Dreamum wakeuppam अश्लील गाणे?

Submitted by रमेश भिडे on 17 December, 2012 - 23:54

Dreamum wakeuppam हे नवीन गाणे काही दिवसपूर्वी कानावर आले. आणि कालच पुतण्याला मुंबईत फोन केला तर हे गाणे मागे वाजत होते. कुतूहल चाळवले,म्हणून विचारले तर म्हणाला की हे गाणे तर सुपरहिट आहे...म्हणून डाउनलोड करून काळजीपूर्वक ऐकले तेव्हा मला धक्काच बसला .........................!

संगीत,ठेका ,शब्दोच्चार पद्धत इत्यादि बाबतीत गाणे catchy असले तरी गाण्याचे शब्द आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ अश्लील आहे,असे मला वाटले. अशा गाण्यांना सेन्सॉर बोर्ड परवानगी काशी काय देते बुवा?

..
Aiyyaayo..

Dreamum wakeuppam
Critical conditionum
Hey earthum quakepum
Hil dool sab shakeupum
Face to faceum dharti putram
Thighsum thunderum
Downum underum
Sizeum matterum
Thinkum wonderum
Jumpingum..
Pumpingum..
Throbbingum..
Thumpingum.. (Wune, runde, mune, naale)
Ummhha.. Ummhha..
Heart beatnum
dhol peetnum
Love lust double kasht
bada dheetnum
Yeh.. body heatnum
hot seatnum
Calling fire brigade bhi defeatnum
Same to sameum
Dil me utarum
Thighsum thunderum
Downum underum
Sizeum matterum
Thinkum wonderum
Jumpingum…
Pumpingum
Streelingum..
Pullingum.. (Wune, runde, mune, naale)
Ummhha.. Ummhha.. Ummhha.. Ummhha..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://youtu.be/ryy5jrN183Q. खरं हायलाईट हे गाणं आहे. राणीने खुप मेहनत केलेली दिसते आहे नाचताना आणी गायलं पण छान आहे.

मुळातच पुरुषाला ऑब्जेक्टीफाय करणे ही या सिनेमातली एक थीम आहे आणि त्यात हे गाणे अचूक बसते>> +१
दुसरं गाणं आणि त्यातील पेट्रोल भरण्याचं दृश्य देखील थीमनुसारच आहे.

<<< (अवांतर - चार सहा वर्षाची मुले 'पुल्लिंगं, स्त्रीलिंगं' करत बागडू लागली तर पालक स्वतःच्या मनाला 'शब्दांमागे जे कथानक आहे त्या संदर्भात मुलांचे हे बागडणे आपण बघायला हवे' असे समजावून सांगतील का?) >>>

Rofl

Rofl

Rofl

चार सहा वर्षाची मुले 'पुल्लिंगं, स्त्रीलिंगं' करत बागडू लागली तर पालक स्वतःच्या मनाला 'शब्दांमागे जे कथानक आहे त्या संदर्भात मुलांचे हे बागडणे आपण बघायला हवे' असे समजावून सांगतील का? >>>>>>>>>>> खरंय बेफी. Lol

>>>> (अवांतर - चार सहा वर्षाची मुले 'पुल्लिंगं, स्त्रीलिंगं' करत बागडू लागली तर पालक स्वतःच्या मनाला 'शब्दांमागे जे कथानक आहे त्या संदर्भात मुलांचे हे बागडणे आपण बघायला हवे' असे समजावून सांगतील का?) <<<<<
नाही, ते तोन्डात मूग धरुन बस्तील.
अन अशी मुलेच पुढे दिल्लीत जे बलात्काराचे प्रकरण झाले व देशभरात होत रहातात, ते करू धजतील.
अन आम्ही मायबोली वर संस्कार, सु कोणते नि कु कोणते, ते आईनेच करावे की बापानेही, आईनेच करायचे तर त्यानिमित्ते तिला "स्त्री" म्हणून डाम्बुन ठेवणे होते, वगैरे अक्कलेचे तारे तोडत राहू.

.

शी!

देव्यानी | 18 December, 2012 - 13:21
अहो ह्याच काय घेवुन बसलात .... मनात आनलं तर " नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच " हेही अश्लील गाणं वाटतं .

काय करून बसलात हे देव्यानी तै !
मला नाही वाटत की आता या जन्मीतरी मी "नाच रे मोरा" हे गाणे इनोसंटपणे व न हसता ऐकू शकेन.

