केव्हा ?

Submitted by पुरुषोत्तमवरादे on 18 February, 2013 - 13:27

==========केव्हा ?============
_____________________________
आलो गरीब बनुनी ,जगलो तसा न केव्हा ....!
मी "वाघ "होत गेलो ,झालो "ससा "न केव्हा...!!

रस्ते असोत तिरके ,चालून पार केले ..!
मी ठेवला खुणेचा, मागे ठसा न केव्हा.... !!

आदेश मीच देतो ,सारयास मान्य होता... !
माझा म्हणून येथे ,मळला घसा न केव्हा ....!!

सारेच राजबिंडे ,कोणी न आज रोगी ........!
अंगी म्हणून त्यांच्या, टुचल्या लसा न केव्हा ...!!

ठरवून दे मलाही ,वाटेल ते दगेतू ....!
आला कधी तुझाही, मज भरवसा न केव्हा ...!!

शापित अंग माझे ,अंगात पाप रुळले ...!
तू दावला कधी तो मज आरसा न केव्हा ....!!

===========================
========वराडे पु ग===========

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शापित अंग माझे ,<<< आधी शापीत करा ते

टुचल्या लसा न केव्हा ...<<< Rofl

रदीफ फरफटतीय. काळजी घ्या. काकांशी चर्चा करा.

शुभेच्छा! Happy

आपण कोण ते नाव मला दिसत नाही पण मी इथे कुणाचेही रेकोर्ड मोडायला आलो नाही माझ्यातली कला कृती इथे घेवून आलो आहे .................काका (सतीश देवपुरे)आमचे आराध्य आहे .........त्यांच्या नखाचीही सर माझ्यात आल्यास मी माझे अहो भाग्य समजेल ...........असो

काका (सतीश देवपुरे)आमचे आराध्य आहे .........त्यांच्या नखाचीही सर माझ्यात आल्यास मी माझे अहो भाग्य समजेल ...........असो<<<

हायला निवडून काय दैवत निवडलंय राव

दोघांना शुभेच्छा

शेवटचा शेर छान!
पुरुषोत्तम, इथे अनेक बडे बडे काका आहेत बर का! अनेक दादा पण आहेत! काय म्हणतात ते बघ रे बाबा!

पुरुषोत्तम!
इथे काही मानाचे गणपती आहेत बर का? सावध! फार कडक सोवळेओवळे असते त्यांचे! त्यांचे काही नंदी आहेत, हांजी बाबा आहेत, डफलीवाले आहेत, तुणतुणेवाले आहेत!
कळेल तुला हळू हळू इथले पर्यावरण! तोवर जरा जपून!
चार शब्दांची स्तुतीही झोंबते त्यांना.....
लोक काही केवढे विस्फारती डोळे!
असे आहे रे बाबा इथे!

छान प्रयत्न , पुरूषोत्तमजी.

इथल्या लोकांचा परिचय होण्यासाठी त्यांच्या रचना वाचत चला. त्याखालील प्रतिक्रियाही वाचत चला. इथले वातावरण खूपच वेगळे आहे.
या वातावरणाचा सराव व्हायला तुम्हाला वेळ लागेल.
इथे अस्सल काही असले तरच दाद मिळते.
कुणाचीही गय केली जात नाही.
टीकेची झोड उठते चहुबाजूंनी आणि चांगलं काही शिकायलाही मिळत राहतं.

तेंव्हा जरा सबुरीनं घ्या.
शुभेच्छा !
Happy

>>इथल्या लोकांचा परिचय होण्यासाठी त्यांच्या रचना वाचत चला. त्याखालील प्रतिक्रियाही वाचत चला. इथले वातावरण खूपच वेगळे आहे.
या वातावरणाचा सराव व्हायला तुम्हाला वेळ लागेल.
इथे अस्सल काही असले तरच दाद मिळते.
कुणाचीही गय केली जात नाही.
टीकेची झोड उठते चहुबाजूंनी आणि चांगलं काही शिकायलाही मिळत राहतं.<<

असेच म्हणतो..!!

