राहो सुरू वेडेपणा
Submitted by बेफ़िकीर on 6 February, 2013 - 01:32
असहाय्यता अगतीकता
प्रश्नाळली झुडुपे मधे
फांद्यांवरी नुसती भुते
काट्यांवरी ही पावले
रक्ताळती वेली मला
कोमेजती मन ही फुले
पक्षी चघळती पापण्या
वरती अडकल्या चांदण्या
सोबत तुझी सुटलीच की
किस्मत पुरी फुटलीच की
पण चालणे चालायचे
यातुन पुढे मी जायचे
आरंभही ना आठवे
मुक्कामही ना आठवे
कोठेतरी आहोत हे
केव्हातरी का जाणवे
यातून जर झालो वजा
उरतील सार्या बेरजा
गिळणार हे जंगल मला
होईन मी यांच्यातला
काटा बनू फांदी बनू
पक्षी बनू वेली बनू
सुटका कुठे आहे म्हणा
विषय:
शब्दखुणा: