Dreamum wakeuppam हे नवीन गाणे काही दिवसपूर्वी कानावर आले. आणि कालच पुतण्याला मुंबईत फोन केला तर हे गाणे मागे वाजत होते. कुतूहल चाळवले,म्हणून विचारले तर म्हणाला की हे गाणे तर सुपरहिट आहे...म्हणून डाउनलोड करून काळजीपूर्वक ऐकले तेव्हा मला धक्काच बसला .........................!
संगीत,ठेका ,शब्दोच्चार पद्धत इत्यादि बाबतीत गाणे catchy असले तरी गाण्याचे शब्द आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ अश्लील आहे,असे मला वाटले. अशा गाण्यांना सेन्सॉर बोर्ड परवानगी काशी काय देते बुवा?
..
Aiyyaayo..
Dreamum wakeuppam
Critical conditionum
Hey earthum quakepum
Hil dool sab shakeupum
Face to faceum dharti putram
Thighsum thunderum
Downum underum
Sizeum matterum
Thinkum wonderum
Jumpingum..
Pumpingum..
Throbbingum..
Thumpingum.. (Wune, runde, mune, naale)
Ummhha.. Ummhha..
Heart beatnum
dhol peetnum
Love lust double kasht
bada dheetnum
Yeh.. body heatnum
hot seatnum
Calling fire brigade bhi defeatnum
Same to sameum
Dil me utarum
Thighsum thunderum
Downum underum
Sizeum matterum
Thinkum wonderum
Jumpingum…
Pumpingum
Streelingum..
Pullingum.. (Wune, runde, mune, naale)
Ummhha.. Ummhha.. Ummhha.. Ummhha..
आपण (ह्यात मी सुद्धा आलो)
आपण (ह्यात मी सुद्धा आलो) माध्यमांच्या नावानी बोंब मारुन काहीच होणार नाही. >> बुवा, देशात ५-६ पासुन सगळ्या वर्षाच्या मुलांना टीवी वर सगळं दिसतं.
टीवी आपला नसला तरी शेजार्याचा, नातेवाईकांचा
असतो.
इतकी वाईड्स्प्रेड गोष्ट थांबवण्म, सोसायटी पासून आय्सोलेटेड राहिल्यासच जमवता येते.
त्यामुळे पॅरेंट्ल गायड्न्स असावा वगैरे प्रॅक्टिकली जमवणं अवघड आहे.
>>या गाण्या वर नाचताना दिसली,
>>या गाण्या वर नाचताना दिसली, बाकी तिघे मोठे होते पण एक बाल कलाकार या गाण्यावर नाचताना अतिशय इनअॅप्रोप्रिएट वाटलं>><<
का बरं?
ह्यावरून विचारावस वाटलं,
गाणं अश्लील नाही, चला मान्य केलं काहींनी.
आता त्याच मोकळ्या (open mind) मनाने गाणं अश्लील नाही म्हणणारे (सर्वच बाबतीत म्हणजे शब्दातून, प्रक्षेपण, धून वगैरे) अश्लील नाही असा अर्थ घेवून किती जणं ह्या गाण्यावर आपल्या लहान मुलाला/मुलीचा असा नाच बसवतील? कि तो नाच सुद्धा एक 'कला' आहे असे समजून ह्या गाण्यावर भाग घ्यायला उत्तेजन देतील लहान मुलांना?
(चला, आता दांभिक उत्तरे मिळणार का... कशी ते पाहुया....?)
(आधी एका कुठल्या तरी बीबीवर प्रतिसाद वाचलेला आठवतोय अश्याच आयडीचा, की लहान मुलांचे अश्या (अश्या म्हणजे त्यांनाच माहीती 'कश्या' त्या) गाण्यांवर आजकाल नाच बसवतात व आई वडील टाळ्या वाजवतात.. मग गाण अश्लील नाहीये तर का मग अशी कमेंट त्याच लोकांची ? हे जरा समजून घ्यावेसे वाटले. )
हे आपण मला विचारलेत का? (इथे
हे आपण मला विचारलेत का?
(इथे मी=इब्लिस. व अशोक पाटील सरांनी या अर्थाचे लिहिले आहे. -आई वडिलांचे टाळ्या वाजविणे- याच धाग्यावर. समजून घ्यावेसे वाटून घेण्या पूर्वी कुणि कशाला टाळ्या वाजवल्या हे पहाण्याचे कष्ट घ्यावेत माणसाने. ३ पाने वाचणे फारसे कठीण नसेल.)
