संगोपनहिताय..

Submitted by रैना on 13 May, 2009 - 17:27

१)
ती लहान असताना तिची नोकरी करणारी आई घरी दोन मुलींसाठी वेगवेगळ्या वेळचे खाऊचे डबे भरून जायची. ते सगळे सांभाळणारी खाऊन टाकायची ! मुलींना न देताच, आणि मुलींना तिने कुठल्यातरी पावरबाज मेरीची शपथ घातली होती ,की भेद केल्यास मेरी आईला हेलमध्ये नेईल म्हणून. हे असं २ वर्ष चाललं. जेव्हा एकदा धाकटीच्या भुकेने पावरबाज मेरीवरच्या विश्वासावर मात केली, तेव्हा तिनी आईला सांगीतले. हे जेव्हा त्या आईला कळले असेल तेव्हा तिच्या जीवाचा किती थरकाप उडाला असेल ?
मोठी झालेली ती मोठी मुलगी आता जवळजवळ विभक्त झाल्यासारखी राहते. नवरा एकीकडे, मुलगा आणि ती आईकडे. कुठल्याही परिस्थितीत डेकेअर किंवा बाई हा पर्याय तिला मान्य नाही.

२)
फार्मा कंपनीचे पाळणाघर. कुठलीही साथ नसताना, थंडीवारापाऊस नसताना फेनर्गानच्या वाढत्या मागणीबद्दल एका डोकं आणि आत्मा ताळ्यावर असणा-या कंपनीच्या वेठबिगारी डॉक्टरणीने केलेल्या वास्तुपुस्तीचा निष्कर्ष - बाळं झोपावीत म्हणून त्यांना दिवसाकाठी काही कारण नसताना दिले जाणारे फेनार्गान.
नेहमी पाळणाघरातून घेऊन जाताना आपलं बाळ मलूल, आळसावलेलं का दिसतं असं एका तरी आईच्या लक्षात आलं असेल ? मोबदल्याविना मिळणारी सोय सोडून पर्याय तरी काय असा विचार त्या आईच्या मनात आला असेल ?

३)
सांभाळायला ठेवलेल्या अडाणी बाईने सावळ्याश्या मोठीच्या मनात "कस्ली काळीबिद्री हाये. धाकली कस्ली गोरीपान- गुनाची ग माजी बाय" भरवलं. भरीस भर म्हणून धाकटीला साय आणि मोठीचा लाडु अशी परस्पर विभागणी सुरु केली. "तुला तयार करुन उपेग काय ?" असंही ऐकवण्यत येऊ लागलं.
त्या सावळ्याश्या मोठीच्या आत्मभानाच पुढे काय झालं असेल ? तिच्या आईला हे समजेपर्यंत जो काळ गेला त्याचे काय ?

४) कुठल्यातरी तालुक्याच्या गावात सरकारी इस्पितळातील कर्मचा-यांचे सरकारी निवासस्थानं. बायको इस्पितळात गेली कॉल अटेंड करायला, की नव-याने पोरं सांभाळणारीला आवाज दिलाच. वर पोरांच्या खोलीला कडी लावून बाई खाली.. आख्ख्या गावाला माहीत असणारी कथा बायकोला दिवसरात्रीच्या रुग्णसेवेच्या धबडग्यात कधी कळली ? कळल्यानंतर......... ? भर दिवसा, रात्री, अपरात्री, वेळी अवेळी येणा-या हाकेचा आणि दाराला बाहेरुन बसणा-या कडीचा पोरांवर काय परिणाम झाला असेल ?

५) घरी कटा़क्षाने दूरचित्रवाणी न पाहणारे आईबाप. पोरांच्या शब्दसंपदेत अचानक "देखो देखो गिरीजाघर " सारखी भाषांतरीत हिंदीतली अगम्य वाक्य का येताहेत यावर कधी विचार करतात ? मोठ्ठ्याला एकदम धाकट्याच्या डोक्यात हातोडी घालून टॉSSSSSय असे ओरडावेसे का वाटते , ह्याचा विचार कधी करतात ? विचार केल्यावर पुढे काय करतात/ करावे ?

६) धरी मुलगा आणि मुलीला समान वागणूक देणा-या आईबापांच्या पदरात एकदम -" आई तो बॉय आहे म्हणून त्याची प्लेट मी उचलली " हे वाक्य कसं पडतं ?

