Dreamum wakeuppam हे नवीन गाणे काही दिवसपूर्वी कानावर आले. आणि कालच पुतण्याला मुंबईत फोन केला तर हे गाणे मागे वाजत होते. कुतूहल चाळवले,म्हणून विचारले तर म्हणाला की हे गाणे तर सुपरहिट आहे...म्हणून डाउनलोड करून काळजीपूर्वक ऐकले तेव्हा मला धक्काच बसला .........................!
संगीत,ठेका ,शब्दोच्चार पद्धत इत्यादि बाबतीत गाणे catchy असले तरी गाण्याचे शब्द आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ अश्लील आहे,असे मला वाटले. अशा गाण्यांना सेन्सॉर बोर्ड परवानगी काशी काय देते बुवा?
..
Aiyyaayo..
Dreamum wakeuppam
Critical conditionum
Hey earthum quakepum
Hil dool sab shakeupum
Face to faceum dharti putram
Thighsum thunderum
Downum underum
Sizeum matterum
Thinkum wonderum
Jumpingum..
Pumpingum..
Throbbingum..
Thumpingum.. (Wune, runde, mune, naale)
Ummhha.. Ummhha..
Heart beatnum
dhol peetnum
Love lust double kasht
bada dheetnum
Yeh.. body heatnum
hot seatnum
Calling fire brigade bhi defeatnum
Same to sameum
Dil me utarum
Thighsum thunderum
Downum underum
Sizeum matterum
Thinkum wonderum
Jumpingum…
Pumpingum
Streelingum..
Pullingum.. (Wune, runde, mune, naale)
Ummhha.. Ummhha.. Ummhha.. Ummhha..
<<<<<<<<<<<<<<सस्मित यांचा
<<<<<<<<<<<<<<सस्मित यांचा प्रतिसाद असा असावा असं मला वाटतं.......
"कॅरेकटर आणि कथेचा संदर्भ, बोल्ड, पब्लिक डिमांड काहीही असो पण हे गाणं अगदीच वाह्यात आहे, असं मला वाटतं. अश्लील आहे असं मला वाटतं. मला अगदी बघवत नाही नाच आणी हावभाव. राणी भयाण, असं मला वाटतं">>>>>>>>>>>>>>>>>>>
गुप्ताजी (सौ.स. त आहे मी) हे माझंच स्वतःचच मत आहे. इथे मला वाटतं तेच मी लिहिते. बहुतेक सगळेच स्वतःचीच मतं लिहितात. दुसर्याला काय वाटतं ते लिहित नाहीत. तरी माझ्या प्रतिसादावर तुमच्या प्रतिसादाच प्रयोजन समजलं नाही. असो. तसेही तुम्ही ड्युआयडी आहात असं मला वाटतय म्हणुन इथेच थांबते.
सिनेमाच्या कथेचा, पात्रांचा
सिनेमाच्या कथेचा, पात्रांचा रेफर्न्स लक्षात घेतला तर हे गाणे मला अजिबात खटकले नाही. मुळातच पुरुषाला ऑब्जेक्टीफाय करणे ही या सिनेमातली एक थीम आहे आणि त्यात हे गाणे अचूक बसते.
एक्झॅक्टली आगाऊ.
एक्झॅक्टली आगाऊ.
वर पेट्रोल पंपाच्या
वर पेट्रोल पंपाच्या दृश्याबद्दल लिहिलं आहे. हे दृश्य या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे. किंबहुना हीच या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
हे गाणे मला अजिबात खटकले
हे गाणे मला अजिबात खटकले नाही. >>>
"हे गाणे सिनेमात का आहे?" ह्या प्रश्नासाठी मूळात हा बीबी आहे का? "गाणे अश्लील आहे का?" असा प्रश्न आहे. आणि नी ने म्हटल्याप्रमाणे कुणाला श्लील वाटते व कुणाला अश्लील हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.!
"हे गाणे सिनेमात उगीचह आहे. काही संदर्भाशिवाय आहे." अशी हेडपोस्ट किंवा प्रतिक्रिया असती तर संदर्भ कसे बरोबर आहेत इ. चर्चा योग्य वाटेल ना! कुठचा विषय कुठे जातो इथे!
<"हे गाणे सिनेमात का आहे?"
