मैत्री की दुष्मनी ?

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 February, 2013 - 15:26

मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान सासूबाईंना खिडकीटून फुस फुस करत आवाज आला. त्यांनी पाहीले तो मोट्ठा साप मी लावलेल्या हळदीच्या टबावर बसलेला. हा भाग आमच्या पाठीमागे पावसाच्या पाण्याच्या नाल्याला लागून आहे. सासूबाईनी आम्हाला ते पाहण्यासाठी खाली बोलावले. मी लगेच कॅमेरा घेउन धावतच बाहेर गेले आणि मला एक आश्चर्यच वाटले. ज्या झाडाखाली मी खतासाठी घरातील ओला कचरा जमा करते तिथून ते ट्बापर्यंत तो साप चढला होता. साधारण ६ फुट तरी असेल.

\

त्याच्यास समोर छोटा मुंगुसही तिथेच घुटमळत होता. दोघांमध्ये कावळाही आला होता. पण तोही ओरडत नव्हता. इतरवेळी मात्र असे काही दिसताच साळुंख्या व कावळे एकच गलका करतात. साळुंख्याही नव्ह्त्या आल्या.

आम्हाला वाटले की आता ह्या दोघांची मारामारी चालू होईल पण असे काही झाले नाही. दोघेही सोबत प्रवास करत असल्याप्रमाणे वागत होते. जवळ जवळ १० मिनीटे त्यांनी त्या जागेवर टाईमपास केला. मी भराभर फोटो काढून घेतले. सासूबाईंनी घाबरून माझ्या मिस्टरांना सर्प मित्रांना बोलवायला सांगितले. सर्पमित्रांना फोन केला पण ते येई पर्यंत दोघेही कुंपणाच्या भिंतीच्या बाहेर निघून गेले.

मुंगूस जिथे होता तिथे त्या मुंगूसाचे बिळही आहे. त्यामुळे आम्हाला असे वाटले की त्या मुंगुसामुळे साप पुढे जात नसावा.

सर्पमित्रांना फोटो दाखवील्यावर त्यांनी तो साप नसून धामण असल्यचे सांगितले. ते निघून गेले व आम्हीही आमच्या कामासाठी गेलो तेवढ्यात अर्ध्या तासात परत सासूबाईंनी हाक मारली व तो भिंतीच्या पलीकडे असल्याचे सांगीतले. आणि परत अजब मुंगूस आणि साप दोघे एकत्रच फिरत होते. परत सर्पमित्रांना फोन केला. ते येईपर्यंत धामण शेजार्‍यांच्या ओसाड जागी फिरत होती. मुंगुस दिसेनासा झाला होता. एक बकरी चरणारी आजी त्या धामणीवर लक्ष ठेऊन होती. तिने सर्पमित्रांना ती दाखवली पण त्यानंतर ती चपळतेने कुठेतरी घुसली आणि दिसेनाशी झाली.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे!
जागू, तुम्हाला भिती नाही वाटत त्या जागेत जर सर्प वगैरे येतात... वावरताना. तिथे कचरा टाकायला जाताना?
मुंगुस पिल्लू आहे का? म्हणून नसेल हल्ला केला..

Happy

धामण चांगली जाडजुड असते असा माझा समज होता. आमच्या घरी आंब्याच्या झाडावर चढलेली अगदी जवळून बघितली होती.

झंपी नाही मला भिती नाही वाटत अगदीच अचानक पाहीले तर भिती वाटते. आणि पाहिल्यापासूनही मग जरा जपुन वावरणे होते. लहानपणापासून हे आजूबाजूला वावरताना पहायची सवय आहे. Happy

सिंडरेला, चिखल्या Happy

भारी! Happy

धामण पिवळी जर्द असते ना ? एकाला मी धामण बिळातुन ओढुन काढताना पाहिलं होतं . पुरा जोर लावुन ओढत होता पण तरीही धामन काही निघता नव्हती .
भारी फोटो आहेत .

