भारतीय समाजाचे चित्र

Submitted by मी-भास्कर on 26 January, 2013 - 03:00

भारतीय समाजाचे चित्र

दिल्लीत झालेल्या दामिनी प्रकरणात झालेल्या उद्रेकानंतर सध्याच्या भारतीय समाजाचे चित्र रेखाटणारा चेतन भगत यांचा लेख १३-१-१३ च्या टाईम्स मध्ये वाचला. त्या लेखातील प्रतिपादन मला समजले तसे थोडक्यात देत आहे. जिज्ञासूनी लेख मुळातून वाचावा.
एवढ्या प्रचंड समाजाचे चित्रण कोणी एक जण करेल आणि ते सर्वमान्य होईलच असे नाही. पण बरेचसे तंतोतन्त चित्र तयार होण्यास लागणारे स्केच असे त्याकडे बघता येईल. परिवर्तन व्हावे असे वाटणार्‍यांसाठि त्यांनी लेख लिहिल्याचे म्हटले आहे.
लेखाचा सारांश
:समाजाचे चार वर्ग: त्यांना पहिला,दुसरा,तिसरा,चौथा म्हणू.
पहिला- राजकीय शासक: ते जमिनी, संसाधने आणि कायदे यान्च्यावरील नियंत्रणाच्या बळावर आपल्यावर राज्य करतात.
दुसरा- भांडवलदार , उद्योगपती, कॉन्ट्रेक्टर . पहिला दुसर्‍याला श्रीमन्त होण्यास वेगवेगळ्या प्रकारे मदत करतो आणि त्याची परतफेड म्हणून दुसरा पहिल्याला निवडून येण्यास व सत्ता टिकविण्यास हराप्रकारे मदत करतो.
तिसरा- १०% असलेल्या या वर्गाला जगण्यासाठी झगडावे लागते, पण हा वर्ग सुशिक्षित असल्याने यांचे रहाणीमान बरे असते. चांगला जलद न्याय, चांगले नेते, आणि पोलिस संरक्षण मिळू न शकल्याने हा वर्ग स्वतला असुरक्षित समजू लागला आहे. दिल्लीतील उद्रेक त्यामुळेच दिसून आला. नाही म्हणायल या वर्गाला आता माध्यमांचा आधार लाभला आहे. त्याचे कारण :-
जाहिरतादारांना जे खपवायचे आहे त्या वस्तूंचा मुख्य ग्राहक हा वर्गच आहे. त्यामुळेच यांचा
आक्रोश माध्यमांनी महिनाभर दाखवला. हा आक्रोश योग्य होता तरी या वर्गाबद्दल नकळत अशी प्रतिमा निर्माण झाली की हा वर्गही पहिला आणि दुसरा यान्च्याप्रमाणे फक्त स्वताचीच काळजी घेतो. वास्तविक या वर्गाचा सामाजिक कार्यक्षेत्रात चांगला दबदबा आहे.
चौथा:- हे ९०% आहेत. अशिक्षित, अर्धशिक्षित. निष्कृष्ट दर्जाचे राहाणीमान. ते चांगले होण्याची आशा यांना कमीच. यान्ची दाखल माध्यमे कमीच घेतात. पहिले यांच्या भावभावना बोलून दाखवतात, त्यांच्या तोन्डावर चार तुकडे फेकतात. त्या बदल्यात हा वर्ग पहिल्याच्या दुष्क्रुत्यान्कडे दुर्लक्ष करून त्यांना निवडून्सत्तेवर आणतो. तिसरा मात्र आक्रोश करीत राहातो. तिसरा, चौथ्यापासून स्वताला अलिप्त ठेवतो किंवा पाश्चिमात्यांकडून आणलेल्या कल्पना त्यांच्यावर लादू पाहातो. त्यांच्या पचनी तो न पडल्यास त्यांची टिंगल करतो.
आता यात बदल घडावा असे वाटत असेल तर तिसर्‍या ने चौथ्यापासून अलिप्त राहून पहिल्याला त्यांचा वापर करण्यास मोकळे रान देऊ नये. कोणताही बदल तिसर्‍या ने चौथ्याला बरोबर घेतल्याशिवाय होणार नाही.