<"हे गाणे सिनेमात का आहे?" ह्या प्रश्नासाठी मूळात हा बीबी आहे का? "गाणे अश्लील आहे का?" असा प्रश्न आहे. आणि नी ने म्हटल्याप्रमाणे कुणाला श्लील वाटते व कुणाला अश्लील हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.!>
गाणं अश्लील आहे की नाही, यासाठी ते कुठल्या संदर्भात आले आहे, हे महत्त्वाचंच असतं.
कुठलीही कलाकृती अश्लील ठरवण्याआधी संदर्भ तपासून बघायचे असतात. केवळ काही शब्द आवडले नाहीत, म्हणून त्या कलाकृतीला अश्लील ठरवणं हे अन्याय्य आहे.
मुळात हे गाणे अश्लील"च" आहे.
मुळात हे गाणे अश्लील"च" आहे. द्विअर्थी"च" आहे. सिनेम्यात तसे"च" असायला हवे म्हणूनच त्याचे शब्द तसेच आहेत.
ज्या साऊथच्या गाण्यांवरून हे गाणे इन्स्पायर झाले आहे ते पाहता हे गाणे बरेचसे सौम्य म्हणायला हवे. साऊथ फिल्म इंडस्ट्री म्हणजे मणीरत्नम आणि रहमान नव्हे. त्याव्यतिरीक्त देखील इथे बरेच बी आणि सी ग्रेड सिनेमा बनतात. (किंबहुना, एका विशीष्ट प्रकारच्या सिनेमांची लाट इथूनच आली. अधिक माहितीसाठी द डर्टी पिक्चर बघा!!)
मुळातच पुरुषाला ऑब्जेक्टीफाय करणे ही या सिनेमातली एक थीम आहे आणि त्यात हे गाणे अचूक बसते.>>> स्वामी आगाऊनंद यांनी अचूक रीत्या निदान केलेले आहे.
अश्लीलतेला संदर्भाच्या
अश्लीलतेला संदर्भाच्या वेष्टनात गुंडाळल्याने ते श्लील होत नाही
शेण ते शेणच.
मुळातच पुरुषाला ऑब्जेक्टीफाय
मुळातच पुरुषाला ऑब्जेक्टीफाय करणे ही या सिनेमातली एक थीम आहे आणि त्यात हे गाणे अचूक बसते.>>> है शाबास!! एकदम परफेक्ट.
आणि गाणं अश्लील असलं म्हणून काय बिघडलं? इतकी ढीगभर अश्लील गाणी येतात, त्यातलंच हे एक. अगदी बाफ उघडून चर्चा करण्यासारखं काय आहे एवढं त्यात?
पिक्चर पूर्ण होऊन गाणं
पिक्चर पूर्ण होऊन गाणं टीव्हीवर लागून्, मग पिक्चर रीलीज होऊन दणकन आपटून टीव्हीवर येऊन मग इथे चर्चा होतेय.
फारच तत्पर चर्चा.
<< Downum underum Sizeum
<<
Downum underum
Sizeum matterum
Thinkum wonderum
Jumpingum…
Pumpingum
Streelingum..
Pullingum.. (Wune, runde, mune, naale)
Ummhha.. Ummhha.. Ummhha.. Ummhha..
>>
इथे लक्ष द्या जरा......................
फॅन्टसीमधेही एकतारी घेऊन
फॅन्टसीमधेही एकतारी घेऊन केशवा माधवा गात असल्यासारखे का करतायत सगळे?
फॅन्टसीमधेही एकतारी घेऊन
फॅन्टसीमधेही एकतारी घेऊन केशवा माधवा गात असल्यासारखे का करतायत सगळे?

>>
निंबू +१
एकतारी घेऊन केशवा माधवा गात
एकतारी घेऊन केशवा माधवा गात असल्यासारखे का करतायत सगळे?>>
आगाऊ, नंदिनी +१. मला आवडलं
आगाऊ, नंदिनी +१.
मला आवडलं गाणं, भारी बसवलय. रानीनी कितीही वेडावाकडा डान्स केला तरी वल्गर वाटत नाही (मला
) आणि त्यामुळे आणखिनच विनोदी वाटतं ते. गाण्यात सुद्धा मुद्दाम ओवर द टॉप फेशियल एक्स्प्रेशन्स हे मुद्दाम स्पूफ च्या दृष्टिनी आणलेत जे रानी आणि पृथ्वी मस्त वठवतात. पृथ्वी येवढा आडदांड वाटला तरी रानीच्या बरोबरीनी किंवा काही वेळा तर तिच्या पेक्षा ठेक्यात आणि झोकात नाचतो.
