एक दिवसीय पिकनिक किंवा मोठी टूर (देशांतर्गत किंवा देशाबाहेर) ठरली की सर्वात महत्त्वाचे असते, प्रवासासाठी न्याव्या लागणार्या सामानाची यादी बनवणे व त्यानुसार सामान पॅक करीत जाणे! सोबत लहान मुले/ वृद्ध व्यक्ती/ आजारी व्यक्ती असतील तर काही स्पेशल वस्तुंना सामानात जागा द्यावीच लागते.
इथे प्रवासाच्या पूर्वतयारीसाठी टिप्स देणे अपेक्षित आहे. उदा.
१) किती वर्षे वयाच्या मुलांसाठी काय काय वस्तु 'हे अजिबात विसरू नका' च्या यादीत असू शकतात?
२) विमान प्रवासासाठी च्या उपयुक्त टिप्स (उदा. हँड्बँग आणि बाकी मोठ्या बँग्स ह्या मध्ये काय काय ठेवायचे ह्याचे निर्णय कोणत्या अनुषंगाने घेता?
३) बाहेरचे खाणे न खाऊ शकणार्या लहान मुलांसाठी अध्ये मध्ये खाण्यासाठी तहान लाडू, भूक लाडू म्हणून काय काय घेता येऊ शकेल?
४) सामानाचे वर्गीकरण बॅग्स मध्ये कसे करता?
५) टूर कंपनी सोबत चा प्रवास व स्वतः ठरवलेला व स्वतःच आखलेला प्रवास ह्यांमध्ये काय काय गोष्टींचे नियोजन कसे कसे करता?
६) काही स्पेशल सहलींसाठी (जसे की क्रूज वरची सहल, ट्रेकिंग) स्पेशल वस्तु 'मस्ट' यादीत असतात. ती यादी इथे देता आली तर उत्तमच.
७) प्रवासाच्या ठिकाणाप्रमाणे सोबत 'मस्ट' असणार्या वस्तुंची यादी
ह्या व अश्याच अनुषंगाने एकुणच प्रवासाच्या पूर्वतयारी मध्ये जे काही मुद्दे येत असतील त्या सर्वांवरच इथे चर्चा करता येईल. (ही हेडर पोस्ट जरा विस्कळीत झाली आहे ह्याची कल्पना आहे. मनात असलेले सगळेच मुद्दे नीट मांडता आले नाहीयेत. माबोवर स्पेसिफिक कारणांनी स्पेसिफिक प्रवासांसाठी टिप्स मागणारे धागे आधी पाहिले होते. पण सर्वंकष मुद्दे चर्चेत असलेला धागा माझ्या पाहण्यात आला नव्हता. म्हणून हा धागा काढत आहे. अश्या स्वरुपाचा धागा आधी असल्यास सांगा, म्हणजे हा काढून टाकेन. )
तब्येतीच्या कुरबुरी असल्या तर
तब्येतीच्या कुरबुरी असल्या तर परदेशी प्रवासासाठी, हेल्थ इन्श्यूरन्स अवश्य घ्यावा. तो फारसा महाग नसतो.
आहाराबाबत काही खास आवडीनिवडी असल्या तर विमानाचे तिकिट बूक करतानाच सांगावे ( नंतरही नेटवर हे करता येते पण काही विमान कंपन्या किमान ७२ तासाची मुदत मागतात. ) हव्या त्या सीट्सही आता निवडता येतात. या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा.
काहि देशांसाठी टेलिफोन कार्डस आता मुंबईच्या विमानतळावर मिळतात. थोड्या दिवसासाठी जात असाल तर ती उपयोगी पडतात. बहुतेक परदेशी विमानतळावरच फ्री इंटरनेट उपलब्ध आहे. आपली महत्वाची डॉक्यूमेंटस आपल्याला ईमेल बॉक्सवरूनही घेता येतात.
