मुंबई मध्ये ए पॉजिटिव रक्ताची गरज / An appeal for blood (A+) in Mumbai

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मुंबई मध्ये ए पॉजिटिव रक्ताची गरज.

येत्या शनिवारी, मुंबई मध्ये माझ्या मित्राच्या वडिलांवर तातडीच्या कॉरोनरी आर्टरी आणि अ‍ॅओर्टा व्हाल्व रिप्लेसमेंट अश्या गुंतागुंतीच्या ह्र्दय शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. अतिशय अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असल्या मुळे त्यांना १२ युनिट रक्ताची गरज भासणार आहे. प्रत्येक रक्तदात्याकरवी एक युनिट रक्तदानाची अपेक्षा आहे. या शस्त्रक्रियांचे गंभीर स्वरुप बघता, डॉक्टरांना ताज्या रक्ताची गरज आहे. (ब्लड बँका किंवा इतर हॉस्पिटलमधले रक्त चालणार नाही.). त्यामुळे आपण व आपल्या जवळच्यांकडून रक्तदानासाठी काही मदत होऊ शकेल का? ए पॉझिटिव (A+) रक्ताची गरज आहे.

जिवंत आणि प्रत्यक्ष हजर असलेल्या रक्तदात्यांना पहिले काही चाचण्यांतून जावे लागेल व रक्त योग्य वाटल्यासच दान करता येइल. १८ ते ६० वर्षे वय असलेले, ४५ किलोच्या वर वजन असणारे, गेल्या ३ महिन्यात रक्तदान न केलेले, गेल्या २४ तासात अल्कोहोल न घेतलेले, शक्यतो कुठलाही आजार नसणारे वा ऊपचार न घेणारे, वर्षभरात मोठी शस्त्रक्रिया न झालेले, ( स्त्रियांच्या बाबतीत गरोदर नसणार्‍या व स्तनपान न देणार्‍या ) असे रक्तदाते हवेत. रक्तदात्यांना शनिवारी प्रत्यक्ष हजर रहावे लागेल.

रक्तदात्याच्या निवडीसाठी थोडे कडक निकष आहेत जे खाली इंग्लिश मधे लिहिलेले आहेत. क्रुपया अधिक माहिती साठी खालील मेसेज बघावा. तुम्ही माझ्या मित्राशी थेट संपर्क करू शकता. त्याच्याशी बोलताना माझा संदर्भ द्यायचा असेल तर बिपीन असे नमूद केले तर त्याला ओळख पटेल.
Nilesh Porwal (9820263572 and 02228070303, email: nilesh.porwal@gmail.com).

वेळात वेळ काढून हे वाचल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद नि रक्तदात्यांचे (आगाऊ) मनःपूर्वक धन्यवाद.

------------------------------------------------------------------------------------------------------

Father of close friend of mine is scheduled for high risk dual surgeries - Coronary Artery Bypass Surgery (CABG) and the AVR (Aortic Valve Replacement) on coming Saturday in Mumbai. Given the dual surgery and the very high risk, they estimate he will need 12 units of blood, and with one unit per donor, are asking if we can arrange for a few. His blood group is A+.

They do not work with blood from other hospitals or blood banks due to the nature of the surgeries, and only accept blood from live donors that they can pre-screen and match. We need at least one healthy donor - on the day of the surgery.

These are the constraints:
Between 18-60 years, over 45 kgs, should not have donated within last 3 months, no alcohol for last 24 hours before donation, non-smokers, not on medication (allopathic, homeopathic or ayurvedic), no major surgery in the last 12 months, not pregnant or feeding or in menstrual cycles.The live donor on Saturday should be between 18 and 45 and would have to come in twice, once for the pre-screening and on the day of the operation. All others would have to come only once.

Conditions that are unacceptable: abnormal bleedings, arthritis, asthma, blood pressure, cancer, dengue fever, diabetes, endocrine disorders, HIV AIDS, Malaria, Measles, Mumps, Renal Disorders, STDs.