तुम्हांला हे गाण इतका का खटकत
तुम्हांला हे गाण इतका का खटकत ????
बाकीची किती तरी अश्लील गाणी आहेत ज्यावर कैट बाई आनि करीना पण नाचली आहे.... रावडी मधल गाण तर सेन्सॉर ने कस पास केल काय माहीत ?????
ही सरळ सरळ अश्लील शब्द असलेली गाणी सोडुन ह्याच गाण्यावर का इतकी चर्चा.. जे एकताना नीट समजत पण नाही.. ????
लईच मनोरंजक चर्चा. मला आचार्य
लईच मनोरंजक चर्चा. मला आचार्य अत्रेंनी अश्लीलताविरोधी कमिटीविरुद्ध केलेले विनोद आठवून आणखीच हसू येतंय.
मंजूडीला अनुमोदन
फॅन्टसीमधेही एकतारी घेऊन
फॅन्टसीमधेही एकतारी घेऊन केशवा माधवा गात असल्यासारखे का करतायत सगळे?>>>>>>
गाणं अश्लील आहे की नाही,
गाणं अश्लील आहे की नाही, यासाठी ते कुठल्या संदर्भात आले आहे, हे महत्त्वाचंच असतं.
कुठलीही कलाकृती अश्लील ठरवण्याआधी संदर्भ तपासून बघायचे असतात. केवळ काही शब्द आवडले नाहीत, म्हणून त्या कलाकृतीला अश्लील ठरवणं हे अन्याय्य आहे.<<<
पटले नाही.
एक शंका:
'एका बलात्कारितेने दिलेला झगडा' अशी थीम असलेल्या चित्रपटात तिच्यावर झालेला बलात्कार पूर्ण तपशीलवार दाखवणे हे तुमच्यामते अश्लील ठरत नाही का?
श्लील - अश्लीलतेच्या व्याख्या जश्या ज्याच्या त्याच्या असतात त्याचप्रमाणे त्यांच्याबाबत त्या त्या प्रदेशातील एक अलिखित निकषही असू शकतो असे मला वाटते. फार पूर्वी चुंबनाच्या सीनवेळेस फुले वगैरे दाखवायचे तेव्हा हाच अलिखित निकष कार्यान्वीत झालेला असायचा. तो पुढे पुढे उदारपणे सैल होत गेला व आता फारच अंधुक झाला आहे, तरीही अस्तित्वात आहे. आगापीछा पाहून ते गीत अश्लील आहे की नाही हे ठरवावे या मतासहितच सध्याच्या सैलावलेल्या का असेनात पण निकषानुसार ते अश्लील आहे की नाही हेही बघितले जाणार असे वाटते.
त्यामुळे निव्वळ शब्दरचना पाहिली तर ते अश्लील वाटणे हेही गैर नाही असे वाटते.
गाण्याचे शब्द जरी अश्लील
गाण्याचे शब्द जरी अश्लील वाटले तरी पडद्यावर ते कसं चित्रित झाले आहे त्यानेही फरक पडतो. उदा. चोलीके पीछे गाण्याचे बोल वाह्यात असले तरी माधुरीने त्यावर तसा बराच संयमित नाच केला आहे.
थोडसं अवांतर - गाण्याच्या बोलांवरून उठलेला गदारोळ हा प्रकार तसा खूपच जुना आहे. नौ दो ग्यारह मधे देव आनंदचं गाणं आहे ' आखोंमे क्या जी' त्यातल्या 'आंचल मे क्या जी- अजबसी हलचल' या शब्दांवरून बरंच वादळ उठलं होतं.
तसंच बर्मनदांनी एक आठवण सांगितली आहे. टक्सी ड्रायवर या चित्रपटातली सगळी गाणी लतादीदींनी गायली होती. अपवाद जीने दो और जियो हे गाणे. त्यातल्या 'चढती जवानी के दिन है' या शब्दांना लतादीदींनी आक्षेप घेतला त्यामुळे शेवटी ते गाणे आशाने गायले.
अनू
अनू
मला तरी ऐकल्यावरच आवडलं
मला तरी ऐकल्यावरच आवडलं बुवा.. चित्रपट पहायचं भाग्य अजून लाभलं नाहीये.
बरचसं वेगळं, शब्दांना पूर्ण न्याय देणारं असं कंपोझिशन व गायकी देखिल आहे..किंबहुना "संगीतकार" म्हणून याला संगीत द्यायला नक्कीच आवडलं असतं.. नक्कीच सोपे काम नाहीये..