७) पाचेक वर्षाच्या दादाला , नवीन आलेल्या इवल्याश्या बाळाला कपाटात लपवून ठेवावसं का वाटंत ?

८) घरी छोटा मुलगा एकदम विचित्र खेळ खेळण्याचं मूळ सजग आईला, त्याची मैत्रीण पाळणाघरात भलतेच खेळ खेळण्यात असल्याच समजलं. तिनी रीतसर तक्रार केली. अवघड जागेचं दुखणं ! बाई आईला बोलवून घेतात. आई त्यावर महानगरातल्या जागेची टंचाई वगैरे ओशाळ्या गोष्टी सांगते.
सजग पण पर्याय नसलेल्या आईनी काय करावं ?

९) सरकारी आदेशानुसार मिळणा-या शाळेतील खिचडीनी मुलाचं भयंकर पोट दुखतं. त्यालाच न देणे, शाळेच्या नियमात बसत नाही.

१०) आज पोराला पाळणाघरात कोणी सोडायचं म्हणून रोज नवरा बायकोचं भांडण पोर येऊन पाळणाघरातील काकूंना सांगतो. त्याला एकदा का भाजीच्या जड पिशवीसारखं पाळणाघरात आदळलं की पालक घोड्यावर निघून जाणार. पोराला पाळणाघरातून नेताना पुन्हा तमाशे. "काकू मी आवडत नाही का ग त्यांना? आज मला घरी नको ना ग पाठवू"

आपल्याला काय वाटतं ?
आपल्या सर्वांच्या हाती काही हितावह आणि काही भयावह लागलं तर ते वाटून घेऊयात. विचारांना आणि कृतीला चालना मिळाल्याशी कारण.

_______
प्रेरणास्रोत- पूनमच्या रंगीबेरंगीपानावरील चर्चेनी आणि तिथे मांडल्या गेलेल्या अनुभवांनी विचारांना चालना दिली.
http://www.maayboli.com/node/7785

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय ग कविता. नवरा युरो किड्स ची माहिती घेऊन आलाय. त्याचे म्हणणं की हे प्रोफेशनल आहे पाळणाघर. बघु..!

