Submitted by पूनम on 1 October, 2009 - 02:47
इथे मायक्रोवेव्हबद्दल सर्व लिहूया. आधीच्या धाग्यावरची पोस्टंही हलवते इथे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मावेतली काचेची चकती फिरते,
मावेतली काचेची चकती फिरते, दिवा लागतो, ठरलेला वेळ संपल्यावर अलार्म वाजतो इत्यादी पण वस्तू गरम होत नाही असा प्रॉब्लेम आलाय का कुणाला? >> मायक्रोवेव्ह मधिल मॅग्नॅट्रोन बिघडला कि होते असे. इथे मॅग्नॅट्रोन बदलायची किंमत जवळ जवळ मायक्रोवेव्ह च्या किंमति एव्हढि असते. भारतात माहिति नाहि.
मी आज मावे मधे उपमा केला तो
मी आज मावे मधे उपमा केला तो चिकट झाला. रवा २-२ मि साठी ठेवला बाहेर फोडणी करुन रव्यावर ओतली, मग परत १ मि. मावे मधे ठेवले, गरम पाणीटाकून ३-२ मी. ठेवले.
तरी उपमा चिकट का झाला?
रवा आधी भाजून नही घेतला?
रवा आधी भाजून नही घेतला? मावेमध्ये तुपावर भाजायला हवा.
.
.
LG ग्रील + कन्वेक्शन २८- ३०
LG ग्रील + कन्वेक्शन २८- ३० लि. घेण्याचे नक्की करत आहे. १३००० पर्यंत मिळतो आहे.
पण माबो वर विचारल्याखेरीज चैन पडेना.
मुलुंड ,ठाण्यात कोणी माहितीचा, विश्वासु दुकानदार माहीत आहे का?
तसेच ते कुकींग चे १३१ मोड, १५१ ऑटो कुक मेन्यूज याने काय फरक पडतो का?
कॉमेंट्स प्लिज
मुलुंड ,ठाण्यात कोणी
मुलुंड ,ठाण्यात कोणी माहितीचा, विश्वासु दुकानदार माहीत आहे का?
>> विजय सेल्स
कुकींग चे १३१ मोड, १५१ ऑटो कुक मेन्यूज याने काय फरक पडतो का?
मायक्रोवेव, ग्रिल, कन्वेक्शन, मायक्रो+ग्रिल, मायक्रो+कन्वेक्शन, डिफ्रॉस्ट हेच मेनू जास्त आपल्या उपयोगाचे असतात. ऑटो कूक मेनूसाठी पदार्थाचं ठराविक वाजन अपेक्षित असतं. उदा. गाजहलवा या मेनूसाठी ८०० ग्रॅम गाजराचा किस+साखर+खवा. हे नेहमीच आपल्या आवश्यकतेशी जुळतंच असं नाही. त्यामुळे ऑटो कूक मेनूंचा फारसा उपयोग नसतो.
>>> अजिबात नाही
LG ग्रील + कन्वेक्शन २८- ३०
LG ग्रील + कन्वेक्शन २८- ३० लि. घेण्याचे नक्की करत आहे. १३००० पर्यंत मिळतो आहे.
पण माबो वर विचारल्याखेरीज चैन पडेना.
मुलुंड ,ठाण्यात कोणी माहितीचा, विश्वासु दुकानदार माहीत आहे का?
तसेच ते कुकींग चे १३१ मोड, १५१ ऑटो कुक मेन्यूज याने काय फरक पडतो का?
कॉमेंट्स प्लिज>>>>>>>>
विजय सेल्स कडे नाहीतर मग चेकनाक्या वरच्या क्रोमा मधे जा ना. ऑटो कुक मधे खुप फरक पडतो. मस्त असतात ते मेनु. मी खुप गोष्टींसाठी मावे वापरते. त्या मुळे मी फॅन आहे मावे ची.
मोकिमी, आता मुग्धानंद गोंधळेल
मोकिमी, आता मुग्धानंद गोंधळेल
आपण दोघींनी नेमकं विरोधी लिहिलं आहे.
ऑटो कुकचा माझा अनुभव चांगला
ऑटो कुकचा माझा अनुभव चांगला आहे. साधारण पणे मावे बरोबर जो मेजरींग ग्लास येतो त्यात मेजर करुन घेतले तर काही गडबड होत नाही. ३-४ जणाच्या जेवणासाठी एकदम मस्त.... नुडल्स तर खुपच मस्त होतात. पास्ता सुध्धा.. अनेकदा पास्ता जास्त शिजला तर एकदम वाइट लागतो... ह्या ऑटोकुक वर एकदम झकास शिजतो... तसच साबुदाणा खिचडीचं.... मी अनेकदा भाज्या, दाणे भाजणे, खारे दाणे करणे, भात्/पुलाव, बर्फ्या, तीळ भाजणे, गाजर्/दुधी हलवा.. इ.इ. मावे मधे ऑटो कुक वरच करते... माझ्या कडे अनेक वर्षां पासुन इलेक्ट्रोलक्स चा आहे... मी साधारण हा २००८ मधे घेतला...
