रानवाटा आयोजित "आरंभ" - छायाचित्र प्रदर्शन

Submitted by जिप्सी on 30 January, 2013 - 23:58

रानवाटा प्रस्तुत "आरंभ" - नवीन कलाकारांना रंगमंच देणारे छायाचित्र प्रदर्शन.
"रानवाटा" छायाचित्र कार्यशाळेचे आयोजन करून नवीन कलाकार घडवत असते. या सर्व हौशी आणि नवकलाकारांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळावी म्हणून रानवाटातर्फे त्यांनी काढलेल्या छायाचित्राचे प्रदर्शन "ठाणे कलाभवन" येथे भरवले आहे. या प्रदर्शना मध्ये जवळपास ४०० छायाचित्रे वेगवेगळे विषय, छायाचित्रकारांच्या कल्पनेतून मांडण्यात आले आहेत.
मायबोलीकर जिवेश (जिवेश), Sano (संदेश करळकर), राहूल०७ (राहूल क्षीरसागर), जिप्सी (योगेश जगताप) यांचीही काही छायाचित्रे प्रदर्शनात आहेत.
हौशी कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी या प्रदर्शनाला नक्की भेट दया. Happy

रानवाटा प्रस्तुत "आरंभ"-छायाचित्र प्रदर्शन
ठाणे कलाभवन,
कापूरबावडी, बीगबजार जवळ,
ठाणे (पश्चिम).
दिनांकः शनिवार २ फेब्रुवारी आणि रविवार ३ फेब्रुवारी
वेळः सकाळी १० ते रात्रौ ८ पर्यंत.

यंदाच्या प्रदर्शनातील छायाचित्रांची एक झलकः

सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages