मुकुंदराव किर्लोस्करांचे दु:खद निधन
२८ फेब्रुवरी २०१३ रोजी मुकुंदराव किर्लोस्कर अचानकपणे गेले आणि एका चैतन्यदायी पर्वाचा अंत झाला !
मराठी नियतकालीकांचा मानदंड आणि मापदंड ठरावीत अशा किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर या नियतकालीकांचे संपादक - प्रकाशक म्हणून कै. मुकुंद रावांची ओळख कधीही पुसली जाणार नाही. या नियतलालिकांचे 'गोरस'पान करून ज्या अनेक पिढ्या घडल्या - मोठ्या झाल्या, त्यात माझ्या पिढीचाही समावेश आहे.
आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या विविध पैलूंवर त्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण वाचन-लेखन केले. आधुनिक महाराष्ट्राच्या वैचारीक जडण- घडणीतील त्यांचे योगदान फार मोठे होते. त्यांना लाभलेल्या दीर्घायुष्यातला क्षण नि क्षण त्यांनी वाचन, व्यासंग, लेखन आणि प्रवासात सत्कारणी लावला.
जलसंधारण आणि मृदसंधारण ही महाराष्ट्राच्या कृषि आणि ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली आहे यावर त्यांची श्रद्धा होती. त्यांनी या विषयांचा सखोल अभ्यास केला होता. या विषयांवर गप्पा मारताना त्यांची कळी विशेष खुलत असे, याचा अनुभव मी घेतलेला आहे. पर्जन्य-छायेत येणार्या प्रदेशावर वारंवार दुष्काळाचे संकट कोसळते आणि यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आले आहे याचा त्यांना मनस्वी खेद होत असे. त्यांनी देशात आणि परदेशात आवडीने खूप प्रवास केला होता, फोटोग्रफीचा छंदही जोपासला होता पण ते मनापासून कुठे रमले असतील तर ते सातारा -सोलापूर- सांगलीच्या दुष्काळी भागातच, असा माझा ग्रह झाला होता.
एकंदरीतच त्यांना गप्पांची मैफिल जमवणे मनापासून आवडत असे आणि अशा मैफिलीत सामील होताना 'बोलण्या'पेक्षाही 'ऐकण्या'वर त्यांचा अधिक भर असे. समोरच्या माणसाला सहजपणे 'बोलते' करण्याची हातोटी त्यांना साधलेली होती. त्यांच्या बोलण्या-वागण्यात विलक्षण ऋजुता आणि नैसर्गिक सहजता होती. नर्म विनोदाचा शिडकावा करून ते एखादा गहन विषयही,त्याच्या गंभीरतेला धक्का न लावता, सोपा करून सोडत असत.
उणी-पुरी चार दशके त्यांनी पत्रकारिता केली. या सुदीर्घ प्रवासात त्यांच्या वाट्याला अनेक बरे-वाईट अनुभव आले असणार. शिवाय त्यांना सर्वच क्षेत्रातल्या अनेक लहान-मोठ्या व्यक्तिंमध्ये वावरायला आणि जवळून निरखायला मिळाले. तथापि मुकुंदराव कोणाही विषयी काही उणे-दुणे बोलल्याचे माझ्या तरी ऐकण्यात नाही. काही चांगले बोलता येण्यासारखे असेल तर ते जरूर बोलावे आणि जे हिणकस अनुभवाला आले त्याचा उल्लेखही करू नये असा त्यांचा स्वभाव होता.
वय वाढले म्हणून मुकुंदराव कधीच 'जुनाट' झाले नाहीत. मराठी आणि इंग्रजी सहित्य, नाटक, चित्रपट, संगीत यातील नव-नव्या प्रवाहांची आणि आर्थिक-सामाजिक मतप्रवाहांची त्यांना चांगली जाण होती. जे चांगले ते मनापासून स्वीकारण्याकडे त्यांचा कल असे. आयुष्यभर त्यांनी चौफेर वाचन केले, साहजिकच त्यांची काही मते बनली असणार पण आपल्या मताचा हिरिरीने पाठपुरावा करणे किंवा दुराग्रह धरणे हे त्यांच्या हातून घडल्याचे कधी जाणवले नाही. आपल्यापेक्षा वेगळे काही मत कोणी मांडत असेल तर त्याचे म्हणणे ते लक्षपूर्वक ऐकत असत.
मुकुंदरावांच्या जाण्याने एक अत्यंत सुसंस्कृत, व्यासंगी आणि उमदे व्यक्तिमत्व आपल्यातून लोपले याचा मनस्वी खेद होतो.
-प्रभाकर [बापू] करंदीकर.