ह्म्म.. ते घरी बाई ठेवण्यात पण खूप त्रास असतो. जसे मी आधीच म्हटल्याप्रमाणे माझ्या आईला ही बराच त्रास झाला.
काही अनुभव इथे लिहित आहे त्याचा बहुधा फायदा होइल्(आता तसे सर्वच जागृत आहेत (वरची चर्चा वाचून ) पण तरीही,
वरच्या बर्‍याच गोष्टी आम्ही देखील अनुभवल्या. जेवण थंड देणे दुपारी, दार उघडे टाकून बाजूच्या बंगल्यातील बायकांशी गप्पा मारणे वगैरे वगैरे.
एका बाईने तर दुसर्‍यांचे दुपारची धुणी, भांडीचे काम करायला घेतले होते. आम्हाला ती ओरडून वगैरे झोपायला भाग पाडायची नी जायची. आईच्या गपचूप भेटीने कळले. आई तर पुर्ण वेळचे पैसे द्यायची. पण ह्या बायकांची डोकी जरा हलकीच असतात कितीही चांगले केले त्यांना तरी. Sad
५-६ वर्षाच्या मुली काय कप्पाळ वही लिहिणार. मग आईच ट्रीक काढून आल्यावर आम्हाला प्रश्ण विचारायची की दुपारी काय जेवलात? ही भाजी आवडली का? आम्ही खेळता खेळता आठवून सांगायचो, कुठली भाजी? मग कळायचे आईला की आजीने जेवणात एकच भाजी वाढली.(आई दोन भाज्यांची तयारी करायची पण आजी आळस करून एकच भाजी करत नी थंड जेवण देत्.) लहान असताना काही लक्षात रहात नाहीत असले डिटेल्स. त्या वही लिहिण्याचा फायदा खरे तर ८ वगैरे वर्षानंतर झाला. मग आम्हाला कळले की आजींवर नजर ठेवायची तो पर्यन्त हि एक कठीण गोष्ट होती की आम्हाला समजावून सांगणे ,कारण उगाच भिती निर्माण होइल म्हणून्, बर्‍यापैकी समजायला लागले की मुलांना आपोआप कळते कोण कसे वागते तसेच ते आम्हाला कळायला लागले. .(इती आई). Happy
दुपारची चित्रे वगैरे काढायला सांगायची. काही वेळा मुलांची स्थिती चित्र कशी काढतात त्यावरून समजते.
हां नंतर एक फायदा झाला जेव्हा कुत्रा पाळायला लागलो तेव्हा. आमची कुत्री खूप हुशार होती. ती ओळखीच्या माणसाशिवाय कोणाला घरात यायला द्यायची नाही मग आजींचे फुकट दुपारी गपचूप येणारे, जेवणारे नातेवाईक कमी झाले. Happy
त्या सांभळण्यार्‍या आजी ह्या कुत्रीचा पण राग करत. नाईलाज असल्याने आईला काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागे.
आपली सांभाळणारी बाई चांगली असेल तर 'शेजार्‍यांपासून जपून ठेवा.' शेजारी इतके जेलस असतात ना की ते आपल्या बाईला फूस लावतात. हा कायम त्रास होता आईला. आई शोधून गावाहून अगदी सगळी जबाबादारी घेवून माहीतीतली बाई आणायची(गावच्या बाया सुरुवातीला बर्‍या असतात),तीचे जेवण, राहण्याची व्यवस्था, आजार सुद्धा सांभाळायाचे नी ती रुळली की कोण शेजारी रहणारे फूस लावत आम्ही ज्यास्त पैसे देवू वगैरे. Happy एकदा अशीच बाई सोडून दुसरीकडे गेली माहिन्याच्या आत परत येवून काम मागायला लागली ,आईने पुन्हा ठेवले नाही. आम्हाला त्या आजीचा लळा लागला तरीही पुन्हा ठेवले नाही. एकद फसवल्यावर पुन्हा विश्वास न ठेवलेलाच बरा.
घरात सांभाळण्यार्‍या बाईला कधीच औषधे वगैरे डोस द्यायला सांगू नये. कितीही शिकलेली ,समजावून सांगितले तरी त्या घोळ घालतातच. जर बाई स्वतः आजारी असतील तर त्यांची औषधे,कपडे वेगळेच ठेवावे नाहीतर सुट्टे दिलेली बरी.शेवटी ह्या सर्व त्रासाला कंटळून आईने लायसन्स मिळाल्यावर घरीच बाहेर रूम वाढवून प्रॅक्टीस सुरु केली. आम्ही खुष कारण आई घरात दिसायची. दुपारी गप्पा मारायची. मध्येच घरात येवून काही ना काही बनवायची.
मला आठवते तेव्हा आई घरात राहिल्यापासून माझे सतत आजारी पडण्याचे प्रकार कमी झाले. (इती आई).
कधी कधी नोकरी करणे गरजेचे नसतेच मुळी तर पेशाची (पैशाची नाही) आवड असते(इती आई).तरी शक्यतो आईने आमच्या साठी काही काळ प्रॅक्टीसच सोडली होती. आई नी पप्पा सतत बोलत असत आमच्याशी ,बाहेर घेवून जात्(आई म्हणते ते गिल्ट फिलिंग असायचे तिला सुद्धा). असो.
काही गोष्टींचा फायदा मुलांना सुद्धा होतो. मुले जबाबदार होतात लवकरच्.(ह्याचा अर्थ बाकीची मुले आई घरे असेल तर होत नाहीत असा नाही). पण भारतात बर्‍यापैकी घरी रहाण्यार्‍या आईला ग्रॅन्टेद घेतले जातेच तसे (imo). its always plus and minus असे असते. असो. संपली माझी चर्चा. Happy

त्यावेळी आईने पाळणाघरे विषेश पाहीली नाहीत नी जेवढी पाहीली त्यात पाळणाघरातील स्वछता हा भाग जितक्या ठिकाणी आईन पाहिला तिला कधीच तिच्या पसंतीस पडला नाही व जवळपास घरगूतीच चाले पाळणाघर एक दोन खोलीतच. त्यातच त्यांची वाढलेली मुले, त्या त्या बाईंचे रहाणीमान ..छे! ते आईला पसंत न्हवते. माझ्या मते तर माझी आई स्वच्छतेच्या बाबतीत कहर आहे खरी. Happy

घरी बाई ठेवण्यातही नेहमीच फायदा असतो असं नाही ह्याबाबत मनुस्विनीशी सहमत.