मोकिमी, आता मुग्धानंद गोंधळेल
मोकिमी, आता मुग्धानंद गोंधळेल आपण दोघींनी नेमकं विरोधी लिहिलं आहे.>>>>
खरच ग !!! आता तिची मज्जा येइल.... काय करु नी काय....
ह्यावर माझा सल्ला हा की एकदा ऑटोकुकचे मेनु नीट झेपतिल ना ते एकदा बघुन मगच तो घे... नाहीतर मंजुडी म्हणते तसा नॉर्मल तर झकासच...
कुठलाही घेतला तरी थोडे आर & डी करायला लागेलच....
कुठलाही घेतला तरी ऑटो कूक
कुठलाही घेतला तरी ऑटो कूक मेनू असतातच त्यात
त्यांचा वापर करायचा की नाही हे मॅन्युअल वाचून ठरवायचं.
मुग्धानन्द,माझ्याकडे एल.जी.
मुग्धानन्द,माझ्याकडे एल.जी. चा २८ लिटरचा आहे.मला ऑटो व मॅन्युअल दोन्हीसाठी खूप उपयोग होतो.पदार्थांचे वजन मोजायचा काटा आहे त्यामुळे वजन मोजणे(ऑटोसाठी) सोपे जाते.काही पदार्थ ऑटोवर करते,काही दोन्ही प्रकारे.
अगं.... खरंच गं. बुचकळ्यात च
अगं.... खरंच गं. बुचकळ्यात च पडले.
कळाले कळाले. मोकिमी माझा क्लास घ्या...
मला अमा. ना पण लिहायचे आहे....
विजय सेल्स ने एल. जी. वर फुली घातली आहे.
मी दुकानात २८ लि. पाहिला (सपना इले.) मुलुंड वेस्ट- डी मार्ट समोर. त्यांच्या कडे ३० लि. उपलब्ध नव्हता बघायला. मग एल जी ची साईट पाहिली. त्यावर इतकी माहीती होती की मीच गोंधळले. (फारच बावरलेली बाहुली)
मुग्धानन्द, विजय सेल्स मधे
मुग्धानन्द, विजय सेल्स मधे एल. जी. प्रॉड्क्ट्स मिळत नाहीत कारण मधे काही इश्यू झाला होता. विजय सेल्स ने एल. जी. चे काही प्रॉड्क्ट्स कंपनी च्या सांगण्या विरुद्ध जास्त कॉस्ट ने विकले होते. एल. जी. च्या authorized dealer ने ही माहीती दिली. मी खूप R&D करून दिवाळी ला एल. जी. चा मायक्रोवेव घेतला.
LG ग्रील + कन्वेक्शन + रोटेसरी ३० लि. १३५००/- चा मला चेंबूर च्या authorized dealer कडून ११८००/- ला मिळाला.
LG चा फ्रिज ठाण्याच्या विजय
LG चा फ्रिज ठाण्याच्या विजय सेल्स मधुन मी जून २०११ ला घेतला आणि जुलै २०१२ ला तो बंद पडला. २३०००/- मग LG च्या ऑफिस मधे तक्रार- पाठपुरावा- LG ने सगळे पैसे परत दिले, कारण त्या सीरीज ची बरीच मॉडेल्स फॉल्टी आहेत. त्यांच्यात मॅन्युफॅक्चरींग गडबड आहे... LG वाल्यांनीच मान्य केलेल आहे...
हे ते मॉडेल
कोणाकडे असेल तर कधीही तयार रहा.... कंपनीच्या माणसानेच सांगितले की ह्या मॉडेलच्या कधीही तक्रारी आल्या तर आम्ही सरळ पैसे परत करतो....
कुठलाही घेतला तरी ऑटो कूक
कुठलाही घेतला तरी ऑटो कूक मेनू असतातच त्यात>>>
अगं त्या विनाही मॉडेल्स असतात... माझा आधीचा आणि आईने अत्ता घेतलेला ऑटो कुक शिवाय आहेत. किमतीतही फरक पडतो....
धन्यवाद सामी आणि मोकीमी....
धन्यवाद सामी आणि मोकीमी....
अगदिच बेसिक .. पण गोंधळले आहे
अगदिच बेसिक .. पण गोंधळले आहे ... काही प्रश्न
१) मायक्रोवेव्ह आणि ओव्हन मध्ये फरक काय ?
२) फक्त ओव्हन मिळतो का? कुणी घेत का?
३) मय्क्रोवेव्ह + ओव्हन म्हणजे काय?
४) ग्रील आणि कन्व्हेक्शन काय प्रकार आहेत...
माझी गरज...
१) रोजची भाजी साठी चा वेळ थोडा वाचवणे..
