सारा हिशोब द्यावा लागेल एक दिवशी!

Submitted by सतीश देवपूरकर on 16 February, 2013 - 09:27

गझल
सारा हिशोब द्यावा लागेल एक दिवशी!
त्याचीच चूक त्याला समजेल एक दिवशी!!

चिखलात माखल्याने दिसतो तुला असा तो....
आहे अरे हिरा तो, चमकेल एक दिवशी!

वाया मुळीच माझे जाणार रक्त नाही;
येथेच स्वप्न माझे उगवेल एक दिवशी!

आहे अशाचसाठी दारी तुझ्या उभा मी....
ते आज ना उद्याला उघडेल एक दिवशी!

माझी गझल उद्याला गाजेल एवढी की,
होऊन श्वास हृदयी धडकेल एक दिवशी!

आधी विचार कर, मग दे आहुती मला तू!
ही आग त्यामुळे पण भडकेल एक दिवशी!!

इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला!
ही काच काळजाची तडकेल एक दिवशी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला!
ही काच काळजाची तडकेल एक दिवशी!!>>>>अप्रतिम

चिखलात माखल्याने दिसतो तुला असा तो....
आहे अरे हिरा तो, चमकेल एक दिवशी!>>>>मस्त

आपल्या प्रेरणेने एक शेर सुचला...

वाट पाहतो माझ्या सुगीच्या दिवसाचे!!
आणि माझाही दिवस येईल एक दिवशी

>>वाया मुळीच माझे जाणार रक्त नाही;
येथेच स्वप्न माझे उगवेल एक दिवशी! <<सुंदर शेर आहे

आधी विचार कर, मग दे आहुती मला तू!
ही आग त्यामुळे पण भडकेल एक दिवशी!
शेर सुंदर आहे. मी वाचताना त्यातील पण काढून असा वाचला
"ही आग त्यामुळेही भडकेल एक दिवशी".. जरा वेगळ अर्थ वाटला, चांगला वाटला ( वै.म)

स्मृतींची ऊब ही प्रतिमा आवडली

आहे अशाचसाठी दारी तुझ्या उभा मी....
ते आज ना उद्याला उघडेल एक दिवशी!

वाह वा !

हर्षल!
ही रचना गझल रचना आहे! छान आहे, बारीकसारीक वृत्तदोष सोडल्यास!
गझल विभागात हलवावी!
प्रा.सतीश देवपूरकर

Harshalc | 17 February, 2013 - 09:07 नवीन
सतीशजी, तुमच्या या गझलेवरून मला सुचलेली ही रचना :
http://www.maayboli.com/node/41161

सतीश देवपूरकर | 17 February, 2013 - 12:24 नवीन
हर्षल!

ही रचना गझल रचना आहे! छान आहे, बारीकसारीक वृत्तदोष सोडल्यास!
गझल विभागात हलवावी!
प्रा.सतीश देवपूरकर

मात्र http://www.maayboli.com/node/41155 ही कविता आहे, ही कविता विभागात हालवावी अशी इच्छा होत आहे.

याची कारणमीमांसा खालीलप्रमाणे:

सारा हिशोब द्यावा लागेल एक दिवशी!
त्याचीच चूक त्याला समजेल एक दिवशी!!

यात कोणताही विशेष खयाल नाही. आकर्षकता नाही. नाट्य नाही. कडेलोट नाही. मन हेलावणारा भाव नाही. वैचारीक खोली नाही. बांधणीत सौंदर्य नाही. एक रदीफ सुचली आहे 'एक दिवशी' ही. काही काफिये घेतले आहेत. एक गझलतंत्रातील रचना जुळवली आहे. यापलीकडे काही नाही. या मतल्यात म्हणे असा कोणीतरी आहे ज्याला एक दिवशी सगळा हिशोब द्यावा लागेल आणि / कारण त्याची चूक त्याला एक दिवशी समजेल. आता या 'च' ची गरज काय विचारले की ओढून ताणून आणलेले समर्थन दिले जाईल. या मतल्यात अशी कोणतीही जादू नाही की ज्यामुळे माणूस पुढे काही ऐकू / वाचू इच्छील.

चिखलात माखल्याने दिसतो तुला असा तो....
आहे अरे हिरा तो, चमकेल एक दिवशी!

