स्पेशल २६ ची कथा तशी वेगळी असली तरी साधी आहे .
चार डोकेबाज लोक ( अक्षय कुमार ,अनुपम खेर , किशोर कदम आणखी एक) खोटे सीबीआय ऑफिसर बनून नेते आणी व्यापार्यावर धाडी घालत असतात , अशाच एका धाडीत ते इन्स्पेक्टर जिमी शेरगीलला फसवतात . मग तो आणी खरा सीबीआय ऑफीसर मनोज वाजपेयी त्यांच्या मागे लागतात एवढीच .
पण या चित्रपटाच खर यश आहे ते यातील कलाकारांचा अभिनय आणी पटकथा .
अनुपम खेर बद्दल तर काही बोलायची गरज च नाही
पण खरा भाव खाऊन जातो मनोज वाजपेयी . एका प्रामाणिक सरकारी कर्मचारी म्ह्णून शोभलाय तो . बाय द वे , या माणसावर फार अन्याय झाला आहे अस मला कायमच वाटत आलय .
अक्षय कुमार ने ही त्याची भूमिका चोख केलीये . हा आणी OMG सारखे चित्रपट करत असताना तो खिलाडी ७८६ का करतो ते कळत नाही .
जिमी शेरगील ठीक ठाक .
काजल अगरवाल नावापुरतीच आहे . बाकी किशोर कदम आणी दिव्या दत्ता याना फारसा वाव नाहेये तरी ते आपापल्या जागी ओके .
कथा १९८७ मध्ये घड्ते यालाही कारण आहे आणी तो काळ उभा करायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय . मग ते रस्त्यावरच्या गाड्या असो , विमानतळ असो की मॅगेजिन कव्हर वरची लिरिल ची अॅड असो .
संवाद सुद्धा जमेची बाजू आहे . "पगार पुरत नाही , लाच घ्यायला सुरू करू काय ? " या संवादाला सगळे थिएटर टाळ्या वाजवते हे कशाचे लक्षण माहीत नाही .
गाण्याना फारसा वाव नसला तरी ती श्रवणीय आहेत आणी कथेला अडथळा करत नाहीत .
आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे अनावश्यक दाक्षिणात्य हाणामार्या आणी आयटम साँग (जे कथेची गरज म्हणून सहज घालता आल असत) नाहीयेत .
बाकी सस्पेन्स उघड व्हायच्या भयाने जास्ती काही लिहीत नाही
पण एकूणच सगळ्यानी एकत्र बसून बघता येईल आणी बाहेर आल्यावर २.५ तास चांगले गेले असे वाटायाला लावेल असा चित्रपट . चुकवू नकाच
स्पेशल २६ : अ केस यू शूड नॉट मिस !
Submitted by केदार जाधव on 8 February, 2013 - 02:14
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेनस्डे वाल्या नीरज पांडेचा
वेनस्डे वाल्या नीरज पांडेचा हा सिनेमा. बघायला हवा. छान परिक्षण.
छान परिक्षण.
छान परिक्षण.
सुट्सुटीत परिक्षण आणि टू द
सुट्सुटीत परिक्षण आणि टू द पॉईंट... आवडलेच
परवा रेस-२ बघितला, त्यात मध्यांतरात ह्या चित्रपटाअचे ट्रेलर पाहिले होते, ते पाहून चित्रपट पहावा की नको, असे वाटत होते... हे परि़क्षण वाचल्यानंतर रिस्क घेण्यास हरकत नाही असे वाटतेय
बागे रेस २ बघितलास मग त्यावर
बागे रेस २ बघितलास मग त्यावर उतारा म्हणुन हा बघ
प्रोमोज पण जबरदस्त आहेत.
प्रोमोज पण जबरदस्त आहेत. उत्सुकता निर्माण करून जातात.
पाहणार नक्की.
आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे
आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे अनावश्यक दाक्षिणात्य हाणामार्या आणी आयटम साँग (जे कथेची गरज म्हणून सहज घालता आल असत) नाहीयेत . >>>>> चक्क ????
सुट्सुटीत परिक्षण आणि टू द पॉईंट... आवडलेच स्मित >>>> +१००....
