कवी लोकांची माफी मागून :-

Submitted by मी मी on 5 February, 2013 - 23:50

(अस्सल वर्हाडी जांगडगुथ्था ईश्टाइल मधली विनोदी कविता सादर करते आहे...कृपया कवी लोकांनी हलके घेणे)

सन्माननीय कवी लोकांची माफी मागून :-

कवितेचा आलाय आता लई च कंटाळा
अन कविता पाहून वाटे मले पळा पळा पळा

जिथ जावं तिथ कवितांच दिसे
अन तिले पाहून मले कसं फुटत जाये हसे
कुठून अन काहून हा कवितेचा लळा, अन
कवितेचा आलाय आता लईच कंटाळा

शब्द राहे तेच लय गोल गोल फिरे
कवी वाटे तुमच्या आमच्या डोक्यावर मिरे
भारीच पडे यायचा कवितेचा जिव्हाळा
कवितेचा आलाय आता लईच कंटाळा

ज्याच्या त्याच्या पुढे कवी कविता वाचे
नको नको म्हणले तरी पुढे पुढे नाचे
समजे नाही कुठे अन कसे यायले टाळा
अन कवितेचा आलाय आता लईच कंटाळा

कवी लोकाईसाठी आना नवीन विमान
नेउन ठेवा त्यायले कोन्या ग्रहा नवीन
पाडा म्हणा तिथ कविता भळा भळा भळा
कवितेचा आलाय आता लई च कंटाळा

कवितेचा आलाय आता लई च कंटाळा...अन
कविता पाहून वाटे मले पळा पळा पळा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

:))

सही ... Lol

माफी मागून लाजवू नका हो कुणाला Happy
आपलंच घर समजा. स्वतःचाच ब्लॉग असल्यासारखे बिनधास्त लिहीत रहा. ( गूढकथा मिळाल्या का ? आता कुटुंबकलहकथा किंवा इतर प्रकारांसाठी देखील बाफ येऊ द्यात. काही लोक विपू मधे लिंक देतात ते योग्य वाटत नाही. अशाने बाफ वर येत नाही हे त्यांना उलटविपूने कळवावे. )

कळावे आपला नम्र
एक प्रतिसादक

.

कवी आणि कवींवर टीकेसाठी कसला आधार घेतला?? तर कवितेचाच.. व्हॉट अ जोक !!!

कावळा...तिच तर्र गम्मत आहे ना फिदीफिदी

मलातर ही फसगत वाटली.

भारीच. 'कविते'ऐवजी गझल असं वाचायला आणखी भन्नाट वाटलं असतं.

कोणाला काय वाटेल त्याचा नेम नाही. मात्र इथे गम्मत कवी लोकांची अपेक्षित होती कवितेची नाही.
कविता ही विधा आपल्या जागी हजार वर्षांहून अधिक काळ आपले अस्तित्व टिकवून आहे.
गझल ही विधाही कवितेतच गणली जाते.
दोन्ही विधा फार मोठी परंपरा घेऊन आल्यात हे भान हवेच.

समीर चव्हाण

समीर चव्हाण ....नेमकं काय म्हणायचय तुम्हाला कळाले नाही.....म्हणजे तुम्ही हि कविता फारच मनावर घेतली कि काय...मी गम्मत म्हणुन लिहिलिय बरं का....पर्सनल घेउ नका....