हे ग्या केवळ पुनःप्रत्यया साठी Rofl

नाच रे मोरा नाच !

ढगांशि वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !

थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझि माझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच !

डॉक्टर...

"...आजकालच्या पालकांची मेंट्यालिटी पहाता उद्या एकाद्या ट्यालेंट शो मधे या गाण्यावर...." - अगदी मनातील लिहिले आहे....आणि असे होईलही....बघणारे टाळ्यांचा कडकडाटही करतील आणि परीक्षक म्हणून बसणारी थोर्र थोर्र मंडळी त्या मुलालामुलीला वरचा 'सा' देतीलही.

खूप गाजलेल्या झी सारेगामा 'लिटल चॅम्प्स' मध्ये आर्या आंबेकर या गुणी मुलीने 'नका तोडू पावणं जरा थांबा...' हे अश्लिलतेकडे सरळसरळ झुकणारे गाणे सादर केले त्यानंतर तिच्या वयाच्या मुलीने ते गाणे सादर करणे योग्य होते का यावर अगदी 'वाचकांच्या पत्रव्यवहारात' चर्चा झाल्याचे स्मरते. तिच्या ब्लॉगवरही त्या गाण्याविरूद्ध मते नोंदविली गेली होती. पण तिच्या आईबापानीच ते गाणे तिच्याकडून बसवून घेतले होते त्याला गुप्ते आणि सामंत तरी काय करणार ? वाजविल्या सार्‍यांनी टाळ्या आणि मिळाला आर्याला वरचा सा.

देव्यानी...... देव्यानी....... (टायटल सॉंगच्या चालीत Wink )

काय हे देव्यानीतै !! घरचे, बाहेरचे लोक माझ्याकडे साशंक होऊन पाहात आहेत. दुपारपर्यंत चांगला होता त्यानंतर काय झालं कुणास ठाऊन, अधूनमधून उगीचच का हा हासतोय ? असे मनात म्हणत असतील. काय सांगू आता त्यांना ?
मागे एकदा दादा कोंडकेंचे "कमरपट्ट्याचं घुंगरु का हसलं, त्यानं पाहिलं ते मला नाही कधी दिसलं' हे गाणे खऱ्या अर्थाने ऐकले होते. त्याची आठवण आली. संपूर्ण गाणे येथे दिल्याबद्दल व त्यातील गुढार्थाची उकल केल्याबद्दल धन्यवाद.

राणीने ह्या सिनेमाच्या निमित्ताने सांगितले होते की एका प्रौढ कुमारिका जी मध्यमवर्गीय आहे तिच्या भावविश्वात असलेला एका तरुण व त्याच्या विषयी असलेली तिची आसक्ती तो दाक्षिणात्य असल्याने आपल्यापुढे त्यांच्या सिनेमातील गाण्यांची
जी काही छबी डोक्यात असते. त्यानुसार तिच्या कल्पनेच्या विश्वात सुटते.
भारतात पुरुष प्रधान संस्कृती असल्याने आसक्ती ,वासना हे पुरुषांच्या तर त्याग ,पवित्र ,निर्मळ प्रेम ही बायकांची मक्तेदारी असल्याचे गृहीत धरले जाते.
पण जसा एखादा पुरुष निर्मळ प्रेम करू शकतो तसे एखादी स्त्री एखाद्या पुरुष्याप्रती
विषयासक्त होऊ शकते. हे निसर्ग धर्माला अनुसरून आहे.
मला ह्या गाण्यात काहीच वावगे वाटत नाही ,
आणि आर्या आंबेकर ने काय गावे व काय गाऊ नये हे तिला तथाकथित पांढरपेशा लोकांनी उगाच समजावू नये.
पोटासाठी नाचते मी ,परवा कोणाची असे एका माजी लावणी कलावतीने म्हणून ठेवले आहे , त्या बाजाची गाणी शहरातील मुलगी गायली तर काय मोठा गहजब झाला.

आकाश नील | 19 December, 2012 - 14:43 नवीन

..... पण काळ सोकावतो .... पुढची गाणी कशी येतील ...?

>>>

वाह , आकाश नील , धन्यवाद , बरेच दिवसांनी कविता लिहायची प्रेरणा दिलीत आपण आम्हाला Biggrin

आकाश नील | 19 December, 2012 - 14:43 नवीन

..... पण काळ सोकावतो .... पुढची गाणी कशी येतील ...?

