रानवाटा प्रस्तुत "आरंभ" - नवीन कलाकारांना रंगमंच देणारे छायाचित्र प्रदर्शन.
"रानवाटा" छायाचित्र कार्यशाळेचे आयोजन करून नवीन कलाकार घडवत असते. या सर्व हौशी आणि नवकलाकारांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळावी म्हणून रानवाटातर्फे त्यांनी काढलेल्या छायाचित्राचे प्रदर्शन "ठाणे कलाभवन" येथे भरवले आहे. या प्रदर्शना मध्ये जवळपास ४०० छायाचित्रे वेगवेगळे विषय, छायाचित्रकारांच्या कल्पनेतून मांडण्यात आले आहेत.
मायबोलीकर जिवेश (जिवेश), Sano (संदेश करळकर), राहूल०७ (राहूल क्षीरसागर), जिप्सी (योगेश जगताप) यांचीही काही छायाचित्रे प्रदर्शनात आहेत.
हौशी कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी या प्रदर्शनाला नक्की भेट दया. 
रानवाटा प्रस्तुत "आरंभ"-छायाचित्र प्रदर्शन
ठाणे कलाभवन,
कापूरबावडी, बीगबजार जवळ,
ठाणे (पश्चिम).
दिनांकः शनिवार २ फेब्रुवारी आणि रविवार ३ फेब्रुवारी
वेळः सकाळी १० ते रात्रौ ८ पर्यंत.
यंदाच्या प्रदर्शनातील छायाचित्रांची एक झलकः







खुप खुप अभिनंदन आणि खुप खुप
खुप खुप अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा.
अभिनंदन योगेश , राहूल ..
अभिनंदन योगेश , राहूल ..
हार्दिक अभिनंदन आणि अनेक
हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा !!!
पुण्यात कधी भरवताय प्रदर्शन ?? >> +१
धन्यवाद लोक्स शनिवारी मी
धन्यवाद लोक्स


शनिवारी मी पूर्ण दिवस असेल आणि रविवारी दुपारनंतर
शक्यतो रात्रौ ८ च्या आधी या
अरेरे मिसनार हे मी तुम्हा
अरेरे मिसनार हे मी