ही मधली टिंबे, उद्गारवाचक चिन्हे, स्वल्पविराम हे सगळे कशासाठी? त्या पहिल्या ओळीतल्या तो या अक्षरानंतर ती टिंबे कशासाठी आहेत? ही चित्रकारी आहे काय? 'आहे अरे हिरा तो' यातील 'अरे' हा भरीचा नाही काय? गझलेवर ग्रंथच्या ग्रंथ वाटतील असे प्रतिसाद देणार्‍या या महाभागांनी हा अरे कसा काय चालवून घेतला स्वतःच्या गझलेत? गझलेचा भाव वाटावा असा विचार या शेरात नाही. चिखलात माखल्याने सध्या असा दिसत आहे, पण तो हिरा आहे, तो एक दिवशी चमकेल. बास. बरं मग? यात आशयाची अशी कोणती उंची गाठली गेली आहे की या सद्गृहस्थांनी गझलेतील काही जणांना तृषार्त, होतकरू वगैरे मानून ज्ञानामृताची चाटणे चाटवावीत?

वाया मुळीच माझे जाणार रक्त नाही;
येथेच स्वप्न माझे उगवेल एक दिवशी!

सहजसुलभ वाक्यरचना काय झाली असती? 'वाया मुळीच नाही जाणार रक्त माझे' अशी! वाया मुळीच माझे जाणार रक्त नाही हे कसे वाटते वाचायला, ऐकायला? दुसर्‍या ओळीतील 'येथेच' या शब्दाचे प्रयोजन काय? 'नक्कीच' हा पर्याय का चालणार नाही? 'यातून' (म्हणजे रक्तातून) हा पर्याय का चालणार नाही? दुसर्‍या ओळीत पुन्हा एकदा 'माझे' हा शब्द आलेला आहे. तो टाळता येणार नाही काय? पस्तीस वर्षांच्या साधनेनंतर असे सपक शेर होत असतील तर पावित्रेबाजगिरी गझलेवर हावी होत असल्याचे शल्य जाणवत नाही काय?

आहे अशाचसाठी दारी तुझ्या उभा मी....
ते आज ना उद्याला उघडेल एक दिवशी!

आज ना उद्याला आणि एक दिवशी यात द्विरुक्तीचा भासही होत नाही आहे काय महाकवींना? गझल म्हणजे श्वास असल्याचे दावे करणार्‍यांनी असे शेर रचावेत आणि काही नीट विचारले की पोरकट स्मायली द्यावेत? किंवा टीका सहन न होऊन दुसर्‍यावरच वैयक्तीक ताशेरे ओढावेत? गोटीबंदता या शब्दावर व्याख्यान देणार्‍यांना 'आज ना उद्याला' आणि 'एक दिवशी' या दोन कालवाचक उल्लेखांना एकाच ओळीत सामावणे खटकत नाही?

माझी गझल उद्याला गाजेल एवढी की,
होऊन श्वास हृदयी धडकेल एक दिवशी!

वावा! वा रे वा! हे धडकणे म्हणजे हिंदी धडकणे का? 'धडकन' वगैरे? मराठीत हृदय धडधडते की धडकते? धडक म्हणजे दोन वाहने एकमेकांवर, दोन माणसे एकमेकांवर, दोन कोणत्याही वस्तू एकमेकांवर आपटणे! श्वास धडकणे म्हणजे काय बुवा? श्वास होऊन हृदयी धडकेल म्हणजे काय? काय कशावर धडकेल? बर हे सगळे या गझलाचार्यांची गझल उद्याला गाजल्यावर होणार आहे. या थोर, उस्ताद व बुजुर्ग गझलाचार्यांनी धडकणे आणि धडधडणे यात कशी काय गल्लत केली ब्वॉ? काय वाचकहो? पटत असेल तर आम्हाला अभिप्राय देऊन होकार तरी कळवा खाली? गपचूप बसून मजा बघण्याऐवजी? याचे कारण तुम्ही मजा बघत बसलात तर हे महान कवी आणखीन चाळीस नवी कलमे, चार नवे शब्दकोषातील दाखले आणि वीस नवे स्मायली देऊन धाग्याचा काश्मीर प्रश्न करून टाकतील.

आधी विचार कर, मग दे आहुती मला तू!
ही आग त्यामुळे पण भडकेल एक दिवशी!!

या दोन ओळी डोक्यावरून गेल्या. कोणी समजावून सांगेल तर बघू. 'मला आहुती दे' म्हणजे कोणत्यातरी आगीत मला आहुती म्हणून घाल असे म्हणायचे असावे. की 'माझी आहुती दे' असे म्हणायचे आहे? काहीच समजले नाही.

इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला!
ही काच काळजाची तडकेल एक दिवशी!!

या शेरात निदान 'स्मृतींची ऊब' ही एक अभिनव कल्पना तरी आलेली आहे. दहा पाच शेरांमधून हे एवढेच हाती लागावे याला नि:संदिग्ध शब्दात गझलतंत्र शरणता, प्रसिद्धीलोलूपता, आशयदारिद्र्य व कल्पनादारिद्र्य असे संबोधू नये तर काय म्हणावे?

