देवबाग-धामापूर

Submitted by रंगासेठ on 13 January, 2013 - 09:02

नवीन वर्षाची सुरुवात छानस्या ट्रीपने करावी असा विचार आला असतानाच सौरभच्या देवबाग ट्रीपचे फोटो पाहायला मिळाले. तारकर्लीजवळच्या या ठिकाणाबद्द्ल ऐकलच होतं. त्यामुळे देवबागलाच जायचं ठरलं. गजालीच्या धाग्यावर माहिती मागितल्यावर विवेक देसाई आणि यो-रॉक्स आणि मस्त माहिती आणि संपर्क दिले. Happy जानेवारी च्या पहिल्याच विकांताला दौरा करायचा ठरलं.

राहायची व्यवस्था 'हेरंब निवास' मध्ये झाली. सौरभने संपर्क क्रमांक दिलेलाच होता, केळुस्करांनीपण एक खोली ठेवून दिली. पुण्याहून मालवणला आणि परतीसाठी एकच बस कळाली, महामंडळाची निमआराम. ही बस निगडीहून संध्याकाळी ७ ला निघते आणि चिंचवड-पुणे स्टेशन-स्वारगेट-कोल्हापूर्-कणकवली करत पहाटे ६ दरम्यान मालवनला पोहोचते. मालवणहून संध्याकाळी ४:१५ वाजता निघून याच मार्गाने पहाटे साधारण २-३ दरम्यान निगडीला पोहोचते.

मालवणला पहाटे स्टँडवर चहा घेवून देवबागच्या बससाठी वाट पाहत बसलो. मालवण-देवबाग (साधारण ११-१२ कि.मी.) दर अर्ध्या तासाने बसेस आहेत, तारकर्ली मार्गे जातात. कोकणाच्या एवढ्याश्या रस्त्यावरून पहाटे बस सुसाट धावत होती, आम्ही काळजीतकी कोण कुठून आडवं येतयं आणि धडकतयं, याच नादात आम्ही थेट देवबाग गावात पोचलो. पण आम्हाला मध्येच उतरायचं होतं (न्यू इंग्लिश शाळेजवळ), त्यामुळे त्याच बसने परत जाऊन तिथे उतरलो. कदाचित आम्ही एव्हढ्या लवकर येण्याची अपेक्षा नसल्याने रिसॉर्टला कुणीच नव्हतं, पण पाच-एक मिनिटातच केळुस्कर आले आणि आम्हाला 'सी-फेसिंग' खोली दिली. Happy आवरून झाल्यावर नाष्टा केला, किनार्‍यावरच घर असल्यामुळे मस्त पैकी खुर्च्या टाकून समुद्राकडे पाहत Wink चहा-पोह्याचा नाष्टा केला, मग बीचवर भटकून आलो.

रुमचे काही प्रचि

प्रचि १

_MG_8441

प्रचि २

IMG_8420

प्रचि ३

IMG_8311

प्रचि ४

_MG_8132

देवबाग बीचचे काही प्रचि,

प्रचि ५
_MG_8119

प्रचि ६

_MG_8151

प्रचि ७

_MG_8183

प्रचि ८

_MG_8212

प्रचि ९

_MG_8217

प्रचि १०

_MG_8283

प्रचि ११

_MG_8301

प्रचि १२

_MG_8391

प्रचि १३

_MG_8470

नंतर स्कुबा-डायविंग साठी मालवणला जायचं होतं पण आमच्याकडे स्वतःचे वाहन नसल्याने एकतर बस नाहीतर जीपने जावं लागणार होतं, पण स्कुबा डायविंगवाले आणि केळुस्करांची ओळख होती की काय माहित, पण त्यांचा एक माणूस आला आणि मी, माझा मित्र आणि तो असे ट्रीपल सीट मालवणला गेलो. Wink
त्याने कुठल्या बोळा-बोळातून गाडी घातली तोच जाणे. शेवटी ठरलेल्या ठिकाणी आलो. स्कुबा डायविंग सिंधुदुर्ग किल्याच्या पायथ्याशीच होतं, तिथपर्यंत जाण्यास आणि येण्यास बोटची व्यवस्था हेच लोक करतात. त्यांचे प्रशिक्षित मार्गदर्शक एकावेळी चार लोक पाण्याखाली नेतात आणि २०-२५ मिनिटे पाण्याखाली सैर करवून आणतात.जवळपास १८-२० फूट पाण्याखाली नेलं जातं. अतिशय रोमांचकारी अनुभव होता तो, मी पहिल्यांदाच पाण्याखाली गेलो होतो, आणि चष्मा घालू देत नाहीत त्यामुळे दिसेल का नाही या विवंचनेत होतो.