माझी ततपप होईल. Happy ... घरामागील बागेत विषारी साप इतक्या सहजपणे येऊ शकतात हे मलातरी अतिशय भितीदायक प्रकार वाटेल. खिडकीतुन आत आला, मागचे दार चुकुन उघडे राहिल्याने आत आला तर अनर्थ!!
फोटो छान आलेत.

जागु>>ले... केव्हढा ६ फुटी साप का धामण.. विषारी असते ना ही पण??
सर्रसरून काटा आला नुस्ते फोटू बघूनच..
पण फोटो एक्दम इस्पेशल मिळालेत गं तुला.. साप्-मुंगुस्-कावळा... एकत्र.. ऑसम दृष्य!!!!

मस्तच....मूंगूसाचं नशिब चांगल होत म्हणाव लागेल Lol

तूम्ही शूटिंग केल असेल तर ते पण टाका बघायला मज्जा येईल.

जागू!!! अप्रतिम आहेत फोटो... ग्रेट आहेत तुमच्या घरचे सर्वच! आम्च्या अंगणात साप आला तर जाम घबराट होइल आमची...

मला तर कुठल्याही सरपटणार्‍या प्राण्याची भिती कम किळस कम घाण वाटते.... साप, सरडे, सुसर्/मगर, पाली, किडे ... य्याक्क...

भारी!

आई ग्गं!

मला तर कुठल्याही सरपटणार्‍या प्राण्याची भिती कम किळस कम घाण वाटते >>> सेम हिअर...

जागू, मस्त टिपलेय नाट्य. प्रा. ज्ञानेश्वर किसन म्हात्रे यांचे साप हे पुस्तक मिळाले तर बघ. सगळ्या सापांचे रंगीत फोटो आणि माहिती आहे. बघितल्यावर ओळखता येतील.

मला तर कुठल्याही सरपटणार्‍या प्राण्याची भिती कम किळस कम घाण वाटते>>>>>>>>>>>>> मला पण ....पण पिक्स छान आलेत..... पण असे साप वगैरे वरचे वर येत असतील तर काळजी घ्या.....

आजकाल त्यांनीही भांडण सोडलेल दिसतय ...

असो काळजी घ्या>>>>>>>>>> राजकारणाचा प्रभाव आणखी काय? Proud
जागु तु प्रोफेशन बदलतेस की काय? शिर्षक पाहुन मला वाटलं की एखाद्या माशाचे खवले काढायला मांजर तुला मदत करत असेल किंवा माशांबरोबर खेकड्यांचे कालवण असं काहीतरी असेल Proud

आमच्याकडे साप दिसला की लगेच सर्पमित्र ला फोन जातो. मग तो कुठलाही असो. विषारी का बिनविषारी हा विचारच करत नाही आम्ही.
धामण विषारी असते का ?

बापरे जागू! घराच्या इतक्या जवळ साप वगैरे याची कल्पना ही नाही करता येत. आणि साप इतक्या जवळ पाहिल्यावर घाबराय्च्या ऐवजी कॅमेरा घेउन यायच काही मला सुचणार नाही बहूतेक. Happy

मला भिती नाही वाटत अगदीच अचानक पाहीले तर भिती वाटते. आणि पाहिल्यापासूनही मग जरा जपुन वावरणे होते. लहानपणापासून हे आजूबाजूला वावरताना पहायची सवय आहे. स्मित >> +१० जागू.. २०-२२ वर्षांपूर्वी हे अस्ले कॅम्स अस्ते ना तर जागू तुला धामण, घोणस, कोब्रा, सुर्यकांडर, नानेटी, सरडे, चोपई, सुरवंट, मुंगुस, कोल्हे ह्या सगळ्यांचे पळताना, आढ्यावर/झाडावर लटकताना, लोंब्कळताना वगैरे पोझेसमधले झब्बू दिले अस्ते.. Proud
बाकी फोटू मस्तच आहेत पण जरा सांभाळून करत जा ग फोटूग्राफी.. Happy

जागू... क्या बात है. निसर्गातील प्रत्येक प्राणी, पक्षी, मासे सगळ्यांशीच तुमचा घरोबा आहे. Happy

मेधा... सहीच Happy

Pages