गजाली

कसं काय हितगुजकरानो, बरा असा मा? गजाली मारुचो ह्यो आपल्या कोकणीच काय सगल्याच मायबोलीकरांचो कसो आवडतो छंद. आठवता काय तुमका ती तांबडी माती, ती कौलारू घरं, बाजुची मंगर, आंबे, फणस, करवंदीचो जाल्यो, आणि ती सादी-सुदी प्रेमळ माणसा. आठवत आसत तर हयसर वायच टेकून जावा. ४ शब्द आपल्या भाषेतले कानावर पडताच कसा बरा वाटता ते बघा. हय लिवाक तुम्ही कोकणीच असूक व्हाया, किंवा तुमका मालवणी येवाकच व्हयी असा काय नाय. पण ह्या मात्र खरा की हयसर येत रवत तर तुमका मालवणी आपोआप बोलाक येयत.. चला तर चालू करा गजाली.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
images_2.jpg

Submit to kanokani.com

कसा काय गजालीकर्स,
खुप दिवसान २ दिवसान्चा विकेन्ड मिळतलो.
त्याकारणानं सोमवारी भेटु परत
(हैला मला आल का मालवणीत बोलता?)

सुप्रभात गजालीकर्स! काल संध्याकाळपासनं कोण्णेक फिरकूक नाय , सगळे कुडकुडले की काय? स्मित

सुप्रभात.
<< .... सोमवारी भेटु परत >> इन्ना, ह्यां तर 'गजाली'चां ब्रीदवाक्यच !! डोळा मारा

सुप्रभात सगळ्यांका...आज तर थंडी कमी असा कालच्यापेक्षा.

सुप्रभात गजालीकर्स स्मित

चला, हंय आज 'देवां'चा अधिष्ठान आसा, शैलजान दिलखुलास हंसान हजेरी लावलिहा. दिस बरो जातलो ! डोळा मारा

नमस्कार... गजालिकरांनू...

आज बहुतेकांचो विकांत... त्यामुळे कदाचीत शुक-शुकाट असण्याची शक्यता...
फिदीफिदी

हाव आयलो ! नो शुकशुकाट !

योग्या ईलस... काय म्हणता केरळ?? स्मित

सुसकाळ (आजून १० मिन्टा आसत) स्मित

काय म्हणता केरळ??>> एअरपोर्टातून बाहेर इल्लय नि असा वाटला आपल्या कोकणातच इलय.. काय्येक फरक वाट्टूक नाय.. पण मुन्नारमध्ये इलय नि मगच केरळचो फिल इलो !

>>असा वाटला आपल्या कोकणातच इलय.>> असा काय तर मग फोटो लवकर अप्लोड करच. बाकी बायकोकडे लक्ष होता की नाय की निसर्ग सौंदर्यातच बुडलेलस डोळा मारा

बाकी बायकोकडे लक्ष होता की नाय की निसर्ग सौंदर्यातच बुडलेलस >> ती गंम्मतच आसय... सगळी जोडपा आपापले फोटो काढीत बसले व्हते.. आणि आम्ही दोघे निसर्गसौंदर्य टिपण्यात बिझी.. हसू येत व्हता आजुबाजूंच्या पोझेस बघान..

योग्या हाहा बाकी तुझा मालवणी बिघडत चल्ला हा.
त्या दुसर्या आयडीचा काय? बायल कधी होता गजालीकर? आवतणाचो नारळ होयो काय? फिदीफिदी

>> ती गंम्मतच आसय...>> हा मगे सविस्तर वृतांत कधी ? डोळा मारा

सुदोपार. संसारी यो चा स्वागत. स्मित

हा मगे सविस्तर वृतांत कधी ? >> वृत्तांत कसलो.. ट्रेकशिवाय वृत्तांत लिवणा माका काय जमूचा नाय.. माहितीसकट फोटो मात्र डकवतलय.. येळ काढून करुचा लागतला.. नि मालवणीचा म्हणशात तर तसापण माका जास्त येणा नाय.... आता मदतनीस इलाहा तेव्हा थोडाफार काय ता सुधारतला... स्मित बायलेचो आयडी अजुन बनवूक नाय.. करेन लवकरच..

हेम.. संसारी शब्द कित्या रे वापरतस.. ट्रेकचो उत्साह मावळतलो रे..

योग्या...
सुस्वागतम...!!!....

अधिकृत माहिती-स्त्रोतानुसार, तू आमच्यावर - पूण्यातले गजालिकर, भयंकर 'चीडलहंस' अशी वार्ता कानावर इलीहा... ही गोष्ट खरी आसा काय?... तुझ्याच गटातल्या एका 'फुटीर ऊमेदवारा'न माका 'फोन-वर' सांगितल्यान... फिदीफिदी ... (मतदान होय पर्यन्त तोंडातसुन अशीच भाषा भायर पडतली...)... आसो...

आमका फक्त 'केरळ-दर्शन' (तुझ्या क्यामेर्‍याच्या नजरेतसून टीपलेला...)चेच फोटो दाखव... डोळा मारा...

>>'फुटीर ऊमेदवार'>>> हसून हसून गडबडा लोळण फुटीर आता फटके खायत फिदीफिदी