महादजी शिंदे छत्री - वानवडी

Submitted by रंगासेठ on 2 February, 2013 - 04:45

पुण्यात काही काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत जिथे केवळ आज-उद्या कधीतरी जाऊ असं विचार करत कधीच जात नाही. वानवडी येथील पेशवाईतील मातब्बर सरदार 'महादजी शिंदे' यांची समाधी/छत्री आहे. याबद्दल तर पुलंच्या 'बटाट्याची चाळ' मध्येच वाचलं होतं. हडपसरला सहा वर्षं राहून पण कधीच नाही गेलो तिकडे. शेवटी चिंचवडला येण्यापूर्वी इथे भेट द्यायचा योग आला.

फातिमानगरचा बिगबाझार पासून वानवडीकडे रस्ता जातो तिथे महादजी शिंदे चौक आहे, हॉटेल शिवसागरच्या पुढे. त्या चौकातून उजवीकडे अर्ध्या कि.मी.गेल्यावर डावीकडे ही वास्तू दिसते. बाहेरून गेटपर्यंत जाईपर्यंत ही वास्तू जाणवतच नाही. छोटी घरं, मंदिर यांचे दर्शनच होते. मुख्य दरवाज्यात गेल्यावरच संपूर्ण दर्शन होते.

प्रवेश फी (५ रु. मात्र) भरून आपल्याला निवांतपणे दर्शन घेता येते. अजिबात म्हणजे अजिबात कुणीच नसतं, संध्याकाळीच काही मुले क्रिकेट खेळायला आणि अधूनमधून आर्टस्कूलचे विद्यार्थी चित्र काढायला येत असतात. आणि पुणे दर्शनात याचा समावेश असल्याने त्यावेळीच काय थोडी फार गर्दी. एरवी अतिशय शांत ठिकाण आहे. महादजी शिंद्यांची समाधी आणि शेजारीच शंकराचे मस्त मंदिर आहे. ग्वाल्हेरचे सिंदिया घराण्यातर्फे ट्रस्ट मार्फत या स्थळाची देखभाल केली जाते.

विकीवरून आणखी माहिती : राजस्थानी शैलीने बांधकाम केलेली ही वास्तू, 'वास्तू-हर' शास्त्राप्रमाणे बांधली आहे. मंदिरावर ऋषी-मुनींचे पुतळे पिवळ्या खडकातून कोरलेत. मंदिराचा हॉल मोट्ठा असून त्यात शिंदे घराण्यातील सदस्यांचे तैलचित्रा-प्रचि आहेत. माधवराव सिंदियांचे ही आहे यात.

मला हॉलमधील फोटो काढता आले नाहीत, कारण अधिकृतरित्या आत फोटो काढण्यास बंदी आहे, पण कधी कधी चौकीदाराला विचारून काढता येत असावेत. वेबवर उपलब्ध आहेत हॉलचे फोटो.

प्रचि १
_MG_6850

प्रचि २
_MG_6851

प्रचि ३
_MG_6861

प्रचि ४
_MG_6858

प्रचि ५
_MG_6855

प्रचि ६
_MG_6857

प्रचि ७
_MG_6862

प्रचि ८
_MG_6865

प्रचि ९
_MG_6873

प्रचि १०
_MG_6875

प्रचि ११
_MG_6872

प्रचि १२
_MG_6869

प्रचि १३
_MG_6867

प्रचि १४
_MG_6868

प्रचि १५
_MG_6893

प्रचि १६ (हा HDR आहे, तीन फोटो - एक अंडरएक्स्पोज्ड, एक ओव्हरएक्स्पोज्ड आणि एक पर्फेक्ट एक्स्पोज्ड एकत्र करून)

ShindeChattri-HDR

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात असून गेले नाही कधीच.. प्रचि फार सुरेख आलेत...
बाहेरुन जातांना आत इतकी सुन्दर कलाक्रुती (हा शब्द कसा लिहायचा?) असेल असे कधीच वाटले नाही.

