तू नसतास तर?

Submitted by उमेश कोठीकर on 19 May, 2009 - 01:15

ए, ऐक ना!
हो रे, नेहमी तूच ऐकतोस,
पण आज अगदी मनापासून,
तुझ्या नकळत तुझ्याकडे खुप खुप बघतांना,
एकदम विचार आला...
तू नसतास तर?.......आयुष्यात?
एकदम भरून आले बघ!
खरंच तू नसतास तर.....
कोणी जपले असते मला;
एव्हढे फुलासारखे?
तुझे ते अपार काळजी घेणे...
प्रेमाने आणि सुखाने गुदमरून टाकणे,
माझ्या कमीपणाचेही...किती कौतुक करणे,
खरंच तू नसतास तर?
कोणी म्हटले असते?
ऑफिसमधून थकून आल्यावरही..
माझ्या निरर्थक रागावर हलकेच हात फिरवून,
"बरे वाटत नाही का गं? थांब, मी करतो कॉफी"
खरेच तू नसतास तर?
मिळाले असते? एव्हढे प्रेम, सुख, भरीव आयुष्य?
अगदी देवासारखे तुझे आईबाबा!
आणि.... मी मात्र समजत राहिले त्यांना,
प्रतिस्पर्धी.... माझ्या प्रेमातले!
किती ओढाताण झाली असेल ना तुझी?
खरेच तू नसतास तर?
कोणी केली असती एव्हढी काळजी?
माझ्या रडण्याची...रागाची..
स्वतःवरच चिडण्याची?
आणि तू मात्र....
माझ्या चुका... उद्वेग...चिडचिड..हट्टीपणा
सगळं... माझा अल्लडपणा समजून
सामावून घेतलंस! हसत हसत,
माझे जिव्हारी लागणारे शब्दही!
तू नसतास तर?
कोणी समजावलं असतं मी हरल्यावर?
मुसमुसणार्‍या मला, माझ्या रागाला,
रडण्याला, लहान मुलासारखं,
मांडीवर हलकेच थोपटत,
हसवत हसवत, नकळत स्वतःच ओला होत!
तू नसतास तर?
केलं असतं कोणी सहन?
माझं वेड्यासारखं.... मनातल्या न सापडणार्‍या
राजकुमारालाच शोधणं...... तुझ्याच सावलीत,
तुला गृहीत धरून.... वृक्षासारखं!

मात्र आता... आयुष्याच्या संध्याकाळी,
'तू नसतास तर' ... या गदगदणार्‍या विचाराने,
मला सावली देऊन...पोळलेल्या तुझ्या हातांवर
अश्रूंचे शिंपण करीत... दाटून,
एव्हढेच बोलू शकते,
मी... नसते जगू शकले रे!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उमेश,
माझे सगळे शब्दभांडार अपुरे आहे तुमच्या या 'मास्टरपीस'चे कौतुक करायला. सिम्प्ली ब्युटिफुल. मार्व्हलस !!

मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" तू नसतास तर...
ही सुदर कविता आमच्यापर्यंत पोहचली असती का रे! "

उमेश दा,
माझ्याच मनातले भाव जणु कागदावर उतरवले आहेत तुम्ही !
आमच्या दोघांच आयुष्य एका कवितेत सामावलय !
तुमची कविता मी माझ्या नवर्‍याला forward पण केली, तुम्हाला न सांगताच !!!!

इतकी सुरेख कविता, प्रत्येकाला वाटाव आपलीच आहे, ही कवितेची ताकद आहे की लिहणार्‍या कविची ?????
कवितेतल Oskar तुम्हाला !!!!!!!!!
Happy
Happy
---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

वा... खुपच छान... अगदी सुरेख...कविता... नव्हे भावना... तरल मनाला भिडणारी...!

मनापासून धन्यवाद मुकुंदजी, वार्‍या, सुमतीजी, वैशू.
.............................................................................
मला हे माहित आहे की मला काहीच माहित नाही. पण त्यांना तर हे ही माहित नाही की त्यांना काहीच माहित नाही! (सॉक्रेटिस)

उमेशराव... नेहमीप्रमाणे अगदी .... खल्लास... लगे रहो भिडु...
----------------------------------------
प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....
माझ्या कविता...इथे बघा..
http://www.destiny-kavyanjali.blogspot.com
----------------------------------->>

व्वा उमेशजी...अगदी भरुन आलं कविता वाचुन...खरंच प्रत्येक स्त्रीला असा जोडीदार मिळाला तर किती बरं होईल Happy

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

मास्टरपीस...! याच्या उलट शिर्षकाची, अशाच काहीश्या अर्थाची एक कविता मी मागे माबोवर लिहीली होती..