Medications that are unacceptable: anti arrhythmics, anti convulsions, anti coagulants, anti thyroid, Parkinson's, aspirin (3 days), acne medication (1 month), insulin (diabetes), oral antibiotics (3 months), injected antibiotics (4 days), cortisone (7 days), Cytotoxic drugs.

I would appreciate if you know someone who will be willing to donate blood (blood group A+ only, is in healthy conditions and on no medications), you reach out to me or to Nilesh Porwal (9820263572 and 02228070303, email: nilesh.porwal@gmail.com).

My sincere thanks for taking time to read this.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

धागा वर आणला आहे.
असामी, थोडक्यात मराठी एक प्यारा लिहाल तर बरे होईल, कित्येक तरुण मित्र भले मोठे इंग्लिश पाहून वाचत नाहीत...

असामी, थोडक्यात मराठी एक प्यारा लिहाल तर बरे होईल, कित्येक तरुण मित्र भले मोठे इंग्लिश पाहून वाचत नाहीत...
+१

माझेच अनेक मित्र आहेत असे Happy

इब्लिस, रिया, मराठीमधे त्यातल्या बर्याच गोष्टी कशा लिहायच्या ते मलाही कळत नाही. तुम्ही मदत करू शकाल का ?

मुंबई मध्ये ए पॉजिटिव रक्ताची गरज.

येत्या शनिवारी, मुंबई मध्ये माझ्या मित्राच्या वडिलांवर कॉरोनरी आर्टरी आणि अ‍ॅओर्टा व्हाल्व रिप्लेसमेंट अश्या गुंतागुंतीच्या ह्र्दय शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. अतिशय अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असल्या मुळे त्यांना १२ युनिट रक्ताची गरज भासणार आहे. प्रत्येक रक्तदात्याकरवी एक युनिट रक्तदानाची अपेक्षा आहे त्यामुळे आपण व आपल्या जवळच्यांकडून रक्तदानासाठी काही मदत होऊ शकेल का? ए पॉझिटिव रक्ताची गरज आहे.

शस्तक्रिया जिथे केली जाणार आहे त्या हॉस्पिटल मध्ये ब्लड बॅंकेतील रक्त घेतले जात नाही. जिवंत आणि प्रत्यक्ष हजर असलेल्या रक्तदात्यांना पहिले काही चाचण्यांतून जावे लागेल व रक्त योग्य वाटल्यासच दान करता येइल. प्रत्यक्ष ऑपरेशन च्या दिवशी निरोगी रक्तदात्याला हजर राहावे लागेल.

असामी, निदान एवढेतरी मी नक्कीच करु शकलो..( हे हेडरमधे डकवाल का ? )
शुभेच्छा आहेतच, आणि रक्तदाते मिळतील याची खात्री आहे.

०००००००००००००००००००००

माझ्या एका जवळच्या मित्राच्या वडीलांची येत्या शनिवारी मुंबईत तातडीची जोड शस्त्रक्रिया ( बायपास आणि व्हॉल्व रिप्लेसमेंट ) करायची आहे. त्यावेळी १२ युनिट, A+ रक्त लागेल.

या शस्त्रक्रियांचे गंभीर स्वरुप बघता, डॉक्टरांना ताज्या रक्ताची गरज आहे. (ब्लड बँका किंवा इतर हॉस्पिटलमधले रक्त चालणार नाही.)

१८ ते ६० वर्षे वय असलेले, ४५ किलोच्या वर वजन असणारे, गेल्या ३ महिन्यात रक्तदान न केलेले, गेल्या २४
तासात अल्कोहोल न घेतलेले, शक्यतो कुठलाही आजार नसणारे वा ऊपचार न घेणारे, वर्षभरात मोठी शस्त्रक्रिया न झालेले, ( स्त्रियांच्या बाबतीत गरोदर नसणार्‍या व स्तनपान न देणार्‍या ) असे रक्तदाते हवेत.
रक्तदात्यांना शनिवारी प्रत्यक्ष हजर रहावे लागेल.

