अब्रू गरीब घरची लुटते हजार वेळा ..

Submitted by ganeshsonawane on 7 March, 2013 - 06:55

मन एकदाच जुळते तुटते हजार वेळा
सल एकदाच होते सलते हजार वेळा

वाटे फुलातला हा मकरंद प्यार प्यावा
पण पाकळी फुलाची मिटते हजार वेळा

येथे बड्या महाली इज्जत गुलाम आहे
अब्रू गरीब घरची लुटते हजार वेळा

मज पावलांस आता कुठली दिशा मिळाली
नभ चंद्र तारकांचे मिळते हजार वेळा

बेरीज रोजची पण बाकी झिरोच येते
कोडेच जीवनाचे चुकते हजार वेळा

ही जीवनात माझ्या पडझड सुरू जहाली
माझेच भाग्य मजवर रुसते हजार वेळा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली आहे .....गझलसम्राट सुरेश भट स्टाइल्!

"झिरोच" ऐवजी एकादा अधिक चपखल शब्द सुचू शकला असता आपणास असे सहजच वाट्ले

सहज सुचते आहे म्हणून गै न ...................

दररोज जीवनाची बेरीज शून्य येते
कोडे असे कसे हे चुकते हजार वेळा

असे करू शकता

मीही चांगला पर्याय देवू शकतो हे पाहून माझे "पर्यायीगझल"-गुरू किती आनंदले असते नै !...अफसोस आता ते नाहीयेत (त्यांच्या मूळ रूपात!! ;).......... उगाच गैरसमज नकोत !!! :फिदी:)

अब्रू गरीब घरची लुटली जाते अशा अर्थी म्हणायचं आहे का?

आहे त्या स्वरूपात ती ओळ पोचली नाही (मला).

सल एकदाच होतो? की होते?

प्रथम मी सर्वाना धन्यवाद देवू इच्छितो कारण सर्वाना माझी गझल आवडली म्हणून. कुलकर्णी सर तुम्ही छान पर्याय सुचवला आहात खरे तर या शेराला मी बऱ्याचदा वाचले पण मला तो तसाच ठेवावासा वाटतो कारण आपण रोज पैसा गोळा करण्याचा प्रयत्न करतो पण हातात तो उरतच नाही. तुमचा पर्याय हि छान आहे पण खयाल बदलतो. पुन्हा एकदा धन्यवाद

आनंदयात्रीजी सल होते अथवा होतो हे बोलीभाषेवर अवलंबुन आहे. लुटते याचा अर्थ मला लुटली जाते असाच अभिप्रेत आहे आणि तो सहज आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

गणेशजी

गझल आवडली नाही. इथे मायबोलीवर तुम्हांला अनंत ढवळे, समीर चव्हाण, अ.अ. जोशी, ज्ञानेश, आनंदयात्री (नचिकेत जोशी), प्राजक्ता पटवर्धन (प्राजु), मिल्या, उमेश कोठीकर, क्रांती, दाद, तुषार जोशी, अरविंद चौधरी, मनिषा नाईक, ममता इ. एकापेक्षा एक चांगल्या गझला लिहीणारे चांगले लोक सहज भेटतील. त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शनही होईल. त्यांच्या गझलांचा आणि सूचनांचा अभ्यास करावासा वाटला तर तुमचे नाव देखील असेच नव्या गझल लिहू पाहणा-याला सुचवले जाईल.

एक प्रतिसादकजी,
तुमच्या स्पष्ट मताबद्दल धन्यवाद, मी ही गझलेत नवीनच आहे येथील तज्ञांकडून मलाही शिकायचे आहे तुम्ही जर गझल तज्ञ असाल तर या गझलेतील त्रुटी कृपया सांगितल्यात तर बरे होईल मला माझ्यात बदल करता येतील.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

तुम्ही जर गझल तज्ञ असाल तर Lol

कुणाला बरं वाटत नसेल तर आपल्याला ठाऊक असलेल्या निष्णात डॉक्टरांची नावं सुचवणा-याकडूनच उपचार करून घ्यायचे म्हणताय !! Uhoh