(संकेत तरही) थांबायचे नाही

Submitted by वैवकु on 23 February, 2013 - 02:21

तरही पुन्हा प्रकाशित करीत आहे Happy

तुला जर जायचे आहेच जा ,मग यायचे नाही
मलासुद्धा अता माझ्यामधे थांबायचे नाही

जुन्या जागेमधे जत्रा स्मृतींची भरवतो आहे
नव्या जागेत मन माझे मला रमवायचे नाही

अमीरी!..मल्मली सदरा तुझा पाहून घेऊ का
...मला आयुष्यभर मग दैन्य हे टोचायचे नाही

दिला मी प्राणसुद्धा आहुती माझा तुला यज्ञा
कसा म्हणतोस तू आता मला 'वणवा'यचे नाही

इथे तर राहिली आहेत नाती फक्त नावाला
अश्या परक्या घरी माझ्या मला परतायचे नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला जर जायचे आहेच जा ,मग यायचे नाही
मलासुद्धा अता माझ्यामधे थांबायचे नाही

जुन्या जागेमधे जत्रा स्मृतींची भरवतो आहे
नव्या जागेत मन माझे मला रमवायचे नाही

इथे तर राहिली आहेत नाती फक्त नावाला
अश्या परक्या घरी माझ्या मला परतायचे नाही

<<<

स्वतंत्र शेर म्हणून आवडले. सांकेतिकता / सूचकता या निकषानुसार पाहिलेच तर काहीसे 'थेट' अधिक झाले आहेत.

तरीही, 'संकेत तरही' हा निव्वळ एक सरावाचा भाग असल्याने मुद्दलात काही बिघडलेले नाहीच.

संकेत तरहीतील सहभागासाठी धन्यवाद व अभिनंदन वैवकु Happy

-'बेफिकीर'!

"स्वतंत्र शेर म्हणून आवडले. सांकेतिकता / सूचकता या निकषानुसार पाहिलेच तर काहीसे 'थेट' अधिक झाले आहेत. " >>> बेफींशी सहमत.

धन्यवाद बेफीजी

१)सांकेतिकता / सूचकता >> याचा अर्थ मी असा केला की आपण जे खयाल दिले आहेत त्यातील प्रतिमा इत्यादी न वापरता नवीन प्रतिमा योजायच्या आहेत ....असे
२)मग मी एक जमीन शोधली ***यचे असे काफिये अन् नाही ही रदीफ मला सापडली

पहिल्याशेरात मी तू हेच घटक आलेत व असे झाले या उल्लेखाऐवजी असे होवूदे असे होणार अशी वाक्यरचना आली

बाकी शेरात नवी जागा-जुनी जागा .....अमीरी गरीबी ....यज्ञ -आहुती .....हे संकेत ठरतील असे मला वाटले

शेर थेट झालेत असे म्हणत आहात ते शब्दलयीतून आलेला जितकाकाही प्रवाहीपणा(फ्लो) अभिव्यक्तीतील जितकीकाही इंटेण्सिटी(तीव्रता) आलेली आहे त्याबद्दल म्हणत आहात का असे यायला अपेक्षित नव्हते का

काही चुकत असल्यास अवश्य सांगावे चुका सुधाराव्यात कशा हेही सांगावे
आपला कृपाभिलाषी
वैवकु Happy

___________________________

धन्यवाद उकाका

वैवकु,

चुकत वगैरे काहीच नाहीये. Happy

आपण असे ठरवत आहोत की संकेत तरहीमध्ये प्रत्यक्ष विषयाचा उल्लेख न करता प्रतिमांच्या भाषेतून तोच संदेश पोचवायचा आहे. खयाल थेट घेतला गेला तर ती खयाली तरही होतेच. प्रतिकात्मकरीत्या, रुपकात्मकरीत्या मांडला की संकेत तरही! इतकाच फरक आहे.

शुभेच्छा!

" संकेत तरहीमध्ये प्रत्यक्ष विषयाचा उल्लेख न करता प्रतिमांच्या भाषेतून तोच संदेश पोचवायचा आहे." >>> बरोब्बर स्पष्ट केलंत बेफीजी.

" संकेत तरहीमध्ये प्रत्यक्ष विषयाचा उल्लेख न करता प्रतिमांच्या भाषेतून तोच संदेश पोचवायचा आहे." >>> बरोब्बर स्पष्ट केलंत बेफीजी.>>>>>>>>>>>>>>>

माझ्या मते मी ही तोच प्रयत्न केलाय उकाका
तुम्हाला काय वाटते उकाका ही रचना संकेत तरही आहे की नाही ?

वैभव तुझ्यासाठी ही विनंती....
१) एकाच मिसर्‍यात अर्धविराम, पुर्णविराम अगदीच आवश्यकता असल्यासच येऊ द्यावेत शक्यतो मिसरा सरळ असावा, फार थांबे घेत जाणारी गाडी जनरल असते, थेट जाणारी स्पेशल Wink
२)जेवणास- जेवायला - जेवाया ... हे सगळे अर्थाच्या दृष्टीने समान चालु शकतात मात्र
अंघोळीस- अंघोळीला- याचे पुढे "अंघोळाया" असे नवीन संशोधन टाळावे ...( हे उदाहरण आहे )
३) आपला प्रतिसाद मुद्देसूद आणि अवांतरास वाव देणारा नसावा. शंका-कुशंका स्वतंत्र व्यक्तिगत विचाराव्यात.
.....

पु.ले.शु Happy

सर्वांचे आभार

शामजी विशेष आभार

वैवकु, गझल संपादीत कशाला केलीत? >>>>>>
या रचनेतील शेर स्वतंत्ररित्या आवडण्यासारखे झालेत पण संकेत तरही सारखे झाले नसावेत असे वाटूलागले
ही संकेत तरही आहे की नाही याचे उतरही तुम्हच्याकडून मिळाले नाही ......
मग मी काय करणार बेफीजी Sad

पहिले तीन सर्वात आवडले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
वैवकु,
पुनःप्रकशित केलीत बरं वाटलं.
तुम्हाला विपूत म्हटल्यानुसार, माझंही कन्फ्युजन वाढत चालल्याने, मी 'सांकेतिक' हा विचार बाजूला ठेऊन प्रत्येक शेर स्वतंत्र शेर म्हणून ध्यानात घ्यायचं ठरवलं आहे.

अर्थात् कन्फ्युजन वाढले हा माझा दोष आहे हे मान्य करतो.