मैत्री की दुष्मनी ?

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2013 - 15:26

मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान सासूबाईंना खिडकीटून फुस फुस करत आवाज आला. त्यांनी पाहीले तो मोट्ठा साप मी लावलेल्या हळदीच्या टबावर बसलेला. हा भाग आमच्या पाठीमागे पावसाच्या पाण्याच्या नाल्याला लागून आहे. सासूबाईनी आम्हाला ते पाहण्यासाठी खाली बोलावले. मी लगेच कॅमेरा घेउन धावतच बाहेर गेले आणि मला एक आश्चर्यच वाटले. ज्या झाडाखाली मी खतासाठी घरातील ओला कचरा जमा करते तिथून ते ट्बापर्यंत तो साप चढला होता. साधारण ६ फुट तरी असेल.

\

त्याच्यास समोर छोटा मुंगुसही तिथेच घुटमळत होता. दोघांमध्ये कावळाही आला होता. पण तोही ओरडत नव्हता. इतरवेळी मात्र असे काही दिसताच साळुंख्या व कावळे एकच गलका करतात. साळुंख्याही नव्ह्त्या आल्या.

आम्हाला वाटले की आता ह्या दोघांची मारामारी चालू होईल पण असे काही झाले नाही. दोघेही सोबत प्रवास करत असल्याप्रमाणे वागत होते. जवळ जवळ १० मिनीटे त्यांनी त्या जागेवर टाईमपास केला. मी भराभर फोटो काढून घेतले. सासूबाईंनी घाबरून माझ्या मिस्टरांना सर्प मित्रांना बोलवायला सांगितले. सर्पमित्रांना फोन केला पण ते येई पर्यंत दोघेही कुंपणाच्या भिंतीच्या बाहेर निघून गेले.

मुंगूस जिथे होता तिथे त्या मुंगूसाचे बिळही आहे. त्यामुळे आम्हाला असे वाटले की त्या मुंगुसामुळे साप पुढे जात नसावा.

सर्पमित्रांना फोटो दाखवील्यावर त्यांनी तो साप नसून धामण असल्यचे सांगितले. ते निघून गेले व आम्हीही आमच्या कामासाठी गेलो तेवढ्यात अर्ध्या तासात परत सासूबाईंनी हाक मारली व तो भिंतीच्या पलीकडे असल्याचे सांगीतले. आणि परत अजब मुंगूस आणि साप दोघे एकत्रच फिरत होते. परत सर्पमित्रांना फोन केला. ते येईपर्यंत धामण शेजार्‍यांच्या ओसाड जागी फिरत होती. मुंगुस दिसेनासा झाला होता. एक बकरी चरणारी आजी त्या धामणीवर लक्ष ठेऊन होती. तिने सर्पमित्रांना ती दाखवली पण त्यानंतर ती चपळतेने कुठेतरी घुसली आणि दिसेनाशी झाली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, मस्त आलेत मित्रांचे फोटो. थोडे दिवसानी हे फोटो काढण्याचे काम, तुझे असिस्टंटच करतील. Wink
पण तिघे शत्रू एकत्र असताना, मित्रत्वाने वागले म्हणजे खरच कमाल आहे हां. Happy

वैद्यबुवा, सुनिधी, वर्षू, तन्मय, रैना लाजो, वेका, विनायक, सायली, मामी, अनिष्का, जिप्सी, विनय, झाकासराव, इन्ना, सुकी, इंद्रा, नितीन, अमेलिया, मुक्तेश्वर, मार्कोपोलो, अनघा, शोभा, रचनाशिल्प धन्यवाद.

पुरुष आमचे अंगण साफच असते रोज आमचा गडी झाडतो. आणि हा भाग मागचा आहे जिथे आमची झाडे व नाल्याचे पाणी वगैरे जाते. तिथे एका झाडाच्या बुंध्याखाली फक्त खतासाठी मी ओला कचरा टाकते. हे साप साफसफाई किंवा घाण पाहून येत नाहीत. तर ते त्यांच्या भक्षाचा पाठलाग करत किंवा कडक उन्हात थोडा थंडावा मिळण्यासाठी येतात. जिथे झाडी झुडपे आहेत तिथे साप हे असतातच. आमचा परीसर झाडी झुडूपांतला आहे.

हो श्री ती नंतर पळताना खालून पिवळसर दिसत होती.

दिनेशदा पुस्तक पाहते मिळत का ते.

श्री, मामी, वैभव, मेधा Lol

मृणाल धामण विषारी नसते असे सर्पमित्रांनी सांगितले.

मोनाली नाही ग हे आमच्या घरात नाही येत. पण सुरक्षेसाठी आम्ही आमच्या दरवाज्यांनाही जाळीचे दरवाजे बसवले आहेत. त्यांना निसर्गातच फिरायला आवडत. माणसांसारख सिमेंटच जंगल नाही आवडत.

जागू बाप रे..
दक्षे हे वाक्य मासे मला पाहून म्हणतात.