>>>

वाह , आकाश नील , धन्यवाद , बरेच दिवसांनी कविता लिहायची प्रेरणा दिलीत आपण आम्हाला खो खो

>>>

जरुर ... पण वरिल गाण्याचा पुढचा भाग (नको नको...) का दुसरे काही? Happy

याच्यात काय अश्लील मला नाही वाटत
आपण जस बघतो तस आपल्याला दिसतं

आता एक कोढ सांगतो
एवढ एवढस असत पण कधी कधी त्याच्यातून पाणी पडत,

याच उत्तर काय- तुम्हाला वाटेल अश्लील आहे

पण तस नाही
याच उत्तर आहे- डोळा

ज्यांना तो सिनेमा जसा बनवावा वाटला तसा त्यांनी बनवला. जसे गाणे टाकावेसे वाटले तसे टाकले.
तुम्हाला काय एव्हडी उठाठेव? बघायचे तर बघा, नसले बघायचे तर नका बघु. compulsion केले आहे का कोणी?

@मंजुडी - प्रतिक्रिया पटली.

>>ज्यांना तो सिनेमा जसा बनवावा वाटला तसा त्यांनी बनवला. जसे गाणे टाकावेसे वाटले तसे टाकले.
>>तुम्हाला काय एव्हडी उठाठेव? बघायचे तर बघा, नसले बघायचे तर नका बघु. compulsion केले आहे का कोणी?
अतिशय चुकीचे विधान आहे हे. दृकश्राव्य माध्यमाचा समाजावर फार चटकन आणि मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे ही असली व्यक्तीस्वातंत्र्य वाली वाक्ये फेकू नकाच कृपया.
यावर याआधीही माबोवर अनेक वेळा चर्चा झालेली आहे. अनेक महान(?) लोकांचे म्हणणे आहे की मेडियाने लोकांवर चांगले संस्कार करण्याचा ठेका घेतला आहे का ? व्यवसाय आहे, मागणी तसा पुरवठा, मग असे असेल तर निळ्या चित्रफिती सरळ सरळ सिनेमागृहांमधे उघड उघड दाखवा ना. कारण छुप्या रितीने का होईना अशाच गोष्टींची मागणी जास्त असेल ना समाजात.
चांगल्याला शाळेची गरज असते, वाईटाला नाही, वाईट गोष्टी फार चटकन पसरतात समाजात. म्हणुन त्याचे उदात्तीकरण करणे चुकीचे आहे. दुर्दैवाने आज सर्वच बाबतीत हे चालू आहे, व्यसने, अश्लिलता, भ्रष्टाचार, इ.
चांगले संस्कार होणे, ते टिकणे आणि पुढच्या पिढ्यांना पण तसेच बनविणे हे फार आवश्यक आहे. पण खरेच आजकाल अजिबातच सुचेनासे झाले आहे, काय केले म्हणजे समाजात पुन्हा सुसंस्कारांना प्रतिष्ठा मिळेल ?

दृकश्राव्य माध्यमाचा समाजावर फार चटकन आणि मोठा परिणाम होत असतो. >>>>> +१
तुमचा मुद्दा बरोबर आहे महेश पण बदलत्या काळानुसार, लोकांच्या आवडी बदलत चालल्या आहेत आणि पाश्चात्य संसकृतीचे अनुकरण करत आपल्या इथे सुद्धा "फ्री कल्चर" येत आहे. इथे अनुकरण चूक की बरोबर हा मुद्दा आजिबातच नाही, फक्त वस्तुस्थिती म्हणून लिहीला आहे.
युरोप अमेरिका मध्ये सुद्धा मुलं लहानाची मोठी होतात, काही सरळमार्गी निघतात काही बिचारे हरवतात. थोडक्यात पुढच्या पिढीचे नुकसान होऊ नये ह्या करता एकच मार्ग आहे तो म्हणजे पालकांनी जातीनी लक्ष देऊन मुख्यतः संवाद हा मुलांशी साधलाच पाहिजे. आपण (ह्यात मी सुद्धा आलो) माध्यमांच्या नावानी बोंब मारुन काहीच होणार नाही. वाईट गोष्टी, इतर प्रलोभनं सर्वत्रचाअहेत पण ती आढळल्यावर किंवा स्वत:च्या समोर ऑपशन बनून आल्यावर ती कशी हाताळायची (हँडल करायची ह्या अर्थानी) हे जर मुलांना शिकवलेलं असेल तर प्रश्न येणार नाही.
आपली खरी समस्या म्हणजे ह्या गोष्टींबाबत मुलांशी बोलायचं कसं. एकदा आपली भीड चेपली की पुढे सगळं सोपं आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल इतकी समज मुलांमध्ये असते.