मुळात गाण्यातले शब्द तर फारच realistic आहेत. किंबहुना अगदी टेक्निकली देखिल योग्यच आहेत..

ते "सालंकृत" असयालाच हवेत असे काही आहे का...? मग फक्त लावण्यांवरच तहान भागवावी लागेल किंवा तसं असेल तर ऑल टाईम हीट गाणे (जे मलाही आवडते)- "तुम्हावर केली मी मर्जी बहाल" (पिंजरा) यातील हे शब्द-
"या बसा मंचकी सुटेल गुलाबी कोडं".. हे ऐकून तर फीटच यायला हवी नाही का?
(वस्तूस्थिती अशी आहे की ईतके चपखल शब्द साक्षात शेक्सपियरभाऊंना देखिल सुचले नसतील!)
किंवा दादा (कोंडकेंची) अनेक फेमस द्वयर्थी गाणी आहेतच की..
(revenge is dish best served cold च्या तालावर), शॄंगार, काम वासना वगैरे वगैरे देखिल तशाच कच्च्या, सच्च्या, निगरगट्ट, अधिक अपिलिंग वाटतात..
काही गाणी श्रवणीय असतात, काही बघणीय, काही प्रेक्षणीय, काही गुणगुणीय, काही ट्रिप मध्ये निव्वळ दंगा करताना गाण्यासाठी, काही टेक्नोफ्युजनीय, काही ईतर काही...
तेव्हा, एव्हडा गजहब आणि वाद कसला बुवा..?
>>'एका बलात्कारितेने दिलेला झगडा' अशी थीम असलेल्या चित्रपटात तिच्यावर झालेला बलात्कार पूर्ण तपशीलवार दाखवणे हे तुमच्यामते अश्लील ठरत नाही का?
बेफिकीर, मुद्दा बरोबर आहे पण "टोकाची भूमिका" वाटते.. त्या फूटपट्टीवर मोजायचे तर गाणे नक्कीच अश्लील नाही.
>>संगीत,ठेका ,शब्दोच्चार पद्धत इत्यादि बाबतीत गाणे catchy असले तरी गाण्याचे शब्द आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ अश्लील आहे,असे मला वाटले.
छे! हे तर अगदीच काहीच्या काही... ऊत्तान (loud treatment) एकवेळ वाटू शकेल पण अश्लील नाहीच!
हा आता यात काही साहित्यिक मूल्य आहे का..? लहान मुलांबरोबर वगैरे बसून बघायचे का? असल्या टिपिकल प्रश्णांची ऊत्तरे ज्याची त्यानेच शोधायची!
च्यामारी किती वर्षे "डीनायल मोड" मध्ये जगणार आहोत आपण?
>>अशा गाण्यांना सेन्सॉर बोर्ड परवानगी काशी काय देते बुवा
जाऊदे हो त्यांना ईतरही कामे असतात...
त्यामुळे निव्वळ शब्दरचना
त्यामुळे निव्वळ शब्दरचना पाहिली तर ते अश्लील वाटणे हेही गैर नाही असे वाटते.
>>
करेक्ट. मलाही तेच म्हणायचे होते.
चर्चेचा एकंदर रागरंग बघता, ह्या धाग्याचे नावे "हल्लीच्या चित्रपटातील आयटम साँग्स तुम्हाला अश्लील वाटतात का?" असे असायला हवेय असे वाटतेय. म्हणजे ह्या एकाच गाण्यावर कॉन्सन्ट्रेट करायला नको. मुन्नी, शीला, फेविकॉल, थर्माकॉल, सगळे येऊ द्या!
नौ दो ग्यारह मधे देव आनंदचं गाणं आहे ' आखोंमे क्या जी' त्यातल्या 'आंचल मे क्या जी- अजबसी हलचल' या शब्दांवरून बरंच वादळ उठलं होतं.
>>
मलाही तीच आठवण झाली होती.
