'पुणे ५२'च्या मुंबईतील शुभारंभाच्या खेळाची तिकिटं उपलब्ध आहेत

Submitted by माध्यम_प्रायोजक on 15 January, 2013 - 12:17

'पुणे ५२' या बहुचर्चित चित्रपटाच्या शुभारंभाचा खेळ गुरुवार दि. १७ जानेवरी २०१३ रोजी मुंबईत पीव्हीआर (फिनिक्स मॉल), लोअर परेल इथे संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजित केला आहे.

चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळाला उपस्थित राहणार आहेत.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'पुणे ५२'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी तुम्हांला मिळणार आहे.

या खेळांस उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी कृपया chinmay@maayboli.com या पत्त्यावर इमेल पाठवावी. इमेलीत कृपया आपला दूरध्वनी क्रमांकही कळवावा.

एका मायबोलीकराला एकच तिकीट दिलं जाईल, याचे कृपया नोंद घ्यावी.

धन्यवाद. Happy

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका मायबोलीकराला एकच तिकीट दिलं जाईल, याचे कृपया नोंद घ्यावी. >>> किमान दोन तरी देण्यात यावीत त्यामुळे जे कपल येणार असेल त्यांची तरी सोय होईल.

मी आणि माझी बायको दोघेही मायबोलीकर आहोत ... तर दोघांनी वेगवेगळे मेल करावेत का एकच केला तर चालेल ..?