नमस्कार, मला अजुन एक
नमस्कार, मला अजुन एक विचारायचे आहे की अमेरिकेत जाताना चेक्ड इन बॅगेजमधे व केबिन बॅगेत काय काय खाऊ व डाळी वै. आपण घेउन जाउ शकतो? मला ३ महिने कामासाठी जायचे आहे तर बेसिक मसाले आणि इतर जरुरी सामान स्वयंपाकासाठी न्यायचे आहे. मी वेस्ट कोस्ट ला San Jose जाणार आहे. कस्टमचा काहि त्रास न होता नेता येइल असे सामान मला सुचवा.
परदेशी विमान प्रवासात
परदेशी विमान प्रवासात तुम्हाला हवे असलेले जेवण आहे कि नाही हे एक दिवस आधी फोन अथवा वेब वर नक्कि चेक करावे. खुपदा तिकिट १-२ महिना आधि बुक केल्यामुळे लक्षात राहात नाहि आणि विमानात जेवणाचा प्रोब्लेम होतो.
बहुतेक विमान कंपन्यांचे
बहुतेक विमान कंपन्यांचे फ्रिक्वेंट फ्लायर प्रोग्रॅम्स असतातच. जरी नियमित प्रवास करत नसाल तरी या प्रोग्रॅम्सचे सभासद होणे फायद्याचे असते. तूमचे मील आणि सीट प्रेफरन्स त्याबरोबरच नोंदवले जातात. आणि पुढच्या वेळी तिकिटाबरोबर आपोआप नोंदवले जातात. त्या त्या कंपनीच्या, पहिल्या प्रवासातच हे सभासदत्व घेता येते.
एमिरेट्स, कॅथे, सिंगापूर, इथिओपियन वगैरे फुकट सभासदत्व देतात. क्वांटास फी घेते.
केबिन लगेज ही, चाकवाल्या बॅग्जपेक्षा बॅकपॅक (सॅक) असले तर सोयीचे पडते असे मला वाटते. पाठीवर ओझे होते हे खरे आहे पण अनेक विमानतळांवर भरपूर चालावे लागते. त्यावेळी हात मोकळे राहतात, बॅकपॅक मूळे.
चेक्ड इन बॅगमधे काहीही मूल्यवान ठेवू नये. तसेच त्या बॅग्ज धडाधड फेकल्या / आपटल्या जातात हे लक्षात ठेवूनच पॅक कराव्यात. त्या काठोकाठ भराव्यात. (रिकाम्या ठेवल्या तर चेपल्या जातात. ) द्रवपदार्थ ( लोणची सुद्धा ) दोनतीन थरात पॅक करावीत. अगदी नाजूक असणार्या ट्यूबज वगैरे एका छोट्या प्लॅस्टीकच्या बॉक्समधे ठेवाव्यात. औषधे, मसाले यासाठीसुद्धा हे बॉक्सेस उपयोगी ठरतात.
केबिन लगेज ही, चाकवाल्या
केबिन लगेज ही, चाकवाल्या बॅग्जपेक्षा बॅकपॅक (सॅक) असले तर सोयीचे पडते असे मला वाटते. पाठीवर ओझे होते हे खरे आहे पण अनेक विमानतळांवर भरपूर चालावे लागते. त्यावेळी हात मोकळे राहतात, बॅकपॅक मूळे. <<
पाठ वा खांदा व्यवस्थित कंडिशनमधे असतील किंवा फारसे केबिन लगेज नसेल तरच हे शक्य आहे.
अन्यथा वाट लागते
एका हातात लॆपटॊप आणि एका
एका हातात लॆपटॊप आणि एका हातात बॆगचा दांडा, असे असल्यावर मला अवघडते. सॆकमधे लॆपटॊप पण राहतो. मग दोन्ही हात मोकळे. तसेही ड्यूटी फ़्री शॊपिंगसाठी, माझी सॆक रिकामीच असते.
माझ्या प्रश्नाचे उत्तर कोणि
माझ्या प्रश्नाचे उत्तर कोणि का देत नहिये?
