Submitted by हेलबॉय on 9 March, 2013 - 02:42
घरी तयार केलेले पदार्थ आणि बाहेर मिळणारे पदार्थ यांच्या चवीत फरक असण्याचे कारण काय असते? बाहेरचे पदार्थ प्रामुख्याने चवीसाठी खाल्ले जातात .
बाहेरचे पदार्थ उदा- सामोसे ,ढोकळा, कचोरी, भेळ, बटाटेवडे, भजी पावभाजी, मटण चिकनच्या डीशेस, बिर्याणी ई ई घरी करुन बघितल्यास बाहेरसारखी चव येत नाहि .याचे काय कारण असावे?....काही सिक्रेट इनग्रेडीएन्ट किंवा पद्धत असते का..?
आपणास जर असे सिक्रेट इनग्रेडीएन्ट किंवा प्रोसेस माहीती असतील काही फंडे ठाऊक असतील तर जरुर इथे द्यावेत... धन्यवाद
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विषय आणि प्रश्न नेमके असले की
विषय आणि प्रश्न नेमके असले की धागा भरकटत नाही
bumrang, आपल्याला इथे काही
bumrang, आपल्याला इथे काही चांगले लिहायचे नसेल तर आपण इथुन गेलात तरी चालेल, virtual शाल श्रीफळ देऊन सेंडॉप द्यायला लावू नका.
अश्वीनीमामी, नक्की रेसिपी द्या ग्रेव्हीच्या ,वाट बघतोय.
अहो चिडताय कशाला एव्हढे? धागा
अहो चिडताय कशाला एव्हढे?
धागा भरकटतोय.... धागा भरकटतोय अशी तुमचीच किरकिर चाललेली म्हणून एक टीप दिली
ऐकायचे असेल तर ऐका नाहीतर सोडुन द्या
हेलबॉय माझ्याकडे पण आहेत या
हेलबॉय माझ्याकडे पण आहेत या ग्रेव्हीज रेसेपी. अमा देतीलच, मी पण लिहीते नंतर.
पण ग्रेव्ही साठी मुख्य घटक म्हणजे कांदा, खोबरे, टॉमेटो, मगज ( यात भोपळा, कलिंगड वगैरेच्या बीया असतात, तो मगज थोड्या पाण्यात वाटुन गाळुन घेतात)तसेच नारळाचे दूध, भाज्यांच्या स्टॉक, काजू+ खसखस भिजवुन वाटुन वगैरे बेस असतोच.
आले लसुण चव वाढवायला आहेत. भाजी कशा पद्ध्तीने चिरता त्यावर पण अवलंबुन आहे. उदा. जालफ्रेझीमध्ये कोबी, सिमला मिर्च्या लांबट चिरल्या जातात. हॉटेलवाले भाज्यांचा किंवा चिकन मटण शिजवलेले पाणीच वापरुन त्याचा स्टॉक वापरतात.
भाज्यांची देठे, पाने वगैरे उकळवुन आटवतात, त्यात तमालपत्र, लवंग, दालचिनी स्वादाकरता, वासाकरता वापरतात. मटण चिकन उकळवलेले पाणी गाळुन त्यात पण खडा मसाला घालुन ते पाणी मटण किंवा बिर्याणीत वापरु शकता.
आणी व्हेजमध्ये भाज्यांकरता तयार ग्रेव्ही चिकन साठी पण वापरु शकता, किंवा उलट पण करु शकता.
टुनटुन, छान माहीती. याच
टुनटुन, छान माहीती.
याच बरोबर ग्रेव्हीचा थिकनेस आणि चव वाढवण्यासाठी त्यामध्ये 'कॉर्नसिरप' घालतात, ज्याने ग्रेव्हीचा टेक्श्चर, चव व थिकनेस वाढतो.
हो, आणी दही विसरलेच. दह्याने
हो, आणी दही विसरलेच. दह्याने सुद्धा थिकनेस येतो. दम आलु सारख्या डिशमध्ये दही मुख्य घटक आहे.
इ-टीव्हीवर विष्णू मनोहर यांनी
इ-टीव्हीवर विष्णू मनोहर यांनी बेसिक ग्रेव्हिज दाखवल्या होत्या. व्हाइट ग्रेव्ही, रेड, ग्रीन ग्रेव्हि.
अलीकडेच एका पुस्तकात पाहून कॉर्न कुर्मासाठी व्हाइट ग्रेव्ही केली, ती आणि एकंदर पदार्थ हॉटेलच्या तोंडात मारेल असा झाला होता.
ताजे खोबरे+ गरम पान्यात भिजवलेले खसखस-काजू+ हिरव्या मिरच्या यांचे वाटण. ते अर्धवट शिजल्यावर टमाटॉ प्युरी+ फेटलेले दही.
इ-टीव्हीवर विष्णू मनोहर यांनी
इ-टीव्हीवर विष्णू मनोहर यांनी बेसिक ग्रेव्हिज दाखवल्या होत्या. व्हाइट ग्रेव्ही, रेड, ग्रीन ग्रेव्हि.>>>>>>>>>>>>> लोकसत्ता पेपर मधे सुदधा त्यांच्या रेसिपिस ग्रेव्हीच्या छापल्या होत्या.. सावजी मसाल्याची पण खरी कृती दिलेली आहे
इथे विष्णू मनोहर यांच्या
इथे विष्णू मनोहर यांच्या बेसिक ग्रेव्हीज आहेत. http://www.loksatta.com/viva-news/indian-gravy-recipes-43548/
हे लोकसत्ताचे पान उघडल्यावर
हे लोकसत्ताचे पान उघडल्यावर एरर येतो
http://www.youtube.com/user/e
http://www.youtube.com/user/etvmarathimejwani
अश्विनीमामी आपले प्रॉमिस
अश्विनीमामी आपले प्रॉमिस विसरला की काय?
तुमच्या नणंदच्या रेसिपी टाकाणार आहात ना?
(No subject)
Pages