असे रक्तदाते असल्यास कृपया श्री निलेश पोरवाल यांच्याशी 9820263572 and 02228070303, email: nilesh.porwal@gmail.com इथे संपर्क साधा.

रक्तदात्यांचे मनापासून आभार.

रक्तदानासाठी पात्रता ठरविण्यासाठी खालील निकष आहेत.

१) दाता १८ ते ६० वयोगटामधील पाहिजे. त्याचे वजन ४५ किलोच्या पेक्षा जास्त हवे.
२) गेल्या तीन महिन्यात दात्याने रक्त दिलेले नसावे. त्याने रक्त चाचणी व दाना आधी किमान २४ तास मद्य प्राशन केलेले नसावे. आणि दाता( स्त्री/पुरुष) धुम्रपान न करणारेच असावेत.
३) रक्त देऊ इच्छिणार्‍या व्यक्तीचे कोणते ही मोठे ऑपरेशन गेल्या १२ महिन्यात झालेले नसावे. तसेच ती व्यक्ती, गर्भवती, मुलाला अंगावर पाजणारी नसावी. मासिक धर्म चालू असतानाही ती व्यक्ति रक्तदानास पात्र ठरणार नाही.

४) शनिवारी, शस्त्रक्रियेच्या दिवशी ह्या जिवंत दात्यास हजर राहावे लागेल त्या दात्याचे वय १८ ते ४५ च्या दरम्यानच असावे. ह्या दात्यास दोनदा येणे आवश्यक असेल. एकदा पूर्व चाचणीसाठी आणि एकदा शस्त्रक्रियेच्या दिवशी. त्यादिवशी कदाचित जास्त थांबावे लागेल तेव्हा तशी पूर्वसूचना घरी द्यावी.

५) बाकी सर्व दात्यांना एकदाच यावे लागेल. चाचणी करून रक्त घेतले जाईल.
६) अनैसर्गिक रक्तस्त्राव, सांधे दुखी, दमा,उच्च रक्त दाब, कर्करोग, डेंग्यू ताप, मलेरिया, मधुमेह,
एंडोक्राइन ग्रंथींचे विकार, एच आय व्ही एड्स, गालगुंडे, कांजिण्या, किडनीचे विकार तसेच गुप्त रोग असलेल्या दात्यांचे रक्त घेतले जाणार नाही.

७) अँटी अरिथमिक्स, अँटी को अ‍ॅग्युलंट्स, थायरॉईड संबंधाने घेतली जाणारी औषधे, फिट्ससाठीची औषधे, पार्किन्सन रोगा मध्ये घेतली जाणारी औषधे, अ‍ॅस्पिरिन( चाचणी आधी तीन दिवस),
इन्सुलिन, अ‍ॅक्नेसाठी चे औषध( गेला एक महिना भर घेतले असेल तर) दाता चाचणी साठी पात्र ठरणार नाही. गेल्या तीन महिन्यात प्रतिजैविके तोंडाद्वारे घेतली असतील किंवा गेल्या चार दिवसात
प्रतिजैविके इंजेक्षन द्वारे दिली गेली असतील, गेल्या सात दिवसात कॉर्टिझोन घेतले असेल किंवा
सायटो टॉक्सिक ड्रग्ज घेत असलेल्या दात्यांची चाचणी केली जाणार नाही.

आपण किंवा आपल्या ओळखीच्या किंवा जवळच्या पैकी कोणाचा रक्त गट मिळता जुळता असेल
व वरील निकषांवर दाता/ दाती पात्र असेल तर कृपया माझ्याशी किंवा निलेश पोरवाल ह्यांच्याशी संपर्क साधावा.

धन्यवाद.

