Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 14 January, 2013 - 01:31
लिहायचे कुणासाठी
लिहायचे कश्यासाठी
शेवाळल्या तळ्याकाठी
जड जड झाली दिठी
सुकलेल्या पानावरी
उदासली सांज सारी
मनातली अक्षरे ही
मनाआड गेली सारी
वेदनांत मरतांना
वेदनांचे गाणे झाले
ऐकतांना दूर कुठे
कुणा डोळी पाणी आले
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्लास....
क्लास.... सुंदर...!!!!
आवडलीच...
अप्रतिम, सह्ही, भन्नाट,
अप्रतिम, सह्ही, भन्नाट, सुपर्ब.....
मस्त, शेवट मस्त आहे
मस्त, शेवट मस्त आहे
मस्त
मस्त
अनेक धन्यवाद
अनेक धन्यवाद ,बागेश्री,शशांक,बेफिकीर आणि Harshalc .
कवितेतला आशय अतिशय सुंदर
कवितेतला आशय अतिशय सुंदर आहे.
अवांतर : लिहायचे कुणासाठी या शीर्षकावरून सुरूवातीला आधीच्या कविता कुणीच न पाहील्या असे झाले असावे काय अशी शंका आली. कुठल्या का कारणाने क्लिक करेना, एक चांगली रचना पहायला मिळाली. आधीच्या रचना पाहील्या गेल्या नसल्यास वेळेचा अभाव हे कारण समजून क्षमा करावी. लिहीत रहावे. शुभेच्छा !
एक प्रतिसादक ,आपला प्रतिसाद
एक प्रतिसादक ,आपला प्रतिसाद मोलाचा आहे.धन्यवाद.
मस्त
मस्त
सुंदर.. डोळा पाणी की डोळी
सुंदर.. डोळा पाणी की डोळी पाणी अशी शंका आली.
खुपच छान......
खुपच छान......
फार सुंदर रचना विक्रांत
फार सुंदर रचना विक्रांत ,कवितेतल्या प्रश्नाचं उत्तर कवितेच्या शेवटी दिलंय तुम्ही.
पु.ले.शु.
छान आहे
छान आहे
धन्यवाद
धन्यवाद वैशाली,श्याम्,श्यामराव,भारतीजी,अश्विनीजी,