जुना वासोटा

Submitted by पवन on 17 January, 2013 - 03:54

यो रॉक्स तुझ्या ब्लॉग वरील वासोट्याच्या ट्रेक चा लेख वाचला,प्रची आणि वर्णन अप्रतीम ..... जुन्या वासोट्या वर जाताच येत नाही हे वाचले आणि आम्ही केलेल्या वेड्या धाडसाची माहिती द्यावीच म्हणून लिहिण्यास घेतले ...

प्रथम आम्ही सह्याद्री ट्रेकर्स च्या मावळ्यांनी नवीन वासोटा - नागेश्वर गुहा हा ट्रेक जानेवारी 2010 मध्ये केला होता . आता उत्सुकता होती ती जुन्या वासोट्याची...

हा जुना वासोटा , नवीन वासोटा काय भानगड आहे हे आज पर्यंत कळले नाही, इतिहास माहित आहे

पण सध्या ट्रेकर्स तिथे का जात नाहीत हे कळण्यास कांहीच मार्ग नाही. जवळपास च्या गावात विचारले तर ते पण म्हणाले कि आम्ही पण जुन्या वासोट्या वर फिरकत नाही .
त्यामुळे जुन्या वासोत्याची माहिती मिळवण्यास खूप अडचणी आल्या . बऱ्याच ट्रेकर्स ग्रुप ला भेटलो , पुस्तके चाळली ,मायबोली करांची( यो, रोहीत एक मावळा , आनंदयात्री, इंद्रधनुष्य ) भेट घेण्यासाठी "हा भारत माझा" हा चित्रपट पाहिला.

बोट मधल्या नावाड्याला फितूर करण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ . बरेच जन म्हणाले असले वेडे धाडस करू नका .पण मन सांगत होते कि जायचेच . ऒफ़ बीट च्या राहुल खोत ने आप्पांशी contact करून दिला त्यांनी सांगितले "गडावर तुम्ही जाऊ शकता फक्त वाट तुम्हा स्वतास शोधावी लागेल " आप्पांचे हे लाख मोलाचे शब्द आठवून
मनाशी पक्के केले आणि मी आणि आमचा वाटाड्या (मावळा) प्रविण गेलो ना बाबुकड्या पर्यंत , पुढे रस्ताच नव्हता .
"इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल " त्याप्रमाणे मार्ग काढत (करत ) निघालो . जंगल खूप दाट होते . पार केलेला रस्ता पण कळत नव्हता मग झाडावर रेडियम च्या खुणा करण्यास सुरुवात केली .
एक कातळ चढून एकदाचे गडावर चढलो .

p1.JPG

या कातळा जवळ आमचे
बाकीचे मावळे आम्हास दुसरया रस्त्याने येऊन भेटले आम्ही 5 जन जुन्या वासोट्या वर बाकी 5 जन नवीन वासोट्या वर गेले . गडावर ची ती भयाण शांतता घनदाट जंगल नानाविध पावलांची ठसे (ठसे ओळखता यायला हवे होते राव ..), गडावर रस्ता पाऊल वाट किंवा गडाचे स्वताचे असे कांहीच अस्तित्व आम्हाला दिसले नाही खूप प्रयत्न केला . गडावर सर्वात उंचावर एक 20 फूट खडा कातळ आहे आम्हास दुरून ती तट बंदी वगैरे असेल
असे वाटले होते त्याच्याच ओढीने आम्ही निघालो होतो . पण जसे जसे जवळ जाऊ तसे कळले कि ती तट बंदी नसून कातळ आहे .

p7.JPG

तिथेच ३:०० pm वाजले होते आम्ही गडावर इतके फिरलो होतो कि, आता परत जाण्याचा रस्ता शोधण्यास वेळ लागेल म्हणून वापस जाण्याचा निर्णय घेतला . जंगल इतके घनदाट आहे कि आम्हीच आमच्या सोयी साठी केलेल्या खुणा आम्हास सापडत नव्हत्या, शेवटी तासाभरात नवीन वासोट्याच्या पायथ्याशी आलो नवीन वासोट्या वर धावती नजर टाकली आणि मुक्कामी नागेश्वर गुहेत गेलो . तिथे देखील मुक्काम करण्यास आता परवानगी नाही.

शेवटी जुना वासोटा फत्ते केल्याचे समाधान मिळाले . जंगलाची भयानकता अनुभवावी तर जुन्या वासोट्या वरच......

जुन्या वासोट्या वरून नवीन वासोट्या चा फोटो (जो मला नेट वर कोठेच बघायला मिळाला नव्हता).

p8.JPGp4.JPGp5.JPGp6.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम Happy

शेवटचा फोटोत दिसणारा सुळका कोणता आहे?

आमचा हा ट्रेक राहिला आहे. नागेश्वरला मुक्काम करायची परवानगी फॉरेस्ट वाल्यांनी कशी काय दिली? तुम्ही चोरवणेतून उतरलात का?

जरीपटका मस्तच Happy

<< शेवटचा फोटोत दिसणारा सुळका कोणता आहे? नागेश्वरला मुक्काम करायची परवानगी फॉरेस्ट वाल्यांनी कशी काय दिली? तुम्ही चोरवणेतून उतरलात का?

तोच नागेश्वर आहे.... थोडे धाडस करुन रहिलो. कोणी पहायला येत नाही(आले नाही)... दुसरया दिवशी सकाळी
चोरवणेत उतरलो...