७) अँटी अरिथमिक्स, अँटी को अ‍ॅग्युलंट्स, थायरॉईड संबंधाने घेतली जाणारी औषधे, फिट्ससाठीची औषधे, पार्किन्सन रोगा मध्ये घेतली जाणारी औषधे, अ‍ॅस्पिरिन( चाचणी आधी तीन दिवस),
इन्सुलिन, अ‍ॅक्नेसाठी चे औषध( गेला एक महिना भर घेतले असेल तर) दाता चाचणी साठी पात्र ठरणार नाही. गेल्या तीन महिन्यात प्रतिजैविके तोंडाद्वारे घेतली असतील किंवा गेल्या चार दिवसात
प्रतिजैविके इंजेक्षन द्वारे दिली गेली असतील, गेल्या सात दिवसात कॉर्टिझोन घेतले असेल किंवा
सायटो टॉक्सिक ड्रग्ज घेत असलेल्या दात्यांची चाचणी केली जाणार नाही.
<<
थोडी अधिक सोपी, जनरल वापरातली भाषा सुचवतोयः

अँटी अरिथमिक्स : हृदयाची गती नियंत्रित करणारे / बीपीची काही औषधे. उदा. अटेन२५, मेट एक्सेल इ.
अँटी को अ‍ॅग्युलंट्स : रक्त पातळ करायची औषधे. उदा. क्लोपिग्रेल, इकोस्प्रिन (अ‍ॅस्पिरिन) इ.
अ‍ॅस्पिरिन( चाचणी आधी तीन दिवस), : अ‍ॅस्पिरिन घेत असल्यास चाचणी आधी किमान ३ दिवस बंद हवी.
अ‍ॅक्नेसाठी चे औषध : पिंपल्स्/मुरुम पुटकुळ्या यांचे औषध, गेल्या महिन्याभरात कधीही घेतले असेल तर.
प्रतिजैविके : अँटीबायोटिक्स.
कॉर्टिझोन = स्टिरॉईड प्रकारची औषधे.
सायटो टॉक्सिक ड्रग्ज : कॅन्सरसाठीची औषधे.

***
इन शॉर्ट,
विड्या तंबाखू न खाणार्‍या अन गेल्या ३ दिवसांत दारू न प्यालेल्या सर्व २५-२८ च्या आत वय असलेल्या, अन गेल्या ३ महिन्यात रक्तदान न केलेल्या तरुण मित्रांना आवाहन आहे, की या ऑपरेशनसाठी रक्तदान करावे!
धन्यवाद.

१ युनिट = १ बाटली रक्त.

एकूण १२ बाटल्या 'फ्रेश' रक्ताची गरज आहे. नॉर्मली तुम्ही दान केलेल्या रक्तावर चाचण्या करून ते २ दिवस 'शिळे' वापरले जाते. इथे संपूर्ण ताजे हवे आहे, म्हणून रक्तदाते 'निवडून' घेतले जाणार आहेत. त्यामुळेच जवळचे मित्र/नातेवाईक इ. कदाचित वगळले जातील.

यात दात्याच्या शरीरातून फक्त ३५० मिलि रक्त काढले जाते, जे संपूर्णपणे निर्धोक आहे. आजपर्यंत रक्तदान केले नसल्यास नक्कीच करा!

सगळ्या ईमेल्स मिळाल्यात मला... मी नक्की जाईन. कृपया मला आधी पत्ता कळवा... शनिवारी मग दिवस मॅनेज करायला सोपं पडेल...

मी ही तेच विचारते. त्याच दिवशी आईचे डोळ्याचे ऑपरेशन होते तेव्हा मी दोघांसाठी एकत्रित प्रेयर करत होते. आईला आत नेताना एक क्षण अगदी कसे तरी झाले. हे तर फार मेजर ऑपरेशन होते.
तुमच्या मित्रावर किती टेन्शन असेल.

मित्रांनो त्यांचे ऑपरेशन दोनदा पुढे ढकलले गेले पण शेवटी यथासांग पार पडले. सध्या त्यांना घरी परत आणलेले आहे. he is recovering well, Thank you all for checking and your heartfelt prayers.

बरे झाले! चान्गले वाटले वाचून. त्यान्ना लवकर आराम पडो आणि लवकर प्रकृती बरी होवो ही सदिच्छा!