बरं! या व्यासपीठावर ठीकठाक, निव्वळ वृत्तात अचूक अश्या रचना करणारे अनेक कवी आहेत. पण त्यांना चार शब्द सांगावेत तर ते मनापासून विचार करतात. सुधारणेकडे त्यांचा कल असतो. त्यांच्या मनात आढ्यता नसते. पण येथे? येथे काही सांगायला जावे तर म्हणतात 'मग हाच शेर तुम्ही कसा लिहिला असतात ते सप्रमाण दाखवा'! अहो हे असे शेर आम्ही रचलेच नसते आणि रचले असते तर कविता म्हणून प्रकाशित केले असते कारण ते सर्व सपक व सपाट आहेत. आता असे म्हंटले की हे म्हणणार एकाच्या दृष्टीने सपक व सपाट असले की तसेच असते असे काहीही नाही. मग समजा आणखी दोघांनी आम्हाला अनुमोदन दिले की हे म्हणणार ह्या दोघांनी तिसर्‍याला अनुमोदन देण्यामुळे काहीही सिद्ध होत नाही व आमचा कळपांवर विश्वास नाही. मग आम्ही भरीचे शब्द दाखवून दिले की ते कसे भरीचे नाहीत याचे समर्थन करण्याऐवजी हे म्हणणार आधी एक निर्दोष, गोटीबंद व कामयाब गझल लिहून दाखवा. जणू यांच्या सर्व गझला गोटीबंद आणि कामयाब आहेत. प्रत्यक्षात शंभरामागे एक गझल तशी असली तर नवल वाटावे अशी परिस्थिती आहे. आता या धुरंधरांशी नम्रपणे बोलावे तर हे आपल्याला त्यांचा गंडाबंद शागीर्द असल्याच्या थाटात उपदेशाचे प्याले पाजतात. थेट विरोध करावा तर 'तुम्हाला गझल लिहितासुद्धा येत नाही' म्हणतात. थट्टा करावी तर भयंकर स्मायली देतात. अनुल्लेख करावा तर दुसर्‍याच्या गझलेखाली काहीही संबंध नसताना पर्यायी गझल देतात. त्यावर टीका करावी तर म्हणतात मायबोली मुक्त फोरम आहे व मी कसेही प्रतिसाद देईन. विपूत लिहा म्हणावे तर म्हणतात जे चालले आहे ते सगळ्या जगासमोरच चालावे, काय म्हणून लपून छपून वावरावे? मनापासून दाद द्यावी तर धन्यवाद देऊन पुढे भाषण ठोकतात. बरं, हे एखाद दोन आठवडे नाही तर महिनोनमहिने चालूच आहे. लोकांनी बोंब मारली, थट्टा केली, अनुल्लेख करून पाहिले, टीका केली, योग्य तेव्हा दाद दिली, आदर दिला, सांसदीय व असांसदीय भाषेत विरोध करून पाहिला, पण हे गृहस्थ गझलगुरू या पदाकडे उड्डाण करण्याच्या इतक्या घाईत आहेत की स्वतःच्या पंखांची ताकद किती ते बघत नाहीत आणि अंबराची उंची तपासत नाहीत. एक आठवड्यापूर्वी ज्यांच्यावर यांनी तोंडसुख घेतलेले असते त्यांना या आठवड्यात डोक्यावर घेऊन हे नाचतात. या आठवड्यात ज्यांना सलाम करतात त्यांना पुढच्या आठवड्यात झटकू पाहतात. सगळ्या गझला वाचल्या तर एकच गझल वाचल्यासारखी वाटते. आजच्या गझलेवर प्रतिसाद देईपर्यंत तीन नव्या गझला झळकवतात.

आता करावे काय?

गंभीर समीक्षकांच्या विनोदी कारणमीमांसेवरील आमची मीमांसा................(शेरनिहाय)
१) खयाल जाणवायला, आकर्षण वाटायला सहृदयता लागते, तसे कवीमन लागते, तसा पिंड लागतो, यांचीच मुळात वाण असेल तर संपलेच की सगळे! मग कडेलोट तर फारच दूरची बाब झाली!

संवेदनशून्य, निबर मन कधीच हेलावत नसते!

मुळातच उथळ असणा-या माणसाला वैचारीक खोली ती काय कळणार?

ज्याची सौंदर्याची व्याख्याच मुळात कुरूप/विद्रूप आहे त्याची सौंदर्याची संकल्पना ती काय असणार अन् तिचे निकष ते काय असणार?

