कमल हासन आणि मराठी सिनेमा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

कमल हासन हा कलाकार सर्वांच्याच परिचयाचा. हिंदी आणि तमिळ दोन्ही सिनेसृष्टीमधे त्याचे योगदान अपूर्व आहे. एकाच चित्रपटामधे अनेक व्यक्तीरेखा सादर करणे, मेकप आणि कॉस्च्युम तंत्राचा यथायोग्य वापर करणे याखेरीज इतर अनेक तांत्रिक अंगांचा वापर करून सिनेमा अधिकाधिक खुलवणे ही त्याची वैशिष्ट्ये. एक अभिनेता म्हणून तर त्याच्याबद्दल बोलायलाच नको. तब्बल चारवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेला हा अभिनेता सध्या एका वेगळ्याच वादळासाठी चर्चेमधे आहे.

तसं कमल हासन आणि वादविवाद हे काही नविन नाहीत. त्याच्या व्यक्तीगत आयुष्यावरून तर किती गॉसिपवाल्यांची घरे बांधली आहेत कुणास ठाऊक. सध्यामात्र चेन्नई फिल्म डीस्ट्रीब्युटर्स त्याच्यावर चिडलेत ते वेगळ्याच कारणाने. कमल हासनचा महत्त्वाकांक्षी "विश्वरूपम" (हिंदीमधे विश्वरूप) हा सिनेमा रीलीजसाठी तयार आहे. सर्व सुरळीत असतं तर पोंगलच्या आठवड्यामधे सिनेमा रीलीज झाला पण अस्ता. पण सध्या त्याचा रीलीज पोस्टपोन झालेला आहे. याचं कारण कमल हासनला हा सिनेमा थिएटरमधे प्रदर्शित करायच्या आधी डीटीएचवर प्रदर्शित करायचा आहे. ज्या दिवशी हा सिनेमा थिएटरमधे प्रदर्शित होईल त्याच्या आदल्या दिवशी रात्री ९ वाजता डीटीएचवर या सिनेमाचे प्रदर्शन करण्यात येइल. एकच शो असलेल्या या सिनेमाला पर सेट टॉप बॉक्स १००० रू. चार्ज लावण्याची योजना होती. इतर प्रांतात राहणारे तमिळ भाषिक आणि थिएटरमधे जाऊन सिनेमा पाहू न शकणारे प्रेक्षक यांच्यासाठी डीटीएच रीलीज फायद्याचा ठरला असता. अर्थात थिएटरमधे जाऊन सिनेमा पाहणार्‍यान्साठी भारतीय सिनेमामधे पहिल्यांदाच वापरली जाणारी ऑरा थ्रीडी साऊंड टेक्नॉलोजी वगैरे तांत्रिक आकर्षणे आहेत.

अर्थात चित्रपट वितरकांनी याचा पुरेपूर विरोध केला आहे. पोंगलसाठी ११ जानेवारीला रीलीज होणारा हा सिनेमा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रीलीज करण्यात येइल. डीटीएच प्रीमीयर केल्यास सिनेमा चित्रपटगृहांमधे प्रदर्शित न करण्याचा निर्णय वितरकांनी घेतला होता. सध्या या सर्व चर्चाचर्विणाचा निर्णय झाला की डीटीएच रीलीज २ फेब्रूवारीला - सिनेमा थिएटरमधे रीलीज झाल्यावर एका आठवड्यानंतर करण्यात येइल. अर्थात प्रेक्षकांचा फायदा असेलच आणि सध्या सिनेमा थिएटरातला बहुतेक गल्ला पहिल्याच आठवड्यात जमवत असल्याने वितरकांचादेखील फायदा आहे. डीटीएच रीलीजला विरोध करताना वितरकांनी हा सिनेमा एकाच वेळेला ५०० स्क्रीनमधे प्रदर्शित करण्याची तयारी दर्शवली होती. आता चर्चेचे फलित म्हणून घरबसल्या प्रेक्षकांना हा सिनेमा एक आठवडा उशीराने का होइना पण ऑफिशीअली बघता येइल. (पायरसीसाठी पण हा चांगला प्रतिबंध ठरेल)

चित्रपट क्षेत्राशी ज्यांचा थोडाफार संबंध येतो, अशा लोकांना चित्रपट वितरक नावाचे लोक ठाऊक असणारच. लहान लहान चित्रपटनिर्मात्यांना सर्वात जास्त त्रास होतो तो या वितरकांचा. प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोचलाच नाही तर सिनेमा यशस्वी कसा काय होणार? याचा अर्थ वितरक लोक व्हिलन असतात असे नाही, त्यांची धंद्याची गणितं ही सिनेमाच्या दर्जावर अवलंबून नसून जास्तीत जास्त पैसा कमावणारा सिनेमा यावर अवलंबून असतात.

