दुरापास्त

Submitted by समीर चव्हाण on 29 January, 2013 - 03:45

मनासारखे होत नाही म्हणून
स्वतःवर असे का रहावे रुसून

दिवे लोचनांचे कुणी जाळलेत
कुणाचे न गेलेय मन काजळून

तसा एक मी पोर हेही खरेच
जरी धाकटी वागते ती जपून

बरे चालले दिवस एकेक मात्र
कुठे चाललो प्रश्न उरतो अजून

सये एवढा जीव लावू नकोस
दुरापास्त होईल जाणे निघून

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरे चालले दिवस एकेक मात्र
कुठे चाललो प्रश्न उरतो अजून

सये एवढा जीव लावू नकोस
दुरापास्त होईल जाणे निघून<<<

व्वा!

बरे चालले दिवस एकेक मात्र
कुठे चाललो प्रश्न उरतो अजून

सये एवढा जीव लावू नकोस
दुरापास्त होईल जाणे निघून

शेर फार आवडले.

बरे चालले दिवस एकेक मात्र
कुठे चाललो प्रश्न उरतो अजून >> जबरी..

वैभव जे विचारायचे ते विपूतून ही प्रथा पाडून घेऊयात का? आपण आपल्याच पायावर कितीदा धोन्डा मारायचा.. प्रतिसादक बहुदा गझलकारच असल्याने हे सगळ्यांच्याच पथ्याचे हाईल... !

ओके शामजी

आपल्याच पायावर कितीदा धोंडा मारायचा >>>> म्हणजे पुन्हा माझेच काहीतेरी चुकलेय तर !!:अरेरे:

असो वरील प्रतिसाद लगेच संपादित करत आहे ...............
धन्स शामजी

बरे चालले दिवस एकेक मात्र
कुठे चाललो प्रश्न उरतो अजून

सये एवढा जीव लावू नकोस
दुरापास्त होईल जाणे निघून

वाह वा वा !

दोन्ही शेर बेहद आवडले

धन्यवाद!

ही गझल लगागा लगागा लगागा लगा या वृत्तातच आहे

वाचताना असे उच्चार होत आहेत.

मनासारखे होत नाही म्हणुन
स्वतःवर असे का रहावे रुसुन

दिवे लोचनांचे कुणी जाळले
कुणाचे न गेलेय मन काजळुन

तसा एक मी पोर हेही खरे
जरी धाकटी वागते ती जपुन

बरे चालले दिवस एकेक पण
कुठे चाललो प्रश्न उरतो अजुन

सये एवढा जीव लावू नको
दुरापास्त होईल जाणे निघुन

माझी श्येनिका वृत्तातील अशीच एक गझल आहे,

http://www.maayboli.com/node/20437

डॉ. साहेब मी मूळ ओळीतला मात्र हा शब्द कानास खटकला म्हणून वैयक्तिक वाचना साठी <<<बरे चालले दिवस एकेक पण>>>> असे वाचले त्यात शेवट्चा एक ल येत नाही मग................
बाकी समीरजीना विपूतून कळवले आहे Happy

आपण केलेला वृत्तातला हलकासा बदल खूप आवड्ला
श्येनिका >>> काय मस्त नाव आहे !! मला खूप आवडले सांगीतल्याबद्दल धन्स

तुमची गझलही छानच आहे आवडली

सगळ्यांचे खूप आभार.

वैभवः मेसेज पाठवलाय.

कैलासजी:

ही गझल लगागा लगागा लगागा लगा या वृत्तातच आहे

अमान्य.
ही गझल लगागा लगागा लगागा लगाल अश्या वृत्तात आहे.
हे वृत्त मी पुरेपूर निभावलेय. शेवटी लघु येऊ नये असा काही नियम ऐकण्यात नाही.
आपली गझल पाहिली. त्यातील वृत्त वेगळे आहे:

गालगा लगाल गालगा लगा

एकूणच मी इस्लाहच्या विरोधात आहे.
इतकेच.

माझी गझल वेगळ्या वृत्तात आहे समीरजी आणि आपल्यासारख्या सिद्धहस्त कवीस इस्लाह करण्याचा प्रमाद मी नक्कीच करणार नाही...

शेवटी लघु असलेल्या अनेक गझल आहेत.....

फक्त उच्चारानुरुप होत असलेला बदल मी दाखवला.

असो,आपले म्हणणे मान्य आहे.

समीर,

कैलासरावांनी इस्लाह वगैरे केलेला नाही, केवळ म्हणणे मांडले आहे. असो. विपूतून चर्चा ही शामरावांची कल्पना चांगल्या प्रकारे लाभदायक ठरत आहे असे दिसते.

कैलासजी आणि भूषणाजी:

माझी लिहिण्यात चूक झाली.
कैलासजींनी इस्लाह केला नाही हे स्पष्ट आहेच.

इस्लाहबद्दलचे मत एकंदरच दिले होते.
कुणी कुणालाच बदल सुचवू नये हे म्हणायचे होते.
बदलाची गरज सुचवलं तरी पुरेसे ठरावे.
मग गझलकार आपल्यापरीने शेर ठीकठाक करायचा प्रयत्न करीनच.
बदल योग्य ठरला तर त्याचा शेर पूर्णपणे त्याचाच राहिल असे वाटते.

विपूतून चर्चा ही शामरावांची कल्पना चांगल्या प्रकारे लाभदायक ठरत आहे असे दिसते.
अत्युत्तम कल्पना.

कृपया गैरसमज नसावा.

बदलाची गरज सुचवलं तरी पुरेसे ठरावे.
मग गझलकार आपल्यापरीने शेर ठीकठाक करायचा प्रयत्न करीनच.
बदल योग्य ठरला तर त्याचा शेर पूर्णपणे त्याचाच राहिल असे वाटते.>>>>>
१००%सहमत

मी ही सांगताना 'बदलाची गरज' असे शब्द योजायला हवे होते
मला मात्र या शब्दाच्या लगावली /मात्रा बद्दल बोलयचे नव्हते (ते मला नाहीतच होते)मी फक्त त्र य अक्षराच्या त्+र या उच्चार करताना येणार्‍या दीड मात्रेसारख्या उच्चारबाबत म्हणत होतो जे मी जरा विस्ताराने यथामती माण्डले
मी जरासा उपदेशपर वाटेलश्या भाषेतच बोललो (माझी बोलायची पध्धतच बरीच सदोष असते नेहमी! काय करू! :अरेरे:)..पण तसे काही नव्हतेच मुळी हे आपण बरोबर जाणलेत त्याबद्दल धन्स
झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व

विपू वाचली समीरजी अन पटलीही धन्यवाद

पुनश्च शामजींचे शतशः आभार