काफिये घेतले जात नसतात ते अपरिहार्यपणे उसळणा-या उद्गारात अवतरत असतात!

गझल म्हणजे जुळवाजुळव हा एक सोयिस्कर जावईशोध!

मुळातच ज्याला काही ऐकायचे/वाचायचे नसते त्यापुढे काहीही वाचा, काय उपयोग? शेर म्हणजे काय बंगाली जादू असते काय?
..........................................................................
२) ‘शुद्धलेखनातील चिन्हांचा वापर’ हे प्रकरण शाळेत जर अभ्यासले असते तर असे प्रश्न चाळिशी उलटल्यावरही पडले नसते! म्हणूनच काळ्यावर पांढरे काहीही रेखाटले तरी ते चित्रच वाटते अशा माणसाला!

संवादत्मक ओळीत संबोधने ही येतात.

समीक्षकाच्या थाटात लिहिणा-याला ‘अरे’ शब्द काढणे वा डकवणे फारच अवघड वाटत असावे!

मुळातच भावनाशून्य मन असल्यावर कसला आलाय भाव?

शब्दांच्या अर्थांची कमालीची निरक्षरता असणा-यांना शब्दांचे मोल वा आवाका तो काय कळणार? वाक्य, ओळी, शेर ही तर दूरची बाब!

जो खरा तृषार्त असतो, त्याला पाण्याचीच आवश्यकता असते. पोट भरलेल्यांना चाटणाची आवश्यकता असते!
..........................................................................
३) सुलभता सापेक्ष असते!

प्रत्येकाची एक शैली असते!

इथे तथाकथित कारणमीमांसेत तोडलेले तारे पहायला कसे
वाटते?

वेड घेवून पेडगावला जाणा-या व ज्याच्या चिंतनाला, वाचनाला मुळातच काही बूड नसते, त्याला दोन ओळीतील सोयरीक ती काय कळावी? शब्दांची अपरिहार्यता ती काय कळणार?

नुसतीच टाळाटाळ करणारे टळलेलेच बरे नव्हेत काय?

गाढवाला गुळाची चव काय? रुचकर काय? अन् सपक काय?

पवित्रेबाजी राजकारण्यांत, लबाडांमधे असते, कलेत नाही!
..........................................................................

४)शब्दांची मुळातच जाण नसणा-यांना शब्दांचे बारकावे ते काय समजावे? अन् समजून ते काय सांगावे? अशा वेळी स्माइलीच काय ते त्यांची कानउघाडणी करू शकतात पण तिथेही समजायला बुद्धीचा प्रश्न येतोच!
...............................................................................................................................

५)धड/धडगत/धडक/धडकण/धडकणे/धडदिशी/धडफडक/धडकाधडकी/धडकावणे/धडकी/धडकणे.......यातील फरक चिल्लर मनाला काय कळावे? तो ‘धडकन’ या हिंदीतल्या एकाच बोथट शब्दाने बधिर झालेला असतो. त्यालाच निर्बुद्ध प्रश्नांची मालिका मात्र निश्चित सुचेल!

मराठी भाषा casually घेण-याला सगळीच गल्लत वाटणार, यात आश्चर्य ते काय?

सूज्ञ वाचकांनी याच नव्हे तर इतर अनेक संकेतस्थळांवर त्यांची मते कळवली सुद्धा! ते कुणाच्या गंभीर विनोदी मीमांसेसाठी खोळंबले नाहीत!

टीप: रचनाकाराच्या wallवर व इतर संकेतस्थळांवर पहावे......उत्तर मिळेल!

केवढा हा शब्दकोशांचा व हास्यमुद्रांचा धसका! अर्थात असणारच, कारण नावातच केवढे गांभिर्य ओतप्रोत भरलेले आहे!

धाग्याच्या नंदनवनाचे स्वप्न यांना कधीच पडणार नाही, काश्मिर करून टाकणेच यांना आकर्षित करणार!
...............................................................................................................................

६)खुज्यांच्या काहीही डोक्यावरूनच जाते. निदान एक गोष्ट चांगली की, डोक्यावरून गेले हे त्यांच्या डोक्यात तरी आले! त्याबद्दल अभिनंदन!

काव्य समजावण्यापेक्षा महसूस करणे महत्वाचे!

गझलशणता, आशयदारिद्रय, कल्पनादारिद्रय इत्यादी भाडोत्री सुबक/गोंडस शब्द कुठेही डकवण्याला आता काय म्हणावे?

मुळातच ज्याच्याकडे सहृदयतेची वानवा आहे, त्याला सगळीकडे कुठल्या न कुठल्या दारिद्र्या शिवाय अन्य काय दिसणार? त्याची नजरच मुळी इतकी खुजी असते की, दारिद्र्यापलीकडे तिला काय दिसणार?