ओह... माझी मुकुंदराव
ओह... माझी मुकुंदराव किर्लोस्करांना विनम्र श्रद्धांजली.
मुकुंदराव किर्लोस्करांना
मुकुंदराव किर्लोस्करांना श्रद्धांजली
विनम्र श्रद्धांजली
विनम्र श्रद्धांजली
मुकुंदराव म्हणजे केवळ
मुकुंदराव म्हणजे केवळ 'किर्लोस्कर' मधील एक घटक नसून सर्वार्थाने ते 'इतिहासाचे भरभरून वाढलेले झाड' असेच होते. श्री.करंदीकर यानी वर एके ठिकाणी लिहिले आहे... "वय वाढले म्हणून मुकुंदराव कधीच 'जुनाट' झाले नाहीत....", हे वाक्य खूप काही सांगून जाते मुकुंदरावांच्या व्यक्तिमत्वाविषयी. सदैव हसतमुख आणि चकचकीत तर असे की जणू काही आता थोड्याच वेळाने एखादे फोटोसेशन असावे असाच त्यांच्याकडे पाहाताना ग्रह होत असे.
मराठी शारदेच्या प्रांगणात आज ज्येष्ठ समजली जाणारी लेखक मंडळी प्राधान्याने 'किर्लोस्कर' मधूनच लिहिती झाली होती त्याचे सारे श्रेय मुकुंदरावांच्या साहित्यप्रेमाला जाते. "किस्त्रीम" तर साहित्य वाटचालीतील मैलाचा दगड मानले जावे इतक्या महतीचे ते दस्तावेज आहे.
असे म्हटले जात आहे की, "त्यांच्या निधनाने त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीतील एक महत्वाचा भागीदार हरपला आहे...." १००% सत्य विधान.
भावपूर्ण श्रद्धांजली.
- भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
कृतज्ञतापूर्वक
कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली.
त्यांची वैयक्तीक ओळख असण्याचं भाग्य नव्हतं. पण << या नियतलालिकांचे 'गोरस'पान करून ज्या अनेक पिढ्या घडल्या - मोठ्या झाल्या, त्यात माझ्या पिढीचाही समावेश आहे.>> यानुसार शाळा- कॉलेजपासून साहित्याची आवड "किस्त्रीम" ने रुजवली, किंबहुना माझ्या पिढीला वाचनाची चटकच त्या नियतकालीकानी लावली असं म्हणणंही अतिशयोक्तीचं होणार नाही. हीं तीनही नियतकालिकं सुसंस्कृततेचीं प्रतिकंच होतीं व तो ठसा मुख्यत्वे मुकुंदरावांच्या व्यक्तीमत्वाचाच होता हे स्पष्ट जाणवायचं.
पर्जन्य-छायेत येणार्या
पर्जन्य-छायेत येणार्या प्रदेशावर वारंवार दुष्काळाचे संकट कोसळते आणि यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत आले आहे याचा त्यांना मनस्वी खेद होत असे
>>>
हे अगदी खरे आहे. यावर दीर्घकालीन उपाययोजना होणे सध्याच्या राजकारण्यांचे प्राधान्यक्रम पहाता आता शक्य वाटत नाही. अस्मानी संकटात आता सुलतानीही सामील झाली आहे. सध्याचे व भावी युवराज राजकारणी यावर काही करतील अशी आशा राहिलेली नाही. त्यात बापूंचे लाडके जाणते राजेही आलेच. जमीन कसून पिकवण्यापेक्शा तिची खरेदी विक्री ही खूपच फायदेशीर 'शेती' असल्याचे मार्गदर्शन करणार्यांना सलाम....मध्ये एका राज्य सरकारच्या अधिकार्याने आतापर्यन्त दुष्काळात खर्च केलेया तात्पुरत्या योजनांवर गेल्या २०-२५ वर्षात जेवढा खर्च झाला त्याच्या निम्म्या खरचात जल व मृद संधारनाचे पर्मनन्ट इन्फ्रस्ट्रक्चर उभे राहिले असते असते असा सप्रमान लेखा जोखा मांडला असता सगळ्यांचेच चेहरे खेटरे मारल्यासारखे झाले . पण सगळे चटकन सावरले अन दुषकाळात कारयकर्त्याना कुठे 'हात' मारता येईल याबाबत योजना आखण्यात गढून गेले
मुकुन्दराव 'योग्य' वेळीच गेले म्हणायचे...
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली.
कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली.
समर्पक लेख. किर्लोस्कर या
समर्पक लेख.
किर्लोस्कर या शब्दालाच एक वजन आहे, आणि ते राहिलच. श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.