माझ्या शेजारणीकडे मुलगा झाल्यावर लगेच डेकेअर नको म्हणून गुजराती बाई होती 'लिव्ह इन' बेसिसवर. ती बाई सुरवातीला चांगली होती. मग तिन कम्युनिटीत बा़कीच्या देसी लोकांना हिच्याच घरचा गॅस, नी कणीक वापरुन पोळ्या करुन द्यायला सुरवात केली. (गुज्जूच ती, काय गप्प बसणार, पैसे न कमवता) आणि मग सोडून गेली तेव्हा शेजारणीचे सोन्याचे कानातले नी बारीक सारीक जुलरी घेऊन पसार झाली.

पण अ‍ॅटलिस्ट मुलं आपल्या घरात आनंदी तरी रहातात.

भयंकर अनुभव आहेत रैना आणि बाकी काहीनी लिहिलेले. ह्याहुन पण भयंकर असु शकतीलही.. वाचवत नाही. मला आठवतय, भारतात जेव्हा एखादी बाई म्हणायची, घरात बसुन कन्टाळा येतो टाईमपास म्हणुन कसली नोकरी करु तेव्हा तिला बाहेरचे सांगायचे, मग घरात पाळणाघर चालु कर, जास्त काम करावे लागत नाही आणि पैसे पण मिळतात .. ????? ... आता समजतय असल्या गैसमजुतीमुळेच असे प्रकार वाढतात.
माझ्यावर पण मुलीला वर्षाची असताना पाळणाघरात ठेवायची वेळ आली तेव्हा सर्वप्रथम मी घरी कोणालातरी सांभाळायला बोलावण्याचा किंवा प्रायव्हेट पाळणाघर चालवणर्‍या भारतीय बाईकडे सोडायचा विचार केला. पण विचार करुन शेवटी व्यावसायीक शाळा+पाळणाघर असे दुहेरी असलेल्या संस्थेत घातले. म्हणजे तिथे भरपुर शिक्षीका असतात. वयाप्रमाणे मुलाला त्या त्या वर्गात घालतात. प्रत्येक वर्गात २ शिक्षीका, आणि जास्तीतजास्त १२-१३ मुले. एक बाई आली नाहीतर तिच्याजागी दुसरी तयार असतेच तिचे काम करायला. म्हणजे आपल्याला सुट्टी घ्यायला नको. त्यानी कोर्स पण केलेला असतो. मुलाना उगाचच रागावणे नाही की अतीप्रेम पण देणे नाही की दुर्लक्ष करणे नाही (पण प्रेमाने बोलतात व्यवसायाला अनुसरुन).. ठरावीक मेनु रोज खाण्याचा. शिकवण्याचे वेळापत्रक लावलेले.. इ.इ.
आज ती ४ वर्षे तिथे जाते तरी मी रोज मी तिला विचारते, 'आज मजा आली?' ती जोरात 'हो' म्हणते तेव्हा मला बरे वाटते. आधी मला खुप अपराधी वाटले तिला सोडुन नोकरी करताना पण ती खुश असेल तर अजुन काय हवे.

अशा संस्था भारतात पण असतील, पण ते जास्त ठिकाणी सुरु झाले तर कितीतरी आयांची काळजी मिटेल.

बाप्रे, कसले horrible अनुभव आहेत एक एक. मी आणि माझ्या बहिणीनेही लहानपणी पाळणाघरात राहून बरेच वाईट अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळे माझ्या मनात लहानपणापासून या एका विचाराने कायमचे ठाण मांडले होते की मी एकत्र कुटुंबातच जाणार लग्न करून की जिथे माझ्या पाल्याला त्याच्या आजी-आजोबांचे प्रेम + माया मिळेल. प्रेमविवाह असूनही माझ्या सुदैवाने मला असेच कुटुंब मिळाले. आमचे पिल्लू आजी सोबत असते दिवसभर. सासरे अजूनही नोकरी करतायत. लवकरच ते रीटायर होतील. Happy
साबांना मदत म्हणून दिवसभर (स. ९ ते सं ६) कामाला बाई लावून टाकली आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण बाई लावून टाकली आहे. Happy

mazi mulgi 14 months chi aahe, me working woman aahe. mala tiche aangavar dudh pine kami karayche aahe, so. mala please guide kara.

Pages