शेरांची सपकता कळायला आधी रुची कळावी लागते! ज्याला रुची/अभिरुची कशाचाच गंध नाही त्याच्या रुचीलाही काही अर्थ नाही अन् सपकतेलाही नाही!

करून दाखवा म्हटले की, मग सुबक, गोंडस कारणे देवून पलायन करायचे व तसे कुणी करायचा जरी प्रयत्न केला तरी त्यांच्यावर ताशेरे ओढायचे याला काय म्हणावे?

सपाट काय, उंचसखल काय, उत्तुंग काय सर्व व्यक्तिसापेक्ष आहे! ज्याला आपण सपाट म्हणतो ते जर दुस-या scaleवर पाहिले तर उंचसखल वाटते! जाऊ द्या, हे आपल्या डोक्यावरचे आहे!

कोणत्याही मोठ्या प्रथितयश कवीच्या सर्वच कविता या गोटीबंद व तितक्याच दर्जेदार नसतात!

गुणोत्तर काढायला काव्य म्हणजे गणित वाटते की, कोडे वाटते या विनोदी गंभीरांना?

जो तो आपापली ताकद जाणत असतो. त्याकरता कुणाच्याही प्रशस्तिपत्रकाची/अनुमोदनाची/शिक्कामोर्तबाची/ओवाळण्याची /पाठ थोपटणयाची गरज नसते!

ज्याला स्वत:चे पंखच नाहीत त्याने अंबराच्या उंचीबद्दल काय बोलावे?

आकाशही दिले तू, मज पंखही दिले तू!
नाही मलाच आली घेता कधी भरारी!!.....ही तर आम्ही कबूली केव्हाच दिली आहे!(१९९२)

त्याकरता कुठे पाल्हाळीक पवित्रेबाज निर्रथक कारणमीमांसा केलेली नाही!

डोळे भरून तुजला पाहीन रोज म्हणतो!
उंची तुझ्या नभाची मोजीन रोज म्हणतो!.....हा आमचा गझलेकडे बघण्याचा दृष्टीकोन! यातच काय ते समजा!

ज्याने त्याने आपल्या गतीने चालावे!(पावसाने पावसाच्या पायरीने कोसळावे!)

नाही तर कोलमडायला होते हेच खरे!

धाप लागली की, काय होते हेच या गं.स. यांच्या कारणमीमांसेवरून स्पष्ट दिसते!

अजून काय बोलणार?

वेळेची बरीच पदरमोड/मोडतोड झाली सकाळी सकाळी!

खरोखरीच अशा विदूषकी मीमांसकांना दंडवतच घातला पाहिजे!......चिखल्यास अनुमोदन!

प्रा.सतीश देवपूरकर

टीप: हे म्हणजे असे झाले एकजण झुलीचे चिलखत घालून सशस्त्र व दुसरा नि:शस्त्र निधड्या छातीचा अशी लढत झाली ही! खरी मजा तेव्हाच येईल जेव्हा झूल उतरून लढत होईल!

देवपूरकर,

आपण आपल्या शेरांची मीमांसा दुर्लक्षित करुन गंभीर समीक्षकांवर टीका फक्त केली आहे. आपल्या रचनेवरील आक्षेपांचे हे उत्तर नव्हे. गंभीर समीक्षकांवर किंवा त्यांच्या सौंदर्यबोधावर टीका करुन आपली रचना ''अलौकिक'' आहे हे सिद्ध होत नाही.

मुळातच उथळ असणा-या माणसाला वैचारीक खोली ती काय कळणार?

ज्याची सौंदर्याची व्याख्याच मुळात कुरूप/विद्रूप आहे त्याची सौंदर्याची संकल्पना ती काय असणार अन् तिचे निकष ते काय असणार?

मुळातच ज्याला काही ऐकायचे/वाचायचे नसते त्यापुढे काहीही वाचा, काय उपयोग? शेर म्हणजे काय बंगाली जादू असते काय?

समीक्षकाच्या थाटात लिहिणा-याला ‘अरे’ शब्द काढणे वा डकवणे फारच अवघड वाटत असावे!

मुळातच भावनाशून्य मन असल्यावर कसला आलाय भाव?

शब्दांच्या अर्थांची कमालीची निरक्षरता असणा-यांना शब्दांचे मोल वा आवाका तो काय कळणार? वाक्य, ओळी, शेर ही तर दूरची बाब!

जो खरा तृषार्त असतो, त्याला पाण्याचीच आवश्यकता असते. पोट भरलेल्यांना चाटणाची आवश्यकता असते!

