Submitted by बेफ़िकीर on 6 February, 2013 - 01:32
असहाय्यता अगतीकता
प्रश्नाळली झुडुपे मधे
फांद्यांवरी नुसती भुते
काट्यांवरी ही पावले
रक्ताळती वेली मला
कोमेजती मन ही फुले
पक्षी चघळती पापण्या
वरती अडकल्या चांदण्या
सोबत तुझी सुटलीच की
किस्मत पुरी फुटलीच की
पण चालणे चालायचे
यातुन पुढे मी जायचे
आरंभही ना आठवे
मुक्कामही ना आठवे
कोठेतरी आहोत हे
केव्हातरी का जाणवे
यातून जर झालो वजा
उरतील सार्या बेरजा
गिळणार हे जंगल मला
होईन मी यांच्यातला
काटा बनू फांदी बनू
पक्षी बनू वेली बनू
सुटका कुठे आहे म्हणा
राहो सुरू वेडेपणा
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोठेतरी आहोत हे केव्हातरी का
कोठेतरी आहोत हे
केव्हातरी का जाणवे
यातून जर झालो वजा
उरतील सार्या बेरजा>>>>>>>>>>>> आवड्या
कवीच्या लेखनक्षमतेच्या
कवीच्या लेखनक्षमतेच्या गुढात्मकतेच्या पातळीवर उतरलेले काव्य. तरीही दुर्बोध न होता को-रिलेट करता येत आहे.
कविता आवडली.
सुंदर!!! एकामागोमाग एक अशा
सुंदर!!!
एकामागोमाग एक अशा प्रवाहासारख्या निघालेल्या ओळी आवडल्या...
पण चालणे चालायचे यातुन पुढे
पण चालणे चालायचे
यातुन पुढे मी जायचे
आरंभही ना आठवे
मुक्कामही ना आठवे
कोठेतरी आहोत हे
केव्हातरी का जाणवे
यातून जर झालो वजा
उरतील सार्या बेरजा
गिळणार हे जंगल मला
होईन मी यांच्यातला
कविता फार आवडली.
राहो सुरू वेडेपणा . . .
राहो सुरू वेडेपणा . . . .
बेफिकीरपणे . . . !
लय मनात उतरली थेट .
धन्यवाद मित्रांनो. (ही कविता
धन्यवाद मित्रांनो. (ही कविता चांगली झाली आहे असे मलाही वाटत आहे खरे)
अस्वस्थता, उद्विग्नता, मनाची
अस्वस्थता, उद्विग्नता, मनाची उलघाल यासारखे भाव प्रभावीपणे व्यक्त होताहेत.
काटा बनू फांदी बनू पक्षी बनू
काटा बनू फांदी बनू
पक्षी बनू वेली बनू
सुटका कुठे आहे म्हणा
राहो सुरू वेडेपणा >>>> सुर्रेखच ....
छान कविता.....
छान कविता.....
खूप आवडली
खूप आवडली
छान जमली ! अवांतर प्रश्नाळली
छान जमली !
अवांतर प्रश्नाळली असा शब्द आहे की नाही माहीत नाही?
प्रश्न म्हणुन उभी
ठाकली झुडपे मधे असेही वाचुन पाहीले !
आवडली. शेवटच्या सहा ओळी
आवडली.
शेवटच्या सहा ओळी जास्तच आवडल्या.
इतक्या चांगल्या कवितेत 'किस्मत पुरी फुटलीच की' वाचायला आवडले नाही.
(अमृततुल्य चहासारखी किस्मत नावाची पुरी फुटल्यासारखे वाटले)
सुरेख.....
सुरेख.....
मस्त!
मस्त!
साती.... <<<किस्मत नावाची
साती.... <<<किस्मत नावाची पुरी >>>>काहीतरीच बरळू नका
मु. कु . .....<<<<असेही वाचुन पाहिले >>> काहीच गरज नव्हती उगाचच का वाचलेत माहीत नाही
असो !!
आवडली
आवडली
वा ! मनाची घालमेल हुबेहुब
वा ! मनाची घालमेल हुबेहुब उतरलिय शब्दातून...
आवडली कविता.
बेफिकीर, कवितेत अगतिकता
बेफिकीर,
कवितेत अगतिकता जाणवते. पण प्रखरपणा कमी आहे. 'उर्मी विझली' शी नकळत तुलना होतेय...! तिची अनुगामी (सीक्वेल) म्हणून ही वाचली जावी. हेमावैम.
आ.न.,
-गा.पै.
आवडली ,साती ला पुरी ऐवजी सारी
आवडली ,साती ला पुरी ऐवजी सारी वाचु द्या .अथवा किस्मत ऐवजी तकदीर . नशिबाला मराठीत स्त्री लिंगी शद आहे का ?
आवडेश
आवडेश
आवडली
आवडली
कविता आवडली!
कविता आवडली!
आवडली कविता
आवडली कविता
धन्यवाद
धन्यवाद