२) कधी कधी केक ई. करणे.. फ्रिक्वेंट नाही...
३) रवा ,शेंगादाणे, डाळ, तांदुळ भाजणे...
४) जेवण गरम करणे
घरी २ वर्ष आतली मुलगी आहे..
पण तिचा खाऊ नाही बनवणार त्यात..
कोणी आहे का? मदत.....
कोणी आहे का? मदत.....
आनंदी, हा धागा पहिल्यापासून
आनंदी, हा धागा पहिल्यापासून वाचलास तर तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.
तुझ्या गरजा पाहून तुला मायक्रिवेव्ह + कन्वेक्शन मोड घ्यायला हरकत न्सावी.
सगळा धागा वाचुन काढा पहिल्या
सगळा धागा वाचुन काढा पहिल्या पानापासुन
ओक्के...
ओक्के...
मायक्रोवेव्हमध्ये (ग्रील
मायक्रोवेव्हमध्ये (ग्रील मोडला नाही) मक्याची कणसे भाजता येतात कां ? मी नेटावरील काही टिप्स पाहून प्रयत्न केला पण कणसे उकडल्यासारखी लागतात. तसेच मायक्रोवेव्हमध्ये मक्याच्या /ज्वारीच्या लाह्या कशा करता येतील ? त्यासाठी कागदाचा Brown Lunch Bag असा प्रकार त्यासाठी पुण्यामध्ये कोठे मिळेल ?
मावमधे कणीस ३-४ मिनीट ठेवुन
मावमधे कणीस ३-४ मिनीट ठेवुन उकडल्यासारखे होते. मग गॅसवर २-३ मिनीटात नीट भाजले जाते. आमच्याकडे ५-६ कणसे लागतात एकावेळि.. मावेमुळे काम खुप सोपे होते
तसेच भुईमुगाच्या शेंगांचे.. साधारण ३५०-४०० गॅम शेंगा १०-१२ मिनीटात मस्त भाजतात.
खूप धन्यवाद !
खूप धन्यवाद !
काल मला मुंबईच्या पावभाजीची
काल मला मुंबईच्या पावभाजीची आठवण आली होती. पण ते सर्व करायला वेळ नव्हता. पावभाजी मसालाही सम्पला होता. म्हणून बहुतेक तयार प्रॉडक्ट्स वापरून मावेमधे हि पावभाजी केली. मुद्दाम प्रमाण देतोय.
१) एक मेझरिंग कप पोटॅटो फ्लेक्स
२) १ टीन गाजर + मटार ( ड्रेन करुन )
३) १ टेबलस्पून टोमॅटो पेस्ट ४
४) १ टिस्पून नलिनीच्या पद्धतीचा मिरचीचा गोळा
५) १ टिस्पून काश्मिरी तिखट
६) अर्धा टिस्पून राजमा मसाला
७) १ टिस्पून वर्हाडी मसाला ( नागपूरला मिळाला होता )
८) चवीनुसार मीठ
९) २ टेबलस्पून अनियन फेक्स ( सुकवलेला कांदा, इथे बाटलीत मिळतो.)
१०) बटर, १ टेबलस्पून
थोड्या बटरवर कांदा ३० सेकंद मावे केला. मग त्यात मसाले आणि टोमॅटो पेस्ट घालून आणखी ३०सेकंद ठेवले.
मग बाकी सगळे एकत्र करून आवश्यक तेवढे पाणी घालून २ मिनिटे हाय वर मावे केले. नीट ढवळून परत १ मिनिट मावे केले... मस्त पावभाजी तयार.
पावभाजी मसाला असेल तर असे मसाले एकत्र करावे लागणार नाहीत.
बरं झालं हा धागा वर आला ते.
बरं झालं हा धागा वर आला ते. गेले २ दिवस माझ्या मावेत एक प्रकारचा वास येतोय. टिपिकल आंब्याच्या लोणच्याचा असतो, साधारण तसा. मग ताबडतोब कोलिन ने छान पुसुन घेतला, काचेची डिश स्वच्छ घासून पुसून लख्ख केली. पण किंचित वास येतोच आहे अजूनी. कसा घालवू?
जरा वेळ उघडा ठेवून दे. कदाचित
जरा वेळ उघडा ठेवून दे. कदाचित त्याने वास जाईल.
दक्षिणा, बहूतेक खायचा सोडा
दक्षिणा, बहूतेक खायचा सोडा काचेच्या बोलमध्ये घालून ठेवल्याने मावेमधला वास निघून जातो. (बोल ठेवल्यावर मावे सुरु करायचा असतो कि नाही हे मात्र मला आता आठवत नाही. )
दक्षिणा, बोलमधे पाण्यात थोडे
दक्षिणा, बोलमधे पाण्यात थोडे व्हिनेगर घालून गरम कर मावेत. थोडा वेळाने स्टीम जमा झाली की मावे उघडून पुसून घे.
Pages