मासे ४१) पिळसा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 January, 2013 - 03:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पिळसा मासा किंवा माश्याच्या तुकड्या
हळद अर्धा चमचा
2 चमचे मसाला
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
आल,लसुण वाटण (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

पिळसा माश्याची खौले काढून त्याचे शेपुट, पर काढून टाका. त्याच्या पोटाकडील भागाला चिर देऊन पोटातील घाण काढून टाका. आता त्याच्या तुकड्या पाडा. (तुकडया करण्यासाठी धारदार कात किंवा विळी लागते. अन्यथा सरळ कोळणी कडूनच करुन घ्यायच्या तुकड्या). ह्या तुकड्या तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या.

(ह्या तुकड्या घरीच केल्या आहेत. फ्रिज मधुन काढून तुकड्या केल्याने गोठल्यामुळे व्यवस्थित तुकड्या पडलेल्या नाहीत तरी चांगल्या आकाराच्या मानून चालावे ही विनंती :हाहा:)

तुकड्यांना हळद, मसाला, मिठ चोळून घ्या. आवडत असल्यास आल-लसुण वाटण चोळा व एकत्र करुन वेळ असल्यास मुरवत ठेवा.

तवा मिडीयम फ्लेम वर ठेउन चांगला तापल्यावर त्यात तेल सोडा व त्यात तुकड्या तळण्यासाठी सोडा. पाच ते सात मिनिटे पहिली बाजू शिजून पलटा गरज वाटल्यास पलटल्यावर थोडे तेल साईडने सोडा. दुसरी बाजूही साधारण तेवढाच वेळ शिजवून घ्या.

(हे तेल जरा माझ्या हातून जास्तच पडले आहे. एवढ्या तेलाची गरज नसते. )

ह्या आहेत तयार चमचमीत, रुचकर पिळसा च्या तुकड्या. तोंडात अगदी पिळून पिळून खा. Lol

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक तुकडी
अधिक टिपा: 

पिळसा मासा म्हणजे बोईट ह्या माश्याचे मोठे रुप. फ्रेश असेल तर चविला छानच लागतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासु Happy

तुझं जाम कौतुक वाटतं, इतक्या सार्‍या प्रकारचे मासे ओळखता येतात, त्यांचे वेगवेगळे प्रकार बनवायचे, आणि मासे खवले वगैरे काढण्यापासुन स्वच्छ करणे म्हणजे कळसच आहे ___/\___

आम्ही याला बोईस म्हणतो....

अगदी तोंपासु पाकृ.

जागु तोंपासु Happy

पण का कोण जाणे Sad मला नविन प्रकारचे मासे खाण्याची इच्छा होत नाही..

तरिहि इतरांसाठी छान पाककृती... Happy

आह्हा.. तोंपासु
जागु.. ६,७ मिनिटे एकाच बाजूने?? एव्हढा वेळ लागतो हे मासे शिजायला???
आणी खाताना आकाराकडे लक्ष द्यायला कुणाला फुरसत मिळणारे.. Happy

जागु मी आले Proud

बादवे मला प्रश्न पडलाय >>
तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या>> म्हणजे नक्की काय करा? Proud

फ्रिज मधुन काढून तुकड्या केल्याने गोठल्यामुळे व्यवस्थित तुकड्या पडलेल्या नाहीत >> ई ना चॉलबे.. पुन्हा कर आणि नवे फोटो टाक. Proud

तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या>> म्हणजे नक्की काय करा?>>>>>>>> तीन वेळा धुवायचा ना?

ई ना चॉलबे.. पुन्हा कर आणि नवे फोटो टाक.>>>>>> दक्षे, अजुन तोंपासु फोटो बघितल्यावर तरी तु खाणार आहेस का??? Wink

आणखी एक नवीन मासा!मस्त! पहिला फोटो बघितल्यावर बोइट आठवला होता पण पिळसा नाव माहित नव्हते. Happy शेवटची ओळ वाचून माझ्या माशांच्या शब्दकोषात भर पडली!
जागू,अशीच छानछान माशांची मेजवानी फोटोंसकट देत राहा.

जाजूजींकडून आणखी एका छान माशाची 'तोंड'ओळख !
मुंबईत 'बोयटे' बदनाम झालेत कारण जवळपासच्या खाड्यांतील प्रदूषणामुळे त्याना रॉकेलसारखा वास येतो असा कांहीसा खरा समज इथं पसरलाय. पण कोकणात हाच मासा [ गुंजुली] दिसायला चकचकीत व खायला चमचमीत समजला जातो ! खाडीत होडीतून जाताना हवेंत उंच उडी मारून लखकन चमकून पाण्यात सूर मारणारा मासा दिसला कीं ह्याला ओळखून घ्यावं. कच्छच्या आखातातून मुंबईच्या बाजारात येणारे बोयटे खूपच मोठे,स्वच्छ व चवदार असतात पण बहुधा पावसाळ्याच्या सुरवातीसच ते इथल्या बाजारात मिळतात. प्रथिनांसाठी हा मासा उत्तम, असं आमचे अट्टल मासेखाऊ फॅमिली डॉक्टर सांगत !!
II इति पिळसा पुराणंम II Wink

अविगा, प्रितिभुषण, वर्षू, अंशा, गुरुदास, श्री, सिंडरेला, मृण्मयी धन्यवाद.

दक्षिणा तू खाणार असशील तर हवा त्या डिझाईनमध्ये मी कापायला तयार आहे मासा.:स्मित:

अवल तशी गरज नसते तळलेल्या तुकडांसाठी पण चवीसाठी हवे तर थोडे लिंबू किंवा चींच किंवा कोकम लावू शकतेस.

आशु नाही हा शहाळासारखा मऊ नसतो. इतर माशांसारखेच असते ह्याचे मांस.

भाऊ हो आमच्या इथेही खाडीतील माश्यांना पहिला तसा रॉकेलचा वास यायचा.

फुल्ल तोंपासू..
जागू आमच्या इथे तिलापिया किंवा गोड्या पाण्याचे मासे मिळतात, पण गोड्या पाण्याच्या मास्यानां वेगळीच चव आणि वास येतो, मला खाववत नाहीत पण हे मासे हॉटेल मध्ये मस्त लगतात असे कसे काय?

जागु तु आणि मी जेव्हा योगायोगाने भेटू तेव्हा नक्की करून आण, फक्त सुरमई.. एक तुकडा (बोटाच्या पेराएव्हढा) मी नक्की खाईन. Happy

दक्षे, वा प्रगती आहे. डायरेक्ट सुरमय पासून सुरुवात... चला मग ... it started with one inch of fried suramay (cooked by Jagu from Maaybo) and then I never looked back... अशी गोष्ट सांगणार का? Proud

मस्तच. जागू तुझ्यामुळे नविन नविन मासे खायची आवड निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात रत्नागिरीला नदीतले ताजे मासे खायला मिळाले. 'बळी' आणि 'चिवले' हे मासे खाल्ले. खाताना पहिल्यांदा तुझी आठवण आलीच.

पण का कोण जाणे मला नविन प्रकारचे मासे खाण्याची इच्छा होत नाही..>>>++१११

फोटो भारी ....

भारती, जाई, सत्यजीत, झंपी, परदेसाई, सामी सृष्टी धन्यवाद.

दक्षे मग मी तुला नक्कीच भेटेन.

हो येळेकर तसेच रवा लावून अजून टेस्टी लागतात. मी बर्‍याचदा रवा लावते. काहीजण बेसन लावतात. पण हे लावल्याने माश्याची ओरी़जनल चव जरा बाजूला राहते.

Pages