तुम्हा सर्वांना शुभेच्छा.. तेव्हढं पुण्यात प्रदर्शनाचं बघा
मस्त रे, अभिनंदन ! पुण्यात
मस्त रे, अभिनंदन !
पुण्यात कधी भरवताय प्रदर्शन
मनःपुर्वक अभिनंदन ! !
मनःपुर्वक अभिनंदन ! ! !
पुण्यात कधी भरवताय प्रदर्शन >>> +१
रानवाटा उपक्रमास शुभेच्छा
अभिनंदन व शुभेच्छा ! कीप अप
अभिनंदन व शुभेच्छा ! कीप अप !!
अभिनंदन योगेश, मी पण नक्की
अभिनंदन योगेश,
मी पण नक्की येतेय, जमल्यास ऑफिसमधील काही लोक आहेत त्यांनाही घेऊन येते. बहुतेक रविवारी
अभिनंदन आणि शुभेच्छा, योगेश!
अभिनंदन आणि शुभेच्छा, योगेश!
अभिनंदन आणि शुभेच्छा, योगेश!
अभिनंदन आणि शुभेच्छा, योगेश!
हार्दिक अभिनंदन आणि अनेक
हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा !!!
पुण्यात कधी भरवताय प्रदर्शन ?? >> +१
वॉव!!!! सह्हीच. जमल्यास
वॉव!!!! सह्हीच. जमल्यास नक्कीच चक्कर टाकेन.
सगळ्या प्रचिकारांना शुभेच्छा.
आज दुपारीच चक्कर मारून आलो...
आज दुपारीच चक्कर मारून आलो... सगळेच प्रचि उत्तम.. नि पहिला मजला बहुदा पहिलटकरांसाठी असावा.. दुसरा मजला मात्र दादालोकांचा वाटला.. ! त्यात जिप्सीने क्लिकलेला कुतूबमिनार तर दुरुन पण लक्ष वेधून घेतो.. ग्रेट जिप्सी ! बहुतांशी प्रचिखाली असलेली कॅप्शन्स पण जिप्सीने लिहीलेली आहेत.. आवर्जुन वाचावी ! 'रानवाटा' च्या माध्यमातून फोटोग्राफीत 'आरंभ' केलेल्यांसाठी व तेथे शिकणार्यांसाठी 'फोटो प्रदर्शन' चा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्याचा 'रानवाटा' चा हा उपक्रम खरच कौतुकास्पदच!
अजुन एक सांगण्यासारखे.. गेलात तर न चुकवू असे दोन तीन मिनीटांचा शो.. रानवाटाचे निर्माता श्री. स्वप्नील पवार यांनी त्यांच्या सहकार्यांना घेउन खास दोन तीन व्हिडीओ शूट केलेत..
१)पंढरपुरची वारी व रिंगण... >> अँगल मस्त घेतलाय
२) हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा >>> हे लिहीताना ते चित्र एकदम समोर उभे राहतेय.. इतकेच काय ते पाहताना मी तर थेट कोकणकड्यावर पोहोचलो ! पावसाळी वातावरण बघून तर आता कधी कडयावर जातोय असे झालेय... या शोचे महत्त्व म्हणजे इंद्रव्रज कसे घेतलेय ते दाखवलेय.. सुरवातच वीज कडाडताना नि त्यात चमकणारी शिखरे !!! मग कोकणकडयाला खेटून असणारी दरी अगदी ढगांनी तुडूंब भरलेली.... मग इंद्रव्रज दिसण्यासाठी कोकणकडयावरून श्री. स्वप्नील धावताहेत नि मागून अगदी वरच्या बाजूने थेट दरी दिसेल असा घेतलेला कॅमेरा !! मग उलगडणारे इंद्रव्रज ! एकदम सॉल्लीड !! फक्त चार-पाच मिनीटांचा विडीओ पण बघणार्यांवर छाप पाडून जातो.. विशेषतः ज्यांनी कोकणकडा प्रत्यक्षात पाहिला नाही त्यांच्यावर ! आम्हा ट्रेकरमंडळीना तर आता पुढचा ट्रेक कोकणकडयावर असेच वाटून जाणार !
एकंदर प्रदर्शनाला हजेरी लावल्याचे सार्थ झाले नि आपला मित्र 'योगेश जगताप' यांचे यंदाही झळकलेले प्रचि बघून दिल एकदम खुष हुआ !!
अभिनंदन, जिप्सी!
अभिनंदन, जिप्सी!
ऑसम झलक. अभिनंदन आणि शुभेच्छा
ऑसम झलक.
अभिनंदन आणि शुभेच्छा योगेश.
वा.. हार्दिक अभिनंदन.
वा.. हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
वा!! मस्तच!!
वा!! मस्तच!!
प्रेरणादाई आरंभ.... तूम्हा
प्रेरणादाई आरंभ.... तूम्हा सर्वाचं अभिनंदन
Yo.Rocks +१
Yo.Rocks +१
अभिनंदन !
अभिनंदन !
गुड. डिट्टेल फोटो व्रुतांत
गुड.
डिट्टेल फोटो व्रुतांत बघायला आवडेल.
शुभेच्छांबद्दल मनापासुन
शुभेच्छांबद्दल मनापासुन धन्यवाद!!!!



प्रदर्शन दणक्यात पार पडले. काल लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पार्किंगही फुल्ल झाले होते.
वारी आणि गडकोटांच्या व्हिडियो क्लिप्सला तूफान प्रतिसाद लाभला. संध्याकाळी तर एका तासात २-३ शो ठेवावे लागले. लोक कॉन्फरन्स रूममध्ये उभे राहुन क्लिप्स पाहत होते.
एका ट्रेकर्सने घेतलेला इंद्रवज्रचा शोध लोकांना प्रचंड आवडलं.
सविस्तर फोटो वृतांत लवकरच...
सविस्तर फोटो वृतांत लवकरच>>>>
सविस्तर फोटो वृतांत लवकरच>>>> लवकर टाक रे .. वाट बघतोय
अभिनंदन जिप्स्या कोण कोण
अभिनंदन जिप्स्या
कोण कोण माबोकर आले होते?
कोण कोण माबोकर आले
कोण कोण माबोकर आले होते?>>>>यो रॉक्स, स्मि रॉक्स, इंद्रा, रोमा आणि गिरीविहार
मस्त रे जिप्सी.... पण शनीवार
मस्त रे जिप्सी.... पण शनीवार रविवार जमतच नाही यायला..... खुप यायचं होतं.... पण राहिलं....
प्रचि टाकरे सगळी
"एका ट्रेकर्सने घेतलेला
"एका ट्रेकर्सने घेतलेला इंद्रवज्रचा शोध" तू-नळीवर उपलब्ध आहे का?असल्यास दुवा देणे आणि दुवा घेणे....:)
नाही हर्पेन, तू नळीवर उपलब्ध
नाही हर्पेन, तू नळीवर उपलब्ध नाही आहे
एका प्रोजेक्ट विचारात असल्याने अजुन कुठेही ते पब्लिश केले नाही.
Pages