Submitted by सतीश देवपूरकर on 19 December, 2012 - 09:58
गझल
विसकटलेली घडी बसवती समर्थ स्वामी!
प्रत्येकाची धुरा वाहती समर्थ स्वामी!!
दु:खांमध्ये श्रद्धेची होतेच परीक्षा....
नभ फाटू दे, तेही शिवती समर्थ स्वामी!
राखेमधुनी सुद्धा गावे उभी राहती!
तुटलेले संसार वसवती समर्थ स्वामी!
हवा भाव अन् हवी सबूरी भक्तापाशी;
माळरानही पहा फुलवती समर्थ स्वामी!
उगा कशाला धावावे मागुनी सुखाच्या?
अरे, सुखाचे मळे पिकवती समर्थ स्वामी!
दूर तुझ्यापासून कुठे गेलेत कधी ते!
श्वासाश्वासामधे धडकती समर्थ स्वामी!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
॥ जय जय श्रीस्वामिसमर्थ ॥
॥ जय जय श्रीस्वामिसमर्थ ॥
गझलतंत्रातील भक्तीपर रचना (
गझलतंत्रातील भक्तीपर रचना
( श्री स्वामी समर्थ )
धन्यवाद हरिहरजी, भूषणराव!
धन्यवाद हरिहरजी, भूषणराव!
असा एक मिसरा सुचला आहे यावर
असा एक मिसरा सुचला आहे यावर शेर करता येईल क पहावे प्लीज
<<<<भिऊ नका पाठीशी असती समर्थ स्वामी
धन्यवाद
______________________________________________
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ......
______________________________________________
जय गुरुदेव दत्त तू कसाही
जय गुरुदेव दत्त
तू कसाही वाग,मी तुझ्या पाठीशी आहे ---
एकतर उद्धरायला वा फेकायला ...
देवपूरकरसर, सरळ वर्मावरच घाव
देवपूरकरसर, सरळ वर्मावरच घाव घातलात. गझल वाचताना नकळत हात जोडले गेलेत.
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
गझल आवडली !
गझल आवडली !
इस्त्रीवाला टेलर गावकरी शेतकर
इस्त्रीवाला
टेलर
गावकरी
शेतकरी
बागवान
डॉक्टर
वाह वाह !
(गझल बिझल ठीक आहे हो , पण स्वामींसारख्या विरक्त सन्याश्याला तुम्हा आम्हा क्षुद्र प्रापंचिकाच्या ह्या क्षुद्र सांसारीक गोष्टी का करायला लावताहात ? एकदम देउळ पिक्चर ची आठवण आली .... तु झोप तुझा दत्त जागा आहे )
सर्व रसिकांचे आभार!
सर्व रसिकांचे आभार!
प्रसादपंत! काय करतो मी, करे
प्रसादपंत!

काय करतो मी, करे तू काय वेड्या?
सर्व काही ते स्वत: करतात स्वामी!
प्रा.सतीश देवपूरकर
वैभवा! खुशाल जा सामोरी
वैभवा!

खुशाल जा सामोरी येणा-या दिवसाला!
भिऊ नका पाठीशी असती समर्थ स्वामी!!
धन्यवाद सर शेर तसा चांगला
धन्यवाद सर
शेर तसा चांगला झालाय पण या गझलेतल्या इतर शेरांइतका नाही अवडला
असो
पुनश्च धन्यवाद सर
जय जय स्वामी समर्थ!
जय जय स्वामी समर्थ!
धन्यवाद वैभवा, विभाग्रजजी!
धन्यवाद वैभवा, विभाग्रजजी!
जय जय स्वामी समर्थ...........
जय जय स्वामी समर्थ...........
याला गझल का म्हणावे? ('आरती
याला गझल का म्हणावे?
('आरती विभाग' आहे काय माबोवर?)
(No subject)
साबिर उर्फ बदीउज्जमा बिराजदार
साबिर उर्फ बदीउज्जमा बिराजदार सर यांची थोपु वर १९/१२/१२ चे गझल वाचली
प्रस्तुत गझल त्या वरून प्रेरणा घेवून पाडलेली आहे असा दाट संशय आल्यावाचून राहत नाही
अस्सल व नक्कल यातला फरक स्वामीच जणोत
जय स्वामी समर्थ !!!!!!