>>या गाण्या वर नाचताना दिसली,
>>या गाण्या वर नाचताना दिसली, बाकी तिघे मोठे होते पण एक बाल कलाकार या गाण्यावर नाचताना अतिशय इनअॅप्रोप्रिएट वाटलं>><<
का बरं?
<<<<
कारण सिनेमातलं गाणं " त्या' सिचुयेशन ला" बेडरुम फँटसी' सीन मधे असणं वेगळं आणि ज्या बालवयात समज नसते काय गाणं आहे , काय शब्द त्याचा अर्थ काय 'त्या वयात ' हे गाणं किंवा कल सैंया ने ऐसी बॉलिंग करी/ रुख्मिणी रुख्मिणी- हलकट जवानी-शीला कि जवानी' इ. एज इनअॅप्रोप्रियेट गाण्यावर डान्स परफॉर्म करणं २ वेगळ्या गोष्टी आहेत म्हणून.
इब्लिश, तुम्हाला नाही
इब्लिश, तुम्हाला नाही विचारलेले. तेव्हा उगाच डोकेफोड नको. हा बराच आधीचा रेफरेन्स आहे.
दिपांजली, धन्यवाद उत्तराबद्दल.
नात्या, ताबडतोब मुलांशी
नात्या, ताबडतोब मुलांशी बोललं पाहिजे असं मी म्हणत नव्हतोच. शेजारच्यांकडे जरी बघितलं तरी आपल्यासमोर गुणगुणणार, उल्लेख करणार नाहीत का?
थोडक्यात, आपल्याला कळ्ल्यावर आपण काय करायला पाहिजे हा मुद्दा होता.
इब्लिस, आपल्या इथल्या
इब्लिस,
आपल्या इथल्या प्रतिसादास १००% अनुमोदन.
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद पैलवान. अन नाताळच्या
धन्यवाद पैलवान.
अन नाताळच्या शुभेच्छा!
इब्लिस, आपल्यालाही नाताळाच्या
इब्लिस, आपल्यालाही नाताळाच्या शुभेच्छा!
आ.न.,
-गा.पै.
१००%
१००%
इब्लिस आणि गामा पैलवानांचा
इब्लिस आणि गामा पैलवानांचा नाताळनिमित्त सौजन्य सप्ताह चालू झालेला दिसतोय.

दीपांजलीचा प्रतिसाद मार्मिक आहे, आवडला.
<<फॅन्टसीमधेही एकतारी घेऊन
<<फॅन्टसीमधेही एकतारी घेऊन केशवा माधवा गात असल्यासारखे का करतायत सगळे?>>
'हे गाणे अश्लील नाही' असे
'हे गाणे अश्लील नाही' असे सरसकट स्टेटमेंट इथे कोणीही केलेले मला दिसले नाही. जे गाण्याच्या बाजूने बोलताहेत ते इतकेच म्हणत आहेत की ते गाणे जसे काही आहे, तसे ते असण्यास हरकत नाही.
त्यामुळे लगेच 'तुमच्या मुलांना नाचवाल का' वगैरे आक्रस्ताळेपणा करणे हे मुद्दे संपल्याचे लक्षण आहे असे समजावे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या समाजमान्य आहेत, योग्य आहेत आणि तरीही मुलांना त्यापासून दूर ठेवावे लागते अशा आहेत.
बाकी गाण्याबद्दल म्हणाल तर-
लग जा गले के फिर ये हसीं रात हो न हो
तेरी दो टकियेकी नौकरी में मेरा लाखोका सावन जाये
तिसरा कोई दूर तक नहीं.. जानम समझा करो
काढायचाच ठरवला तर यातूनही बराच अर्थ काढता येईल. कुठलीही गोष्ट out of context पाहिली तर खटकू शकते. त्यात चुकीचे काही नाही. पण मला खटकली म्हणजे सगळ्यांनाच खटकली पाहिजे असा आग्रह धरणे चूक आहे.
ज्ञानेश, त्या यादीत १. मालवून
ज्ञानेश,
त्या यादीत
१. मालवून टाक दीप
२. तरूण आहे रात्र अजूनी (जे आई मुलासाठी गात नाही!)
३. मलमली तारूण्य माझे
अशी पण गाणी घे.
इब्लिस आणि गामा पैलवानांचा
इब्लिस आणि गामा पैलवानांचा नाताळनिमित्त सौजन्य सप्ताह चालू झालेला दिसतोय.