वेड घेवून पेडगावला जाणा-या व ज्याच्या चिंतनाला, वाचनाला मुळातच काही बूड नसते, त्याला दोन ओळीतील सोयरीक ती काय कळावी? शब्दांची अपरिहार्यता ती काय कळणार?

नुसतीच टाळाटाळ करणारे टळलेलेच बरे नव्हेत काय?

गाढवाला गुळाची चव काय? रुचकर काय? अन् सपक काय?
पवित्रेबाजी राजकारण्यांत, लबाडांमधे असते, कलेत नाही!

शब्दांची मुळातच जाण नसणा-यांना शब्दांचे बारकावे ते काय समजावे? अन् समजून ते काय सांगावे? अशा वेळी स्माइलीच काय ते त्यांची कानउघाडणी करू शकतात पण तिथेही समजायला बुद्धीचा प्रश्न येतोच!

खुज्यांच्या काहीही डोक्यावरूनच जाते. निदान एक गोष्ट चांगली की, डोक्यावरून गेले हे त्यांच्या डोक्यात तरी आले! त्याबद्दल अभिनंदन!

ही आणि वरील लेखातील अनेक वाक्ये डकवता येतील ज्यात आपण टीकाकाराचा उपहास केला आहे....पण शेरावरील समीक्षेचे उत्तर नाही दिले.

मला तर गंभीर समीक्षकांना सांगावेसे वाटते की

''दगडावर डोके आपटल्यावर आपलेच डोके फुटते''

वेड घेवून पेडगावला जाणा-याला कसले स्पष्टीकरण द्यायचे कैलासराव!

आपण आपल्या शेरांची मीमांसा दुर्लक्षित करुन गंभीर समीक्षकांवर टीका फक्त केली आहे. आपल्या रचनेवरील आक्षेपांचे हे उत्तर नव्हे. गंभीर समीक्षकांवर किंवा त्यांच्या सौंदर्यबोधावर टीका करुन आपली रचना ''अलौकिक'' आहे हे सिद्ध होत नाही.<<<<<<<<<<,,

सौंदर्यबोध? .......कमाल आहे! आहो जिथे काव्यबोधाची वानवा आहे तिथे कसला आलाय सौंदर्यबोध?

झूल घातलेल्यांच्या आक्षेपांना/आरोप-प्रत्यारोपांना काय उत्तर द्यायचे?

ज्याला ज्या भाषेत समजते त्याच भाषेत सांगितलेले बरे नव्हे का?

आमची रचना अलौकिक आहे अशी घोषणा आम्ही कधीच केली नाही वा तशी टिमकी कुण्या बुरखेधारी भाटांकडून वाजवूनही घेतली नाही! तो आमचा स्वभाव नाही!

आम्ही एक शिक्षक आहोत! गझलेचे उपासक आहोत! खरेच समजले नसते तर एकदा नाही शंभरवेळा आम्ही समजावले असते, त्याची सवय आहे या वृद्ध प्राध्यापकाला! त्याकरता कितीही वेळेची पदरमोड करायला लागली तरी मागेपुढे नाही आम्ही पहाणार!
बाकी आम्ही दगडांचेच प्राध्यापक आहोत! व त्याचा आम्हास रास्त अभिमान आहे! पण आमच्या काळजाचा मात्र दगड होवू दिलेला नाही असे म्हणतात!

कैलासराव : आपणाविषयी आम्हास नितांत आदर आहे! आपण काही गोष्टी विचारा, आम्ही आमच्यापरीने प्रांजळ उत्तरे देवू! गझलेत झालेल्या चुका मान्य करू, आपल्या मार्गदर्शनाचा लाभ घेवू!
शेवटी लिखाणावर नाही म्हटले तरी वेळेकडून बंधने पडतात! प्रत्यक्ष वा फोनवर बोलल्यास दोघांनाही सोयीचे व हितावह ठरेल!

............प्रा.सतीश देवपूरकर
टीप: हल्ली गझलेपेक्षा गझलकाराकडे बघूनच काही जण प्रतिसाद देतात असे वाटू लागले आहे!
एकच मोजपट्टी प्रत्येकाच्या गझलेला लावायला हवी! मोजपट्टी ही काय व्यक्तीगणीक बदलते काय?
सदर मोजपट्टी जर इथल्या सर्व गझलांना लावली तर किती जणांना ती सोसेल हा प्रश्नच आहे!

सतीशजी:

आहे अशाचसाठी दारी तुझ्या उभा मी....
ते आज ना उद्याला उघडेल एक दिवशी!

इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला!
ही काच काळजाची तडकेल एक दिवशी!!