राजीवजी +१

खरेतर काकानाच तुम्ही काहीतरी शिकवाल असा एक गुण आहे तुमच्या या रचनेत ...तडफ वगैरे की काय म्हणतात त्यास

असो
फडतूस आहे हे जे काही तुम्ही लिहिले आहे ते
मनात खूप आहे की तुमच्या हातून अनेक चांगल्या गझल् व्हाव्यात व आम्हाला वाचायला मिळाव्यात पण मी तुम्हाला शुभेच्छा देत नाहीये कारण माझा एक सुटा शेर होता...............

कुणालाही कधी माझ्या शुभेच्छा देत नाही मी
इरादा विठ्ठलाचा काय तो मी काय जाणावा

असो

Happy

तुमच्या काकाना तुमची ही रचना आवडलेली दिसत नाहीये अन्यथा एव्हाना किमान३-४ "पर्यायी"तरी पडायला हव्या होत्या इतकी हिला पर्यायीची गरज आहे

रस्ते असोत तिरके ,चालून पार केले ..!
मी ठेवला खुणेचा, मागे ठसा न केव्हा.... !!

रस्ते तिरके असोत म्हणजे काय हो कवीराज? तिरके रस्ते काय लोळत पार करायचे असतात काय? चालूनच पार करायचे ना? रस्ते तिरके असण्याचा मागे खुणेचा ठसा न ठेवण्याशी काही सुतराम संबंध आहे काय?

इथे अश्या तिखट प्रतिक्रिया वाचायला मिळतील वाटले नव्हते .......काही जहरी आक्षेपार्ह्य पण प्रतिक्रिया पहिल्या त्यातून असे काही जाणवले कि अल्पश्या मराठीच्या ज्ञानाने पिवळे झालेले काही लोक इथे रचना खाली फुकट सल्ले देत सुटत आहेत ........जे मला खपन्या जोगे नाही भले माझ्या रचना मला माझ्या घरी गाव्या लागल्या तरी चालतील मी कुणालाही मोकाट चरण्यासाठी माझ्या रचनारूपी कुरण त्यांना वाढणार नाही किंवा माझ्या रचनांचा विपर्यास करण्यासाठी मी माझ्या रचना इथे आणणार नाही......मुळात मी वखरावरचा गोटा आपल्या सारख्या खंद्या मराठीच्या लोकांमध्ये बसण्याची माझी लायकी नाही ......मी बरा माझ्या घरी
............कळावे लोभ असावा ..........

श्री पु ग !! आपणही आपल्या देवपूरकर काकांच्या" माझेच खरे " ह्या
मार्गावर जात आहात असो आपली मर्जी ............
सगळेजण तुमच्या भल्यासाठीच सांगत आहेत .............

असो ....टिका न सहन करता आल्याने व त्यातून सुधारणा न करता आल्याने नुकसान झलेच तर तुमचे / तुमच्या गझलेचेच होणार आमचे नाही
टि़केमुळे अजूनच सुधारत जाणारा असा गझल हा काव्यप्रकार आहे याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे.. माझ्या मते प्रत्येकासच हा अनुभवातून जावेच लागले आहे अगदी भट साहेबाना देखील

अर्थात त्यासाठीम्हणून आम्हीलोक टिका करत नाही आहोत तर खरोखरच जे आपण लिहिलेत त्यास "वा छान गझल आहे" असे म्हणणे आम्हालोकाना स्वतःस मनाला पटणारे नाही म्हणून आम्ही तसे म्हणत आहोत

असो
एक गझलप्रेमी
~वैवकु

शापीत अंग माझे ,अंगात पाप रुळले ...!
तू दावला कधी तो मज आरसा न केव्हा ....

व्वा..!

खरेच आहे. प्रत्येकाने आरसा पहावा. तरी या विचाराविरुद्ध माझ्या दोन ओळी आहेत एका गझलेतल्या...

पाण्यातल्या रंगासम असा..
लागे कशाला मग आरसा...?

पुलेशु.

माझी शीकायची अतूट इच्छा आहे पण असल्या मार्गाने शिकणे मला कधीही आवडणार नाही .......आपण स्वतः ला मराठीचे पुरस्कर्ते समजतात मग आपल्या भात्यात प्रेमाचे शब्दही असायला हवे आहेत असल्या खोचक प्रतिक्रिया माझ्या पचनी पडणाऱ्या नाही म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे ..........कुणाला सन्मानाने मी काही प्रेमळ शब्द बोलल्या स आपला अक्षेप तो का असावा? ,आपल्या पोटात का दुखावे या मागचे कारण समजण्या पलीकडचे आहे आणि त्यातही आपले टोमणे .........त्यांना मराठीचे ज्ञान नाही अश्यात्लाही भाग नाही ज्यांच्यावर आपल्या सारख्या लोकांचे टीकास्र चालू आहे....मला लहानपणीचे सातवीच्या वर्गात असतांना शाळेत शिकवलेले आठवते कि लहान मुल घरात रांगते त्या त्याच्या रांगन्यातहि काही शिकण्या सारखे असते मग आपणाला त्या बुजुर्ग व्यक्तीवर इतके टीकास्र सोडून आपण ते काय साध्य करणार आहात देव जाणो जाउद्या हा विषय माझा नाही. पण मला अजिबात आवडले नाही बुवा इथले वातावरण असल्या वातावरणात मला तरी शिकायला जमणार नाही .....त्यामुळे मी येथून गेलेलेच बरे ........

..त्यामुळे मी येथून गेलेलेच बरे ........>>>>>>>>>>>>>>>>

जाऊदे बाबा तू फारच कोमल मनाचा दिसतोय्स
असाच रहा रे मित्रा
तुला शुभेच्छा................

बर तू इथे नाही येणार म्हणतोय्स मग आम्हाला तुझ्या ताज्या नव्यादमाच्या गझला कशा वाचायला मिळणार
आम्ही तर मायबोली सोडून कुठेच जात नाही (आम्ही म्हणजे मी व माझ्यासारखे अजून काही मायबोलीकर)

आमची काहीतरी "सोय" करून जा रे बाबा ...............

पु. ग.,

आपली ओळख थो.पु.वरील आहे... मध्यंतरी आपण मला माझ्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाबद्दल आवर्जून फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या, तेही आपल्या रचनांवर मी सणकून टीका केलेली असतानाही.. हे मी विसरणार नाही. एक मोठ्या दिलाचा माणूस आपल्या आत आहे, नक्कीच.
म्हणूनच सांगावेसे वाटते की, जेव्हा अनेक जण एखादी गोष्ट सांगत असतील तेव्हा त्यावर विचार नक्कीच करायलाच हवा.
आंतरजालावरील प्रत्येक व्यासपीठाचे एक वेगळे समीकरण असते, प्रत्येक मंचाची प्रवृत्ती वेगळी असते. काही (बहुतेक) ठिकाणी कुठल्याही चार-आठ ओळींच्या मोळीला डोक्यावर घेतले जाते.. वाह..वाह केली जाते. काही ठिकाणी संयमित भाषेत (हातचे राखून) बरे-वाईट लिहिले जाते तर काही ठिकाणी नवकवितेच्या कोरडेठाकपणासारखं जे आहे ते, रोखठोक लिहिले जाते. हा मंच, माझ्या अनुभवानुसार तिसर्‍या प्रकारच्या मंचांत मोडतो. इथे वाईट लिहिलं, तर वाईट प्रतिक्रिया मिळतात, बरं लिहिलं तर बर्‍या प्रतिक्रिया मिळतात आणि चांगलं लिहिलं तर चांगल्या. आणि हे सगळं थेट, स्पष्ट..... मुलाहिजा न बाळगता.