पहिल्यांदा आपल्याला स्कुबासाठी आवश्यक मास्क घालतात यामुळे नाक पूर्ण बंद होतं, श्वासोच्छवास तोंडाने करावा लागतो, त्या मास्कलाच एक पाइप असतो, तो व्यवस्थित घालायचा, बोटीमधून खाली पाण्यात उतरायचं आणि प्रशिक्षक आपल्याला २-३ मिनिटे पाण्याखाली डोकं घालून तोंडाने श्वासोच्छवास करण्याचा सराव करवून घेतात. एकदा का तुम्ही तयार झाला की मग काय अप्रतिम समुद्र विश्वाची एक झलक अनुभवण्यास आपण निघतो. इतके दिवस केवळ टिव्ही आणि चित्रपटात पाहिलेल्या या विश्वात आल्यावर अक्षरशः भान हरपतं, जवळून जाणारे सुंदर रंग बिरंगी मासे, प्रवाळ खडक, भन्नाट समद्र वनस्पती... अवर्णनीयच. Happy ही सफर केव्हा संपली हेच कळालं नाही. वर बोटीवर आल्यावर १० मिनिटं 'ZNMD' मधल्या ह्रितिक सारखं बसून अनुभव मुरवला:-D. त्यातच एका छोट्या बोटीतून तरंगती टपरीवाला होता, त्याच्या गरमागरम कॉफी आणि चविष्ट उपम्याने कळस केला.

स्कुबाचे काही प्रचि (त्यांनी काढलेले)

प्रचि १४

P1050446

प्रचि १५

P1050465

प्रचि १६

P1050463

एकूण खर्च १५००/- प्रत्येकी आहे, यात बोटीने ये-जा, डायविंग आणि आपले स्कुबा करतानाचे फोटो विथ सीडी आहे. त्यानंतर जर इच्छा असेल तर सिंधुदुर्ग किल्ला पाहायला जाऊ शकता. आम्ही परत मालवणला आलो. आंघोळी आवरुन जेवायला बसलो, मस्त शाकाहारी जेवणाने तृप्त होऊन जरा डुलकी घेतली. संध्याकाळी देवबागच्या सुनामी आयलंडला निघालो. इथे खास वॉटर स्पोर्ट होतात. जेटस्की, वॉटर स्कूटर, बंपी राइड, बनाना आणि डॉल्फिन राइड व कायाकिंग उपलब्ध आहेत. थोडेफार कस्टमाइज करता येतात. आम्ही जेटस्की, बंपर राइड आणि बनाना राइड केली. इथे पण बोटीने ये-जा आणि हे तीन खेळा मिळून प्रत्येकी ७००/- खर्च आला. फुकट चहा पण मिळाला Wink

त्सुनामी आयलंडचे काही प्रचि

प्रचि १७

_MG_8362

प्रचि १८

_MG_8346

प्रचि १९

_MG_8339

संध्याकाळपासून बीचवर खुर्च्या टाकून मस्त गप्पा मारत बसलो. अधूनमधून केळुस्कर चौकशी करत होते त्यात आणखी काही लोक आले होते राहण्यास तिथे. तेव्हढ्यात आमच्या गरमागरम भजींची ऑर्डर आली, गरमागरम भजी, चहा आणी समुद्री वारे.. अहाहाहा 'काय सांगू महाराजा' असं वाटत होतं.

दुसर्‍या दिवशी खास घावन-चटणीचा गरगरीत नाष्टा करून रुम सोडली आणि परत मालवणास आलो. तिथून विवेक यांनी सुचवलेल्या धामापूर गावी निघालो. कुडाळला जाणारी एक यष्टी धामापूर मार्गे जाते. मंदिर साधं पण शांत आहे. मंदिराला लागून असलेला विस्तिर्ण जलाशय फार सुंदर आहे. जलाशयावरून वाहणारा वारा, मंदिराची शांतता अगदी अनुभवण्यासारखी आहे. तिथे बोट राइडपण उपलब्ध आहे. संपूर्ण दुपार तिथे बसून होतो, निघूच नये असं वाटत होतं.

श्री भगवती देवी मंदिर धामापूर,

प्रचि २०

_MG_8510

प्रचि २१

_MG_8502

प्रचि २२

_MG_8521

प्रचि २३

_MG_8512

प्रचि २४

_MG_8557

प्रचि २५

_MG_8543

प्रचि २६

_MG_8531

प्रचि २७

_MG_8571_1

प्रचि २८

_MG_8494

परत मालवणला आलो आणि 'अथिती बांबू' मध्ये जेवण केलं. नक्कीच रुचकर जेवण मिळतं पण वेटिंग फार असतं, आम्ही दोघच असल्याने आम्हाला लगेच जागा मिळाली. जेऊन मालवण स्टँडला चालतच निघालो, वाटेत बाजारात थोडी खरेदी केली आणि परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत करुळ घाटात रात्रीच सुंदर तारकायुक्त आकाशाने या झक्कास प्रवासाची सांगता झाली.