दमहाजन! गुगल करुन बघितल्यास
दमहाजन! गुगल करुन बघितल्यास तुम्ही जाणार्या भागात जवळच एखादे indian gorcery shop असल्यास तुम्हाला काहिही किराणा आणायची गरज नाही इथेच घ्या..(थोडे महाग वाटेल पण ऊगाच क्स्ट्म मधे अडकण्यापेक्षा हे बरे)
काय आणू नका
१)राइस(अजिबात आणू नका बन्दी आहे)
२)फळे
३)बिया
अवश्या आणा
१) घर्गुती फराळ चिवडा,लादू,चकली ई...)
२)कुकि.न्ग साथी लागणारी बेसिक भा.न्डि
३) मसाले आणू शकता(तयार गोडा मसाला आणा पण ,जिरे,मोहरी ई आणन्यापेक्षा तयार घर्गुती खाऊ आणा)
आणखी आठवल्यावर लिहिल..
शुभेच्छा!
बहुतेक विमान कंपन्या वेब चेक
बहुतेक विमान कंपन्या वेब चेक इन ७२ तास आधी सुरु करतात... नीदान देशात तरी मी नेहेमी वेब चे इन करुनच जाते. परदेशातही जाताना अनेकदा वेब चेक इन करुनच गेले आहे.. फक्त परत येताना गंडायला होतं....(आळस अजुन काय!!!)... अनेकदा पुर्ण फॅमीली दुर दुरच्या सीट्स वर बसुन प्रवास झाले तरी खोड मोडत नाहिये.....
प्रवासात डायबेटिक पेशंट मात्र इन्शुलीन हँड बॅग मधे कॅरी करु शकतो. पण त्याच्या कडे डॉ. चं सर्टिफिकेट पाहिजे.
वन टाइम यूजची डिस्पोजेबल अंडरगार्मेंट्सही मिळतात.>>>>
हा काय प्रकार आहे? अॅडल्ट डायपर्स तर नाहीत ना? ( अज्ञान !!! घोर अज्ञान)
काहि देशांत प्रवेश
काहि देशांत प्रवेश करण्यापूर्वी काही लसी टोचून घेणे आवश्यक असते. त्याची माहिती करुन घ्यावीच आणि त्या घ्याव्यातच. ( पर्याय.. आल्यावर दहा दिवसाची कोठडी नाहीतर चक्क हकालपट्टी )
बॅगेमधे इस्त्री केलेल्या कपड्यांची इस्त्री मोडतेच. एखादा ड्रेस तसा हवा असेल तर तोही प्लॅस्टीकच्या छोट्या बॉक्समधे न्यावा. नेलकटर, छोटी कात्री, रेझर या वस्तूही विमानातल्या केबिन लगेज मधे चालत नाहीत तसेच लाल तिखट आणि मसालेही चालत नाहीत.
एखादे कप गरम पाणी करण्यासाठी एक वॉटर हिटर मिळतो आता. गरम चहा / कॉफी / सूप प्यायची आवड असेल तर तो आणि छोटा कप, रेडीमिक्स सॅशे, कप-अ-सूप सोबत ठेवावे. क्रोसिनची स्क्रीप / इयर बड्स अशाही काही गोष्टी जवळ ठेवाव्यात. परक्या ठिकाणी त्यांची दुकाने पटकन सापडत नाहीत.
बॅगेत जाताना एक कापराच्या वड्यांचे पाकिट ठेवावे. येताना ओलसर कपडे भरायचे असतील तर त्या पिशवीत कापराची वडी ठेवली, तर कुबट वास येत नाही.
तिकिटांचे पी.एन.आर. / बुकिंग नंबर वेगळे लिहून किंवा मोबाईल मधे ठेवावेत. आयत्यावेळी तिकिट सापडले नाही तर काहीतरी खटपट करता येते.
जर आयत्यावेळी विमानाचे मॉडेल बदलले तर आधी निवडलेल्या सीट्स मिळत नाहीत, ते लक्षात ठेवावे. काऊंटर स्टाफ त्यावेळी फार काही करु शकत नाही.
००००००००
गोव्यातून दारूच्या बाटल्या न्यायच्या असतील तर जपून. अनमोड घाटात चेकिंग होते.
