बुरखा

Submitted by कौतुक शिरोडकर on 28 January, 2013 - 01:30

तिच्या हाती 'बुरखा' दिला,
"घाल... झाकलसं तरच अब्रू वाचेल"
...
..
.
"यापेक्षा तुम्ही तुमचे बुरखे का फाडत नाहीत ?"
असलं काहीसं बडबडून ती माघारी फिरली.
...
..
.
"मुर्ख कुठची !
मलाच 'नागवा हो' म्हणतेय !"
पुन्हा खिडक्याचे काळे पडदे ओढून,
मनाचं दार घट्ट लावून घेतलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जमलीये पण त्रोटक वाटली जे सांगायचे ते उघड उघड नाही आले बराचसा भाग समजून घ्यावा लगतो
पण आवडली
वेगळ्या स्टाईलची कविता ...............
आवडली

ज्याला जसे जमेल त्याने तशी समजून घ्यावी अश्या स्टाईलची कविता, कौ! ओळींच्या पलीकडले खूप काही आहे.

खरंच गम्मत वाटते बर्‍याचदा
एक कोरा कागद असतो इथे माबोवर एक 'नवा लेखनाचा धागा' म्हण, तो कोरा करकरीत.... त्यावर काही शब्द उमटतात, काही विरामचिन्हे आणि धाग्याला एका विशिष्ठ आशयाची ताकद लाभते, त्याचा रंगच बदलतो... लेखकाची ही किमया...!!
तुझ्या ह्या धाग्यावरच्या रचनेत एका कोत्या वृत्तीचा धिक्कार थेटच पोहोचतोय.

थेट...!
रात्रीसोबत स्वप्नांचीही, चिमण्या; भेसूर पहाट व्हावी?
धरण्याआधी जीव, भावना; गर्भाची का फुटून जावी?

छिद्रच नसते मला तेथ ते, कशास उठत्या किंकाळ्या अन
छिन्नभिन्न ते करण्यासाठी, वखवखलेले सगळे जीवन

विचार पटला... पण...

कविता
.....
....
म्हणून
...
...
...
....
नाही
..
..
पटली................................................!