-------------------------------------------------------------------------------------------------
मला वाटते की पहिला आणि दुसरा यांच्या दरम्यान आणखी एक पहिला-२ वर्ग आहे. त्यात सरकारी यंत्रणा येते. न्यायपालिका देखील यातच येते. पहिला निवडणुकीतून बदलला गेला तरी हा वर्ग तुलनेनें खूपच स्थिर असतो. पहिल्याला भ्रष्टाचाराला मदत करता करता हाही भ्रष्ट बनला आहे. पहिल्याच्या संम्मतीने दुसर्‍यलाही हा वर्ग मदत करतो. गाजावाजा करून पहिल्याने चौथ्यांच्या भल्यासाठी काढलेल्या योजनांमधल्या ९०% पैशान्ची गळती याच्या मदतीनेच होते. हा गळलेला पैसा नेत्यांच्या उतरन्डी आणि हा वर्ग वाटून घेतो. हा वर्ग नाठाळ घोड्यासारखा असतो. पहिला प्रामाणिक आणि खमक्या असेल तर हा कामाला लागतो. तसे नसेल तर मात्र सध्या चालू आहे तसे तो तीसर्‍याला आणि चौथ्याला नाडतो.
हा वर्ग प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ असेल तर पहिला, दुसरा यांच्या मनमानीला थोडा तरी आळा बसू शकतो आणि तिसररा आणि चौथा यांना सुसह्य जीवन आणि न्याय लाभू शकतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, वा.
समाजाचे हे वर्गीकरण सर्वच देशात लागू पडेल. टक्केवारीत थोडा फार फरक.

माझ्या मते, सर्व जगात आजकाल सारासार विचारबुद्धि, ज्याला मराठीत तुम्ही कॉमन सेन्स म्हणता तो फार दुर्मिळ झाला आहे.

एकूणच जग अत्यंत कठीण (काँप्लिकेटेड) झाले आहे. प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर नाही. कोणताहि प्रश्न समूळ सुटणार नाही. त्या साठी संपूर्णपणे नाही तरी काही अंशी तरी प्रश्न सुटेल, असे उत्तर शोधले पाहिजे. हळू हळू प्रश्नाची व्याप्तता कमी झाली, की आणखी प्रभावी मार्ग शोधता येतील.

पण यात अडथळे अनेक.
१. प्रश्न ताबडतोब सुटणार नाही म्हणून काहीच करायचे नाही.
२. अतीव मोठा असा स्वार्थ, स्वतःबद्दल गर्व.
३. हेकेखोरपणा, तडजोड नाही. अगदी लोकशाही, बहुमताला मान याहि गोष्टी हे लोक मानत नाहीत. इतरांच्या चांगल्या कार्यात सतत अडथळा आणणे

तिसर्‍या वर्गाच्या हातून काही होणार असेल तर त्यांना दुसर्‍या वर्गाला आधी आपल्या बाजूला ओढले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या बुद्धीला, सदसद्विवेक बुद्धीला आव्हान करावे लागेल. त्या वर्गाच्या हातात सत्ता आहे, पैसा आहे.

तिसर्‍याने चौथ्या वर्गाला बरोबर घेण्यात अडथळा असा की पहिला वर्ग स्वतःच्या स्वार्थासाठी चौथ्या वर्गातल्या लोकांच्या अज्ञानाचा, गरीबीचा फायदा घेऊन त्यांच्याच तर्फे इतरांच्या प्रयत्नात अडथळे आणण्याचे काम करत आहे.

मला भास्कर यांचा लेख आवडला. (म्हणजे चेतन भगत यांचा मूळ लेखही आवडेल असा अर्थ मी लावत आहे).

झक्की यांचे हे वाक्यही आवडले.

