अब्रू गरीब घरची

अब्रू गरीब घरची लुटते हजार वेळा ..

Submitted by ganeshsonawane on 7 March, 2013 - 06:55

मन एकदाच जुळते तुटते हजार वेळा
सल एकदाच होते सलते हजार वेळा

वाटे फुलातला हा मकरंद प्यार प्यावा
पण पाकळी फुलाची मिटते हजार वेळा

येथे बड्या महाली इज्जत गुलाम आहे
अब्रू गरीब घरची लुटते हजार वेळा

मज पावलांस आता कुठली दिशा मिळाली
नभ चंद्र तारकांचे मिळते हजार वेळा

बेरीज रोजची पण बाकी झिरोच येते
कोडेच जीवनाचे चुकते हजार वेळा

ही जीवनात माझ्या पडझड सुरू जहाली
माझेच भाग्य मजवर रुसते हजार वेळा

Subscribe to RSS - अब्रू गरीब घरची