इथे शिमगा सुरूच आहे 
..
<<
पण नाताळ आहे ना म्हणून
ज्ञानेश, काही गोष्टी
ज्ञानेश,
काही गोष्टी मुलांपासून दूर ठेवाव्यात हे मान्य. पण ही बंधने घालणारी कोणी एक नियंत्रक शक्ती नाही. जर मुलांनी हे गाणं ऐकून त्यावर नाच करायला घेतला तर आपण संदर्भ समजून घ्यावा का, हा सवाल आहे. की हस्तक्षेप करून नाचगाणं थांबवावं?
आ.न.,
-गा.पै.
मुलं स्वतः म्हणून नाच बसवायला
मुलं स्वतः म्हणून नाच बसवायला जातात असं क्वचित घडतं. नृत्य-शिक्षक/शिक्षिका आणि त्याना नाही जमलं तर पालक यानी ठरवायला हवं की आपल्या मुलाला कोणत्या वयात काय शिकवावं....
(एका दिवाळी कार्यक्रमात मी ५-७ वयोगटाने केलेला 'बारा महिनेमें बारा तरीकेसे तुझको प्यार सिखाऊंगा रे..' पाहिलाय.. )
प्रणयातील प्रेम भावना काढुन
प्रणयातील प्रेम भावना काढुन त्यात थोडासा बीभत्स रस ओतला की अश्लीलता येते असे वाटते.
अर्थात हे निकष व्यक्तिनुसार बदलतात हे देखिल मान्य.
एकंदरीत असे गाणे चित्रपटात असणे अयोग्य नाही, अर्थात अल्पवयीन मुलांनी असे गाणे सादर करावे (प्रेक्षकवर्गाचेही भान ठेउन ) हे अयोग्यच.
मराठी 'गन्ध' सिनेमाची हा
मराठी 'गन्ध' सिनेमाची हा सिनेमा कॉपी आहे. हिन्दीत बरेचसे ढापलेले आहे. मराठीमधे अमॄता सुभाष आहे.
तू-नळी वर मराठी सिनेमा आहे
http://www.youtube.com/watch?v=cWC2hQ-rrVg&playnext=1&list=PLOsJ8izdKPvm...
निलिमा, तुम्ही केलेली
निलिमा, तुम्ही केलेली अश्लीलतेची व्याख्या अगदी सुस्पष्ट आहे. धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.
गंधचा दिग्दर्शक व अय्याचा
गंधचा दिग्दर्शक व अय्याचा दिग्दर्शक ही एकच व्यक्ती आहे.
गंध मधील एका कथेवरून हा सिनेमा घेतलाय हे त्यांनी पहिल्यापासून स्पष्ट सांगितलेले होते.
नवीन काहीतरी शोध लागल्यासारखे ढापलेय बिपलेय काय?
अश्लिल-बिश्लिल असं काहीच नसतं
अश्लिल-बिश्लिल असं काहीच नसतं हो. एव्हरीथिंग इज स्टेट ऑफ माइंड.
घाण आपल्या डोक्यात असते ती काढून टाकली की बाहरेच्या जगातील गोष्टी वेगळ्या दिसू लागतात.
निधप्--मला म्हणायचे होते की
निधप्--मला म्हणायचे होते की बराचसा भाग अगदि तसाच घेतलेला आहे. शब्द चुकले त्याबद्दल क्षमस्व.
हे गाणं पाहुन प्रचंड हसलो ,
हे गाणं पाहुन प्रचंड हसलो , एकदम भारीय गाणं .
खूप दिवसांनी पुन्हा एकदा
खूप दिवसांनी पुन्हा एकदा बघीतला अय्या चित्रपट. यावेळी मैत्रिणीबरोबर! हहपुवा नुसती. लय म्हणजे लय म्हणजे लयच आवडला मैत्रिणीला पण! अगदी अंदाज अपना अपना, हेराफेरी, वेलकम या ऑल टाईम आवडत्या विनोदी चित्रपटांत. राणीने मराठी उच्चारांवर मेहनत घ्यायला हवी होती हे बाजिराव बघितल्यामुळे यावेळी सारखं सारखं वाटत होतं, शेवटच्या बडबडीच्यावेळी जास्तंच!
नाच रे मोरा कडे नवीन अँगलने
नाच रे मोरा कडे नवीन अँगलने बघायला लावल्याबद्दल धन्यचवाद !
Pages