जागू भारीच बघायला मिळालं, मस्त फोटो आहेत. आणि कावळाही इतका स्वस्थ कसा काही कळत नाही.

२ वर्षा पुर्वी मझ्या घरा मागे असेच पहायला मिळाले होते ते आठवले, पण तिथे साप मुंगसाची मारामारी चालली होती. आमच्या चाहुली मुळे थांबली.

sap1.jpgsap2.jpg

धामण, मुंगुस व तरीही शांत राहिलेला कावळा - हे सगळंच अनाकलनीय !!!!

फोटो व बारीक-सारीक वर्णन मस्तए.....

जिप्सी, मी तुला बहुतेक खैरे यांचे दिलेय. अर्थात ते पण चांगलेच आहे.

जागू, तूमचा डॅनी अशावेळी ( साप आल्यावर ) काय करतो ? त्याला सर्वात आधी हे कळायला पाहिजे.

दिनेशदा तेंव्हा डॅनी ओटीवर बांधलेला होता आणि साप मागे त्यामुळे त्याला काहीच कळले नसेल.

जिप्सी ठिक आहे मला काही लागले की मी तुला माहीती विचारेन.

कंसराज, प्रज्ञा, शशांक धन्स.

जो-एस तो पाणशिरडा दिसतोय.

जल्ला ही जागु भलतीच डेअरींगबाज हाय्.:डोमा: पाकक्रियाच काय फोटुग्राफीत तर लै भारी.:फिदी:

जागु तू मनाने पण खरच मोठी आहेस. तुझा आनंद तू नेहेमीच इतरांबरोबर शेअर करतेस याचेच कौतुक वाटते. सिमेंटच्या जंगलात वाढलेलो आम्ही, आम्हाला निसर्ग फार कमी अनुभवायला मिळाला. पण तुझ्या रुपाने तो परत बघायला मिळतो. माबोवरचे बाकी भटके पण आम्हाला आनंद देतातच, पण तुझा सहभाग नेहेमी हटके असतो.

बाकी लहानपणी घोणस पहायला मिळाला तेवढाच बाकी इल्ले पिल्ले साप नाव माहीत नसल्याने नुसतेच दर्शन घडवुन गेले.

जागू, सॉल्लिड. मधे एकदा जयगडला जात असताना रस्त्यामधे साप मुंगूस खेळताना दिसले होते. पण तेव्हा कॅमेरा नसल्याने फोटो काढता आले नाहीत. पण एकंदरीत साप मुंगूस एकत्र असले मस्त खेळत असतात ते बघत आम्ही कितीतरी वेळ रस्त्यावर उभे होतो.

धामण विषारी नसते, धामण जनरली उंदीर घुशींना खात असल्यामुळे आवारामधे फिरत असलेली चांगली म्हणतात.

जागू, दंडवत तुला. कसला योगायोग! त्या मित्रांच्या फोटोत तू मिसिंग आहेस हो पण! Happy

आता डिसेंबरात गावाला गेलो होतो तेंव्हा घरात रात्री भाची पाणी प्यायला उठली तर पाण्याच्या पिंपाजवळ साप! ती किंचाळली मग सगळे जागे झाले, हालचाल ऐकून हळूहळू मग तो घराबाहेर पडला.

आजूबाजूला निसर्ग असेल तर तुम्ही त्यांचं वावरणं खरेच हे रोखू शकत नाही. कुठे कुठे बोळा लावणार? येता-जाता थोडीशी काळजी घेणे हेच हातात असते. आणि आजूबाजूला साप असतात म्हणजे रोज ते येताजाता चावतच असतात असे अजिबात नाही. पण आपणच प्रतिक्षिप्त क्रियेने दिसला साप की तो दुष्मनच समजून शस्त्र सज्ज करायला लागतो.

इकडे नेरुळला (गावात ),नाणेटी,धामण असले साप दिसले तर कुणीच मारत नाहीत .... पाम बीच रोडच्या बाजुस समुद्राशेजारेल हिरवाईत अर्‍याच धामणी दिसतात..... मात्र जागूने धामण -मुंगुसाचा लैच भारी फोटु पकडलाय. Happy

मस्तच..ती धामण एकदम रॉयल दिसतेय..आणि मुंगूस तर नेहमीच गोड.. Happy
माझ्या हॉस्टेलच्या रूमच्या मागे एक मुंगूस फॅमिली यायची कडुलिंबाच्या झाडाखाली.. मम्मा मुंगूस, पप्पा मुंगूस आणि छोटू मुंगूस.. तिची आठवण झाली.. Happy
आणि नवीन हॉस्टेलजवळ परवाच घोणस निघाला होता..तोपण रात्री.. त्याला दोरी समजून आम्च्याकडचं वेडं मांजराचं पिल्लू गेलं होतं..असला फुसफुसला तो.. पिल्लु मैलभर लांब पळून गेलं.. Happy

Pages