तुम्हाला इथे आपल्या रचना सादर करायच्या आहेत की नाहीत, हा तुमचा प्रश्न आहे. पण गझलची हमखास पडताळणी करून घ्यायची असेल तर सहज उपलब्ध असलेला ह्याहून दुसरा मंच नाही.

---------------------------------------------

फॉर युवर इन्फर्मेशन.............. मी अश्याही साईट्स 'अनुभवल्या' आहेत जिथे टवाळ प्रतिक्रिया दिल्या जातात. त्यांना कसलाही आधारही नसतो... बिनबुडाच्या असतात. ही जागा त्यातली नाही. तुम्हाला खरोखर अशी जागा पाहायची व अनुभवायची असेल तर खाजगीत संपर्क करा, सांगतो.

----------------------------------------------

आज जे लोक तुम्हाला 'हाणत' आहेत. उद्या एखादी अप्रतिम रचना लिहिल्यावर, हेच लोक तुम्हाला डोक्यावरही घेतील, एवढं नक्की. बाकी कोण, कुणाला, का व कशा भाषेत अपमानित/ सन्मानित करतो आहे, ह्यावर तुम्ही हळूहळू 'अपडेट' व्हाल... त्यासाठी इथे थांबावं मात्र लागेल.

धन्यवाद !!
....रसप....

वा जितू चांगला प्रतिसाद
माझी पुगंशी काहीही ओळख नाही तुझी पुगंशी ओळख आहे म्हणतोस तर त्याना तुझं म्हणणं पटेल बहुधा
ओळखीच्या माणसाचे माणूस लवकर ऐकतो त्याचे सांगणे त्याला जास्त लवकर समजते असे मला वाटते

>>>माझी शीकायची अतूट इच्छा आहे पण असल्या मार्गाने शिकणे मला कधीही आवडणार नाही .......आपण स्वतः ला मराठीचे पुरस्कर्ते समजतात मग आपल्या भात्यात प्रेमाचे शब्दही असायला हवे आहेत असल्या खोचक प्रतिक्रिया माझ्या पचनी पडणाऱ्या नाही म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे ..........कुणाला सन्मानाने मी काही प्रेमळ शब्द बोलल्या स आपला अक्षेप तो का असावा? ,आपल्या पोटात का दुखावे या मागचे कारण समजण्या पलीकडचे आहे आणि त्यातही आपले टोमणे .........त्यांना मराठीचे ज्ञान नाही अश्यात्लाही भाग नाही ज्यांच्यावर आपल्या सारख्या लोकांचे टीकास्र चालू आहे....मला लहानपणीचे सातवीच्या वर्गात असतांना शाळेत शिकवलेले आठवते कि लहान मुल घरात रांगते त्या त्याच्या रांगन्यातहि काही शिकण्या सारखे असते मग आपणाला त्या बुजुर्ग व्यक्तीवर इतके टीकास्र सोडून आपण ते काय साध्य करणार आहात देव जाणो जाउद्या हा विषय माझा नाही. पण मला अजिबात आवडले नाही बुवा इथले वातावरण असल्या वातावरणात मला तरी शिकायला जमणार नाही .....त्यामुळे मी येथून गेलेलेच बरे ......<<<

