कहाणी

Submitted by समीर चव्हाण on 5 March, 2013 - 05:00

एक परी येईल कहाणी सांगुन जाइल
नक्षत्रांची सगळी गाणी गाउन जाइल

आकाशाच्या गवाक्षात येतील तारका
पाहण्यास तुज कोण-कोण डोकावुन जाइल

तुझे हास्य येईल घेउनी गंध निरागस
त्या गंधाची छाया जीवन व्यापुन जाइल

स्वप्नांची चाहूल तुला लागेल आगंतुक
कोण कुणासाठी आतुर पण होउन जाइल

स्वप्नझुल्यावर समीर झुलविल तुला निरंतर
झुलता-झुलता झुलणे जगणे होउन जाइल

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली
जमीन फार आवडली

आंगतुक ऐवजी अगंतु (मूळ शब्द =आगंतुक) असे वाचले
___________________________

आधीच क्षमस्व म्हणून घेतो ..................
..................(आता पुढे मी जे म्हणणार अहे त्याचा अर्थ नेम़का एक्सप्लेन करून सांगाता येणार नाही मला Sad जे जाणवतेय ते बोलतोय फक्त).
.
.............गझल पेक्षा 'कविता' जास्त वाटली शिवाय तुमच्या नेहमीच्या स्टाईलचीही नाही वाटली !!!!

पण छानच आहे आवडली
Happy

कबीरसाठी (कबीरच ना ?)लिहिली असेल बहुधा असे वाटले कारण हिचे स्पेशलपण सारखे जाणवत राहते
वाचताना

मी हीला गझल-अंगाई म्हणालोतर चालेल का

चुकत असलयस क्षमस्व
~वैवकु Happy

छानच !

समीर,

र्‍हस्व दीर्घाच्या सुटी जास्त झाल्याने रसभंग झाला माझा तरी. आशयही भावकाव्यासारखा वाटला. पुन्हा वाचून पाहतो.

भूषणः

र्‍हस्व दीर्घाच्या सुटी जास्त झाल्याने रसभंग झाला माझा तरी

र्‍हस्व दीर्घाचे प्रयोजन उच्चाराच्या सुलभतेसाठी असावे.
कवितेत त्याचे ठोस असे काही नियम नाहीत.
ज्ञानेश्वर-तुकाराम वाचले की हे प्रकर्षाने जाणवते.
मला वाटतं वरील रचना वाचताना फार ओढाताण वा कसरत होत नसावी.

प्रस्तुत कविता गझल आहे की नाही हे खूपच सटल आहे.
काळजीपूर्वक पाहिल्यास ही रचना निश्चितच वर्णनात्मक नाही.
ही (मुसल्सिल) गझल का नाही, हा प्रश्नही अनुत्तरीत राहतो.

ह्या निमित्ताने गझलेचे बेसिक्स परत एकदा पडताळून पाहण्याची संधी मिळाली.
त्याबद्दल धन्यवाद.

ह्या निमित्ताने गझलेचे बेसिक्स परत एकदा पडताळून पाहण्याची संधी मिळाली.... या अ‍ॅटीट्यूडसाठी सलाम

आकाशाच्या गवाक्षात येतील तारका
पाहण्यास तुज कोण-कोण डोकावुन जाइल

ही द्वीपदी मस्तच!

एक सिंपल सोल्युशन ....................

या गझलेची जमीन सांगणारा शेर , मतला ...जो आहे तिथेच ठेवून बाकीच्या शेरांची जागा बदला

Happy

गझलेत कोणत्या शेरास क्रम काय असावा हे निरर्थकच असते पण अश्या मुसल्सल गझलेत मात्र ते नितांत आवश्यक आसते असे मला व्यक्तिगतरित्या नेहमीच वाटत आले आहे

नीट पाहिल्यास या पाचही शेराना एक घटनाक्रमाची सुसुत्रता आहे ......एखादी कहाणी पुढे सरकत जावी तशी!!.

याला एक 'स्टोरीईन' आहे असे म्हणणे योग्य की नाही हे माहीत नाही पण असा प्रकार सहसा चित्रपट गीतात पहायला मिळतो जिथे गाणे कहाणीला पुढे घेवून जाते

यावरूनही समीरजीनी दिलेले कहाणी हे नाव किती सूटेबल आहे ते समजते (त्यांच्या गझलला नेहमीच ते असे समर्पक शीर्षके देतात.....समर्पक वरून तो "निरर्थ़क" शेर आठवला Wink )

तर मी म्हणत होतो इतकेच की ...................

या गझलेची जमीन सांगणारा शेर , मतला ...जो आहे तिथेच ठेवून बाकीच्या शेरांची जागा बदला.....इतके केले तरी ही गझल वाटेल व मुसल्सल्पणासही जरासुद्धा धक्का लागणार नाही असा मला विश्वास आहे !!!

हाताला काही कामे नसली की माझ्यासारख्या माणसाला असले उद्योग सुचतात Lol

~वैवकु
________________________________________
(आ़कृतीबंध पाळला गेल्याने व शायराने हिला ही गझलच आहे असे स्वतःस पक्के माहीत आहे म्हणूनच त्याने इथे पेश केल्याने ही रचना गझलच आहे सो............इतरांनी चर्चा करणे निरर्थक -इति मी !)