त.टी.

१) स्कुबा डायविंग करताना पाण्याखाली गेल्यावर कानाला दडे बसतात, अशावेळी न घाबरता, तोंडाने श्वास घायचा आणि सोडताना नाक्-तोंड बंद करून सोडायचा, जो कानावाटे बाहेर पडतो आणि कान मोकळे होतात.
२) स्कुबाला वेगळा सूट नसतो, स्त्रियांसाठी मिळतो आणि बोटीवरच छोटीसी चेंजिंग रुम असते.
३) पाण्याखाली त्यांचाच माणूस आपले फोटो काढतो आणि संध्याकाळ पर्यंत सीडी आणून देतो.
४) वॉटर स्पोर्ट्स मध्ये जेटस्की फार धोकादायक आहे, जवळपास १५०-२०० कि.मी. ने ती स्की फिरवली जाते, जर पकड निसटली तर पाण्यात आदळणारच. लाइफ जॅकेट असतच, पण मार लागणाराअच (मला मिळाला नाही Wink )

प्र.चि. २९

_MG_8413

धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम...........
५ वा आणि १२ वा तर एकदम छानच
५व्या प्रचि मधले मोकळा किनारा बघुन ......क्रिकेट खेळायची इच्छा झाली Happy

अफलातुन
सगळेच प्रचि खास. प्रचि १२ जास्त आवडला. Happy

त्या स्कुबा डायविंगमध्ये पाठीवर सिलेंडर नसल्याने आम्ही केल नाही. Proud

सुंदर प्र.चि. !
रंगासेठजी, परत मालवणला जाल- म्हणजे जाणारच तुम्ही - तेंव्हा दुपारीऐवजी एक संध्याकाळ धामापूरच्या तळ्यासाठी राखून ठेवा, कॅमेरा बरोबर न घेतां; निसर्गाशी एकरूप होण्याची अनुभूति ही काय चीज असावी, हे सहज उमगेल तुम्हाला !!
[ हा सुखद अमृतानुभव इतक्या वेळां चाखलाय मी या माझ्या आजोळच्या गांवी कीं बहुधा माझ्यावरूनच मालवणीत ही म्हण आली असावी - ' चुकलां ढोर धामापूरच्या तळ्यार !'. अर्थ- हरवलेलीं गुरं हमखास धामापुरच्या तळ्यावरच मिळणार ! Wink ]

भाऊ, नक्की प्रयत्न करेन, यावेळी आम्हाला ४ वाजता परतायचं होतं, म्हणून नाही बसू शकलो संध्याकाळ पर्यंत.
सौरभ, नाही, हेरंबने निराश नाही केले. Happy

सुंदर सफर Happy

सगळेच प्रचि सुंदर आहेत... खास करुन १२ आणि स्कुबाचे प्रचि खुप आवडले.

धामापुर बाबत भाऊंना अनुमोदन.

धन्यवाद सर्वांना Happy

प्रचि १४-१५ स्कुबाचे आहेत, स्नॉर्केलिंगमध्ये आपण पाण्याखाली खोल जात नाही बहुदा. जास्त करुन पाण्याच्या पृष्ठभागाला समांतर पोहत, पाण्याखाली पाहणे म्हणजे स्नॉर्केलिंग (विकि वरुन साभार)

सर्व प्र चि व वर्णन मस्तच......
कृपया, त्या केळुस्कर काकांचा फोन नं देणार का ? पुण्याहून कारने जायचे असल्यास कसे जावे - कुठला रस्ता ड्रायव्हिंगला चांगला आहे, तसेच तिथले डिटेल रोड मॅप्स कुठे मिळतील ? आत्ता जाने - फेब्रु. त सीझन कसा असतो/ जाणे योग्य आहे का?

केळुस्करांचा नंबर : ९४०४९३२००१
पुण्याहून कारने पण याच मार्गाने जाणं योग्य ठरेल असं वाटतय. आम्ही अथिती बांबूत जेवत असताना पुण्याहून काही लोक आले होते, त्यांनी पण कोल्हापूर-करुळ घाट-कणकवली याच मार्गाने मालवण गाठलं. रस्ता चांगला आहे. रोड मॅप्स गूगल वर आहेत, आम्ही तेच पाहत होतो.
जानेवारी-फेब्रुवारी चांगलाच आहे सिझन, थंडी असे पर्यंत. Happy

मस्त फोटो ! ह्यावर्षी मी नक्की जाणार आहे.
चाफ्याच्या झाडाचा फोटो फारच आवडला.

सर्व माहिती त्वरित दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद, रंगासेठ...