हडपसर मध्येच राहातोय पण अजुन जाण्याचा योग नाही; आता आवर्जुन जाणार.
आपल्या राहत्या परिसरातील इतक॑ सु॑दर ठिकाण पहायच॑ राहुन गेल॑ होत॑, माहिति
दिल्याबद्द्ल आभारी आहे.

रंगासेठ....

तुमचे मानावे तितके धन्यवाद कमीच होतील. कार्यालयीन कामानिमित्ताने कोल्हापूर ते पुणे अशा फेर्‍या गेल्या पंचवीसे-तीस वर्षात किती झाल्या असतील त्याची गणती करणेच अशक्य. ऑफिसचे काम काही वेळा लवकर आटोपले की मग जवळपास ३/४ दिवस शिल्लक असायचा, तो "कारणी" लावण्यासाठी पुण्यातल्या पुण्यात अनेक ठिकाणी भटकंती व्हायची.....पण कधीही 'महादजी शिंदे छत्री' पाहाण्यासाठी हडपसरला जायचे कसे काय डोक्यात आलेच नाही. ["बटाट्याच्या चाळी'तील भ्रमणमंडळ "पुणे दर्शना' त महादजी शिंद्यांच्या छत्रीचा उल्लेख करत असल्याचे वाचूनदेखील....]

आज तुम्ही दिलेली ही प्रकाशचित्र पाहून खरोखरीच काहीतरी अमूल्य असे 'मिस'केल्याची भावना मनी दाटली आहे. नक्की आता हडपसरला जाऊन हा परिसर पाहाणार....इतके मात्र इथे म्हणू शकतो.

[अवांतर : ग्वाल्हेरच्या 'सिंधिया' ट्रस्टने 'छत्री परिसर' ची देखभाल छानच ठेवली आहे ते वृत्तांतावरू समजले, असे असूनही त्यानी महाराष्ट्रातील परंपरेनुसार फरशीवर महादजी यांचे आडनाव 'शिंदे' असे कोरल्याचे पाहून समाधान वाटले.]

अशोक पाटील

वा ! रंगासेठ मस्तच !
पण बाजीराव पेशाव्यांच्या समाधीकडे महाराष्ट्र शासनाने दुर्लक्ष केले आहे. म्.प्र. शासनाचेही अभिनंदन !

माझं बर्‍याचदा जाणं होतं छत्रीला. (ऑफ़ीस तिथुन जवळ असल्याचा फ़ायदा)
अतिशय शांत निवांत जागा आहे. माझी अत्यंत आवडती! Happy

मध्यंतरी (पावसाळ्यात )बरीच दुरवस्था झाली होती, पण आता डागडुजी केली आहे.

न पाहीलेल्यानी एकदा अवश्य भेट द्या!

धन्यवाद. Happy सिंदिया ट्रस्टने खरच चांगली देखभाल ठेवली आहे. आणि अर्ध्या तासाच्या आतच ही वास्तू पाहून होते, तेव्हा सहज म्हणून चक्कर टाकता येईल.

छान फोटो. फलकावर लिहिल्याप्रमाणे ही छत्री आणि इतर बांधकाम १९६५ चं दिसतंय. त्यापूर्वी तिथे समाधीशिवाय इतर काय होतं?

खुप सुरेख फोटो सगळेच Happy

या धाग्यामुळे या ठिकाणी जायची इच्छा बळावली आहे. खूप धन्यवाद रंगासेठ>>>>>हेम +१ Happy

पु.लं.च्या भाषेत "आज छत्री पहायला सांगताय उद्या रेनकोट सांगाल" Happy
जोक्स अपार्ट हे ठिकाण खुप छान आहे, जवळच शिंदे यांचा "लक्ष्मी विलास" राजवाडा पण होता,
आता त्याची परिस्थिती काय आहे माहिती नाही.
जवळच एक शनिमंदिर पण आहे, कोणी भाविक असतील तर अवश्य जा, आवडेल.

पुण्यातलं अतिशय जवळचं एक सुंदर ऐतिहासिक ठिकाण आहे. मी दोन-तिनदा गेलोय. खुप शांत-निवांत अन छान वाटते. मस्ट वॉच !