अहो कवीवर्य,

आपणांस जायचे असल्यास अवश्य जा. पण आपण मायबोलीवर एन्ट्री मारलीत तीच मुळी 'माझे आराध्य दैवत देवपूरकर आहेत' वगैरे सांगत. येथे अनेक चर्चा घडलेल्या आहेत, एक गझल परिचय नावाच लेख आहे, एक तरही गझलचा धागा आहे, वीस पंचवीस चांगले गझलकार आपल्या रचना सातत्याने देत आहेत. जरा येथे काय चालते हे बघायला नको का? एवढेच काय, येथे काय काय चालते हे तर स्वतः देवपूरकरांनीही पाहिलेले नव्हते आणि त्यांनी रोज गझला प्रकाशित करायला सुरुवात केली. तरीही येथील गझलप्रेमींनी त्यांना पहिल्या दिवसापासून सामावून घेतले कारण त्यांची गझल तशी होती. पुढे पुढे ते गझल उस्तादाच्या थाटात बाकीच्यांनाच व्याख्याने द्यायला लागले तसे मग त्यांचे वर्तन हास्यास्पद आणि हास्योत्पादक झाले. पण त्यांच्या अगदी सुरुवातीच्या गझला काढून त्यावरील प्रतिसाद पाहा. संयत व व्यवस्थित प्रतिसादच दिसतील. पण तुम्ही गझल शिकू इच्छित आहात असेसुद्धा वाटत नाही आहे. 'गालगा' या इतक्या लहान बहरीत आपण नुकतीच सोल तू, खोल तू अशी काहीतरी गझल रचून प्रकाशित केलीत. त्या गझलेला काही अर्थ आहे का? त्यावर अश्याच प्रतिक्रिया आल्यानंतर 'मी चाललो' म्हणालात तर कोण अडवत बसणार तुम्हाला?

हवे ते करा. चांगल्या गझलेला येथे मागचे सर्व वाद विसरून निखालस प्रामाणिक दाद मिळते याचे सर्वजण साक्षीदार आहेत. येथे गझलेवर गंभीर काम होत असते व चालू आहे. राजकारण नाही. ज्यांना राजकारण करायचे असेल त्यांची टिंगलच होईल.

धन्यवाद.

-'बेफिकीर'!

पुरूषोत्तमजी,
मी सुद्धा इथे नवीनच आहे. इथले लोक टिका करायला म्हणूनच इथे येतात असे नाही , पण अपेक्षा पूर्ण होताना दिसत नसल्यावर किंवा चुकाच चुका आढळल्यास प्रतिक्रिया टिकात्म होत जातात.

गझलकाराची प्रत्येक गझल , त्यातला प्रत्येक शेर प्रत्येक वेळी वाहवा मिळवण्याइतपत चांगला होईलच असे नाही. त्यात सुधारणा मात्र शक्य आहे. टीकेतून आपल्यातल्या उणिवा जर पूर्ण करता आल्या , तर छानच. अर्थात हे माझे वैयक्तिक मत .

बेफिकिरी -मी आधीच म्हटले आहे मागच्या प्रतिसादात कि मी वखरावरचा गोटा आहे....... मला राजकारण येत नाही ....आणि येथल्या वातावरणा वरही मी बोललो आहे पण हि पद्धतच मला आवडली नाही इथले सल्ले ,इथले उपहास हे मला सोसण्य पलीकडचे आहे , म्हणून मी जाण्याचा निर्णय घेतला आहे ......त्या पेक्षा गझलेतला ध चा म माहित नसणाऱ्या लोकांकडून मला प्रतिक्रिया मिळाल्यास मी कधीही माझ्या रचनांचे चित झाले असे समजेल ........आणि खरा रसिकही मी त्यांनाच मानतो ......एक कवी हा दुसर्या कवीच्या रचनांचे दिलखुलास कधीच प्रशन्शा करत नाही अशी माझी धारणा आहे ...बहुधा तुम्ही लोक माझ्या ह्या वक्तव्यास गैरसमज संबोधणार हेही मी जाणतो पण ह्या वखरावरच्या पाषाणाला तरी या खुल्या जगात वावरून असले अनुभव आलेले आहे . मी इथे आलो होतो ते सामान्य माणसांना माझ्या रचना वाचनास देण्यासाठी ना कि आपल्या सारख्या गझलेतल्या दिग्गजांचे चुकांचे समिक्ष्न वाचण्यासाठी मला बरेच मित्र म्हटले होते कि अरे हिथे जा तिथे खाते उघड म्हणजे तुझ्या रसिकांमध्ये अजून भर पडेल इथली संख्या भरपूर आहे म्हणून मी इथे आलो पण इथे मला वेगळेच चित्र बघायला मिळाले जे आपल्या स्वतः च्या नाव लपवून काही तरी भलत्या सलत्या नावाची चौकडी बघायला मिळाली .....सतीश काकांना मी "मकस " पासून ओळखतो व त्यांच्या रचनां मधून मला या आधी खूप काही शिकण्यास मिळाले म्हणून मी त्यांना आराध्य समजलो त्यात वाईट असे काय ?जसे खाते उघडले तसे त्यांचे नाव मला दिसले व आधी त्यांचीच प्रतिक्रिया मी पहिली . आपण जे म्हटले बोल तू ,खोल तू या रचनेवर इतक्या छोट्या बहर मध्ये या "तडित वृत्तात " दिसून ते काय भाव दिसणार किंवा काय खयाल दिसणार ..........पण जे काही लिहिले आहे त्याच्या आधीच प्रतिक्रिया मला सामान्य रसिक माय बापांकडून मिळाल्या आहेत त्यासाठी आपल्या दाखल्याची गरज मला नाही .............आणि मी मुळात लिहितो ते आधी म्हटल्या प्रमाणे सामान्य रसिक मायबापांसाठी ......आणि तेच माझे दैवत

रणजीत साहेब आपले धन्यवाद पण नाही करमणार मला इथे माझी कार्य शैली जरा वेगळी आहे मी असल्या असल्या मार्गांनी शिकणे पसंत करणार नाही आपल्या टिके मुळे ही मी जितका व्यथित आधी झालो होतो तितकाच आताही झालो आहे पण धन्यावाद आपले कि आपल्या मुळे मला कमीत कमी गझलेतले ध चे म कळायला लागले आहे ........पूर्वीच्या बालिश कवितांमधून आता कुठे जरा वृत्ताधारे लिहाया लागलो आहे ज्या दिवशी आपली टीका झाली अवघ्या त्या दिवस पासून आठ दिवसाच्या आत मी गझल रचायला शिकलो त्या साठी खरच आपले धन्यवाद ____/\____ पण त्या मधल्या काळातला त्रास मला खूप जाणवला मानसिक दडपण जाणवले काय असेल हे वृत्त शास्र काय असेल हे छंद काही समजण्या पलीकडचे होते पण अहो रात्र मेहनतीच्या बळावर व रात्र रात्र भर जुगल बंदीच्या बळावर मी शिकत गेलो त्यामुळे आता जरा कुठे हायसे वाटते आणि म्हणून आता पुन्हा जुन्या घटना आठवून मन दुखवावे वाटत नाही तसा मी मला अजूनही पूर्वी म्हटल्या प्रमाणे वखरावरचा गोटाच संबोधतो ......... मला मोठे व्हायचे नाही चुकून मी इथे आलो आपल्या मध्ये त्या बद्दल .......क्षमस्व

तुमचा नंबर कळवा .............जमल्यास बोलूच

तुम्ही फारच व्यथित दिसता आहात
कही जागी आपण उगाचच सहानुभुती मिळावी यास्तव व्यथित झालेले जाणवता आहात ते मला पडताळून पाहायचे आहे बाकी काही नाही

आपणांस जायचे असल्यास अवश्य जा. पण आपण मायबोलीवर एन्ट्री मारलीत तीच मुळी 'माझे आराध्य दैवत देवपूरकर आहेत' वगैरे सांगत.<<<<<<<<<<<<<

खरी बोच हीच आहे!