तु असतास तर...

तु असतास तर..
डोळे कधी भरले नसते
रुमालाचे शेव कधी
आसवांनी भिजले नसते
डोळे पुसता पुसता
............हात माझे थकले नसते.

तु असतास तर..
गालावर फुललेले गुलाब
अकाली कोमजले नसते
स्वप्ने पहायच्या वयात
जिथे प्राजक्त फुलायचे
...........तिथे काटे रुतले नसते.

तु असतास तर..
सजली असती मग निशीगंधाही
हंसली असती मग परसातली
अबोल मुग्ध ती रातराणीही
कुंपणावरच्या जाई-जुईंनी
............कुजबुजणे सोडले नसते.

तु असतास तर..
असले असते माझे असणेही
तुझ्या असण्यातले माझे
माझ्या असण्याला शोधणेही
भिरभिरणार्‍या पापणीने मग
...........क्षितिज शोधणे सोडले नसते.

तू नसतास तर? - सुरेख...

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

विशाल, कमाल आहे. किती जुळणारे विचार! मस्त.
.............................................................................
मला हे माहित आहे की मला काहीच माहित नाही. पण त्यांना तर हे ही माहित नाही की त्यांना काहीच माहित नाही! (सॉक्रेटिस)

उमेश मस्तच रे.... एकप्रकारे पुरुषांचे एक रुप तू उलगडून दाखवलेस.
................................................................................................................
ज्याला आपण आपल मन म्हणतो..ते कधीतरी आपल्या ताब्यात असत का?

बायकोची कविता ढापलीस काय रे ?
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

कौतुकदा, काय हे? तिच्यासाठी केली असे म्हणू शकता.
.............................................................................
मला हे माहित आहे की मला काहीच माहित नाही. पण त्यांना तर हे ही माहित नाही की त्यांना काहीच माहित नाही! (सॉक्रेटिस)

मस्त उमेशराव ....कविता आवडली.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
~ प्रकाश ~GET CONNECTED

उमेश खुप छान आहे कविता! आवडली आणि अगदि मनातलि हि वाटली

************************

नको ओढ लावुन घेउ उन्हाची ,जसे पारधि हे तसे तीर टोची
पिसामागुनि ग पिसे दग्ध होति, भररि परि मृत्तिकेशीच अंती

कौत्या. उगा काड्या टाकु नकोस! Wink
दादा तु आवरी अगदी खर्‍या अर्थासकट ऐकवेन वहिनींना !! Proud

हळवं केलंत उमेशराव.
ऑस्कर सकट बुकर तुम्हाला.

उमेश खरच ग्रेट आहे कविता,शब्द अपुरे पडतात वर्णन करायला .
अश्रूंचे शिंपण करीत... दाटून,
एव्हढेच बोलू शकते,
मी... नसते जगू शकले रे!!

नाही जगू शकत त्याच्याशिवाय!!!!

*******************************************
बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते,व्याकुळ होते,तीळ तीळ तुटते,खोल कुठे गलबलते

धन्यवाद जयूगुरूजी, नूतन, श्रीकांत.
.............................................................................
मला हे माहित आहे की मला काहीच माहित नाही. पण त्यांना तर हे ही माहित नाही की त्यांना काहीच माहित नाही! (सॉक्रेटिस)

वा! माझ्या बायकोच्या मनातली कविता लिहिलीत!

वा वा, प्रेम असावे तर असे..
संवाद मस्त रंगवून लिहिलाय.
ही तिने लिहिली असती तर..? (ह्याहूनही अजून काही लिहिले असते, असे लगेच उत्तर येईल !)
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

धन्यवाद अलकाजी.
.............................................................................
मला हे माहित आहे की मला काहीच माहित नाही. पण त्यांना तर हे ही माहित नाही की त्यांना काहीच माहित नाही! (सॉक्रेटिस)

उमेशजी , अप्रतिमच नेहमीप्रमाणे.....

उमेश,
खूप छान कविता आहे. Happy
कविता वाचून माझ्या एकदम जवळच्या व्यक्तिची आठवण झाली.
तुझ्या कवितेच्या निमित्ताने त्या व्यक्तिला सलाम! Happy

आधी ह्या कवितेचं विडंबन वाचलं...क्षमस्व!

खूप म्हणजे खूपच मस्त लिहिलीत! ते राणीच्या भाषेत म्हणतात न "लै टचिंग बरं का" अगदी तशीच!! खूप आवडली!!

========================
बस एवढंच!!

Pages