दु:ख

Submitted by समीर चव्हाण on 11 March, 2013 - 02:28

निराशेच्या निबिड ह्या जंगलाचे
करावे काय मी सांगा मनाचे

जसा रस्ता धुक्याने वेढलेला
उदासी घेरुनी आयुष्य त्याचे

व्यथा थैमान घालाव्यात हृदयी
चहूबाजूंस वारे वेदनांचे

अशी समजूत घालावी मनाची
कुणावाचून का अडते कुणाचे

कधीची सोडली आशा तुझी मी
न आता दु:ख साथीला कशाचे

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोझिंग नसलेली गझल.

अनेक नवकवींनी काहीतरी शिकावे ह्यातून.

साधेपणा किती असावा ह्याचे उदाहरण.

मागे एकदा चित्तरंजन ह्यांनी "ग्रिटींग कार्डीय भावविव्हलता" हा शब्दप्रयोग केला होता. ती नसणे म्हणजे काय ह्याचा वस्तुपाठ घालून देणारी गझल.

खूप धन्यवाद समीर!

जसा रस्ता धुक्याने वेढलेला
उदासी घेरुनी आयुष्य त्याचे

अशी समजूत घालावी मनाची
कुणावाचून का अडते कुणाचे

सहज आणि सुंदर शेर

गणेश सोनावणे

अशी समजूत घालावी मनाची
कुणावाचून का अडते कुणाचे........... क्या बात है!!!!

शब्दबंबाळपणा, अलंकारिकता टाळूनही किती प्रभावी लिहिता येते याचा वस्तुपाठच मिळाला.

धन्यवाद समीर.

जसा रस्ता धुक्याने वेढलेला
उदासी घेरुनी आयुष्य त्याचे

अशी समजूत घालावी मनाची
कुणावाचून का अडते कुणाचे

मस्तच. . उदासीवाला सॉलीड आहे.

निराशेच्या निबिड ह्या जंगलाचे
करावे काय मी सांगा मनाचे...अप्रतिम !!!

जसा रस्ता धुक्याने वेढलेला
उदासी घेरुनी आयुष्य त्याचे......क्या ब्ब्बात !

अशी समजूत घालावी मनाची
कुणावाचून का अडते कुणाचे.....ह्म्न !

सॉलिड गझल !

धन्यवाद!

<<< अशी समजूत घालावी मनाची
कुणावाचून का अडते कुणाचे

कधीची सोडली आशा तुझी मी
न आता दु:ख साथीला कशाचे >>>

साधे पण खुपच मनाला भिडणारे...

निराशेच्या निबिड ह्या जंगलाचे
करावे काय मी सांगा मनाचे>>>> क्या ब्बात.. जबरी मतला

सुंदर गझल...आवडली

निराशेच्या निबिड ह्या जंगलाचे
करावे काय मी सांगा मनाचे>>
सहज..

अशी समजूत घालावी मनाची
कुणावाचून का अडते कुणाचे..
आपण ज्या प्रकारे बोलतो तितक्याच सहजतेचा शेर..
मनात शिरणारा..

जसा रस्ता धुक्याने वेढलेला
उदासी घेरुनी आयुष्य त्याचे

हा शेर सर्वात आवडला.

निराशेच्या निबिड ह्या जंगलाचे
करावे काय मी सांगा मनाचे

अशी समजूत घालावी मनाची
कुणावाचून का अडते कुणाचे

कधीची सोडली आशा तुझी मी
न आता दु:ख साथीला कशाचे

छान शेर, आवडले!