जरा याद करो कुर्बानी (आझाद) : विनम्र अभिवादन

Submitted by एक प्रतिसादक on 27 February, 2013 - 11:25

chandrashekhar azad.jpg

ए मेरे वतन के लोगों
जरा याद करो कुर्बानी

थोर स्वातंत्र्यसेनानी व भगतसिंह, राजगुरू , सुखदेव आणि अन्य अनेक प्रखर देशभक्त व क्रांतीकारकांचे गुरू असलेले चंद्रशेखर आझाद यांचा आज स्मरणदिन आहे. आजच्या दिवशी दि. 27 फेब्रुवारी १९३१ रोजी, त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या सशस्त्र क्रांतीच्या प्रणेत्यास अभिवादन करूयात.

( स्व. चंद्रशेखर आझाद यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाशझोत टाकणारे किस्से, घटना लिहीण्यास हरकत नाही. वादविवाद नको. )

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा बाफ का बरे दुर्लक्षित व्हावा ? धागा सुरू करताना काही चूक झ्ली असेल तर झालेल्या अक्षम्य चुकीसाठी खेद प्रकट करतो व सर्व देशभक्तांची क्षमा मागतो.

@एक प्रतिसादक | 28 February, 2013 - 12:06 नवीन
हा बाफ का बरे दुर्लक्षित व्हावा ?
>>
चंद्रशेखर आझाद यांना विनम्र अभिवादन!
प्रकाशचित्र दिलेत ते फार चांगले झाले. अगदी थोडक्यात चरित्र ,कार्य ,कर्मभूमी इ. दिले असतेत तर चांगले झाले असते. अजूनही टाका.
महाराष्ट्रातील क्रांतिकारकांबद्दल माहिती असलेलेच मुळात कमी, तेथे इतर प्रांतातील क्रांतिकारकांबद्दल कितपत माहिती असणार?
प्रचि खालील काव्य समर्पक असले तरी ते स्वातंत्र्यपूर्व काळातील शहिदांना उद्देशून लिहिले गेलेले नाही. १९६२ मध्ये चीनने आपल्याला जो रट्टा हाणला त्यामुळे त्यावेळच्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांसंदर्भातील काव्य आहे ते! आणि ते योग्यही आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील शहिदांची आणि सशस्त्र लढा दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची नेहरूंच्या राज्यात जाणूनबुजून संपूर्ण उपेक्षाच केली गेली. त्यामुळेच अंदमानातील सेल्युलर जेल पाडून टाकण्यास नेहरूंनी सांगितले. याला विरोध करणार्‍यांना १९६७ मध्ये यश आले पण तोवर सात पैकी ४ विंग्स पाडून टाकल्या होत्या. या कृतघ्नतेमुळेच सैनिकांच्या बलिदानाची आठवण ठेवा असे सांगण्याची पाळी १९६२ मध्ये आली.
त्यामुळे या सर्व उपेक्षिल्या गेलेल्यांचे स्मरण ठेवणे आपले कर्तव्यच आहे.

@ मी भास्कर

हा धागा अभिवादनासाठी आहे. अर्थात चंद्रशेखर आखाद यांचे कार्य पाहता कुणाला काही लिहावेसे वाटल्यास त्याचे स्वागतच आहे ही भूमिका आहे. किमान शाळेत इतिहास शिकलेल्यांना आझाद माहीत नसतील असं वाटत नाही. आझादांना आजही जनता विसरलेली नाही. इनमीन २४ वर्षांचा आयुष्यात भगतसिंहांसारख्या प्रखर आणि बुद्धीमान क्रांतिकारकांचे ते गुरू म्हणवले जावेत आणि इंग्रजांच्या नाकात नऊ आणावेत यातच त्यांच्या कार्याची महती दिसून येते. इंग्रजांच्या तावडीत सापडण्यापेक्षा मृत्यू स्विकारणा-या आझाद यांचे जीवन अनेक पिढ्या भारतियांना प्रेरणा देत राहील यात शंकाच नाही.

त्यांच्या स्मृतिदिनाची आठवण ठेवून अभिवादन करणा-या जबाबदार मायबोलीकरांचे आभार !

थोर क्रांतीकारक आणि महान देशभक्त श्री चंद्रशेखर आझाद यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन.

.
( हा बाफ कसा सुटला नजरेतून ?)

क्षमस्व, उशीराबद्दल.
चंद्रशेखर आझाद यांना विनम्र अभिवादन.
त्यांच्याबद्दल कमीच माहिती आहे,अधिक येथे कुणी दिल्यास वाचता येईल.

यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती
तेथे कर माझे जुळती _/\_