________________________________________________________
गझल
आहे समर्थ माझा माझीच लाज स्वामी
दुखण्यावरीच करतो माझा इलाज स्वामी
माझ्या सभोवताली कल्लोळ फार होता
पण शांतता मनाला देतोय आज स्वामी
त्याचा सुगंध आहे माझ्याच जिंदगीला
माझ्या मुक्या मुखाने करतो रियाज स्वामी
आहे परोपकारी सन्मार्ग सोबतीला
येवून आज नमतो सारा समाज स्वामी
मी गीत मांडताना स्वामी तुझाच साबिर
कंठात आज माझ्या स्वर आणि साज स्वामी
~बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर शोलापुरी)
sabirsolapuri@gmail.com
MOB: 9890171703
Like · · Follow post · 19 December at 22:20
___________________________________
असो............. हाय काय अन् नाय काय आपल्याला काय नाय का!!!
सतीश देवपूरकर सर यांना स्वामी
सतीश देवपूरकर सर यांना स्वामी समर्थांवर भक्ती रचनेची मागणी एका मठातर्फे आली होती त्याप्रमाणे ही भक्तीरचना (गझल) ही त्यांचीच आहे सर्वप्रथम त्यांनी मला फोनवर वाचून दाखवली त्यानंतर मीही गझल लिहिली आहे मीही त्याना फोनवर वाचून दाखवली मी पोस्ट करू का असे विचारले असता सतीश देवपूरकर सर म्हणाले तुम्ही तुमच पोस्ट करा मी नंतर पोस्ट करतो
ही कोणाची नक्कल नाही उलट स्वामी समर्थाचीच ही प्रेरणा आहे आपणा सर्वांनाही स्वामी समर्थ अशीच प्रेरणा देवो हीच स्वामी समर्था चरणी प्रार्थना
स्वामीच सगळं करतात तर
स्वामीच सगळं करतात तर देवपूरकर सर त्यांना ते जरा सांगा ना...बलात्कार्यांना सद्बुद्धी द्यायला....तुमचा वशिला लावा की ! समस्त भगिनीवर्ग दुआच देईल तुम्हाला.
वरील प्रतिसाद तुम्ही आवर्जून
वरील प्रतिसाद तुम्ही आवर्जून लिहाच असा फोन देवपूरकरांनी तुम्हालाआवर्जून केलेल दिसतोय
एरवी/ सहसा तुम्ही माबो वर नसता साबिर जी (येत जा माबोवर नेहमीनेहमी , तुमच्या नवनवीन गझला आमच्याशी शेअर करत चला!!!)
असो तुम्ही म्हणताहात तर तसेच असेल
पण काहीका असेना या २ गझलांचे अपापसात कनेक्क्षन आहे हा माझा कयास बरोबर आहे म्हणायचा !!
जय स्वामी समर्थ !!!!!!
"भिऊ नको मी तुझ्या पाठीशी
"भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे"
असे सांगणारे स्वामी समर्थांचीच कृपा आम्हा दोघांवर आहे
आपणा सर्वांचा गैरसमज दूर करण्यासाठी केलेला हा सत्य खुलासा आहे
माझ्याविषयी सांगायचं तर मीही गझल लिहितो पूर्वी मी गझल पोस्ट केलेले आहे. मला जे सुचते तस मी लिहित असतो काहींना माझे खयाल आवडत नाही...म्हणून गझला पोस्ट करत नव्हतो. म्हणून या समुहावर नुसता वाचन करणे हे वाचत असताना सतीश देवपूरकर सरांची गझल आणि प्रतिक्रिया वाचल्यामुळे खुलासा करणे गरजेचे वाटले कृपया गैसमज नसावा
माझे आणि सरांचे बोलणे पूर्वीच झालेले होते विषय फक्त स्वामी समर्थ आहे पण दोघांचे शेर (खयाल) हे ज्याचे त्याचे आहे.