>>>तिसर्‍याने चौथ्या वर्गाला बरोबर घेण्यात अडथळा असा की पहिला वर्ग स्वतःच्या स्वार्थासाठी चौथ्या वर्गातल्या लोकांच्या अज्ञानाचा, गरीबीचा फायदा घेऊन त्यांच्याच तर्फे इतरांच्या प्रयत्नात अडथळे आणण्याचे काम केले आहे.<<<

धन्यवाद

पादुकानन्द | 26 January, 2013 - 12:09
गिरीश कर्नाडचे तुघलक नाटक पहा/वाचा....
<<
सूचने बद्दल धन्यवाद. जरूर वाचीन.
पण लेखातील विचार आणि हे नाटक यातील संबंध कळला असता तर बरे झाले असते.

झक्की | 27 January, 2013 - 21:18

>>तिसर्‍याने चौथ्या वर्गाला बरोबर घेण्यात अडथळा असा की पहिला वर्ग स्वतःच्या स्वार्थासाठी चौथ्या वर्गातल्या लोकांच्या अज्ञानाचा, गरीबीचा फायदा घेऊन त्यांच्याच तर्फे इतरांच्या प्रयत्नात अडथळे आणण्याचे काम करत आहे.
<<
धन्यवाद.
आपले मत बव्हंशी पटले.
बेफिकीर यांच्याप्रमाणे मलाही या वरच्या वाक्यात खूप तथ्य आहे असे वाटले.
आणखी एक बाब :- चौथ्याला बरोबर घेतल्याशिवाय निव्वळ दुसर्‍या वर्गाच्या मदतीने आवश्यक ते संख्याबळ [जे लोकशाहीत आवश्यक आहे] मिळविणे कसे शक्य आहे? शिवाय दुसर्‍या वर्गाला पहिला वर्ग ज्या प्रकारची मदत करू शकतो ती मदत तिसरा वर्ग करू शकेल का? आणि तशी मदत मिळाल्याशिवाय सदसद्विवेक बुद्धीला आव्हान करून दुसरा वर्ग तिसर्‍याला फार मदत करील असे वाटत नाही.

आणखी एक बाबः कॉमन सेन्सपेक्षा सारासार विचारबुद्धि विचार करण्याची बरीच वरची पायरी दर्शविते असा माझा समज आहे.

बेफ़िकीर | 27 January, 2013 - 21:06
निव्वळ लिंक देण्याऐवजी मूळ लेखाचा नेमका भावार्थ सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
फक्त अगदी शेवटी मी माझे मत लिहिले आहे.
धन्यवाद

लेख अर्धवट आहे.

वैदिक काळात असं नव्हतं हो.

ते मुघल आणि इंग्रज आले आणि मग असं झालं बघा.

हे शेपूट जोडायचं राहिलं ..

आणि तशी मदत मिळाल्याशिवाय सदसद्विवेक बुद्धीला आव्हान करून दुसरा वर्ग तिसर्‍याला फार मदत करील असे वाटत नाही.

दुर्दैवाने ते खरे आहे,

निव्वळ दुसर्‍या वर्गाच्या मदतीने

अहो हे काम व्हायला एक पिढी पुरणार नाही. एका फटक्यात सुटेल इतका सोपा प्रश्न नाहीये हा.

पण मला असे वाटते की पहिला वर्ग बहुधा स्वार्थाने नि सत्तेच्या लालचेपायी बदलणे कठीण. पण दुसरा वर्ग थोडाफार जरी आपल्या बाजूने आला तरी पहिल्या वर्गाच्या घातकी प्रभावातून चौथ्या वर्गाला बाहेर काढणे हा एक मार्ग मला आत्ता सुचतो आहे. अधिक विचार करून, नि आंबा४, इब्लिस सारख्यांकडे दुर्लक्ष करून, कुणालाहि नावे न ठेवता, कुणाचीहि अक्कल न काढता, काही चर्चा झाली तर कदाचित इतर लोक ज्यांना समाजकार्याचा काही अनुभव आहे ते पुढे येतील. नि मग इतर मार्ग सुचतील.