मोकिमी, हे पहा : वन टाइम
मोकिमी,
हे पहा : वन टाइम यूजची डिस्पोजेबल अंडरगार्मेंट्स
हे अॅडल्ट डायपर नव्हे. विषेशतः परदेश प्रवासात फार परवडेबल अन सेन्सिबल वस्तू आहेत या. धुणे, वाळवणे अन सांभाळणे कसलीच कटकट नाही. अन फारसे महागही नाही.
दिनेशदा, अतिशय उपयुक्त
दिनेशदा, अतिशय उपयुक्त माहिती. खरच, या छोट्या छोट्या गोष्टी ऐनवेळी लक्षात आल्या नाहीत तर पंचाईत होते.
२)कुकि.न्ग साथी लागणारी बेसिक
२)कुकि.न्ग साथी लागणारी बेसिक भा.न्डि <<<
महाजन, भांड्यांमधे एक बेसिक प्रेशर पॅन घ्या म्हणजे त्यात पोहे-खिचडी-उपमा, भाज्या-आमट्या, भात-खिचड्या वगैरे सगळे करता येईल.
बाकीची भांडी अगदी जुजबी १-२ पातेली/कुंडे वगैरे पुरेसं आहे.
मिसळणाचा छोटा डबा बेसिक सगळ्या वस्तू प्लॅस्टिकच्या छोट्या झिपलॉकमधे भरून त्या त्या वाट्यांमधे ठेवून नेऊ शकता. तूरडाळ आणि मूगडाळ कस्टमला चालत असेल तर अगदी दोन-तीन जेवणांपुरत्या घेऊन जा. जेणेकरून लगेच देसी ग्रोसरी शोधायला नको.
सुर्या, चॉपिंग बोर्ड, किसणी किंवा तत्सम गॅजेटस अजिबात नेऊ नका. लोणची, ओल्या चटण्या अजिबात नेऊ नका.
मी गेले होते तेव्हा २५-३० गुळाच्या पोळ्या भरपूर तूप लावून आणि दोन तीन झिपलॉकमधे व्यवस्थित पॅक करून नेल्या होत्या. लसणाची कोरडी चटणी नेली होती. गुळाच्या पोळ्या टिकतात आणि लगेच बाकी काही जाऊन आणायला जमले नाही तर लसणाच्या चटणीबरोबर खाऊन भूक भागते. याला बरीच वर्षे झाली. अजूनही हे कस्टम्स मधे चालत असेल तर घेऊन जा.
परदेशात जाताना सगळ्यान्चे
परदेशात जाताना सगळ्यान्चे पासपोर्ट. न.म्बर आणि व्हॅलीड अपटू डेटस एका कागदावर लिहून न्याव्यात. इमिग्रेशन फॉर्म भरताना सगळ्यान्चे पासपोर्ट काढत बसावे लागत नाहीत.
माहिती बद्दल आभार , अजुन काहि
माहिती बद्दल आभार , अजुन काहि कोणाला माहीत असेल तर जरूर लिहा, धन्यवाद.
परदेशी जाताना -ज्या
परदेशी जाताना -ज्या व्यक्तीकडे जात असाल ( विशेषतः) नातेवाईक असल्यास
त्याचा पूर्ण पत्ता अरिया कोड सहित वरच असावा..
चेक इन च्या वेळेस एअरलाईन वाले विचारतात.
दमहाजन सॅन होजेला तुम्हाला
दमहाजन
सॅन होजेला तुम्हाला गरम जिलब्या सुध्दा मिळतील
काहीही मसाले वगैरे नेवू नका
मला कोणी सांगेल का? Travel
मला कोणी सांगेल का?
Travel कूकर (साधारण चहा-कॉफी, maggi, प्यायला पाणी गरम हवे असल्यास) पुरते वापरता येतो असा पाहिला. पण त्यावर suitable फोर international travel असं लिहिलंय. पण देशात सुद्धा वापरता येईल ना? एकदम छोटा आहे.कोणी वापरलाय का?
आणि इलेक्ट्रिक kettle?