इथे नुकताच विषय निघाला आणि कालच 'सपने सुहाने लडक पन के' नावाच्या शो मधे , लग्नयच्या सीन मधे गेस्ट अपिअरन्स करत ' डान्स इंडिया डान्स लिट्ल चॅम्प' ची स्पर्धक श्रेया (७-८ वर्षाची फार तर) या गाण्या वर नाचताना दिसली, बाकी तिघे मोठे होते पण एक बाल कलाकार या गाण्यावर नाचताना अतिशय इनअ‍ॅप्रोप्रिएट वाटलं.

@महेश - cinema किंवा media चा समाजा वर परिणाम होतो हे assumption च आधी चुकीचे आहे. हे कुठे सिद्ध झाले आहे? तसे असते तर हिंदी cinema मधे नेहमीच चांगल्याचा वाईटावर विजय असे दाखवले असते, तरी पण समाज का सुधारत नाही. एके काळी रामायण serial खुप popular होती आणि दुसरे पर्याय पण नव्हते लोकांना बघण्यासाठी, at least त्या काळापुरते तरी गुन्हेगारी, बलात्कार कमी झाले होते का?

सध्याचे भ्रष्ट राजकारणी सगळे ६०+ आहेत, त्यांच्या तरुणपणात किंवा घडण्याच्या वयात तर सगळे साधे, सरळ आणि सज्जन cinema च होते, मग हे पैसे खायला आणि गुंडगरी करायला कसे शिकले?

जे सरळमार्गी असतात ते सरळच चालत रहातात. काही भटकतात पण स्वताहुन वाटेवर येतात. काहींना सरळ वाट नकोच असते, त्यांना कोणी सुधारु किंवा बिघडवु शकत नाही.

प्रसाद, तुमचा पॉईन्ट पटला नाही. मिडियाचा खूप होत परिणाम असतो लोकांवर. पूर्वी गुन्हे घडतच नव्हते असे नाही पण overall conscience जास्त होता. मिडिया मधे दाखवलेल्या व्हायलन्समुळे होतकरू potential गुन्हेगारांना धीर येतो असे मला वाटते. "अरे मला जे करायची इच्छा होती ते इतर लोकही करतायत" ही हिम्मत मिळते. it slowly gets overall approval of the society. फॅशन्स कशा पसरतात असे वाटते तुम्हाला?
बाकी गाण्याच्या अश्लीलपणाबद्दल, कथेची मागणी असेल तसे गाणे असणार हे पटते (हा पिक्चर पाहिला नाही त्यामुळे माहित नाही). पण या लिबर्टीचा गैरफायदा घेऊन cheap entertainment आरामात मिळावी हे नाही पटत.

इथे नुकताच विषय निघाला आणि कालच 'सपने सुहाने लडक पन के' नावाच्या शो मधे , लग्नयच्या सीन मधे गेस्ट अपिअरन्स करत ' डान्स इंडिया डान्स लिट्ल चॅम्प' ची स्पर्धक श्रेया (७-८ वर्षाची फार तर) या गाण्या वर नाचताना दिसली, बाकी तिघे मोठे होते पण एक बाल कलाकार या गाण्यावर नाचताना अतिशय इनअ‍ॅप्रोप्रिएट वाटलं.>>>>>>>>> दीपांजली, शाळेत अ‍ॅनुअल डे ला मुलींचा डान्स बसवलाय टीचरनी ह्या गाण्यावर Sad

दीपांजली, शाळेत अ‍ॅनुअल डे ला मुलींचा डान्स बसवलाय टीचरनी ह्या गाण्यावर <<

शाळेच्या प्रशासनाकडे/मुख्याध्यापकांकडे लेखी निषेध नोंदवा. गाण्याचे बोल अश्लिल आहेत, यांवर अशाप्रकारे डान्स बसवून शाळेत सादर करणे योग्य नाही हे निदर्शनास आणून द्या. इतके केले की डान्स क्यान्सल होईल ताबडतोब.

PTA Meet मधे सरळ शिव्या घाला.

बर्‍यांचदा अनवधानाने काही नवे करायच्या नादात तरूण डान्स टीचर्स असले उद्योग करत असतात. आधी नीट सांगून पहावं. हे उत्तम.

Pages