(येथे पूर्वी लिहीलेले सर्व काढून टाकले आहे. विषयाशी संबंधित नव्हते,)

हल्ली वारंवार मायबोली आणि बाकीच्या काही मराठी साईट्स वर पण दुसऱ्याची अक्कल काढणे हा फारच जोमाने वाढणारा संसर्गजन्य रोग पसरलेला आहे. फारच थोडे लोक संयमाने प्रतिसाद देतात किंवा फारच थोड्या धाग्यांवर चांगली चर्चा अथवा माहिती मिळते. जवळपास सगळीकडे दोन कंपू एकमेकांना लाथाळ्या घालण्यातच धन्यता मानतात. असो. न्यूज चानेल जसे बघणे कमी झाले आहे तसे हळूहळू आता असे ओपन फोरम पण बघणे कमी झाले आहे.

समाजाचे हे वर्गीकरण सर्वच देशात लागू पडेल. टक्केवारीत थोडा फार फरक.>> टक्केवारीत खुप फरक असतो. civilised देशात हा तिसरा वर्ग ९०% असतो

दिमः८-२-१३: नितिशजी, आता तुम्हीच मनावर घ्या- लेखक : चेतन भगत
लेखाचा आशय असा:
मूळ धागा ज्या लेखकाच्या लेखावर आहे त्यात त्याने वर्णिलेल्या पहिल्या वर्गाचे [राजकीय शासक] म्हणजे एन्डीएचे नेतृत्व नरेन्द्र मोदींकडेच राहावे आणि नितीशजींनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. निखालस कुवतीच्या बळावर नेतृत्व मिळविणार्‍या तुमच्या यशाची फलशृती म्हणजे नरेन्द्र मोदींना विरोध करून तुमची घराणेशाहीला मदत अशीच ठरणार का असा सवाल केला आहे.
सर्वोत्कृष्ट योद्ध्यालाच विजय मिळेल असा खराखुरा संग्राम २०१४ ला व्हावा अशी इच्छा व्यक्त करून लेख संपवला आहे.

वर्गीकरण ठीक वाटले. - पहिला-२ हा पहिलाच आहे.

पाचवा वर्ग आहे. गुंड. पाचव्याच्या साहाय्याने पहिला चवथ्याला आपल्याकडेच राबवून घेतो. चवथा अशिक्षित असेल पण आंधळा नाही (इति नरहर कुरुंदकर) पण चवथ्याला पहीला, दुसरा आणि तिसरा सारखेच वाटतात.

असो - माझा वर्ग संकल्पनेवर "theory of classes and class-wars" वर जास्त विश्वास नाही. भारतीय समाजामध्ये अजूनही जात वर्गापेक्षा महत्वाची आहे. तिसरा, चवथा वर्ग अजूनही जातीमधे वावरतो. जात मानत नसलेला मतदान करणारा समूह जेंव्हा २०% पेक्षा जास्त होइल तेंव्हा सुधारणा होतील.

आभार मी भास्कर.खूप छान प्रतिपादन,चेतन भगत यांचे लिखाण खूप आवडते. त्यांचे हे 'वर्गीकरण' बर्‍याच अंशी पटले. तरीही झक्की यांचे मतही बरोबरच आहे. जग इतके व्यामिश्र झालेय की असे काही सोपे करून मांडता येत नाही .
तिसरा वर्ग दुसर्‍या वर्गाइतकाच स्वार्थी आहे,संघटितही आहे. हा वर्गही पहिल्या दोन वर्गांशी हातमिळवणी अधिक सहजपणे करू शकतो.. पण या वर्गातूनच वैचारिक नेतृत्व येत असते,तो या वर्गाचा एक छोटा पण प्रेरणादायी उपगट. चौथ्या वर्गाकडे त्याचे लक्ष वळवण्यास त्याला भाग पाडू शकते हे सुजाण नेतृत्वच. ते प्रभावी ठरते तेव्हा वेगळा इतिहास लिहिला जातो.