लेबले लावलेल्या कंपूघोषित तथाकथित गझलेच्या दिग्गज जाणकारांचा उदोउदो करत वा जप करत आपण एन्ट्री घेतली नाही म्हणूनच बहुधा एक्झिट आपणास करावी लागत असावी!

गझलेपेक्षा गझलकाराकडे हल्ली पाहून प्रतिसादांची शैली, आशय, व आकडेमोड चालू असते.......ही दुर्दैवी बाब आहे!
येथे काय काय चालते हे तर स्वतः देवपूरकरांनीही पाहिलेले नव्हते<<<<
हा साक्षात्कार कुठून झाला! आम्हास त्याची गरज भासली नाही! आमच्या वेळेनुसार व अनुक्रमानुसार आम्ही जे वाचायचे तेच व तेवढेच वाचले!

त्यांनी रोज गझला प्रकाशित करायला सुरुवात केली.<<<<<<<
हे अजून एक मोठे दुखणे झालेले दिसते!
गझलप्रेमींनी त्यांना पहिल्या दिवसापासून सामावून घेतले
गझलही पाहिली व गझलप्रेमीही पाहिले, त्यांनी तोडलेले तारेही पाहतो आहे!
पुढे पुढे ते गझल उस्तादाच्या थाटात बाकीच्यांनाच व्याख्याने द्यायला लागले तसे मग त्यांचे वर्तन हास्यास्पद आणि हास्योत्पादक झाले.<<<<<<<<<,

का इथल्या उस्तादांच्या पोटात गोळा आला की, काय? म्हणून दुस-याला हसण्याच्या नादात अनेकांनी स्वत:चेच हसू करून घेतले ज्याचे अख्खे जग साक्षीदार आहे!

कौतुकाची भीक द्यावी लागते येथे.....
येथला तुज कायदा समजायचा नाही!................ही इथली आजची परिस्थिती!
येथे गझलेवर गंभीर काम होत असते <<<<<<<<<<<<एक गंभीर विनोद समीक्षकाच्या थाटातला!
ज्यांना राजकारण करायचे असेल त्यांची टिंगलच होईल.
<<<<<<<<<<<<<टिंगलींचे राजकारण मात्र म्हणूनच सतत चालले असते!
तेव्हा पुरुषोत्तमराव टाटा! आपणास थांबा असे कोणत्या तोंडाने म्हणू आम्ही? इथली दंगल, धिंगाणा तर आपण पाहिलाच आहे!
आपल्या लिखाणास आमच्या शुभेच्छा!
...........प्रा.सतीश देवपूरकर

गझल विभाग आहे का आखाडा?

प्रत्येक जण किती ते मी मी करणार अजून? प्रामाणिकपणे लिखाणावर प्रतिक्रिया द्यावी असं नाही का वाटत कोणालाच? . आम्ही आधी कोणी लिहिलय ते बघणार आणि मग प्रतिक्रिया द्यायची की नाही ते ठरवणार, त्यात पुन्हा कशी द्यायची तेही ठरवणार. खरोखर कंटाळा आला या गझल विभागाचा. नुसत्या यमकांची आगगाडी एका नंतर एक उभी करायची त्याला गझल म्हणायचं. त्यातला विचार स्पष्ट होतो आहे, पोचतो आहे? याची चाचपणी सुद्धा न करता धडाधड गझला पोस्ट करत सुटाययचं. मायबोली प्रशासनानी फुकट जागा दिली आहे म्हणून आपली रफ वही इथे पोस्ट करायची झालं

फक्त समोरच्याला खाली कसं खेचता येईल एवढ एकच ध्येय घेऊन काही मंडळी गझल विभागात वावरत असतात. वाईट वाटतय पण खरच अती झालंय. Sad

केव्हा, या गजलेवर हा प्रतिसाद नाही, तर प्रतिसांदामधल्या काही पोस्ट्स वाचून लिहिला आहे.
तुमच्या गझलेखाली हे लिहावे लागले यासाठी क्षमस्व.

Pages