मालवणी कोळंबी मसाला

Submitted by डॅफोडिल्स on 28 February, 2013 - 12:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

100_7347 (800x610).jpg

कोलंबी /कोळंबी - २ कप किंवा साधारण २०-२५ नग डोकी आणि काळा दोर काढून स्वच्छ केलेली.
कांदे २-३ मध्यम आकाराचे बारीक चिरून
टोमॅटो २ मध्यम आकाराचे बारिक चिरून
बटाटा १ मध्यम आकाराचा फोडि करून
ओले खोबरे अर्धी वाटी (खउन) किंवा सुके खोबरे पावडर
आले लसूण पेस्ट १ टेबल्स्पून
कोकम/ आमसोलं २/३
लाल तिखट १ टेबल स्पून (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
हळद १/२ टीस्पून
गरम मसाला १ टेबल स्पून
मालवणी मसाला १ टेबल स्पून
मीठ चवीप्रमाणे
तेल

क्रमवार पाककृती: 
  • कोळंबी स्वच्छ धुवुन त्याला हळद, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि चविप्रमाणे मिठ लावुन बाजूला ठेउन द्यावी.
  • एका पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकून त्यावर बारिक चिरलेला कांदा घालावा.
  • कांदा गुलाबीसर परतत आला की त्यावर किंचित हळद टाकून मग खोवलेले खोबरे आणि बारिक चिरलेला टोमेटो टाकून परतावे. बटाट्याच्या फोडी घालाव्यात. एक वाफ काढावी.
  • मिश्रण थोडे परतल्यावर मग गरम मसाला आणि मालवणी मसाला घालून मंद आचे वर चांगले तेल सुटे पर्यंत परतावे.
  • त्यावर मिठ मसाला लावलेली कोळंबी घालून एक वाफ काढावी. थोडाफार रस्सा हवा असल्यास कपभर पाणी घालून कोळंबी शिजवुन घ्यावी. फार ढवळू नये कोळंबी मोडण्याची शक्यता असते. पण मसाला खाली लागता कामा नये (जळता) नंतर आवडीप्रमाणे आमसुले टाकावित. बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी. मालवणी कोलंबी मसाला तय्यार.

100_7346 (640x480).jpg

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

कोळंबी पटकन शिजते. कोळंबी गोलाकार झाली शिजली समजावे. जास्त शिजवल्यावर वातड होऊ शकते.
बटाटा टाकल्याने ग्रेव्ही मस्त मिळून येते.
कोळंबी घेताना पांढऱ्या रंगाची घ्यावी. लालसर गुलाबी कोळंबी बहुतांशी वातूळ असते.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो खतरा आहे एकदम <<<<<< + १.
डॅफो, सही! कोळंबी मसाल्याबरोबर तांदळाची भाकरी हवीच! Happy

डॅफो जबरदस्त Happy
माझी उडी कोळंबीपर्यंत गेलेली नाहिये अजून.
सुरमई सुरू केला त्याचं श्रेय(?) जागूला..
तुला कोळंबीचं श्रेय हवंय का? Proud Lol

गे बाय सकाळी सकाळी काय भुक चाळवतेस. हीट रेसिपी. फोटो एकदम फक्कड.
(स्वगत-आज शुक्रवाराचा बेत जमवावा काय? :-))

स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स !!!!!

धन्यवाद लोकहो !
मालवणी मसाला कसा बनवायचा हे लिहिलेय इथे साधना ने.

पण अगदिच बनवणे शक्य नसेल तर बाजारात सर्वत्र मिळतो.

शिजल्यानंतर आमसुल घालतात का?>>> हो नाहीतर खूप आंबट पणा येतो.
डॅफो, माझ्या घराशेजारी घर घे की तू.>>> शूम्पी तु केव्हाही माझ्याकडे येउ शकतेस जेवायला Happy
तुला कोळंबीचं श्रेय हवंय का?>>> चालेलच Proud पण दक्षे तु सेम ग्रेव्ही नुसत्या बटाट्याची सुद्ध करु शकतेस. Happy

आता पुढची फ्लाईट घेऊन तुझ्याकडेच येईन म्हणते! Proud हे असले फोटोज टाकून का जीवाचे हाल करतेस गं आमच्या?

मस्त प्रकार ! फोटो पण छान.
आमच्या घरी आता सगळ्यांनीच मासे, मटण खायचे सोडले. पुर्वी आई करायची त्याला असाच रंग असायचा.
पण टोमॅटो बहुतेक वापरत नसेच. ( आम्ही "नावापुरते" का होईना, पण मालवणीच ! )

मी अजुन पापले, सुरमई ई. ला सरावते आहे<< ओह मला वाटल कोळंबी पहीली स्टेप आहे नंतर पापलेट वैगरे

फोटो मस्त. मालवणी मसाला आणावा लागेल आता.

आमचं एक एडिशन....... Happy
नॉन व्हेज साठी वाटण करताना एकतर आपण सुकं किंवा ओलं खोबरं वापरतो...
पण दोन्ही (सुकं आणि ओलं खोबरं) समप्रमाणात घेउन नॉर्मल कांदा खोबर्याचं वाटण थोडी वेगळी चव देते ......