कोकणी

Submitted by webmaster on 3 April, 2008 - 02:27
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीर - मालवणी वारा

सर्व कोकणवासियांका माझो नमस्कार...
गाववाल्यानु निकतोच इलय तुमच्या गजालीक ... करश्यात मा गजाली?

सर्व कोकणवासियांना माझाहि नमस्कार.....
Happy

सर्व कोकन्-निवासियाना माझा नमस्कार. चला आपन एकत्र एऊन आपल्या कोकनचा विकास करु या .एकमेकान्चे पाय ओधुन आपले खूप नुकसान झालेले आहे , हे माहीत असुन हि तसेच वागून काय मिलनार ! झालेल्या चुका सुधारायला हव्यात नाही का? पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करु या.
आपल्यातलाच मी एक -- एन्.सत्या.

नमस्कार मंडळी.

दिवाळीची चाहूल कशी अगदी आसमंतात भरून राहिली आहे नाही?
वर्षातल्या सर्वात मोठ्या या उत्सवात लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुमची लगबग सुरू झाली असेल. घरातली अडगळ काढून साफसफाई करायची आहे. घर रंगवायचे आहे. नवीन खरेदी करायला दोन-तीन दिवस तरी पाहिजेत. प्रियजनांच्या गाठी आणि त्यांच्यासाठी भेटी घ्यायच्या आहेत. नोकरी-धंद्यातल्या संबंधांना यानिमित्ताने उजाळा द्यायचा आहे. बर्‍याच नातेवाई़कांकडे जायचे नियोजन करायचे आहे.. हे ना ते. अनंत विषय मनात असतील, अन् कमी वेळेत कसे कसे होईल हा प्रश्नही!

या गडबडीत आपल्या दिवाळी अंकाला मात्र विसरू नका, म्हणजे झाले.

दिवाळी अंकाची घोषणा होऊनच आता आठवडा उलटून गेला आहे. दिवाळी अंकातला आपला सहभाग निश्चित करण्याच्या दृष्टीने हीच वेळ आहे घाई करण्याची.
आपल्या लाडक्या मायबोलीचा हा नववा 'हितगुज दिवाळी अंक', "मायबोली-मायमराठी- गेले तप आणि येणारे तप" असा विषय घेऊन महाजालावर आपणा सर्वांसमोर येतो आहे, हे दिवाळी अंक घोषणेत सांगून झालेच आहे. या वर्षी आपला दिवाळी अंक मूर्त रूप घेणार आहे तो फक्त शब्दरूपाने नव्हे, तर दृक्-श्राव्य रूपाने सुध्दा. यामध्ये कथा, कविता, ललित, हलकेफुलके लेख, प्रवासवर्णन, रसग्रहण यांबरोबरच बाल साहित्य व आपल्या गुणप्रदर्शनांचे स्वागत आहे..

आपण अजूनही विचार करत असाल, विषय ठरले झाले नसतील तर आपण घाई करायला हवी. ऐनवेळी तुमची धांदल नको, म्हणून ही आगाऊ सूचना!
तेव्हा, लागा बघू तयारीला..!!

आपले साहित्य तयार असेल तर दिवाळी अंकाची घोषणा व त्यातील सूचना पुन्हा एकदा वाचून, कृपया आपले साहित्य दिवाळी अंक लेखनाच्या खालील दुव्यावर पाठवावे.
http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1

काही शंका असल्यास, आपल्या प्रश्नांचे स्वागत आहे..

--
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २००८

अरे माका पन घिया मरे तुमच्या गजालिक.
मी नितिन
बरा वाटला गाववाल्याका भेटान.

वायूदूतच्या ईमानातन एकदा रत्नागीरीक गेललय. तेवां आनी आता.ं कोकण सगला.ंएकच आसा असा.ं वाटला !
"करतांव काय ?" पासून " मेल्या, करतहस काय ?" ... मजा येईल !

तितिक्षा,
कोकणी मांणूस 'एक' होत नाही का कधी ? Proud
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

Nahi kiru mi gujarat madhe rahate gavala jate teva gharchi bhetat pan gujarat madhe marathi far sarve bhetatat ban te kokani nasatat manun asa manali

रे मि पण इलय करताव काय मा??

वाह! ईथे मालवणी मधे सुद्धा गप्पा मारायला मिळतात Happy

कोकणी पसरले हत सगळ्याभर वाटता Happy
मायबोलीक कोकणी करूचा हा काय ... Happy

मायबोलीक मायबोली च रवानदे पन आपन कोकणी वीसराक नको

कोकणी- मालवणीत फकाणे मारुक व्हये तर मगे तुमका हयसर येवुकच व्हया.. बरेच मालवणी कोकाटे आसत थडे.. Happy
http://www.maayboli.com/node/1562#new

नमस्कार,

तुमचे विचार चान्गले आहेत. पण कोकणाविशयी निस्स्वर्थिपणे विचार करणारे, त्या आमच्या मातीवर, आमच्या माणसानविशयी ममत्त्व बाळगणारे किती, आणि चार दिवसान्चा कोकणाचा पुळका येणारे किती, बेगडी प्रेम दाखवणारे किती हे आधी तपासले पाहिजे.

आशा करतो की तुम्ही सगळे खर्या अरथाने कोकणीच असाल.

तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो.

आपला{च्}{करुन घेतला तर}
डी. गणेश.

सगळ्यानी हात जोडा रे....

तर देवा म्हाराज्या रवळनाथा,

तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)

दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्‍या, वाचणार्‍या आणि अंकाची कामा करणार्‍या सगळ्यांचो हात आसा.

कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.

तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.

म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.

तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.

आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)

. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्‍याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...

अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.