झक्की | 28 January, 2013 - 19:36
पण दुसरा वर्ग थोडाफार जरी आपल्या बाजूने आला तरी पहिल्या वर्गाच्या घातकी प्रभावातून चौथ्या वर्गाला बाहेर काढणे हा एक मार्ग मला आत्ता सुचतो आहे.
>>
तिसरा वर्ग दुसर्‍याला त्याचा व्यवसाय/उद्योग चालवायला नोकर्/सल्लागार इ मार्गांनी मदत करतोच पण उद्योगाची वाढ/ भरभराट इ साठी पहिला वर्गाच्या तोंडाकडे बघण्याशिवाय दुसर्‍या वर्गाला गत्यंतर नसते. शिवाय दुसरा वर्ग चौथ्याला आपल्यापासून दुर करण्यास मदत करत आहे हे लक्षात येताच पहिला वर्ग इन्कमतॅक्स, इडि, सिबिआय यांच्याद्वारे आर्म ट्विस्टीग करत असतो. तेव्हा 'पहिल्या वर्गाच्या घातकी प्रभावातून चौथ्या वर्गाला बाहेर ' काढायचे कसे याचा मार्ग सुचवा.

@प्रसाद१९७१ | 28 January, 2013 - 19:54
>> टक्केवारीत खुप फरक असतो. <<

तिसर्‍या वर्गाची जास्त टक्केवारी असणे पहिलया आणि दुसर्‍या वर्गावर थोडा अंकुश राहाण्यास उपयुक्त असते . पहिला टक्केवारीने कमितकमी पण व्यापक दृष्टिकोन असणारा, गुणग्राहक आणि स्वतः गुणवत्तेच्या बाबतीत श्रेष्ठ असावा असे मला वाटते. .

सुसुकु | 8 February, 2013 - 22:20
भारतीय समाजामध्ये अजूनही जात वर्गापेक्षा महत्वाची आहे. तिसरा, चवथा वर्ग अजूनही जातीमधे वावरतो. >>
असे असू नये पण वस्तुस्थिती तशी आहे हे खरे.

>>जात मानत नसलेला मतदान करणारा समूह जेंव्हा २०% पेक्षा जास्त होइल तेंव्हा सुधारणा होतील.
>>

नुसती जात न मानणे पुरेसे नाही. सारासार विचार करून देशहीत लक्षात घेऊन मतदान करणारा समूह जेंव्हा २०% पेक्षा जास्त होईल तेंव्हा सुधारणा होतील.

भारती बिर्जे डि... | 8 February, 2013 - 22:40
.. जग इतके व्यामिश्र झालेय की असे काही सोपे करून मांडता येत नाही .
तिसरा वर्ग दुसर्‍या वर्गाइतकाच स्वार्थी आहे,संघटितही आहे. हा वर्गही पहिल्या दोन वर्गांशी हातमिळवणी अधिक सहजपणे करू शकतो.. पण या वर्गातूनच वैचारिक नेतृत्व येत असते,तो या वर्गाचा एक छोटा पण प्रेरणादायी उपगट. चौथ्या वर्गाकडे त्याचे लक्ष वळवण्यास त्याला भाग पाडू शकते हे सुजाण नेतृत्वच. ते प्रभावी ठरते तेव्हा वेगळा इतिहास लिहिला जातो.<<

नेमके विश्लेषण आहे हे!
पण या उपगटाला सर्वसाधारणपणे स्वार्थत्यागच करावा लागतो. त्याची फळे त्यांच्या जिवितकालात मिळतातच असे नाही.
धन्यवाद.

भास्कर, तूम्ही वेळात वेळ काढून, "गोष्ट मोंढा गावाची" हा मिलिंद बोकील यांनी लिहिलेला अहवाल वाचाच. मी सध्या वाचतोय. आणखी काही दिवसांनी सविस्तर लिहिनच.

@दिनेशदा | 11 February, 2013 - 19:00 नवीन
सुचविल्याबद्दल धन्यवाद!
"गोष्ट मोंढा गावाची" या मिलिंद बोकील यांनी लिहिलेल्या अहवालावर आपल्या सविस्तर लिखाणाची प्रतीक्षा करतो.

प्रत्येक लिखाण मुळातून वाचणे हे अशक्यप्राय असल्याने आपल्या सारखे जे अभ्यासक वाचलेल्या लेखाचा नेमका आशय सर्वांसाठी येथे मांडतात ते मला अतिशय प्रीय आहेत.