उदा. चोलीके पीछे गाण्याचे बोल
उदा. चोलीके पीछे गाण्याचे बोल वाह्यात असले तरी माधुरीने त्यावर तसा बराच संयमित नाच केला आहे.<<<
ते नृत्य संयमीत आहे हे मान्य. पण त्यामागे नृत्यदिग्दर्शकाची व दिग्दर्शकाचीही भूमिका आहे. त्यांनी नृत्य वाह्यात होऊ दिलेले नाही. असे करण्यामागे माधुरीची पडद्यावरची इमेज बिघडू नये हाही एक विचार सर्वानुमते महत्वाचा ठरला असावाही. त्याशिवाय सेन्सॉर हरकत घेईल, संघटना रस्त्यावर येतील, हेही असू शकेल. (उदाहरण: ममता कुलकर्णीने दिलेले चित्र व गदारोळ, अश्या गोष्टींचे प्रभाव नृत्य संयमीत साकारण्यावर असतीलही). (एक तुलनाच करायची झाली तर - माझ्यामते - दृष्य स्वरुपात चोली के पीछे या नृत्यापेक्षा सैलाबमधील माधुरीचे 'हमको आजकल है इंतजार' हे अधिक भडक वगैरेआहे), पण शब्दरचना बरीच सौम्य आहे).
हे सर्व लिहिण्याचे कारण असे की मूळ धाग्यात धागाकर्त्याने केलेले हे विधानः
>>> म्हणून डाउनलोड करून काळजीपूर्वक ऐकले तेव्हा मला धक्काच बसला .........................! त्यातून व्यक्त होणारा अर्थ अश्लील आहे,असे मला वाटले<<<
येथे निव्वळ गीताची शब्दरचना व तिचा अर्थ अशी चर्चा - खरे तर - अपेक्षित असेल.
(अवांतर - चार सहा वर्षाची मुले 'पुल्लिंगं, स्त्रीलिंगं' करत बागडू लागली तर पालक स्वतःच्या मनाला 'शब्दांमागे जे कथानक आहे त्या संदर्भात मुलांचे हे बागडणे आपण बघायला हवे' असे समजावून सांगतील का?)
-'बेफिकीर'!
चार सहा वर्षाची मुले
चार सहा वर्षाची मुले 'पुल्लिंगं, स्त्रीलिंगं' करत बागडू लागली तर पालक स्वतःच्या मनाला 'शब्दांमागे जे कथानक आहे त्या संदर्भात मुलांचे हे बागडणे आपण बघायला हवे' असे समजावून सांगतील का? >>>
खूप मनापासून हसतेय!
भंगार गाणे... या धाग्यामुळे
भंगार गाणे... या धाग्यामुळे यात नक्की काय शब्द आहेत ते कळ्ळे.
न आवडलेले गाणे संपूर्ण ऐकून, ते सगळं लिहून काढण्याचे कष्ट घेतले....कशासाठी?
मला हेच कळत नाही की शीला की
मला हेच कळत नाही की शीला की जवानी मधलं ' I am too sexy for you' किंवा चिकनी चमेली मधलं ' जोबन ये मेरा कैची है राजा सारे पर्दोको काटूंगी मै' असे शब्द चालतात तर फक्त याच गाण्यावर आक्षेप घेण्यासारखे काय आहे? का शब्दांपेक्षा गाण्याच्या चित्रिकरणावर जास्त आक्षेप आहे?
मला हेच कळत नाही की शीला की
मला हेच कळत नाही की शीला की जवानी मधलं ' I am too sexy for you' किंवा चिकनी चमेली मधलं ' जोबन ये मेरा कैची है राजा सारे पर्दोको काटूंगी मै' असे शब्द चालतात तर फक्त याच गाण्यावर आक्षेप घेण्यासारखे काय आहे? का शब्दांपेक्षा गाण्याच्या चित्रिकरणावर जास्त आक्षेप आहे?<<<
त्यांनी एका गाण्यावर आक्षेप घेतला आहे, त्यांचे असे म्हणणे नाही की असे दुसरे गाणेच नाही आहे, हेच फक्त गाणे अश्लील आहे वगैरे!
हे तर आहेच पण इतर उल्लेख केली
हे तर आहेच पण इतर उल्लेख केली गेलेली गाणी पण भंगार आहेत.
कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचा प्रकार आहेत.
देवआनंद, पिंजरा, इ. गीतांबरोबर तुलना केली आहे पण ती शब्दरचना, चित्रीकरण, इ. अतिशय संयमित होते.
या धाग्यावर बेफींशी सहमत
या धाग्यावर बेफींशी सहमत
आजकालच्या पालकांची मेंट्यालिटी पहाता उद्या एकाद्या ट्यालेंट शो मधे या गाण्यावर यांनी आपल्या मुला मुलींना नाच करायला परवानगीच नाही, तर स्वतःच सुचवले तर नवल वाटेलच असे नाही.
Pages