विसकटलेली घडी बसवती समर्थ स्वामी!

Submitted by सतीश देवपूरकर on 19 December, 2012 - 09:58

गझल
विसकटलेली घडी बसवती समर्थ स्वामी!
प्रत्येकाची धुरा वाहती समर्थ स्वामी!!

दु:खांमध्ये श्रद्धेची होतेच परीक्षा....
नभ फाटू दे, तेही शिवती समर्थ स्वामी!

राखेमधुनी सुद्धा गावे उभी राहती!
तुटलेले संसार वसवती समर्थ स्वामी!

हवा भाव अन् हवी सबूरी भक्तापाशी;
माळरानही पहा फुलवती समर्थ स्वामी!

उगा कशाला धावावे मागुनी सुखाच्या?
अरे, सुखाचे मळे पिकवती समर्थ स्वामी!

दूर तुझ्यापासून कुठे गेलेत कधी ते!
श्वासाश्वासामधे धडकती समर्थ स्वामी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर त्या दुसर्‍या गझलेतील आतला आवाज या शेरावर मी प्रतिसाद दिला होता त्यावर काही बोलला नाहीत ते
मी आज सादर केलेल्या गझलेत आहे तो माझा शेर जो मला काल-परवाच सुचला आहे तो मी तुमच्या शेराशी टॅली करून पाहिला
तुम्ही अलिकडे माझ्या गझला वाचून प्रतिसाद देणेच सोडले आहे अगदी .
पर्यायी देवू नका असे म्हणालो होतो मी एकदा .....तुम्ही प्रतिसाद देणेच बंद केलेत Wink

वैभवा! तुझ्या गझलेवर आम्ही का बरे प्रतिसाद नाही देणार बुवा?
उलट तू गझल टाकल्या टाकल्या आमचा प्रतिसाद लिहून झाला होता आमच्या चोपडीत!
पण आधी आमच्या समर्थांवरील रचनेवरच्या प्रतिसादांचा समाचार घेतला, आता तुझाच नंबर!

वैभवा, या तुझ्या गझलेतील रदीफ आहे............''आहे''!
काफिया कोणता आहे?
काफियातील न बदलणारे अक्षर कोणते?
आलामत कोणती? अ की, आ?

खयाल/मिसरे/प्रतिके/पा्रतिमा टकराना होवू शकते.
त्यात कुठलाही कमीपणा वाटण्याचे कारण नाही.
उर्दूत तर अशा टकरानेवाल्या शेरांची पुस्तके उपलब्ध आहेत.
गझल आवडली!

तू विचारलेस म्हणून (एरव्ही देखिल दिले असतेच हा भाग वेगळा) दोन शेर देत आहोत, जे आम्हास तुझी ही गझल वाचता वाचताच सुचले!

मतला आम्ही असा केला...........(अर्थ तुझाच रहाणार नाही)

ऊब देणारा स्मृतींचा गारवा आहे!
गारव्यामध्ये अनोखा गोडवा आहे!!

वाटते आकशवाणी आज होवू दे.......
आतला आवाज माझा गोठला आहे!*

* इथे काफिया आम्ही दिलेल्या मतल्याखाली बसत नाही. पण तुझाच शेर तुझा सानी मिसरा कायम ठेवून वरीलप्रमाणे करावासा वाटला!

पहा कसे वाटतात हे बदल! न रुचल्यास दुर्लक्ष करावेस!

टीप: असे काफिये घेवून गझल करू नये हे आमचे व आमच्या गुरूंचे वैयक्तिक मत
आहे! असो.
गझललेखनास शुभेच्छा!
प्रा.सतीश देवपूरकर

Lol
ओके देवकाका तुम्ही म्हणताहात तर तसेच करीन काही दिवसानी सोलापुरला जाणे आहे अक्कलकोटलाही जाईन म्हणतो सोलापुरात साबिरजीनाही भेटायचे होतेच पण योग येत नव्हता आता त्यानाही भेटीन म्हणतोय

धन्यवाद देवसर

अलामत आ ही आहे जी काफियाच्या शेवटच्या अक्षरावर आहे काफिये असे आहेत ...एकटा , गारवा , गोडवा , हरवला, गोठला ,व्यथा इत्यादी

उर्दूत तर अशा टकरानेवाल्या शेरांची पुस्तके उपलब्ध आहेत.>>रोचक माहिती !! तुमच्याकडे असतील अशी पुस्तके तर मला जरूर कळवा सर

तुम्ही रचलेला नवीन अर्थ असलेला मतला आवडला
'आकाशवाणी' चे प्रयोजन मी समजू शकतो पण पहिलावाचनात चट्कन रेडियो हाच सामान्य अर्थ लागतो त्यामुळे जरासा रुक्ष वाटतो तो शेर

असो
गझल लेखनासाठी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल शतशः आभार !!...... पण नुसत्याच शुभेच्छा नकोत बरका सर आशिर्वादही हवेत Happy

Pages