दमहाजन, अहो मसाले , तांदूळ ,
दमहाजन, अहो मसाले , तांदूळ , डाळी इ. काहीही नेऊ नका. फक्त घरचा खाऊ बास होईल. फार तर सदाशिव पेठेतून कोथरुड ला गेलायत इतपत च फरक वाटेल भारतातून सॅन होजे मधे गेल्यावर तुम्हाला
नी+१
नी+१
छान धागा आणि खुप उपयुक्त
छान धागा आणि खुप उपयुक्त माहिती.
परदेश प्रवास असेल तर पुरेसे परदेशी चलन बरोबर ठेवावे, चांगला रेट बघून आधिच चलन काढून ठेवावे , एयरपोर्ट वर रेट ईतका चांगला मिळत नाही. परदेशी टॅक्सी,फूड, शॉपींग ई. चे रेट बघावेत, ऑनलाईन तूम्हाला हे सगळे रेट मीळतील.थायलंड/मलेशिया मध्ये फार लूटतात, म्हणून आधीच तयारी केलेली बरी.
मेमरी कार्ड्स, फोन/कॅमेरा चार्जर,महत्वाची कागद पत्रे हॅन्ड बॅगेत ठेवावीत. कनेक्टींग फ्लाईट लेट असल्यास किंवा भलत्याच जागी फ्लाईट लॅड काराव लागल्यास पंचायत होत नाही.
एक बॅग जरा रीकामी ठेवावी. आपण भारतीय नाही म्हटल तरी व्यवस्थित शॉपींग करतो
परतताना बॅगेतली कोंबाकोंबी आणि ओव्हरवेटच टेन्शन येत, म्हणून स्पेअर जागा असलेली बरी. नाहीतर आयत्या वेळी बॅग विकत घ्यायची वेळ येते.
मी कोणत्याही प्रवासात न विसरता एक्स्ट्रा चष्मा घेतो, जर चष्मा फूटला/हरवला तर बॅकप असलेला बरा.
परदेश प्रवासात मोबाईल हल्ली
परदेश प्रवासात मोबाईल हल्ली लागतोच.
बरेच मोबाईल हे Tri-Band/Quad-Band असतात. जाण्यापूर्वी तिथली System, आणि त्याप्रमाणे आपला Mobile चालेल की नाही ते तपासून घ्यावे. Dual Sim मोबाईल असला आणि तिकडे चालत असला, तर दोन दोन मोबाईल बाळगावे लागत नाहीत.
अमेरिकेत येताना सर्व प्रकारच्या फळं, भाज्या, मासे/मटण यावर बंदी आहे.
शेकडा १० लोकांचे Checking होते त्यामुळे दोन - चारदा आलेले लोक वाट्टेल तो सल्ला देतात. (कोणी पकडत नाही, आम्ही तर आंबे पण नेले, काहीही होत नाही .. वगैरे वगैरे).
पण Checking झाले आणि पकडले गेलात तर पदार्थ फेकणे -- किंवा पदार्थ फेकूनही, दंड भरणे -- अश्या शिक्षा होऊ शकतात.
नेहमी येणार्या भारतीयांकडे मिठाईचे डबे, तुपाच्या, लोणच्याच्या बरण्या इत्यादी बघून बघून बहुतेक सगळ्या कस्टम ऑफिसर्सना सवय झालेली असते आणि ते त्रास देत नाहीत.
पण एकादा अडून बसला, तर त्याचा कायदा आणि त्याचेच नियंत्रण.. याची तयारी ठेवावी.
इथे मिळत नाही अश्या फार कमी गोष्टी आहेत आणि सगळ्या वस्तू योग्य भावातही मिळतात.
परदेशात ट्रॅव्हलर्स चेक्स
परदेशात ट्रॅव्हलर्स चेक्स नेलेले उत्तम. हवे तेव्हा तिथल्या बँकातून वटवून त्यांच्या त्यांच्या चलनात रोकड करून घेता येते. बँकेत जाताना बरोबर पासपोर्ट अवश्य न्या.
बरेचदा परदेशात भारतीय बँकांच्या क्रेडिट कार्डांवरच्या ट्रॅन्झॅक्शनला बँक २% जास्त आकारते. त्यामुळे नक्की खात्री करून घेऊनच कार्ड वापरावे.
इब्लीस... धन्स....