सुटसुटीत परिक्षण >>कथा १९८७
सुटसुटीत परिक्षण
>>कथा १९८७ मध्ये घड्ते यालाही कारण आहे <<
पण हिंदी शिणूमा आहे तेव्हा रिस्क घ्यावी म्हणते
हे वाचून १९९२ साल दाखवलेल्या एका सिनेमाची आठवण होऊन छातीत धस्स झाले
mandard , शकुन , बागेश्री ,
mandard , शकुन , बागेश्री , शशांक , शिबा ,धन्यवाद

शिबा ,
कथा १९८७ मध्ये घड्ते यालाही कारण आहे >> आताच्या हाय टेक जमान्यात ही कथा घडली अस दाखवल असत तर ते अगदीच अशक्य वाटल असत
छान आहे. १ डे १ शो...
छान आहे. १ डे १ शो... पाहिला.. प्रेडिक्टेबल आहे... बहुतेक दुसरा पार्ट येईल.
हा आणी OMG सारखे चित्रपट करत
हा आणी OMG सारखे चित्रपट करत असताना तो खिलाडी ७८६ का करतो ते कळत नाही .>>> +१
छान लिहिलंय. बघणारच !
छान लिहिलंय.
बघणारच !
आवडला मलाही. मस्त आहे. अनुपम
आवडला मलाही. मस्त आहे. अनुपम खेरचे काम सर्वात आवडले. त्याची सीबीआय अधिकारी म्हणून जातानाची बॉडी लॅन्ग्वेज व एरव्हीची दोन्हीतील फरक सहज जाणवतो.
मात्र बघताना "अरे हे ते लोक लगेच चेक करणार नाहीत का?" सारखे प्रश्न डोक्यात येतात, विशेषतः क्लायमॅक्सला.
१९८७ चा काळ दाखवल्याने उगाचच कोणती गोष्ट "तेव्हाची वाटत नाही का" ते शोधत होतो. रेल्वे ठळकपणे जाणवते - ते डिझेल इंजिन व डबेसुद्धा आत्ताचे वाटतात. पूर्वी निळे नसत. डिझेल इंजिने सुद्धा पूर्वी अशी नसत.
विमानतळही जरा आत्ताचाच वाटला.
पण या किरकोळ गोष्टी आहेत. मस्त वातावरण उभे केले आहे.
मस्त आहे २६. घडलेल्या घटनेवर
मस्त आहे २६. घडलेल्या घटनेवर आधारीत आहे असा दावा आहे.
चित्रपटाच्या बाबतीत मी मंद
चित्रपटाच्या बाबतीत मी मंद आहे. त्यामुळे माझ्या प्रश्नाचे उत्तर कुणीतरी द्या!
त्या हिरवणीचे तर लग्न होते ना? म्हणजे तसं डायरेक्ट दाखवलं नाहीये पण मुंडावळ्या बांधताना दाखवलं आहे..........
वत्सला, लग्न नाही होत...
वत्सला, लग्न नाही होत... नुसते रिवाज चालू असतात, असे डायरेक्टरला दाखवायचे होते. ऐन वेळी पोरगी पळून जाते - बापाच्या पीएफचे पैसे उधळून. (हा ही उल्लेख आहे पिक्चरमध्ये)
बाकी मराठी मुलगी दाखवण्याच्या भरात डायरेक्टरने तो मुंडावळ्यांचा घोळ केला असावा, असे वाटते. तिला नुसतं मराठी असल्याचे दाखवून (खरं तर उगाच भासवून, ती मराठी वाटत तर मुळीच नाही) काय फायदा हे मात्र मला कळाले नाही. असो.
अनुपम खेरचे काम सर्वात आवडले.
अनुपम खेरचे काम सर्वात आवडले. त्याची सीबीआय अधिकारी म्हणून जातानाची बॉडी लॅन्ग्वेज व एरव्हीची दोन्हीतील फरक सहज जाणवतो. >>> +१
अनुपम खेरचे काम सर्वात आवडले.
अनुपम खेरचे काम सर्वात आवडले. त्याची सीबीआय अधिकारी म्हणून जातानाची बॉडी लॅन्ग्वेज व एरव्हीची दोन्हीतील फरक सहज जाणवतो. >>> +२
पण इंग्लिश लँग्वेजचं काय? आधी
पण इंग्लिश लँग्वेजचं काय? आधी धड येत नसलेली इंग्लिश भाषा नंतर अचानक यायला लागते . आधीची गचाळ इंग्रजी हे सोंग मानायला लागेल.
इंग्रजी बोललाय का तो
इंग्रजी बोललाय का तो सीबीआयच्या रोलमधे? लक्षात नाही. एरव्हीचे इंग्रजी मजेदार दाखवले आहे त्याचे
ट्रेनिंग देताना फाडफाड बोलला
ट्रेनिंग देताना फाडफाड बोलला की.
मला आवडला. फापटपसारा वगळून
मला आवडला. फापटपसारा वगळून चांगली 'पेस' ठेवल्यामुळे आणि खटकेबाज डायलॉग्जनी मजा आली आहे.
वर विस्मयांनी लिंक दिलीच आहे - त्या घटनेचा संदर्भ आहे सिनेमाला.
फा, अजुन एक चूक आहे. अनुपम
फा, अजुन एक चूक आहे.
अनुपम खेर आणि इतर मुंबई मध्ये ज्या हॉटेल मध्ये उतरलेले असतात त्या हॉटेल/रुम मधले वॉशबेसीन दाखवले आहे ते डीझाईन या कथेच्या काळात नव्हतेच आणि ही चूक डायरेक्टर ने देखील मान्य केलीय.
चांगला आहे. वेगवान
चांगला आहे.
वेगवान
****** स्पॉयलर अलर्ट
****** स्पॉयलर अलर्ट ********
एक शंका, जर जिमि शेरगिल आणि दिव्या दत्ता, खरे पोलीस नव्हते तर मग त्या मंत्र्याच्या घरी आलेला कमिशनर पण खराच नसावा. मग हे मंत्री महोदयाना माहिती नसेल? आणि कमिशनर खरा असेल तर मग त्याला या दोघांबद्दल माहिती नसावी??
****** स्पॉयलर अलर्ट
****** स्पॉयलर अलर्ट ********
मला असं वाटतं की ते दोघे तेव्हा पोलिसातच होते. त्यांना सस्पेन्ड केल्यावर ते या टीममध्ये आले असावेत.
होय, पण शेवटी दाखवतात ना,
होय, पण शेवटी दाखवतात ना, जिमी पोलीस स्टेशन मध्ये नसून कुठल्या तरी नाटकमंडळीच्या ऑफिसमध्ये असतो ते!
हो रंगासेठ +१ मलाही हे खटकलचं
हो रंगासेठ +१
मलाही हे खटकलचं होतं
मी वरती उल्लेख केलाय बहुदा!
नाव ऐकल्यावर सिनेमा पहावा अस
नाव ऐकल्यावर सिनेमा पहावा अस वाटतच नाही....अरे, हि काय नाव आहेत? स्पेशल २६, पुणे ५२, टेबल नं. २१....
मग नका पाहू... हे लोकं पण ना
मग नका पाहू... हे लोकं पण ना मनात येईल त्या नावाने लगेच पिक्चर काढत असतात काही समजत नाही त्यांना...
रंगासेठ, ही शंका सिनेमा
रंगासेठ, ही शंका सिनेमा पाहतानाच येते जो कच्चा दुवा आहे असं वाटतं. वास्तविक, त्या पोलीस ठाण्यामधे खळबळ उडायला हवी. ते ठाणे ज्याच्या अखत्यारीत येतं तो सर्कल, एसीपी, डीसीपी यांच्या भेटी त्या ठाण्याला व्हायला हव्यात. मंत्र्यांचा मामला असल्याने एकटा डीसीपी जाणं शक्यच नाही. त्याच्याबरोबर अॅडिशनल कमिशनर / कमिशनर किंवा आयजीपी असे वरिष्ठ पोलीस अधिकारी असायला हवेत. डीसीपी लेव्हलचा अधिकारी अधिकारवाणीने मत्र्यांशी बोलू शकत नाही.
Pages