र्‍हस्व दीर्घाचे प्रयोजन उच्चाराच्या सुलभतेसाठी असावे.<<<

र्‍हस्व दीर्घाचे प्रयोजन, माझ्यामते शुद्धतेसाठी असावे. र्‍हस्वदीर्घाची मोडतोड उच्चाराच्या सुलभतेसाठी असू शकेल. कवीने परिपक्व होण्याच्या प्रक्रियेत शुद्धलेखनाची जबाबदारी व तिचे भान ठेवणेही आवश्यक आहे असे मला वाटते. याचे कारण अश्यातूनच भाषा टिकून राहण्यास मदत होते.

कवितेत त्याचे ठोस असे काही नियम नाहीत.
ज्ञानेश्वर-तुकाराम वाचले की हे प्रकर्षाने जाणवते.<<<

शुद्धलेखनाचे नियम आहेत. ते न पाळून कलाकृती लिहिणे शक्यही आहे व तिचा स्वीकार व्हावा ही अपेक्षा काही प्रमाणात रास्तही आहेच. पण तरीही शुद्धलेखनाचे नियम पाळून कलाकृती निर्मीणे हीसुद्धा एक महत्वाची जबाबदारी आहे. मग त्यासाठी फॉर्म बदलावा लागला (गझलेऐवजी मुक्तछंद योजला) तरी (मला) चालेल. प्रत्येक कलाकृतीसंदर्भात शतकांपूर्वी ज्ञानेश्वर व तुकाराम यांनी केलेली शुद्धलेखनाची मोडतोड अथवा उर्दूतील उच्चाराप्रमाणे झालेली गझल हे दाखले देणे (मला) तितकेसे पटत नाही.

अर्थात, या गझलेतील जवळपास प्रत्येक ओळीत र्‍हस्वदीर्घातील बदल समाविष्ट झाल्याने हा मुद्दा प्रकर्षाने लिहावासा वाटला. अन्यथा तुमच्या रचनेत एखाददोन ठिकाणी असे झाले तर कोणीच काही म्हणणार नाही कारण तुम्ही म्हणजे कोणी नवोदीत नव्हेत की ज्यांच्याशी यावर चर्चा व्हावी.

माझ्या वरील प्रतिसादात दोन वेळा कंसात 'मला' हा शब्द आलेली जी विधाने आहेत त्यातून 'मी म्हणतो ते निकष' असे काहीही अभिप्रेत नसून ती 'माझ्यापुरती' मते आहेत एवढेच म्हणायचे आहे, तेव्हा त्याबाबत कोणाचा कृपया गैरसमज होऊ नये अशी विनंती!

येस बेफीजी........... ते समजते आहे खुलाश्याची गरज नव्हतीच
तसेही आपण सांगताहात ते बरोबरच आहे त्यामुळे गै. स. चे काहीच कारण नाही

आकाशाच्या गवाक्षात येतील तारका
पाहण्यास तुज कोण-कोण डोकावुन जाइल

स्वप्नझुल्यावर समीर झुलविल तुला निरंतर
झुलता-झुलता झुलणे जगणे होउन जाइल<<<

पहिल्या प्रतिसादात मी 'पुन्हा वाचून पाहतो' असे म्हणालो होतो. पुन्हा नीट वाचले व हे दोन शेर मला ठळकपणे गझलेच्या प्रवृत्तीशी मिळतेजुळते जाणवले. (ही सर्व अर्थातच माझ्यापुरती मते आहेत, आग्रह नाहीच).

हेच दोन शेर असे वाटण्याची काही ढोबळ कारणे:

१. पहिल्या ओळीनंतर दुसरी ओळ वाचण्या / ऐकण्याचे कुतुहल आपसूक निर्मा़ण होणे

२. काहीशी कलाटणी / अनपेक्षितता

३. शब्दांची प्रासादिकता व त्यातही असलेला हळुवार, गझलेच्या स्वभावाशी जुळणारा तरल अर्थ

४. दोन ओळी मिळून एक संपूर्ण कथानक बनण्याची अंगभूत क्षमता असलेले शेर

(अवांतर - मतल्यातील ओळींची अदलाबदल केल्यास माझ्यामते तो अधिक प्रभावी मतला व्हावा, पण हे असे म्हणणे म्हणजे कवीच्य स्वातंत्र्यावर गदाच. तेव्हा म्हणून पुन्हा न म्हंटल्यासारखे दाखवत क्षमा मागतो).

बाकीच्या द्विपदी काहीश्या सपक वाटल्या.

चीरफाड हा हेतू नाही याबद्दल अगदि आश्वस्त असावे, निव्वळ चर्चा रंगत आहे म्हणून मते खरडत आहे.

चु भु द्या घ्या

निव्वळ चर्चा रंगत आहे म्हणून मते खरडत आहे.>>>>>मी ही

तुमची मते नेहमीच पटतात बेफीजी

असो

म्यां पामरानेही काही मते नोंदवली आहेत ती पाहिलीत का त्याच्यावरही चर्चा व्हावी व मला अजून काहीतरी शिकायला मिळावे हाच शुद्ध हेतू आहे