इब्लीस...
धन्स....
निंबुडा अगदी योग्य आणि छान
निंबुडा अगदी योग्य आणि छान धागा काढलाय ! नंदिनी ,मोहन कि मीरा ,नीधप यांनी बरोबर सूचना केल्या आहेत .१ )१०वर्षांच्या आतल्या मुलांकरिता त्यांची आवडती चार कॉमिक पुस्तके जवळ ठेवावीत प्रवासात कंटाळा घालवता येतो .म्युझिअमला जाऊ नये त्याऐवजी झूसाठी वेळ ठेवावा .४)तुरटिचा खडा जवळ असावा पायाला जखम झाल्यास लावावी जखम चिघळत नाही ,विशेषत: पावसाळयात .डोळयात काही गेल्यास तुरटिच्या पाण्याने धुवावा . चिमटा आणि भिँग असावे ,काटा अथवा काच पायात घुसल्यास लगेच काढल्यास सेप्टिक होत नाही . न्यायला सोपे आणि अत्यावश्यक (५) टुर कंपनि बरोबर जाणाऱ्यांसाठी गाईड आणि पुस्तकांची गरज नसते कारण ते दाखवतात तेच दिलेल्या वेळांत पाहावे लागते .इतरांसाठी :-ही पुस्तके वाचून गेल्यास गाईडची गरज लागत नाही .चला राजस्थानच्या /मध्य प्रदेशच्या सहलीला ,पांडुरंग पाटणकर .लोनलि प्लैनेटचे साऊथ/नॉथ इंडिया (जुनी दोनशे अडिचशेत मिळतात) (७)हिल स्टेसाठी दुर्बिण अथवा २० एक्स पॉवरचा कैमरा न्यावा .
तिकीटावरचे नांव पासपोर्टशी
तिकीटावरचे नांव पासपोर्टशी मिळते असावे..
माझ्या एका मित्राला सगळेत बाबू म्हणतात. खरे पूर्ण नांव वेगळेच आहे..
मुलीचे लग्न गुजराती घराण्यात झाले. त्यांच्यासाठी काढण्यात आलेल्या विमानाच्या तिकीटावर नांव , 'बाबूभाय'.
मुंबईला विमानतळावर गेल्यावर सेक्युरिटीने अडवले. तिकीट काढणार्या गुजूभायने सिक्यूरिटीवाल्याला बाजूला घेऊन पटवले, त्यामुळे विमानतळावर प्रवेश मिळाला.
विमान कर्मचार्यानी (check-in) एकही प्रश्न विचारला नाही आणि हे महाशय आरामात विमानप्रवास करते झाले.
रच्याकने: हल्ली EWR-Terminal-B मधे काय काय आणता येत नाही ते सामान छोट्या बाटल्यांमधे भरून ठेवलेले आहे. आणि कस्टमवाला 'हे आहे का? ते आहे का?' असं विचारतो..
श्रीनगर विमानतळावर आमचा कापुर
श्रीनगर विमानतळावर आमचा कापुर सगळा फेकुन दीला, पण मजेचि गोष्ट ही श्रीनगरला जाताना मात्र allow केला !
३० मे ते १३ जून १३ दिवसासाथी
३० मे ते १३ जून १३ दिवसासाथी सिमला-कुलु -मनाली ला जायच आहे त्यासाठे काय काय तयारी करावी
थर्मल्स ची गरज लागेल का? शुज
थर्मल्स ची गरज लागेल का? शुज घ्यावे का? आवश्यकता असल्यास कश्या प्रकारचे घ्यावेत?
लेह लडाख ला जाताना कुठल्या
लेह लडाख ला जाताना कुठल्या गोष्टी नेणे आवश्यक आहे ? म्हणजे कि औषध/ सन ग्लासेस ? "यू व्ही "सन ग्लासेस च्या किंमती काय असतात? ते नॉर्मल चष्म्याच्या दुकानात मिळतात का ? लेह लडाख मध्ये ( ड्राय आणि कोल्ड विंडस मुळे ) स्पेशल स्किन ची काळजी घ्यावी लागते का ?
Pages