Graphology: हस्ताक्षराचा अभ्यास

Submitted by माणूस on 19 May, 2009 - 17:08

मधे भारतात गेलो होतो तेव्हा ह्याबद्द्ल काही माहीती कळाळी... असा पण एक अभ्यास असतो हे मला माहीत नव्हते. व लिखाणाच्या पद्धतीमधे बदल केल्यास आपल्याला त्याचा फायदा होवु शकतो असे देखील कळाले.

आपल्यापैकी कुणाला ह्या शास्त्राची माहीती आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी या बद्दल काही लेख वाचले आहेत. एक पुस्तक पण. नाव आठवत नाही. अक्षरांचे वळण, लहान मोठा आकार, टोपी द्यायची पद्धत (मराठीसाठी) यावरुन बरेच विश्लेषण करता येते. कोर्‍या पानावर लिहिताना जर अक्षरे वरच्या दिशेने जात असतील ती व्यक्ति सकारात्मक विचार करते,जर अक्षरे खालच्या दिशेने जात असतील ती व्यक्ति नकारात्मक विचार करते असे म्हणतात. तसेच खुप जोर देउन लिहिणार्‍या व्यक्तिला (ज्यामुळे पानाच्या दुसर्‍या बाजूवरही अक्षरे उमटतात) पटकन राग येतो. अक्षरे लहान आकाराची असतील तर ती व्यक्ति थोडी reserved असते.

आपल्याकडे राम्पास्वामी नावाचा एक आयडी यायचा. त्याचा अभ्यास होता Graphology वर.
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

माझी एक हातभर लाम्बीची पोस्ट "उडाली" Sad
आता उद्याच जमल तर लिहीन
(कोणे एके काळी म्हणजे १९९५ च्या आधी) माझा अभ्यास होता! Happy

फार वर्षांपुर्वी मुंबईच्या जिटीजीला अंबर ने पण बर्‍याच जणांचे हस्ताक्षर बघितले होते Happy