स्पेशल २६ ची कथा तशी वेगळी असली तरी साधी आहे .
चार डोकेबाज लोक ( अक्षय कुमार ,अनुपम खेर , किशोर कदम आणखी एक) खोटे सीबीआय ऑफिसर बनून नेते आणी व्यापार्यावर धाडी घालत असतात , अशाच एका धाडीत ते इन्स्पेक्टर जिमी शेरगीलला फसवतात . मग तो आणी खरा सीबीआय ऑफीसर मनोज वाजपेयी त्यांच्या मागे लागतात एवढीच .
पण या चित्रपटाच खर यश आहे ते यातील कलाकारांचा अभिनय आणी पटकथा .
अनुपम खेर बद्दल तर काही बोलायची गरज च नाही 
पण खरा भाव खाऊन जातो मनोज वाजपेयी . एका प्रामाणिक सरकारी कर्मचारी म्ह्णून शोभलाय तो . बाय द वे , या माणसावर फार अन्याय झाला आहे अस मला कायमच वाटत आलय .
अक्षय कुमार ने ही त्याची भूमिका चोख केलीये . हा आणी OMG सारखे चित्रपट करत असताना तो खिलाडी ७८६ का करतो ते कळत नाही .
जिमी शेरगील ठीक ठाक .
काजल अगरवाल नावापुरतीच आहे . बाकी किशोर कदम आणी दिव्या दत्ता याना फारसा वाव नाहेये तरी ते आपापल्या जागी ओके .
कथा १९८७ मध्ये घड्ते यालाही कारण आहे आणी तो काळ उभा करायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय . मग ते रस्त्यावरच्या गाड्या असो , विमानतळ असो की मॅगेजिन कव्हर वरची लिरिल ची अॅड असो .
संवाद सुद्धा जमेची बाजू आहे . "पगार पुरत नाही , लाच घ्यायला सुरू करू काय ? " या संवादाला सगळे थिएटर टाळ्या वाजवते हे कशाचे लक्षण माहीत नाही .
गाण्याना फारसा वाव नसला तरी ती श्रवणीय आहेत आणी कथेला अडथळा करत नाहीत .
आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे अनावश्यक दाक्षिणात्य हाणामार्या आणी आयटम साँग (जे कथेची गरज म्हणून सहज घालता आल असत) नाहीयेत .
बाकी सस्पेन्स उघड व्हायच्या भयाने जास्ती काही लिहीत नाही
पण एकूणच सगळ्यानी एकत्र बसून बघता येईल आणी बाहेर आल्यावर २.५ तास चांगले गेले असे वाटायाला लावेल असा चित्रपट . चुकवू नकाच 
स्पेशल २६ : अ केस यू शूड नॉट मिस !
Submitted by केदार जाधव on 8 February, 2013 - 02:14
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मंत्र्यांचा मामला असल्याने
मंत्र्यांचा मामला असल्याने एकटा डीसीपी जाणं शक्यच नाही. >>> हो, आणि तो तिथल्या तिथे त्या दोघांना सस्पेण्ड करतो असं दाखवलंय, जे शक्य नाही.... त्यामुळे तो नकली असण्याचीच शक्यता अधिक. तरीही मंत्र्याला संशय कसा येत नाही?
Pages