जुना-वासोटा नविन - वासोटा - नागेश्वर गुहा एक अविस्मरणीय ट्रेक...

Submitted by पवन on 15 March, 2012 - 05:02

खरं तर या ट्रेक ला खुप जनांचा विरोध झाला(चांगल्या आर्थाने). कारण वासोटा हा कोयणा अभयारण्यात येतो त्यामुळे अड्चणी खुप... पण आमचा निर्णय पक्का होता...

सातारातुन सकाळी ८ ची बामणोली गाडी पकड्ली ठिक ९.३० ला कास पठार मार्गे बामणोलीत पोहंचलो

IMG_3465.JPG

बोट्साठी पैसे भरले(१२०० रु १२ व्यक्तीसाठी) अभयारण्यात प्रवेशासाठी प्रत्यकी २० रु भरले.
IMG_3470.JPG

कोयनेच्या विस्तीर्ण जलाशयातुन १.३० तास प्रवास केला
IMG_3484.JPG

समोरच दिसणारा नविन वासोटा
IMG_3515.JPG

जलाशयात मस्त अंघोळी केल्या
IMG_3523.JPG

जलाशयातला प्रवास संपला आणि आम्ही वासोटयाच्या पायथ्याला पोहंचलो तिथे सरकारणे रेस्ट हाउस बांधली आहेत केवळ त्यांच्या सोयीसाठी पण अभयारण्यातील प्राणी, पक्षी यांचे फोटो उत्तम रित्या मांड्ली आहेत.

IMG_3557.JPG

इथुन नविन वासोट्याच्या पायथ्याला जाण्यास २ तास लागतात वाट चढ्णीची आहे पण जंगल खुप दाट आसल्या मुळे थकवा जाणवत नाही.(पाणी सोबत असणे खुप गरजेचे कारण वाटेत कुठेही पाण्याची सोय नाही)

१.३० च्या सुमारास आम्ही वासोट्याच्या पायथ्यास पोहंचलो इथुनच डवीकडे एक अस्पष्ट वाट जाते ती तुम्हाला जुन्या वासोट्याला घेउन जाईल.
बाबु कडा (जुना वासोटा)
IMG_3615.JPG

बाबु कडया नंतर तर वाट सापड्तच नाही ती तुम्हाला शोधावी लागते. तरी तुम्ही समोरच्या कातळाला समांतर वाट तयार केली आनि १५ मिनिट चालत गेलात तर एका ठिकाणी तुम्हाला वरती जाण्यासाठी एक रस्ता दिसेल
पण रस्ता शोधणे अवगड आहे(अस्स्ल ट्रेकर च्या नजरेतुन बघा नक्कीच रस्ता सापडेल)

तसे जुन्या वासोट्यावर दाट जंगलाव्यतिरिक्त कांहीच अवषेश नाहीत आम्ही खुप शोधण्याचा प्रयत्न केला पण कंहीच सापडले नाही.

जुण्या वासोट्यावर जाण्यासाठी वाट अस्तित्वात नाही आम्हाला अशी कसरत करावी लागली
IMG_3630.JPG

जुण्या वासोट्यावर किल्य्यांची कोणतेच अस्तित्व नाही.
जुण्या वासोट्यावरुन काढलेला नविन वासोट्याचा फोटो ( खुप दुर्मिळ नजारा)
IMG_3651.JPG

बाबु कड्याजवळ ऊभारुन निसर्गाला हाक देताना एक मावळा...
IMG_5771.JPG

ठिक ४.०० ला अम्ही गड उतरला अणि परत नविन वासोट्याच्या पायथ्याशी आलो. इथुन परत नविन वासोटा सर केला नविन वासोटा आगोदर केल्यामुळे तासाभरात अम्ही नविन वासोटा पाहिला.

नविन वासोटयावरुन जुण्या वासोटा
IMG_5799.JPGIMG_5829.JPG

नविन वासोट्यावरील मारुतीचे मंदीर...
IMG_5862.JPGIMG_5902.JPG

वासोट्यावर मुक्कामास परवानगी नसल्यामुळे अम्ही मुककामी नागेश्वर गुहेत जाण्यास निघालो.

तसे वन आधिकारी कुठेच मुक्काम करु देत नाहीत पण अम्ही त्याना सांगितले की अम्ही आजच चोरवणे वरुन उतरणार आहोत अनि नागेश्वर गुहा रत्नागिरी जिल्ह्यात येत असल्यामुळे तिथे मुक्कामास हरकत नाही. पण
आपण मुक्काम करणार आहोत याची वाच्यता कोठेही करु नये.
सुर्यास्त नागेश्वराच्या सुळ्क्या सोबत
IMG_5917.JPGIMG_5926.JPG

मसालेभात बनवताना आपले सर्व मावळे...
IMG_5938.JPGIMG_5939.JPGIMG_5953.JPG

नागेश्वर गुहेत मुक्कामास जागा प्रशशस्त आहे. अगदी २०-२५ जण आरामात झोपु शकतात.
नागेश्वराच्या सुळ्क्यावर चढुन भगवा फड्कावला
IMG_6028.JPGIMG_6031.JPGIMG_6050.JPG

नागेश्वर गुहे कडे जाणारया रस्त्यावर रेलींग बांधयचे काम चालु आहे (पुढे पाठ मागे सपाट)
सरकारी कामाचे एक उत्तम उदाहरण...
IMG_6094.JPG

माय फोटोग्राफी
IMG_6102.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा... सरते शेवटी जुना वासोटा सर केलाच तर... अभिनंदन.

जुन्या वासोट्याच्या मार्गात किती अडथळे आले... कसे गेलात? किती वेळ लागला? कृपया सविस्तर लिहा.

नागेश्वराच्या सुळ्क्यावर चढुन भगवा फड्कावला. मस्स्तच

नागेश्वराच्या सुळ्क्यावर जाणे साठी चोरवणे वरुन दमवणरी मोहीम कराच. खरा कस बघनारी मोहीम आहे.

मस्त रे . Happy
अरे व्वा... सरते शेवटी जुना वासोटा सर केलाच तर... अभिनंदन.>>>>+१०
पण रहायला परवानगी नाही तरी बोट वाले फक्त सोडयला येतात ? सविस्तर कळव मावळ्या .....

सध्या वासोटा किल्ल्यासाठी १ डे ट्रेक करण्यासच परवाणगी आहे
जर कुणाला मुक्कामच करायचा आहे तर नागेश्वर गुहा उत्तम..

मावळ्यांनो हा सार्वजनिक ले़ख(धागा) असल्या कारणाने अणि वासोटा वन संरक्षित भाग आहे त्यामुळे मी इथे कांही लिहीत नाही

क्रपया तुम्हास कांही माहिती हवी असल्यास संपर्क करा