ज्ञानेशजी, याला गझल का
ज्ञानेशजी,
याला गझल का म्हणावे?
('आरती विभाग' आहे काय माबोवर?)
गझलेला विषयांचे बंधन नसते.
प्रत्येक शेराचा आशय/विषय/मूड वेगळा असू शकतो.(गैरमुसलसल गझल)
एकाच विषयावर देखिल सर्व शेर असू शकतात. (मुसलसल गझल)
गझलेला भक्तीचेच काय कुठल्याच भावनेशी वावडे नसते.
बेफिकीरजींनी म्हटल्याप्रमाणे ही गझलतंत्रातील भक्तीरचना आहे.
गझलेतील प्रत्येक द्विपदी ही स्वयंपूर्ण कविता असायलाच हवी.
सदर आमची गझल रचना या निकषावर उतरते का हे आम्ही मायबोलीवरील तज्ञांवर व आपणावर सोडतो.
रचनेवर कुणीही काहीही शिक्का मारो, त्या रचनेत मूळ काव्य असायलाच हवे या मताचे आम्ही आहोत.
आता काव्यच मुळात कशास म्हणायचे असा जर प्रश्न असेल तर त्याला मराठीच्या पाठ्यपुस्तकांचा आभ्यास करावयास हवा व कवितेच्या निरनिराळ्या व्याख्या वाचायला हव्यात.
सच्च्या कवीस कोणत्याही काव्य प्रकाराचे वावडे नसावे.
ज्याला जो प्रकार आवडेल, रुचेल, पटेल, पेलवेल त्याने तो हाताळावा मग कुणीही त्यावर कोणतेही लेबल डकवेना का, काय फरक पडतो?
........प्रा.सतीश देवपूरकर
प्रमोद देव, ईश्वराला सर्व
प्रमोद देव,
ईश्वराला सर्व सारखेच! तुमचा/आमचा असा भेदच तिथे नसतो.
आपणही प्रार्थना करा व प्रत्यक्ष अनुभूती घ्या!
चाखल्यावरतीच फळ समजेल गोडी!
........प्रा.सतीश देवपूरकर
एक नवाच कुणीतरी, जे कुणी आहात
एक नवाच कुणीतरी, जे कुणी आहात ते,
बरेच तारे तोडलेत!
साष्टांग नमस्कार!
रचनेवर काहीही न बोलता तिच्या उगमाविषयी बरेच भ्रमिष्ट कयास झाले.
नवेच काहीतरी करायचे दिसते आहे आपणांस!
या पेक्षा उत्तमोत्तम गझला लिहा व वाचकांस निर्मळ आनंद तरी द्या!
जय जय स्वामी समर्थ!
टीप: पडूनच/पडल्या पडल्याच सर्व रचना वाचत चला म्हणजे पडलेली/पाडलेली असा
भेदच उरणार नाही!
प्रा.सतीश देवपूरकर
आता काव्यच मुळात कशास
आता काव्यच मुळात कशास म्हणायचे असा जर प्रश्न असेल तर त्याला मराठीच्या पाठ्यपुस्तकांचा आभ्यास करावयास हवा व कवितेच्या निरनिराळ्या व्याख्या वाचायला हव्यात.<<<
नवाच एक कुणीतरी यांनी केलेला
नवाच एक कुणीतरी यांनी केलेला प्रकार अतीशय वाईट होता
असो, स्वामी समर्थांनीच खुलासा करवून घेतला
जय स्वामी समर्थ!!!
याला गझल का म्हणावे हा प्रश्नही माझ्यामते अनावश्यक होता
असो
बदीऊज्जमा
बदीऊज्जमा बिराजदार/साबिरजी,
खुलाशाबद्दल आभारी आहे!
जय जय स्वामी समर्थ! (हसत असतील बिचारे पामरांना पाहून).....एक आमचा कयास!
टीप: आपली स्वामींवरील गझल छान आहे!
आपल्या गझललेखनास हार्दिक शुभेच्छा!
प्रा.सतीश देवपूरकर
धन्यवाद वैभवा!
धन्यवाद वैभवा!
Pages