लिहायचे कुणासाठी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 14 January, 2013 - 01:31

लिहायचे कुणासाठी
लिहायचे कश्यासाठी
शेवाळल्या तळ्याकाठी
जड जड झाली दिठी
सुकलेल्या पानावरी
उदासली सांज सारी
मनातली अक्षरे ही
मनाआड गेली सारी
वेदनांत मरतांना
वेदनांचे गाणे झाले
ऐकतांना दूर कुठे
कुणा डोळी पाणी आले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लास.... सुंदर...!!!!
आवडलीच...

मस्त Happy

अनेक धन्यवाद ,बागेश्री,शशांक,बेफिकीर आणि Harshalc .

कवितेतला आशय अतिशय सुंदर आहे.

अवांतर : लिहायचे कुणासाठी या शीर्षकावरून सुरूवातीला आधीच्या कविता कुणीच न पाहील्या असे झाले असावे काय अशी शंका आली. कुठल्या का कारणाने क्लिक करेना, एक चांगली रचना पहायला मिळाली. आधीच्या रचना पाहील्या गेल्या नसल्यास वेळेचा अभाव हे कारण समजून क्षमा करावी. लिहीत रहावे. शुभेच्छा !

मस्त

फार सुंदर रचना विक्रांत ,कवितेतल्या प्रश्नाचं उत्तर कवितेच्या शेवटी दिलंय तुम्ही.
पु.ले.शु.

धन्यवाद वैशाली,श्याम्,श्यामराव,भारतीजी,अश्विनीजी,