हे दोन शेर फार आवडले.

सगळ्यांनाचः

कलुषित वातावरणात हातातून चांगले काही होत नाही.
असे वाद घालण्यापेक्षा तोच वेळ वाचनी लावणे बरोबर नव्हे का ?

समीर चव्हाण

कलुषित वातावरणात हातातून चांगले काही होत नाही.<<<

समीर, हातातून जे काही झाले त्यातूनच कलुषित निर्माण झालेले असल्यास काय करणार! असो. स्मृतींची ऊब ही कल्पना वेगळी आहे. दाराचा शेरही आवडला.

-'बेफिकीर'!

समीर, हातातून जे काही झाले त्यातूनच कलुषित निर्माण झालेले असल्यास काय करणार!

सहमत.
तरीही कुठेतरी हे थांबायला हवं असं वाटतं.

सौंदर्यबोध? .......कमाल आहे! आहो जिथे काव्यबोधाची वानवा आहे तिथे कसला आलाय सौंदर्यबोध?

झूल घातलेल्यांच्या आक्षेपांना/आरोप-प्रत्यारोपांना काय उत्तर द्यायचे?

ज्याला ज्या भाषेत समजते त्याच भाषेत सांगितलेले बरे नव्हे का?

पुन्हा आपण तीच री ओढली आहे.

भटसाहेब अमरावतीच्या चौकातील टांगेवाल्यांना आपले शेर ऐकवायचे व प्रचंड दाद घ्यायचे...... काव्याची अतिशय सामान्य जाण असलेल्या रसिकासही त्यांचा शेर भिडायचा व काव्यातील पंडित सुद्धा त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे... शेरावर / शब्दां वर घेतलेल्या प्रत्येक आक्षेपाचं भटसाहेब दुसर्‍यावर टीका न करता खंडन करायचे... व अमुक रसिकाने अमुक रचनेचा आस्वाद कसा घ्यावा हे विशद करुन गझलेसाठी नवे नवे रसिक निर्माण करायचे.

आपणसुद्धा व्यक्तिगत टीका टाळून चर्चा केली तर आपल्या गझलेतील अव्यक्त सौंदर्याचा रसास्वाद सर्वांस घेता येईल.

भटसाहेब अमरावतीच्या चौकातील टांगेवाल्यांना आपले शेर ऐकवायचे व प्रचंड दाद घ्यायचे...... काव्याची अतिशय सामान्य जाण असलेल्या रसिकासही त्यांचा शेर भिडायचा व काव्यातील पंडित सुद्धा त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे... शेरावर / शब्दां वर घेतलेल्या प्रत्येक आक्षेपाचं भटसाहेब दुसर्‍यावर टीका न करता खंडन करायचे... व अमुक रसिकाने अमुक रचनेचा आस्वाद कसा घ्यावा हे विशद करुन गझलेसाठी नवे नवे रसिक निर्माण करायचे.

सहमत.
भटांची आठवण निघालीच आहे तर काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत.
त्यांनी गझल-एके-गझल कधीच केले नाही. कविता-गीत भरपूर लिहिले.
ते नवनवीन वृत्तात गझल लिहीत. नाहीतर बहुतेक गझलकार दोनचार वृत्तातच लिहीतात.
हे आव्हान अगदी प्रायमरी पातळीवरचे असले तरी ह्यातूनही जाणे आवश्यकच आहे.
दुसरे म्हणजे त्यांचे प्रचंड वाचन होते (रेफरन्सः आमचे स्नेही कवी शिवाजी जवरे).
कधी-कधी ग्रंथालयात रात्र-रात्र वाचन करीत असत.
कार्यबाहुल्यामुळे वाचन होत नाही मात्र इथे मोठेमोठे प्रतिसाद द्यायला वेळ होतो हे न पटण्यासारखे आहे.
लिखाणीतील तोचतोचपणा ह्याचे कारण काही प्रमाणात कमी वाचन संभवते.

वरील गोष्टी सतीशजींच्या गझलेशी संबधित नसल्याने प्रतिसाद संपादित करीन तशी सूचना मिळाल्यास.

