवजी दोन लघू वापरलेत, असं चालतं का? वृत्त भंगत नाही का?
पापणीतून आणि ओढून मधले उकार
पापणीतून आणि ओढून मधले उकार र्हस्व हवेत... शंका निघालीच आहे म्हणून, नाहीतर टाळले होतेच!
"पापणीतुन" आणि "ओढुन" पाहिजे
"पापणीतुन" आणि "ओढुन" पाहिजे होतं. मान्य !
वा ...वा मस्तच !! भाकरीचा शेर
वा ...वा मस्तच !!
भाकरीचा शेर तर जबरी !!
द्या गुन्ह्याची कल्पना मग फास
द्या गुन्ह्याची कल्पना मग फास लावा
एवढेसे बोललो तर चूक झाली ?
तो कवीचा चंद्र होता स्वप्नमाझे
आणली डोळ्यात भाकर चूक झाली
वाह !
मतला फार सहज आलाय,
मतला फार सहज आलाय, आवडला!
पुलेशु!
अवांतरः याच रदीफमधली ही जुनी गझल सापडली (काफिया वेगळा आहे)
http://www.maayboli.com/node/33628
सुंदर.
सुंदर.
आवडली...!
आवडली...!
धन्यवाद !
धन्यवाद !