सह्ही रे पवन! वासोटा दुर्गाचा अप्रतिम फोटो ..!!
धन्यवाद. तुझ्या मावळयाला विचारायचं नां जुन्या वासोट्यावरुन पुढे रेडे खिंडीत पण जाता येतं कां ते??? Happy

हा ट्रेक केलाय आस कोणीच भेटल नाही अन त्याच्याबद्दल कुठ वाचणात पण नाही, सह्ही रे पवन! तुम्ही कोकणातून वर आलात की कोयना धरणातून ? सविस्तर लिहा , अन वर अस्वलांच वास्तव्य तसेच इतर श्वापद यांच आस्तित्व आहे रान पण भयाण माजलय , कित्येक महिने कोणी गेलेल नसणार , जबर्याच भिडू......., सलामच,
वासोटा दुर्गाचा अप्रतिम फोटो ..!!>> आजून येउ देत ....
प्राणी इ. दर्शन झाले का ? Happy

पवन मस्तच.. अजून वर्णन आणी फोटो हवे होते.. जुन्यावरून नवीन वासोट्याचा फोटो सहीच...

मी पण काही वर्षांपुर्वी जुन्या वासोट्याच्या पाठी बराच लागलो होतो...गेल्या वर्षी एक निसटती संधी पण आली होती..पण हुकली.... Sad
माझ्या माहीतीप्रमाणे जुन्या वासोट्यावर जाता येते... थोडे कष्ट करून, थोड्या लोकल लिंक्स वापरून जुना वासोट्यावर जाता येते.. :). किल्यावर थोडी तटबंदी, घरांचे थोडे पडके अवशेष आणी एक शंकराचे मंदीर आहे..

तुझ्या मावळयाला विचारायचं नां जुन्या वासोट्यावरुन पुढे रेडे खिंडीत पण जाता येतं कां ते??? >>> हेम, रेडेखिंडीत जायला जुन्या वासोट्यावर जायला लागत नाही.. कोकणातून तिवरे गावातून चढणारी वाट पुढे सरीच्या घाटाने मळदेवला जाते..(जुन्या वासोट्यावर जायची हि एक किल्ली आहे :)) पुढे मळदेव वरून जुन्या वासोट्याच्या पायथ्याला डावीकडे बगल मारून पलीकडे मेट्-इंदवली गावाला उतरणारी वाट रेडेखिंडीतून जाते..

मी अजूनही जुन्या वासोट्याचा माग सोडला नाहीये.. बघूया कधी योग येतो ते... Happy

सर्व माबो करांचे आभार...

आम्ही ५ मावळे जुन्या वासोट्या वर गेलो होतो. नविन वासोट्याच्या डाव्या बाजुने , बाबू कड्यालागत एक रस्ता जुन्या वासोटया कडे जातो . जंगल इतके घनदाट आहे कि आम्ही ज्या रस्त्याने गेलो तो रस्ता
उतरताना आम्हाला मिळालाच नाही (कोठून गेलो कोठून आलो कळलेच नाही.)
झाडांच्या बुंध्यावर नखांचे ओरखडे दिसत होते , प्राण्यांच्या पायांची ठसे , एखादे कुटुंब बसुन झालेली प्लेन जागा ...
आम्ही रस्ता चुकू नये म्हणून झाडावर रेडियम ने खुणा केल्या होत्या पण आम्हालाच त्या मिळाल्या नाहीत
पण एकंदर अनुभव भयाण होता , तो मी कधीच विसरू शकणार नाही . प्राणी मात्र एकही दिसला नाही .
फक्त मनात अजून एक सल आहे "ठसे ओळखता यायला हवे आहेत ". नानाविध प्रकारचे ठसे प्राण्याच्या विष्ठा
त्यांचा उग्र वास अरेरे ...
एक भन्नाट अनुभव .....

जबरीच आहे की हे सगळं प्रकरण....
तुमच्या सगळ्यांच्या धाडसाला सलामच ...... पण काळजी घ्या, सावध रहाणे...

कुठल्याही जंगलात आपण जेव्हा जातो तेव्हा तेथील प्राणी/ पक्ष्याने आपल्याला आधीच पाहिलेले असते. त्यांची नजर/ घ्राणेंद्रिये इतकी तीक्ष्ण असतात की आपण कल्पनाही करु शकत नाही - तेव्हा असा धाडसीपणा करताना एकतर मोठा गट/ समुदाय पाहिजे व स्वसंरक्षणाकरता आपल्याजवळ हत्यारही आवश्यक.....

<<... पण काळजी घ्या, सावध रहाणे..

उत्सुकते पोटी गेलो होतो...

एक ट्रेकर या नात्याने काळजी घेण्याची सवय मात्र जडली आहे...

खल्लास....पण एवढेच फोटो का....अजून काढायचे ना....जंगलाचे वगैरे....
कसला जबरी अनुभव...

खल्लास....पण एवढेच फोटो का....अजून काढायचे ना....जंगलाचे वगैरे....

आम्ही जुन्या वासोट्यावर एक तास घालवला पण तो किल्यांचे अवशेष शोधण्यातच गेला..

[नागेश्वर भाग ३] या गुहेच्यावर जो डोँगराचा शंभरेक फूट भाग आहे त्यात पावसाचे पाणी

वेडं धाडस !!

आम्हाला नवीन वासोट्यावरच अस्वलं भेटली होती .... जुन्यावासोट्यावर तर माणुस फिरकतच नाही म्हणुन तिथे अस्वलांचेच राज्य आहे !!

आम्हाला प्राणी सद्रश्य असे कांही
दिसले नाही.पण खरे जंगल अनुभवता आले. तेथिल गुढरम्य जंगल
वातावरणातील भयानकता वाढ्वत होते.