प्राध्यापका, तोंड आवर, लेखणी आवर. वकूब काय, बोलतो काय! शेतातले बुजगावणे पक्ष्यांना घाबरवायला ठेवलेले असते तसा गझलेच्या शेतात उभा राहून सर्वांना पक्षी समजू नकोस. गझलेची जान म्हणजे काय ते आधी लक्षात घे. सौंदर्यबोध ही संज्ञा तू वापरावीस म्हणजे संघाने भगव्याऐवजी हिरवा रंग स्वीकारण्यासारखे आहे. या अश्या गझला मंडईत शेरावर विकायला बसलो तरी पांढरे ठिपके असलेले काळ्या रंगाचे कुत्रे ढुंकून बघत नाही त्या ढिगाकडे, अन तू लंब्याचौड्या बाता करतोस. भीष्म शरपंजरी आडवे झाले होते. तू झोपताना गादीखाली या सगळ्या गझलांचे कागद ठेवलेस तर स्वतःच भीतीने किंचाळत उठशील मध्यरात्री. डोंबलाचा गझलेचा उपासक.>>>

हा प्रतिसाद फारच आवडला मला. ह्यांना प्राध्यापक गजलपुरेकर यांचा कीती त्रास होतो ते मी समजु शकतो

. ह्यांना प्राध्यापक गजलपुरेकर यांचा कीती त्रास होतो ते मी समजु शकतो>>>>>>.........मीही !!! Lol

श्री .गं.स. यांचा प्रतिसाद १००% पटला !!

गंस,
पहिल्या दोघांत कुणा 'त्या'च्याबद्दल लिहीलय नी बाकी पुढे मी व फक्त मी हे नजरे़ून सुटले की बरोबर वाटले?

>>>टीप: हल्ली गझलेपेक्षा गझलकाराकडे बघूनच काही जण प्रतिसाद देतात असे वाटू लागले आहे!
एकच मोजपट्टी प्रत्येकाच्या गझलेला लावायला हवी! मोजपट्टी ही काय व्यक्तीगणीक बदलते काय?
सदर मोजपट्टी जर इथल्या सर्व गझलांना लावली तर किती जणांना ती सोसेल हा प्रश्नच आहे!<<<

हे मात्र १०१% पटले पण यामागे कारण असावे काहीतरी.

'एक दिवशी' हे एखाद्या शेरामध्ये तडजोड म्हणून चालू शकले असते, पण रदीफच घेतल्यामुळे पटले नाही.
"एके दिवशी" हेच योग्य वाटते.

कैलासराव!
आपणसुद्धा व्यक्तिगत टीका टाळून चर्चा केली तर आपल्या गझलेतील अव्यक्त सौंदर्याचा रसास्वाद सर्वांस घेता येईल.<<<<<<<<<<<<<
वर लिहिलेले कोण टिळाधारी, की, बुरखाधारी, का तिलकधारी काय लिहितात ते पाहिलेत का? हे वाचूनही आपण आम्हास वरील गोष्ट सुचवत आहात हे पाहून आश्चर्य वाटते!
असल्या तोतयांची आमच्यालेखी किंमत शून्य! राग येणे तर दूर, त्यांची कीवच जास्त येत आहे!
माणसाचे संस्कार लगेच कळतात! अशांना आम्ही सावलीलाही उभे करत नाही आमच्या!
एक अदखलपात्र नगण्य तोतया बडबड! , असल्यांसाठी आम्ही आमचा बहुमूल्य वेळ व आमची प्रज्ञा का खर्च करावी?
बाकी अनेक हांजी बाबा आहेतच जी जी करायला अशा तोतयांना! चालू द्या.......सगळ्यांचे चाललेआहे ते !
देव सगळ्यांचे भले करो!
प्रा.सतीश देदवपूरकर

श्री .गं.स. यांचा प्रतिसाद १००% पटला !!>>> ब्रुटस यु टू!!!

@वै कु - प्राध्यापकांशी अशी गद्दारी !!!

@ प्राध्यापक - ह्या वर तुम्ही एक गजल पाडायलाच पाहिजे

गजलुमियां!
हे मात्र १०१% पटले पण यामागे कारण असावे काहीतरी.<<<<<<<<<<
पटलेही म्हणताय, पण काही तरी कारण असावेही म्हणताय, म्हणजे नक्की काय?
कशाचे, कसले, कुठले कारण असावे?

आनंदयात्रीजी!
'एक दिवशी' हे एखाद्या शेरामध्ये तडजोड म्हणून चालू शकले असते, पण रदीफच घेतल्यामुळे पटले नाही.
"एके दिवशी" हेच योग्य वाटते.
<<<<<<<<
एक दिवशी /एका दिवशी /एके दिवशी.......सर्व शब्द बोलले जातात, जे वापरायला हरकत नसावी!
टीप: या रदीफावर भटांशी चर्चा झाली होती, तेव्हा त्यांनी हा वर दिलेला खुलासा केला होता!
रदीफातच चूक असू नये कारण प्रत्येक शेरात त्या चुकीची पुनरावृत्ती होत राहते
अवांतर.......सदर गझल बरीच जुनी २१-२२वर्षांपूर्वीची आहे!

Pages