विद्युल्लता - महिला दिनानिमित्त प्रकाशचित्रे प्रदर्शन & एक झलक ( फोटो सर्कल सोसायटी आयोजित)

Submitted by सावली on 7 March, 2013 - 11:57

मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण.
महिला दिनानिमित्त महिला प्रकाशचित्रकारांनी काढलेल्या विविध क्षेत्रे पादाक्रांत करणार्‍या महिलाच्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन.
स्थळ : ठाणे कलाभवन
उद्घाटन : ८ मार्च, २०१३ संध्याकाळी ५:३०
प्रदर्शन ८ मार्च पासुन १० मार्च पर्यंत चालु राहिल

ज्यांना प्रत्यक्ष यायला जमणार नाही त्यांच्यासाठी या प्रदर्शनाची एक झलक कलाकिर्द ऑनलाईन ग्लिम्प्सेस

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार लोक्स. जमलं तर नक्की या आणि फोन करुन आलात तर मी तिथे वाट पाहिन.
वर एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर या एक्झिबिशनचे ग्लिम्प्सेस पहाता येतील
कलाकिर्द ऑनलाईन ग्लिम्प्सेस

खूप सुंदर प्रदर्शन होतं सावली. प्रोजेक्टकरता केवढी मेहनत घेतली असणार तुम्ही सगळ्यांनी हे प्रत्येक फोटो पहाताना कळत होतं. विद्युल्लतांचे कार्य, व्यक्तिमत्व पुरेपूर फोटोंमधून उमटले होतेच शिवाय प्रत्येक फोटो हा सुंदर कलाकारीचा नमुनाही होता. काम्पोझिशन, रंगसंगती, प्रकाश हे सगळं सहजतेनं येत होतं, कार्यकर्त्यांच्या कामगिरीपेक्षा ते फोटोमधे कुठेही वरचढ ठरत नव्हते हे विशेष.
मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक या फोटो प्रोजेक्टवर काम करणार्‍या तुम्हा सर्वांचे. तुझी भेट झाली हे तर खूपच छान झाले.

प्रदर्शनाला आलेल्या सगळ्यांना आणि लिंक बघितलेल्या सगळ्यांनाच मनापासुन धन्यवाद Happy
मुग्धानंद, अश्विनी तुम्ही आला होतात का? मला दिसला नाहीत आणि मी इथे लॉगिन झाले नव्हते त्यामुळे तुमची पोस्ट आधी पाहिली नव्हती.
शर्मिला, थँक्यु. तुम्हाला भेटता आले हे खरेच मस्त झाले. Happy

या प्रोजेक्टवर सगळ्यांनीच खुप मेहेनत घेतली होती. जे येऊ शकले नाहीत त्यांच्या साठी सांगते कि तिथे ज्यांचे फोटो लावले गेले त्या प्रत्येकाचे कार्य इतके मोठे होते कि अवाक व्हायला व्हावे.
हेच प्रदर्शन पुन्हा १६/ १७ मार्च ला नाशिक इथे आहे. पत्ता वगैरे इथे कळवते मी.

सावली, नाही जमलं गं यायला Sad सकाळपासून काही कामाकरीता बाहेर गेले होते ते दुपारी अडिच वाजता परत आले. उन्हातून भटकून आल्यावर जे गळफटले ते पुन्हा आवरुन बाहेर पडायचं त्राणच नाही राहिलं. शनिवारीच सकाळी यायला हवं होतं.