मराठी सिनेमा बहुतेकदा रीलीजमधे मार खातो. कित्येक उत्तम मराठी सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोचतच नाहीत. त्याऐवजी हा डीटीएच रीलीजचा पर्याय त्यांना स्विकारता येइल. ज्या प्रेक्षकांना सिनेमागृहामधे जाऊन सिनेमा पाहणे शक्य नाही, अशांसाठी तर हा पर्याय उत्तम ठरेल असे माझे मत. चांगला सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरेल. पायरेटेड डीव्हीडीवर सिनेमा पाहण्यापेक्षा तिकीट काढून घरी बसून सिनेमा पाहिलेला परवडला. शिवाय निर्मात्यांनादेखील एक सहज आणि हमखास आर्थिक स्त्रोताचा मार्ग मिळेल.

कमल हासनचा विश्वरूपम चे बजेट ९० कोटीच्या वर आहे, इतक्या प्रचंड बजेटचा सिनेमा असूनदेखील त्याने डीटीएच रीलीजचा वेगळा आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने उपयुक्त निर्णय घेतला याबद्दल त्याचे कौतुक. त्याचबरोबर मराठी सिनेमासाठी या वेगळ्या आऊट ऑफ द बॉक्स थिकिंगचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हीदेखील इच्छा.

विषय: 
प्रकार: 

नंदिनी,

>> Why he should pay for the mess, which he has not made?

We all are paying for the mess we've not made. Look at our rulers.

Kaamate, Saalasakar, Karakare spent their lives to pay for the mess they haven't created. What to speak of Kamal Haasan! It's enough to say that there are two parallel powers working in Bharat.

आ.न.,
-गा.पै.

काल वेळच नव्हता मिळाला. ज्या वेळी हा पिक्चर आला होता त्या वेळी इतके काही समजले नव्हते. आत्ता आमीरच्या पिक्चरच्या निमित्ताने घरगुती सर्कलमधे या पिक्चरचा उल्लेख आला म्हणून इथे काय चर्चा झाली असा सर्च दिला होता. एकच उल्लेख सापडला. पण इतर ठिकाणी खूप वाद झालेत. बातम्या पण आहेत.

गेल्या वर्षी कोविडमधे विश्वरूपम पाहिला. अजिबातच वादग्रस्त काही नाही. उलट त्यातला एक अ‍ॅक्शन सिक्वेन्स आता युरोप अमेरिकेत, कोरियात व्हायरल झाला आहे. मुद्दामून मुस्लीम धर्मियांची खोड काढलीय असे वाटले नाही. अमेरिकन पिक्चर्स मधे सर्रास मुस्लीम अतिरेकी दाखवतात. पण या पिक्चरवर बंदीची मागणी आली. ती पूर्णही झाली. बॉयकॉट मोहीम आणि बंदी यात फरक आहे का ? बंदी घालणारे बॉयकॉट मोहीमेला विरोध करू शकतात का ?

तसेच या बंदीमुळे कमल हसनने देश सोडून जायची धमकी दिली होती. त्या वेळी त्याच्या धमकीचे समर्थन करणार्‍यातले बाय अ‍ॅण्ड लार्ज अनेक जण आज आमीरच्या देशात राहणे धोकादायक आहे हे त्याची बायको म्हणाली या स्टेटमेण्टमुळे त्याला बॉयकॉट करताहेत.
दोन्ही बाजूंनी कोलांट्याउड्या चालल्या आहेत. यात काही सूक्ष्म कंगोरे असतील तर ते दळण चालू ठेवायला हरकत नाही.

Pages